ती सकाळ आणि ती!
आभाळातली चांदण्याची आरास पुसट होत चालली होती. रात्रीचा खेळ संपवून माघारी चाललेल्या चांदण्यांमधल्या काही उगाच मागे रेंगाळल्या होत्या. वारा कधी झाडांवरच्या पानांबरोबर तर कधी खाली निवांत पहुडलेल्या पाला-पाचोळ्यांबरोबर खेळत होता. धुकही आता आजूबाजूच्या परिसराला मिठीत घ्यायला लागल होत. बाहेर भिरभिरणारा वारा आता शिरीषच्या बेडरुमच्या अर्धवट उघड्या खिडकीतून आत शिरला व शिरीषच्या तोंडावर झुलणा-या चादरीच्या टोकाला धरून हलवू लागला.