मुक्तक

नवे देव आणि त्यान्चे नवे भाव

शेखरमोघे's picture
शेखरमोघे in जे न देखे रवी...
4 Jan 2014 - 1:36 pm

भाव तेथे देव, मग नवीन देव आले तर नवीन नकोत का भाव?
विसरा जुनी माहिती, जुन्या पद्धती, खूप ऐकले असेल भाव तेथे देव,
पण आता नवीन पद्धती आणि त्यांत "भाव" कसा ठरवावा हे माहीत आहे काय?
"प्रयत्नांती परमेश्वर" असेल अनेकदा ऐकलं, पण त्याचाच आता नवा "अर्थ" काय ?

भाषा बदलते आहे, "अर्थ" बदलत आहेत, नवीन वारा वाहतो आहे, लक्ष द्या नीट
नवी भाषा, नवे "अर्थ", जाणू शकलात तर व्हाल प्रत्येक चित्रपट आणि नाटकासारखे (सुद्द लेकनाची ऐसी तैसी) "हीट"

मुक्तक

सामान्य

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in जे न देखे रवी...
4 Jan 2014 - 1:18 pm

तसा कविता हा माझा प्रांत नाही. फार्फार वर्षांपूर्वी कोणे एके काळी लिहिलेली ही कविता आज जुने कागद धुंडाळताना समोर आली. म्हटले टाकूया मिपावर. होऊ द्या खर्च, मिपा आहे घर्चं :)

तुझ्यासाठी,
आकाशातील नक्षत्रे काही
मी खूडून आणणार नाही
कारण मला हातच नाहीत

पायपीट करणार नाही
सातासमुद्रापलिकडिल सुवर्णकमळासाठी
कारण मला पायच नाहीत

तुझे उखाणे, तुझी कोडी
गोडगोड लाडीगोडी
अय्या आणि इश्श्य् गडे
मला आहे समजणार थोडे(च) ?
कारण मला डोकेच नाही

मुक्तक

त्रास

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
24 Dec 2013 - 12:39 am

मागच्या महिन्यात माझ्या मुलीचा वाढदिवस होता.म्हणून आम्ही मुलुंडलाच एका चिनी आणि थाय खाद्यसेवा देणारया हॉटेलात जायचे ठरविले होते.मुळात मधलाच वार असल्याने हॉटेलात गर्दी नसेल म्हणून आम्ही जायचे ठरविले होते.माझा दवाखाना साडेआठला बंद होतो. त्यादिवशी आठ पंचवीसला कोणी रुग्ण नाही म्हणून मी माझ्या स्वागत सहाय्यीकेला दवाखाना बंद करायला सांगून जिना उतरत होतो. आता शांतपणे हॉटेलात बसून छानपैकी जेवूया या विचारत होतो. एवढ्यात एक तरुण जोडपे पंचविशीच्या आत बाहेर ( बायको पंचविशीच्या आत आणि नवरा पंचविशीच्या बाहेर) चिंताक्रांत चेहेर्याने समोरून येताना दिसले.

मुक्तकप्रकटन

गारठा!

amit_m's picture
amit_m in जनातलं, मनातलं
23 Dec 2013 - 11:36 pm

नको वाटणाऱ्या अलार्मच्या कर्कश्य आवाजाने त्याला जाग आली…तो उठून बसला…यांत्रिकपणे करायच्या पुढच्या सगळ्या हालचाली आता अंगवळणीच पडलेल्या. उत्तररात्रीच्या त्या अखेरच्या प्रहरात शुभ्र चांदणं पसरलेलं.

"थंडी आहे रे खूप…असुदे" म्हणत आईनं बळेच दिलेल्या गोधडीकडे पाहताना त्याला लहानपणीचा गारवा आठवला.

