मुक्तक

अजित डोवाल : बस नाम हि काफी है

पिंपातला उंदीर's picture
पिंपातला उंदीर in जनातलं, मनातलं
31 May 2014 - 11:56 am

"It is not always easy. Your successes are unheralded--your failures are trumpeted."
President John F. Kennedy, CIA Headquarters, 28 November 1961

मुक्तकप्रकटन

एक विलक्षण अनुभव

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
25 May 2014 - 12:21 am

आताच दोन आठवड्यापूर्वी जे इ इ मेन चा लागला. मुलाचा निकाल फारसा चांगला आला नाही. तो आय आय टी च्या मुख्य परीक्षेसाठी अपात्र ठरला. आम्ही सुद्धा दोन दिवस बर्यापैकी निराश होतो. पण यात आपले नैराश्य बाजूला ठेवून मुलाला धीर देण आवश्यक होते त्यामुळे चेहेर्यावर तसे काही दिसू न देता आम्ही त्याला पुढच्या परीक्षांसाठी उत्तेजन देत होतो. तीन चार दिवसात गाडी रुळावर आली.

मुक्तकप्रकटन

'आजचा भारत' आणि 'नाझी भस्मासुराचा उदयास्त'

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in काथ्याकूट
22 May 2014 - 6:03 pm

इतिहास म्हणजे भूतकाळात यदृच्छया घडलेल्या, व वरवर पाहता विस्कळित, असंबंधित भासणाऱ्या घटनां असून, त्यामागे काही योजनेचे सूत्र असते; म्हणजे ह्या घटनांत एक साचा, आकृतिबंध (पॅटर्न) असतो; इतिहासात उलगडत जाणाऱ्या ह्या आकृतिबंधात इतिहासाचा ‘अर्थ’ सामावलेला असतो हा आकृतिबंध समजून घेण्यानेच, आपल्याला वर्तमान परिस्थितीचा अर्थ, तिच्यात गर्भित असलेल्या प्रवृत्ती आणि ह्या प्रवृत्तींमुळे जो भविष्य वर्तमानातून अटळपणे उद्‍‌भवणार आहे, तो भविष्यकाळ ह्या साऱ्यांचे आकलन होऊ शकते
(संदर्भ: मराठी विश्वकोश)

मुंगळा थिअरी

स्पा's picture
स्पा in जनातलं, मनातलं
22 May 2014 - 2:32 pm

एक मित्र आहे माझा,मैत्रीला वयाचे बंधन नसते म्हणतात तसे,बाबांच्या वयाचा आहे माझ्या,पण मी त्याला अरे तुरेच करतो.कधीतरीच बोलतो,पण भरभरून गप्पा होतात.एकटाच राहतो लग्न झालेले नाही.आई वडील केंव्हाच वारलेले.नातेवाईक सुद्धा जास्त नाहीत. पण पट्ट्या नेहमी आनंदात असतो.भयानक क्रियेटीव आहे.ad agency मध्ये क्रियेटीव डायरेक्टर आहे.डोक्यात सतत नवीन नवीन कल्पना येत असतात.घरी लहान मुलांचे चित्रकलेचे क्लास घेतो.मध्येच विपश्यना काय करून येतो.तो काहीही कधीही करतो.काल बर्याच दिवसांनी बोलणे झाले.त्याला म्हटले तुला एकट्याला कंटाळा नाही का येत?

मुक्तकविचार

NDE बद्दलच्या किरकोळ शंका

शुचि's picture
शुचि in जनातलं, मनातलं
18 May 2014 - 3:28 am

एम्ब्रेस्ड बाय लाईट, सेव्ह्ड बाय द लाईट, thi rTee मिनीटस इन हेवन अशा प्रकारच्या पुस्तकांचा फडशा पाडून , तसेच तासन तास 'निअर डेथ एक्सपीरीअन्स"(NDE ) सारख्या साईट्वर घालवून अन त्या प्रकारचे व्हिडीओ पाहून माझ्या मनात काही शंका निर्माण झाल्या आहेत. त्या शंकाकंड्शमनार्थ हा धागाप्रपंच. सगळ्या NDE मध्ये बर्याच सामाईक बाबी आढळल्या. किंबहुना एक स्ट्रक्चरच , एक क्रमच आढळला जो पुढे येईलच व तदनुशंगिक काही शंकादेखील खाली येतील.

