कथा

माय ईंग्लिश वॉल्कींग..!

तुमचा अभिषेक's picture
तुमचा अभिषेक in जनातलं, मनातलं
12 Apr 2013 - 12:32 pm

मी एक पसरट भांड्यातील राजकुमार आहे ज्याचे विचार क्षितिजापलीकडे जाऊन अंधुक होतात..

पण या जगात असेही लोक आहेत ज्यांच्याकडे भविष्यापलीकडे जाऊन बघण्याची शक्ती असते..

माझे आईवडील अश्यांपैकीच एक..

काय, कसे, नेमके कश्यामुळे, माहीत नाही पण माझ्या आईवडीलांनी मी पाळण्यात असतानाच ओळखले की माझे ईंग्रजी भाषेचे ज्ञान इतर मध्यमवर्गीय मराठी मुलांच्या मानाने फार कच्चे आहे... आणि... तिथेच एक ऐतिहासिक निर्णय घेतला गेला... माझे सारे शिक्षण शुद्ध मराठी माध्यमाच्या शाळेतूनच होण्याचा..

कथाविनोदमौजमजाआस्वादअनुभवविरंगुळा

अहो चहा घेताय ना? (कथा)

मी_देव's picture
मी_देव in जनातलं, मनातलं
10 Apr 2013 - 1:13 pm

“अहो चहा घेताय ना? निवतोय तो, किती वेळ लावायचा आंघोळीला.”
दाराखालून आत सरकवलेला पेपर उचलत सुजाताने विनायकला सकाळपासून दुसर्‍यांदा चहाची आठवण करुन दिली.
कॉलेज मधुन स्वेच्छानिवृत्ती घेतल्यापासून सुजाताला निदान पेपर तरी चाळायला वेळ मिळू लागला होता. होय स्वेच्छानिवृत्ती. कारणंच तशी होती त्याची. सुजाताची तब्येत ठिक नसायची. दम्याचा विकार गेल्या एक-दोन वर्षांत पार विकोपाला गेला होता. त्यामुळे मागील वर्षी, रिटायरमेंट एज च्या सात वर्ष आधीच कामाला पूर्णविराम देऊन, सुजाताने पूर्ण वेळ आराम करायचा असं ठरवलं होतं विनायकने.

कथाआस्वाद

निमित्त फक्त एका भेटीचे

सुज्ञ माणुस's picture
सुज्ञ माणुस in जनातलं, मनातलं
8 Apr 2013 - 1:39 pm

निमित्त फक्त एका भेटीचे

परवाच आई च्या तोंडून तिच्या शाळेतल्या बाईंची भेट ऐकली. पहिल्या दोन वाक्यातच डोळ्यात पाणी उभे राहिले. खरेतर त्या काळाची ती गोष्ट, ऐकून सोडून देण्यापलीकडे काहीही हातात नव्हते. पण आमच्या मातोश्रींचे बोलणेच इतके अमोघ, की त्यातल्या भावनांची मनात गर्दी व्हायला काही क्षणांचा अवकाश. मन भूतकाळात केव्हाच वाहून जाते. आठवणी आणि भावनांचा कल्लोळ असा काही उठतो की अश्रूंचे हळुवार टीपके सैरावैरा धावू पाहतात इवल्याश्या डोळ्याच्या पटांगणावर.

संस्कृतीकथासाहित्यिकसमाजजीवनमानप्रकटनविचारआस्वादअनुभवप्रतिभा

नायक क्रमांक एक

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
2 Apr 2013 - 4:17 pm

आमच्या आगामी " नायक क्रमांक एक" या चित्रपटातले शिर्षक गीत खास आमच्या चाहत्यांसाठी.

या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीते आम्ही स्वतः लिहिली आहेत याची वाचकांनी कॄपया नोंद घ्यावी.

(कंसातल्या सुचना दिग्दर्शकासाठी असुन, नायक नायिकेने कंसाबाहेरच्या शब्दांचे गायन करत नॄत्य करायचे आहे. चित्रीकरण सुरु करण्या आधी कॅमेरामॅनच्या कॅमेर्‍याची बॅटरी चार्ज आहे कि नाही ते तपासावे)

(ज्याच्या कडे बर्‍यापैकी कपडे असतील त्यालाच नायक म्हणुन घेण्यात यावे. नायिका आम्ही आधिच निवडली आहे. तिच्या आईने तीला बर्‍यापैकी कपडे घालुन चित्रीकरणाला पाठवायचे आश्वासन दिले आहे)

कॉकटेल रेसिपीकोडाईकनालभूछत्रीमराठीचे श्लोकशृंगारभयानकहास्यकरुणवीररसअद्भुतरसरौद्ररसशांतरसमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीविज्ञानक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्र

आज फिर मरनेका इरादा है ......!!!