मुक्तकप्रकटन

चायवाला -!_/~

तुमचा अभिषेक's picture
तुमचा अभिषेक in जनातलं, मनातलं
22 Dec 2013 - 11:18 pm

काल आमच्या ऑफिसच्या चायवाल्याने गोंधळ घातला. घाबरला बावरला, डोळ्यात पाणीही आले बिचार्‍याच्या. २२-२४ वर्षांचा मुलगा म्हणजे अगदीच काही लहान नाही, आपला तर खास फंटर ! कधी आपण जागेवर नसलो तरी आठवणीने चहा ठेवतो.. बघावे तर तसे हे एकच कारण, खास असण्याचे. पण ज्या आपुलकीने चहा पाजतो त्याने स्वताला खास झाल्यासारखे वाटते. म्हटलं तर कुठलीही देवाणघेवाण हा एक धंदाच, पण त्यात थोडा भावनांचा ओलावा आला की त्याचे आपलेच एक नाते बनते. काल कदाचित त्याच नात्याने त्याला तारले.

मुक्तकरेखाटनलेख

प्रामाणिक मत

इंद्रधनुष्य's picture
इंद्रधनुष्य in जनातलं, मनातलं
21 Dec 2013 - 4:55 am

आपुलकी, प्रेमभाव, माया ममता हे शब्द नुसत्या कानालाही किती गोड वाटतात. शब्दांचा स्पर्शही आकर्षक, मनोवेधक वाटतो. अनुभव तर सोडाच मायेची दोन शब्दासुद्धा दोना जन्मीचे पारणे फेडून जातात. शरीराची कसकस, मनाची धगधग शांत करुन एक मऊ मुलायम पांघरूण घालून जातात. सुखावून जीवाला पुनश्च धड़पडण्याची , जगण्याची जिद्न्यासा देतात.

मुक्तकविचार

डिसेंबर (२)

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
15 Dec 2013 - 12:23 am

मागील दुवा : डिसेंबर http://misalpav.com/node/26361

डिसेंबरात रात्री मात्र चांदण्यांचे झाड फुललेलं असते. रोहीणी सप्तऋषी स्वाती चित्रा सगळी नक्षत्रे झगमगत असतात. दक्षिणेकडे अगस्तीचा तारा स्वतन्त्र आस्तित्व दाखवत असतो. सिंह राशीतलं उलट प्रश्नचिन्ह वृषभ राशीतल्या कृत्तिकेचा पुंजका, हे आकाशात अक्षरशः हिरेमाणके असावी तसे लखलखत असतात. हे कमी पडेल वाटले म्हणून की काय वृश्चिक राशी इंग्रजी एस आकारात आकाश व्यापून त्यातल्या अनुराधा मूळ ज्येष्ठा नक्षत्रानी दिवाळी साजरी करत असते.

मुक्तकप्रतिभा

मुंबई कट्टा

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
14 Dec 2013 - 6:26 pm

आजच सकाळी मुक्त विहारींकडून असे कळले कि श्री इस्पिकचा एक्का भारतात आले आहेत आणी पुण्यात वास्तव्याला आहेत. आपण त्यांना भेटूया असे आम्ही ठरविले आहे. त्यावर मी त्यांना दूरध्वनी( हा मुक्त विहारीनीच दिला) केला आणी ते शनिवार दिनांक २१ डिसेम्बर रोजी परत विदेशी जात आहेत. त्यांचे विमान सायंकाळी ७.३० ला सुटत आहे आणी त्यांना ४.३० ला चेक इन करायचे आहे म्हणून आम्ही त्यांना सहार विमानतळाजवळ एखाद्या हॉटेल मध्ये साधारण २ वाजता भेटायचे ठरविले आहे.
ज्या मित्रांना तेथे येण्याची इच्छा आहे त्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे.

मुक्तकप्रकटन

सखे ..........

विनय_६६७'s picture
विनय_६६७ in जनातलं, मनातलं
9 Dec 2013 - 6:03 pm

सखे ,

खर सांगू , आता न खूप हलके वाटतेय! खर तू परत आलीस, यावर विश्वास बसतच नव्हता. का कुणास ठाऊक, तुझ्यात ती पूर्वीची तू दिसत नव्हतीस, आणि ते तू कबुल हि केलेस. एरव्ही माझ्या एका शब्दाला तुझे १० शब्द असायचे पण आज ? चक्क तू ? तूच होतीस ती ? कदाचित माझ्या जागी तू जरी असतीस तरी विश्वास ठेवला नसतास यावर. शांतपणे म्हणालीस तू ‘’ .... मी आता तिला ( माझ्या त्या पूर्वीच्या ) ..... मारून टाकलेय.

मुक्तक