मुक्तकविरंगुळा

भारतीय वकीलातीतला अनुभव

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
17 May 2014 - 2:38 am

विटेकर काकांचा "एक उद्विग्न करणारा अनुभव"वाचला . खरच खूप चिडचिड झाली . त्यावरून परदेशातील आमचा भारतीय वकीलातीतला अनुभव सांगावासा वाटतो .

मुक्तकअनुभव

बालपणीचा काळ सुखाचा....

चिन्मय श्री जोशी's picture
चिन्मय श्री जोशी in जनातलं, मनातलं
15 May 2014 - 5:15 pm

बालपणीचा काळ सुखाचा म्हणतात … पण आपण लहान असताना ते पटत नाही आणि नंतर कळून फायदाच नसतो…
पण तरी खूप काही मिळत आपल्याला आपण लहान असताना …

अर्थात मला माझ्या लहान पाणी सगळ्यात जास्त मिळालेली कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे मार आणि बोलणी … पण त्यात माझा काही दोष नव्हता …
लहानपणी काय करायचं नाही हे जवळ जवळ प्रत्येक जण सांगायचा … पण आम्ही उद्योग करून रिकामे झाल्यावर …(आधी सांगितलं तर बहुधा आपल्याला भोगायची शिक्षा सावध करणाऱ्याला भोगायला लागत असावी … )

असो… तर त्या रम्य बालपणीचा काल (शिक्षांसाहित) आठवून आज खूप काही बोलावस वाटलं …. म्हणून शेवटी ब्लॉग खरडायला घेतला …

मुक्तकअनुभव

दीड शतकी धागे - एक अभ्यास

लॉरी टांगटूंगकर's picture
लॉरी टांगटूंगकर in जनातलं, मनातलं
11 May 2014 - 11:43 am

प्रेरणा: ते काय सांगायलाच पाहिजे का! तरीही क्लिंटन यांचे निवडणुकीचे विश्लेषण आणि अंदाज आणि इस्पीकचा एक्का यांचा हा प्रतिसाद

___________________________________________________________________

सुरुवातीला मिपावर २०१०-२०१२ आणि २०१२-२०१४ मध्ये काय झालेलं ते पाहू, ( शतकी धागे अनेक झालेत पण सेफ्टी मार्जीन ठेवण्यासाठी आपण आकडेवारी मध्ये फक्त दीड शतकी धाग्यांबद्दल चर्चा करू.

a

हे ठिकाणधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनसुभाषितेविनोदऔषधोपचारशिक्षणमौजमजाप्रकटनविचारसद्भावनाशुभेच्छाप्रतिक्रियाआस्वादसमीक्षाअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीविरंगुळा

पंगत

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
9 May 2014 - 6:59 pm

आजकाल बर्याचश्या कार्यक्रमांमधे जेवणाच्या वेळी बुफे ही पद्धत रुड झालेली आहे . सोयीच्या दृष्टीने,अन्न वाया ना जाण्याच्या दृष्टीने ती निश्चीतच चांगली आहे.पण तरीही मला मात्र पुर्वी पासूनच पंगत हाच प्रकार खूप आवडतो .

मुक्तकअनुभव

पाऊस नेहेमीच असा अवेळी यावा ...!!

जेनी...'s picture
जेनी... in जे न देखे रवी...
8 May 2014 - 8:22 pm

थंड वाऱ्याची झुळूक यावी,
हलक्याश्या स्पर्शान सरकलेला पदरही,
लाजेची सीमा पार करायला घाबरावा !

तुझा तो स्पर्श,
तुझ्या ओठांनी भिजवलेला शहारा,
शहार्यावर जणू तुझ्या नजरेचाच पहारा बसावा !

मी मुग्ध व्हावी, तू धुंद व्हावा
आणि मग हलकीशी पावसाची सुरुवात व्हावी ..
त्या भिजलेल्या सरी, तू ओंजळीत घ्याव्यास !!

नाजूक फुंकर, ओंजळीतल्या पाण्यावर मारावीस
अन क्षणभर ओठांचा स्पर्श करत,
ते पाणी माझ्या चेहेर्यावर उडवावस !

शांतरसमुक्तक