दिवाळी अंक २०१३

Diwali Anka 2013

गडकोट किल्ले एक सांस्कृतिक ठेवा

सार्थबोध's picture
सार्थबोध in दिवाळी अंक
26 Oct 2013 - 8:55 am

गुरुवार. कंपनीतला नेहमीचा दिवस. दुपारच्या जेवणात आमच्या आप्पाने ट्रेकचा विषय काढला. कामाचा ताण खूप होता; कुणाचे काही काम, तर कोण गावी जाणार होता. आम्ही हो-नाही, हो-नाहीला सुरुवात केली. मी, विक्या, वैभ्या, बापू, पप्या, अण्णा, आप्पा ( हायटेक सॉफ्टवेअरमध्ये असलो तरी घरगुती टोपणनावांची प्रथा आम्ही कायम ठेवली आहे.) चर्चेला सुरुवात झाली. पाऊस नुकताच सुरु झाला होता, शनिवार धरून ‘तिकोणा’ गाठायचे ठरले. जेवण आटोपून जागेवर आलो. कोणी गूगलवर नकाशे बघू लागला, कोणी आधी कोण जाऊन आले आहेत त्यांचे फोटो बघू लागला. आता खरी सुरुवात झाली होती. मी खायला काय न्यायचे, पाणी की ताक, इत्यादी गोष्टी बघू लागलो.

रोहित

सुहास झेले's picture
सुहास झेले in दिवाळी अंक
26 Oct 2013 - 8:53 am

रात्रीचे ११ वाजलेत. मुंबई-गुजरात महामार्गावरून आमची गाडी सुसाट वेगाने डहाणूच्या दिशेने रस्ता कापत होती. इच्छितस्थळी पोचण्यास अजून किमान ४०-४५ मिनिटे लागणार होती आणि त्यात गाडीतल्या वायरलेसची खर-खर डोक्यात जात होती. मनात भीतीचे काहूर दाटले होते. काय होणार पुढे... काही काही कळत नव्हते. रस्त्यावर रहदारी तुरळक होती, पण प्रसन्नदा गाडी ८०-१०० च्या वेगाने दामटवत होते. आम्ही दोघेही शांत होतो. काय बोलावे सुचेनाच. मी सतत साईड मिररमधून मागे बघत होतो...कोणी पाठलाग तर करत नाही ना..कोणाला काही संशय वगैरे आला असेल का? मी सारखा त्याच विचाराने अस्वस्थ होतो.

सत्व

psajid's picture
psajid in दिवाळी अंक
26 Oct 2013 - 8:50 am

सूर्याकडून तांबूस सोनेरी किरणे उसनी घेऊन उल्हासित झालेली पहाट श्री. दीक्षित यांच्या दारावर हळुवार थाप मारू लागली होती. परंतु उशिराच्या जागरणामुळे असेल किंवा रात्रीच्या पार दुसऱ्या प्रहरी लागलेल्या झोपेमुळे असेल, श्री. दीक्षित तिच्या गोड हाकेला प्रत्युत्तर देत नव्हते. आपल्या सोनेरी रूपावर भाळून स्वागताला येणाऱ्या दीक्षित यांची तिला अगदी सवयच होऊन गेलेली होती. परंतु आज ते बाहेर येत नाहीसे पाहून तिला अचंबा वाटला. थोडा वेळ वाट पाहून थकलेली पहाट मोत्यासारख्या शुभ्र रूपात त्यांच्या दरवाजात अवतरली.

