महत्वाची सूचना

नमस्कार,
मिसळपाव.कॉमवर सदस्य नोंदणी केल्यावर ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.

श्रीगणेश लेखमाला २०१४

माझा गणेश मूर्ती संग्रह

अजया's picture
अजया in विशेष
29 Aug 2014 - 12:08 am
श्रीगणेश लेखमाला २०१४

बर्‍याच वर्षांपासुन गणेश मुर्तींचा संग्रह करण्याचा माझा छंद आहे. जिथे जातो तिथली गणेश मुर्ती आणली जायची. बर्‍याच मुर्ती जमा झाल्यावर या संग्रहाचं वर्गीकरण करायला सुरुवात केली. त्यातल्याच काही विविध माध्यमातल्या मुर्तींचे हे फोटो. (नेहेमीचा कॅमेरा बाहरेनला राह्यल्यामुळे मोबाईलवर काढले आहेत.तरी गोड मानून घ्यावे ही विनंती.)
हा टेराकोटा प्रकरच्या गणपतींचा संग्रह.यातल्या काही मूर्ती कलकत्त्याच्या आहेत.