कथा

संवादिका - ३

प्रास's picture
प्रास in जनातलं, मनातलं
22 Jun 2014 - 1:50 am

"आहेस का रे?"

"आहे ना गं, तुझ्यासाठी मी नेहमी इथेच आहे."

"तुझी व्यवधानं सांभाळावी लागणारच नं मला?"

"व्यवधानं का तुझ्यापेक्षा महत्त्वाची असतील?"

"माहितेय माहितेय, दिवसभरात किती वेळा उपलब्ध असतोस ते चांगलं माहितेय मला."

"असं काय करतेस, तुमने पुकारा और हम चले आये, कधीही, केव्हाही.... :-D"

"नेहमी आम्हालाच पुकारावं लागतं, हेच दु:खं आहे नं..."

"असं का म्हणतेस? पापी पेट के लिये नोकरी तो करनीच पडेंगी ना...?"

"तुझ्या या बेदर्दी नोकरी पायी तुझी ही छोकरी तुझ्यासाठी किती झुरतेय हे कळतं नं तुला?"

संस्कृतीनाट्यकथाराहणीगुंतवणूकमौजमजाप्रकटनआस्वादमाध्यमवेधअनुभवमाहितीविरंगुळा

दुखरी नस...!

वटवट's picture
वटवट in जनातलं, मनातलं
10 Jun 2014 - 2:35 pm

संध्याकाळची वेळ... मला ही संध्याकाळची वेळ खूप आवडते... काय होतं देव जाणे पण खूप हळवं वाटतं... म्हणजे दरवेळेस मनात दुःख, वेदनाच असायला हवी असं नाही पण तरीही फार भावनिक व्हायला होतं... ज्या गोष्टींचा आपण संपूर्ण दिवसात कधीच विचार करत नाही त्या गोष्टी आठवू लागतात... काही गोष्टींचे संदर्भ बदलतात..तर काही गोष्टींचे संदर्भ अजून पक्के होतात... संध्याकाळची वेळ ही आत्म्यानं जागं व्ह्यायची वेळ असते. आपलं खरं आस्तित्व काय आहे? आपण नक्की कोण आहोत? आपले नक्की कोण आहेत? आपण नक्की कोणाचे आहोत?

कथालेख

पर्यावरणाची ऐशी तैशी!

मीराताई's picture
मीराताई in जनातलं, मनातलं
9 Jun 2014 - 4:15 pm

अखेर त्यांचं स्वप्न त्यांच्या मुठीत आलं होतं. घरातल्या जागेची अडचण, त्या पाठोपाठ येणाऱ्या अडचणी आणि बाहेरची गर्दी-गोंगाट यांच्यापासून सुटकेचा मार्ग त्यांना सापडला होता. नवीन वसणाऱ्या उपनगरातल्या एका मोठया गृहप्रकल्पात त्यांनी नाव नोंदवलं होतं. प्रख्यात अशा 'स्वप्नसिटी बिल्डर्स'नी या भागातल्या मध्यवर्ती अशा विस्तीर्ण भूखंडावरच्या स्वप्नराशि, स्वप्नमाला, स्वप्नकुटिर, स्वप्ननगरी, स्वप्नाली, स्वप्नील घरकुलांची मोठीच जाहिरात केली होती. प्रशस्त घरांच्या उंच उंच इमारती उभ्या राहूनही गाडयांसाठी, बाग-बगीचा, खेळण्यासाठी जागा आणि क्लब हाऊससाठीसुध्दा जागा उपलब्ध होईल येवढी ऐसपैस जागा होती ती.

कथाजीवनमानप्रकटन

भेट

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
9 Jun 2014 - 2:13 pm

महायुध्दाला सुरवात होऊन सोळा दिवस उलटले होते.

" राजमाता, आपल्या दर्शनासाठी एक देवी आल्या आहेत. " दूताने वर्दी दिली.
" आता ? या वेळी ?" राजमातेने आश्चर्याने विचारलं. रात्रीच्या दुसरा प्रहर सुरू झाला होता.
" हो !"
" कोण आहे ?"
" नाव सांगितलं नाही राजमाता, परंतु आपल्याच दर्शनाची त्यांची आग्रही विनंती आहे !"

राजमातेने मानेनेच होकार दिला. राजमातेच्या शेजारीच बसलेली द्रौपदीही विचारात पडली होती.

काही क्षणांतच मुख आच्छादलेली एक स्त्री राजमातेसमोर आली. राजमातेसमोर येताच तिने त्रिवार वाकून राजमातेला वंदन केलं.

कथा

अनप्रेडीक्टेबल भाग्यश्री...!!