तालीम

शिवोऽहम्'s picture
शिवोऽहम् in दिवाळी अंक
26 Oct 2013 - 8:48 am

बजरंगा म्हन्त्यात मला. तालमीजवळ खोली हाय आमची. म्हंजी मी आन् थोरली भन रहायलोय न्हवं का! नरसिंगपुरास्नं आलोया हितं कोल्लापुरात. टेशनाजवळ आमचा मावळा सांजंच्या टायमाला भाजी इकाय् येतोय, तेच्या वळकीनं ही खोली धरलिया. भनीला पतकी डाक्टरांच्यात काम मिळालंया म्हून बरं. दीसभर दवाखाना झाडती-पुसती. लऽय मोट्टंमोट्टं लोक येत्यात थितं, पोर व्हईना म्हनताना! गावाकडं आसलं काय आसतं तर समद्यांनी खुळ्यात काढला असता की “मर्दा! आरं नवी बाईल आनशिला का डाक्टराफुडं जाशिला!” पर पोरगं झालं का आयबाप समद्यास्नी बक्षिशीबी देत्यात लऽय कायतर. भनीलाबी मिळतंया कवा-कवा! तसं बरं हाय म्हनायचं हितं.

The Lake house

स्पंदना's picture
स्पंदना in दिवाळी अंक
26 Oct 2013 - 8:46 am

अ‍ॅलेक्स त्याच्या घरी जायला निघालेला. रस्ता एकाकी, दाट झाडीतून जाणारा. रस्ता नव्हेच, जंगलातली एक मातीची, जरा रुंद अशी गाडीवाट. फोन वाजतो अन फोनवर हॉस्पिटलमधून त्याच्या वडिलांची डॉक्टर; त्याला त्यांच्या मृत्यूची बातमी कळवते.

मन म्हणते आहे

psajid's picture
psajid in दिवाळी अंक
26 Oct 2013 - 8:42 am

काळाच्या घावाने
फरफटत जावे,
धडपडून उठावे
मन म्हणते आहे !!

ती सोनेरी क्षणे
जिवास ओलावे,
डोळ्यात गुंतावे
मन म्हणते आहे !!

जे राहिले चित्र कोरे
काही रंग भरावे,
कुंचल्यास उचलावे
मन म्हणते आहे !!

तुला शौक सुगंधाचा
विश्व गंधाळुनी यावे,
चंदनासवे झिजावे
मन म्हणते आहे !!

भ्रमराचे ओठ अन
कळीने खुलावे,
गीत होऊन जगावे
मन म्हणते आहे !!

रात्रीस धास्तावले ते
तुझ्या नजरेचे काजवे,
पहाट बनून जावे
मन म्हणते आहे !!

एक कोपरा

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in दिवाळी अंक
26 Oct 2013 - 8:39 am

एक कोपरा असा जिथे की मांडियला संसार
एक कोपरा जिथे मिळाला ह्र्दयाला आधार

धुंडाळुनिया देवळे मला मनात मग सापडला
एक कोपरा असा जिथे की झाला साक्षात्कार

त्या दिवशी तो राव भयाने व्याकुळलेला दिसला
शोधित होता एक कोपरा होऊनिया लाचार

घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती
असावा परि एक कोपरा जुळती जेथ विचार

विश्वामध्ये येती सारे घेऊनिया आकार
उरती होऊन एक कोपरा आणि पाकळ्या चार

त्या गर्दीतच मला उमगले या जगताचे सार
एक कोपरा माझा आणिक माझ्यातुन साकार

पिग वॉर (The Pig War)

किलमाऊस्की's picture
किलमाऊस्की in दिवाळी अंक
26 Oct 2013 - 8:37 am

जगातल्या दोन महासत्ता एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. रणशिंग फुंकलं गेलंय. एक गोळी सुटण्याचा अवकाश. कुठल्याही क्षणी युद्धाला तोंड फुटेल. युद्ध नक्की कशासाठी? आजवर जगात विविध कारणांमुळे युद्धं झाली आहेत. पण कधी ऐकलंय दोन बलाढ्य राष्ट्रं लढाईसाठी सुसज्ज झालेली ती एका डुकरामुळे? हो! अमेरिकेच्या इतिहासात 'पिग वॉर' नावाने प्रसिद्ध असलेल्या या युद्धात अमेरिका व ग्रेट ब्रिटन या दोन बलाढ्य महासत्तांनी सान व्हान बेटांवर एका डुकरामुळे रणशिंग फुंकलं होतं.