जेनी...'s picture
जेनी... in जनातलं, मनातलं
1 Apr 2013 - 4:13 am

आज तो जीने की तमन्ना है...........

हा लेख विजुभाऊंना समर्पित ......

*******************************************************************************************************************************************************

मांडणीकथामुक्तकविचार

तो आवाज आजही मला साद घालतो..!

तुमचा अभिषेक's picture
तुमचा अभिषेक in जनातलं, मनातलं
27 Mar 2013 - 3:03 pm

"प्लॅटफॉर्म क्रमांक दो पे आनेवाली लोकल अंधेरी के लिये धीमी लोकल है..." एका महिला निवेदिकेचा गोड आवाज कानावर पडत होता. पण ज्या ट्रेनसाठी ही अनाऊंसमेंट होत होती त्या ट्रेनने मात्र केव्हाच स्टेशन सोडले होते. तीन-तीन भाषांमध्ये अनाऊंसमेंट करायच्या नादात हे असे होत असावे. पण निदान मग शेवटच्या वाक्यात आनेवालीचे जाने’वाली तरी करायचे. असो, कोणाला काय फरक पडतो. तसेही मुंबई लोकलने प्रवास करणार्‍यांमध्ये या बाईच्या आवाजावर विसंबून राहणारे मोजकेच असावे. आवाजावरून आठवले, या आवाजाच्या उगमाचा शोध कधी ना कधी तरी नक्की घ्यायचा होता मला.

कथाआस्वाद

आणखी एक टायटॅनिक-३

लॉरी टांगटूंगकर's picture
लॉरी टांगटूंगकर in जनातलं, मनातलं
26 Mar 2013 - 4:48 pm
वावरसंस्कृतीनाट्यकथातंत्रराहणीप्रवासभूगोलदेशांतरविज्ञानअर्थव्यवहारप्रकटनविचारलेखबातमीमतमाहितीभाषांतर

गपगार

आतिवास's picture
आतिवास in जनातलं, मनातलं
22 Mar 2013 - 10:39 am

बामनाची ईदद्या ग्येली. म्हंजे म्येली.
शेताला गेल्ती सक्काळी.
हा-या धावत आला सांगाया. मोटी माणसं ग्येली पळत.
म्याबी चाल्ली व्हती.
आयनं पायलं, म्हन्ली, “मुकाट्याने निमीकडं जा. तिथं दिसलीस तर लाथ घालीन.”
आमच्या घरातली मान्सं सूद्द बोल्तेत. म्या येकलीच खेडवळ.

ईदद्या माज्याशी चांगली व्हती. बोलायची न्हाई जास्ती, पण कायबाय द्यायची मला.
गजगं; फुटकी काकणं; चिचोके;
गूळश्यांगदाणं; आवळं; जांभळं;
– समदं फुकाट.
म्याबी तिला मोराचं पीस दिल्त येकडाव. हसली व्हती.

कथासमाजआस्वादअनुभव

ती राजकन्या आणि मी..??

Yash's picture
Yash in जनातलं, मनातलं
20 Mar 2013 - 10:53 pm

तो खूपच थकून गेला होता. मागचे काही दिवस ऑफिसमधील काम इतक वाढलेल होत कि त्याला जेवायलाही वेळ मिळत नव्हता. तो PC समोर बसून files check करत होता. त्याला काहीच सुचत नव्हते.
त्याला असं उदास बसलेलं पाहून अमोद त्याच्या इथे येऊन म्हणाला “अविनाश बस झाल आता चल जरा खाली जाऊन काही तरी खाऊन येऊ. तू तर आज धड जेवला पण नाहीयेस.”
“नको रे कंटाळा आलाय खाली उतरायची पण इच्चा नाहीये.”
“अरे चल ना अव्या (अविनाश) काम तर होतच राहतात म्हणून काय आपलं जेवणखाण सोडून चालत का ? चल निदान ज्यूस तरी घे.”
“बर चल कटकट करू नको.”

कथा