कथा

द स्केअरक्रो - भाग ‍१२

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
19 Jul 2015 - 7:13 am

द स्केअरक्रो भाग ११

द स्केअरक्रो भाग १२ (मूळ लेखक मायकेल कॉनेली)

अँजेलाचं घर नक्की कुठे आहे याबद्दल मला काहीही कल्पना नव्हती. मी रॅशेलला तिच्याबद्दल मला जे काही माहित होतं ते सगळं सांगितलं. अगदी तिला पोएट केसबद्दल असलेल्या आकर्षणाबद्दलसुद्धा. तिचा ब्लॉग आहे हे मला माहित होतं पण मी तो कधीही वाचला नव्हता.

कथाभाषांतर

महाभारत... (शतशब्दकथा)

शब्दबम्बाळ's picture
शब्दबम्बाळ in जनातलं, मनातलं
18 Jul 2015 - 4:07 pm

"बरेच दिवस ते युध्द सुरूच होत. न भूतो न भविष्यति असा तो संग्राम होता. एकाहून एक भयानक आणि संहारक अस्त्र शस्त्र वापरली गेली. लाखो लोक मारले गेले, जे युद्धातून वाचले ते उपासमारी आणि रोगराईने मृत्युमुखी पडले. जेव्हा युद्ध संपले तेव्हा जमीन रक्ताने लाल झाली होती, ब्रम्हास्त्राच्या अति वापराने निर्माण झालेल्या काळ्यामिट्ट ढगांनी सुर्य देखील झाकोळला गेला होता, सगळीकडे अंधःकार पसरला होता. निसर्गाची अपरिमित हानी झाली होती. समस्त मानवजातीला याची किंमत मोजावी लागणार होती"

हे सगळे ऐकून चिंतातूर होत त्याने प्रश्न केला,"मला हे जमेल?"

कथा

द स्केअरक्रो - भाग ‍११

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
18 Jul 2015 - 12:10 am

द स्केअरक्रो भाग १०

द स्केअरक्रो भाग ११ (मूळ लेखक मायकेल कॉनेली )

एली तुरुंगाच्या मोठ्या दरवाज्यातून आत जाताना तर माझी मनःस्थिती पूर्णपणे नैराश्यमय होती. मी यांत्रिकपणे तिथले सगळे सोपस्कार पार पाडले आणि वकील आणि त्यांचे सहाय्यक यांच्यासाठी एक वेगळा प्रवेश होता, तिथून आत गेलो. स्किफिनोने मला दिलेलं पत्र तिथल्या कॅप्टनला दाखवलं. त्याला बहुधा त्यात काही वावगं वाटलं नाही आणि त्याने मला एका खोलीत बसायला सांगितलं. जवळजवळ अर्ध्या तासाने दरवाजा उघडून तो कॅप्टनच आत आला. ब्रायन ओग्लेव्हीचा पत्ता नव्हता.

कथाभाषांतर

घरट्यातून पडलेलं पिलू

पथिक's picture
पथिक in जनातलं, मनातलं
16 Jul 2015 - 10:34 am

परवा संध्याकाळी चालता चालता रस्त्याच्या बाजूला जांभळाच्या एका झाडाखाली पक्षाचं एक पिलू दिसलं. दोन-तीन फुटापर्यंत ते उडत होतं अन परत खाली बसत होतं. त्याच्या बाजूलाच एक बुलबुल येउन बसला. अस्वस्थपणे तो चिवचिव करत होता. बहुतेक त्या पिलाचा बाबा असावा. कारण त्याचा गळा लाल होता. मादी तशी असते कि नाही माहिती नाही. कोणी माणूस येताना दिसलं कि तो बुलबुल उडून झाडावर बसत होता अन मग परत खाली त्या पिलाजवळ येत होता. मी बाजूला पडलेली एक वाळकी डहाळी घेतली अन त्या पिलापुढे धरली. पिलू त्या डहाळीला पकडून बसलं अन मग मी ती त्या झाडाच्या फांदिजवळ नेली. पिलाने झाडाची एक बारीक डहाळी पकडली. मग मी बाजूला झालो.