वटवट's picture
वटवट in जनातलं, मनातलं
9 Jun 2014 - 9:12 am

खरं तर कोणीही जन्माला येताना त्याचा असा स्वतःचा पिंड घेऊन येतो तर काहीजणांचा पिंड घडला जातो. हे घासून घासून गुळगुळीत झालेलं वाक्य घासून घासून गुळगुळीत होऊ पहाणार्या आयुष्याच्या प्रत्येक नाक्यावर, प्रत्येक कोपर्यावर, हमरस्त्यावर आणि आडवाटेवर तर हमखास भेटतंच भेटतं. कधी कधी हे असंच भेटतं तर कधी कधी अगदी कडकडून भेटतं…. आता भेटतं त्याला मी काय करणार?? भेटतं तर भेटतं. आणि मला तर खूपदा भेटलंय. पण काहीजणांच्या बाबतीत प्रचंड संभ्रम पडतो कि ह्यांचा पिंड हा जन्मतःच असा कि नंतर घडला… आणि ह्या प्रश्नाला उत्तर त्या व्यक्तीकडे असेलच ह्याची खात्री नाही. आणि मिळालंच तरी ते खरं असेलच ह्याचीही खात्री नाही….

कथालेख

चिऊ गं चिऊ गं दार उघड...!

वटवट's picture
वटवट in जनातलं, मनातलं
6 Jun 2014 - 1:41 pm

खूप काम झाल्यावर आपण दमतो. खूप दमल्यावर जे काही करतो तेही परफेक्ट असेलच अशी हमी आपण नाही देऊ शकत. बर्याचदा आपलं आपल्याला ही कळत नाही कि पण हे काय केलंय. देवानं स्त्रीला खूप मेहनतीनं बनवलं. नंतर तो खूप दमला असावा आणि तश्याच अवस्थेत त्यानं त्या स्त्रीचं मन बनवलं असावं. आणि नंतर त्याचाही खूप गोंधळ उडाला असेल कि आपल्याला काय करायचं होतं आणि आपण काय केलंय... त्यामुळेच स्त्रीचं मन ब्रह्मदेवालापण समजणार नाही असं म्हणत असावेत ..
तर हे सांगायचं कारण असं कि सगळं सरळ आणि सुरळीत चालू असताना आमच्या हिला आली हुक्की.. आणि उगाच म्हणजे अगदी उगाच मला म्हणाली (म्हणजे मला असं वाटलं.. )

कथा

येक ब्येणं…. गण्या…।

वटवट's picture
वटवट in जनातलं, मनातलं
3 Jun 2014 - 10:36 am

वेडीच माणसं इतिहास घडवतात… इतिहास घडतो तो वेड्याच माणसांकडून.…. इतिहास जर घडवायचा असेल तर कुठलं ना कुठलं वेड हे रक्तात मुरवून घ्यावंच लागतं.… वगैरे वगैरे विधानं वक्तृत्व स्पर्धेतून हमखास उच्चारली जातात. अगदी तारस्वरात जर ही विधानं केली गेली तर हमखास टाळ्या पण मिळतात. आणि कदाचित बक्षीसं पण मिळतं. पण दैनंदिन जीवन जगताना आपण जी वेडी माणसं बघतो, ती सगळीच काही इतिहास घडवत नाहीत. हां… तसं पहायला गेलं तर प्रत्येकच माणूस इतिहास घडवत असतो पण त्याची दखल इतरांनी घ्यावी अशी व्यक्तिमत्वं थोडीच.

कथालेख

नाटेठोम

आतिवास's picture
आतिवास in जनातलं, मनातलं
29 May 2014 - 10:02 am

आमची सुट्टी झ्याक.
राती अंगणात झोपायचं, सकाळी गार पाण्याची आंगोळ.
दिवसभर आंबे, खेळ.
अब्यास न्हाई. मार न्हाई.

घरात लई पावणे. आत्याची, मामाची पोरं.
त्यांच्यासंग शुद्ध बोलते.

अन्यादादान कागदाचे रंगीत तुकडे आणलेत.
मोजले म्या. सव्वीस लाल, सव्वीस काळे.
‘क्याट’ म्हनत्येत त्येला.
खेळतात ती समदी.

त्यादिशी बगत बस्ली.
सोनीदीदी अन्यादादाला “किलवर दश्शी” मागितली.
अन्यादादा बोल्ला, “नाटेठोम”.
मंग अन्यादादाने मागितलं तर राजादादाने येक पत्ता दिला त्याला.
मंग आमचा दादा राजादादाला “नाटेठोम” म्हन्ला.

कथाआस्वादअनुभव

चॉकलेट डे .. खळ्ळं फट्ट्याक !

तुमचा अभिषेक's picture
तुमचा अभिषेक in जनातलं, मनातलं
21 May 2014 - 6:47 pm

आयुष्याने दिलेल्या पचपचीत अनुभवांमध्ये मीठमसाला टाकून त्या किस्सेकहाण्या लोकांना सुनवतोय ! हसतोय आणि हसवतोय ! येण्यार्‍या आयुष्यात काही तरी सुरस आणि चमत्कारीक घडेल, बस्स या आशेवर जगतोय ! पण आज मात्र मी जे सांगायला जाणार आहे त्यात असत्याचा अंश कणभर सुद्धा असणार नाही. जेवढे पिळाल तेवढी त्यातून सत्याचीच धार बाहेर निघेल. आयुष्याने दिलेला एक अनुभव जसाच्या तसा मी आज तुमच्याबरोबर शेअर करायला जात आहे... का? ते मला स्वतालाही ठाऊक नाही...

तर हि गोष्ट आहे इसवीसन ..,,.. चला राहूद्या थेट प्रसंगावरच नेतो

कथाआस्वाद