कथाअनुभव

शतशब्द कथा - सुट्टी

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जनातलं, मनातलं
16 Jul 2015 - 5:49 am

“अगं, मांढरे बाई आजपासून एक आठवड्याच्या सुट्टीवर आहेत. तुही येणार नाही असे चक्क फोनवर सांगतेस. प्ले स्कूलमध्ये लहान मुले आहेत. त्याना कोण सांभाळणार?”
“बाई, आई आजारी आहे, तिचे मलाच बघावे लागते. तिला अंथरुणातून बाहेर तर पडूदे. तीन चार दिवस तर मी हलुच शकणार नाही.
कर्मचाऱ्यांच्या रोजच्या नाटकांनी इरावती वैतागली होती. तिने नुकतेच काढलेले प्ले स्कूल. कशीबशी मुले यायला लागलेली. त्यांच्याकडे निट लक्ष पुरविले नाही तर मोठा घोळ!
काय करायचे? आठवडा तरी ढकलायला हवा.

कथालेख

जेनेसिस (शतशब्दकथा)

सटक's picture
सटक in जनातलं, मनातलं
16 Jul 2015 - 2:01 am

तो अगदी दमून गेला होता!!
त्याने सस्तन, कीट, सरिस्रुप, मत्स्य, उभयचर, पक्षी ह्या सगळ्यांचे जीन्स वापरून काहीतरी बनवले होते. उत्सुकता म्हणून त्याने बायो-इलेक्ट्रिसिटि चालू केली. अत्यंत बेंगरुळ असा तो जीव तसा बरा दिसत होता. त्यांच्या नियमांनुसार प्रत्येक संरचनेला एक "किल स्विच" लावणे आवश्यक होते. त्याच्या जवळच काम करणार्या त्याच्या मित्राला त्याने विचारले की त्याच्याकडे काही आहे का ज्याने ही रचना "फेल शुअर" होईल....

इतिहासकथाविडंबनविनोद

नवीन दोस्त

तुडतुडी's picture
तुडतुडी in जनातलं, मनातलं
15 Jul 2015 - 5:12 pm

लहानगा चिंटू खूप खुष होता . किती दिवसांनी त्याला नवीन दोस्त मिळाला होता . आजीलाही ह्या पोराला खेळायला कोणी मिळालं म्हणून बरं वाटलं . नाहीतर किती दिवस नुसत्या त्याच त्याच गोष्टी सांगून त्याला रमवणार. पण गोष्टी त्याच त्याच असल्या तरी आजीची सांगण्याची हातोटीच अशी होती कि चिंटूला त्या पुन्हा पुन्हा ऐकायला आवडत. चिंटू झोपायला त्रास देवू लागला कि मात्र आजी स्वताच्या मनानेच काहीतरी नवीन गोष्ट तयार करून त्याला ऐकवी .गोष्ट सांगितल्यावर मुकाट झोपण्याच्या अटीवर .

कथाkathaa

मालती (शतशब्दकथा)

सटक's picture
सटक in जनातलं, मनातलं
15 Jul 2015 - 2:20 am

नुकतीच वयात येऊ लागलेली मालती तिच्या स्वप्नाळू मुग्धपणामुळे राजकुमाराची लाडकी! सहिष्णु महाराजांनी मालतीला नेहमीच राजघराण्याच्या तोलामोलाचे सगळे मिळेल असे पाहिले होते. मालती होतीही गुणी. शिकवलेले सगळे लीलया आत्मसात करायची. मग ती घोडदौड असो, तीरंदाजी, तलवारबाजी, न्रुत्य किंवा काव्यशास्त्र....
महाराजंवर झालेल्या धक्कादायक हल्ल्यानंतर सगळा राजवसा कोलमडल्यासारखा झाला होता. राजकुमाराच्या कोवळ्या खांद्यावर मोठीच जबाबदारी येऊन पडली होती. अश्या या वातावरणात त्यांचे कोवळे, तारुण्यसुलभ प्रेम फुलत होते.

कथाविरंगुळा

लिव बामणां लिव

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
14 Jul 2015 - 8:37 am

माझ्या मावसभावाच्या, कोकणात,आंब्यांच्या बागा आहेत.देवगडहून हापूस आंब्यांची कलमं आणून त्याने आपल्या बागेत रुजवली होती.आता त्या झाडांना भरपूर आंबे लागतात.जर मी कोकणात त्या मोसमात गेलो नाही तर तो मला एक आंब्याची पेटी मुंबईला पाठवून देतो.

कथालेख