कथा

बंगला भाग २

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
5 Oct 2015 - 2:00 am

भाग १

बहुतेक मी ऑफिसला जायचो तेव्हा तो घरच सामान आणत असावा. कारण त्याला तर कधी मी आवाराबाहेर पडलेला बघितला नाही. फक्त मी जेव्हा बंगल्याच्या बाजूने फेऱ्या मारायचो तेव्हा तो काहीतरी काम करतो आहे अस दाखवत बंगल्याच्या आतून माझ्यावर नजर ठेवून असायचा. त्याला वाटत असेल मला कळत नाही,; पण मला माहित होत की त्याच पहिल्या दिवसापासूनच माझ्याकडे लक्ष होत.

कथा

बंगला भाग ३ (शेवटचा)

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
5 Oct 2015 - 1:58 am

भाग १, भाग २

असेच दिवस जात होते. माझी नोकरी छान चालू होती. मध्ये वरची पोस्टमिळणार होती पण मी नाही घेतली. अहो आता काय सांगू तुम्हाला? फिरतीवर जाव लागल असत मला. म्हणजे त्या बंगल्यापासून लांब. म्हणून मग नाही घेतली बढती. हिला बोललो नाही मात्र.

कथा

पहाट.

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
4 Oct 2015 - 11:47 am

“पाऊल पुढे टाकायला ही पहाट मला इंधन पुरवते.”---संध्या परब

सकाळीच बाहेर फेरफटका मारायची माझी जूनीच संवय आहे.मग मी कुठेही फिरतीवर असलो किंवा कुणाकडे बाहेर गावी रहायला गेलो असलो तरी सकाळी उठून जवळ असलेल्या कुठच्याही मोकळ्या जागी फिरून यायचो.मग कोकणात असलो तर,बाजूच्या शेतीवाडीत फिरायचो,समुद्राजवळ असलो तर चौपाटीवर जायचो,छोटासा डोंगर असला तर घाटी जढून जायचो.जवळ नदी असेल तर नदीच्या किनार्‍या किनार्‍याने फिरत जायचो.
शहरात असल्यानंतर मात्र अशी निवड करायला मिळत नसायची.

कथालेख

अशीहि एक धर्म निरपेक्शता

दिवाकर कुलकर्णी's picture
दिवाकर कुलकर्णी in जनातलं, मनातलं
3 Oct 2015 - 11:31 pm

अशीहि एक धर्मनिरपेक्षता !
नातवाची लाडीगोडी म्हणजे एक प्रकारचा हुकूमच असतो मग तो कधीहि वेळीअवेळी का केली असेना,
संध्याकाली सात साडेसात वाजता त्याला मातीची खेळणी हवी असतात,
त्याच्या दिवाळी च्या किल्ल्यासाठी .
त्याला स्कूटरवर घेतो आणि येतो स्टँडजवळच्या मेन चौकात,नगरपालिकेच्या दिव्याखाली एक बाई,
बसलेली असते खेळणी विकायला,
मावळे घोडेस्वार ,तोफा आणि काय काय खेळणी तो निवडतो आणि सगळ्यात शेवटी, घोड्यावरील शिवाजी महाराज,
"घोड्यावरील शिवाजी महाराज,सर्वात जास्त खपत असतील नं? " मी काही तरी विचारायचं म्हणून तिला विचारलं,

कथा

मोठ्यांचे मोठेपण आणि त्यांची विनम्रता!

विद्यार्थी's picture
विद्यार्थी in जनातलं, मनातलं
2 Oct 2015 - 8:09 pm

विश्वविहार करताना नारद मुनी एकदा वसिष्ठ ऋषींच्या आश्रमात पोहोचले.निरनिराळ्या वयातील विद्यार्थी तिथे बसून अभ्यास करत होते. त्यातील काही विद्यार्थी ७०-७५-८० वर्षांचे होते. ते पाहून नारदांना गम्मत वाटली. ते वसिष्ठ ऋषींना म्हणाले, "माझा शिष्य ध्रुव (ध्रुव तारावाला) याला तर मी थोड्याच काळात अढळ पदावर पोहोचवले पण तुमचे हे शिष्य संपूर्ण आयुष्य घालवून काहीच मिळवू शकले नाहीत. गुरु म्हणून तुम्ही त्यांना काय मिळवून दिले?"

वसिष्ठ ऋषीं त्यांना नम्रपणे म्हणाले, "आपण देवर्षी नारद आहात, तुमची आणि माझी बरोबरी कशी बरे होऊ शकेल?"

कथालेख

एका मंदिरात...

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
2 Oct 2015 - 5:38 pm

मी राहतो त्याठिकाणी एक अवजड बोजड मंदिर आहे. पण मी तिकडे फारसा जात नाही. रात्रीचं हे मंदिर मला भेसुर वाटते. कलुळात 'कवशी' दिसते असं मला एकजण म्हणाला होता. बऱ्याच वर्षापुर्वी कुण्या 'कौशल्या'ने ईथेच ऊडी मारली मारली होती. तिचं भेसुर भुत ईथंच वावरतयं असा माझा समज झालाय. रात्रीचं मी तिकडं कधीच फिरकत नाही.

कथाजीवनमानप्रकटनलेखप्रतिभा

पुणे कट्टा- ४ ऑक्टोबर २०१५,

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture
कॅप्टन जॅक स्पॅरो in जनातलं, मनातलं
2 Oct 2015 - 9:33 am

दिव्यश्रींच्या धाग्यावर जरा जास्तचं मारामारी झाली. असो. कट्टा फायनालाईझ झालेला आहे. कट्टा खालीलप्रमाणे होईल.

तारिख पे तारिखः ४ ऑक्टोबर २०१५

वेळः रविवारी पहाटे ११.०० वाजता

स्थळः पुण्यनगरीमधली पाताळेश्वर ही पावन जागा

कार्यक्रम: भेटणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे आणि टवाळक्या करणे

फायनान्स डिटेल्सः टी.टी.एम.एम.

कोण कोण येणारे ते इथे कन्फर्म करा. म्हणजे भोजनास कुठे जायचे हे ठरवता येईल. दुर्वांकुरला जायचं का?

(संपादकांना विनंती-४ तारखेनंतर धाग्यास हेवनवासी करावे. धाग्याकर्त्याला नको)

धोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीविज्ञानक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्रप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरविरंगुळा

दिवाकरांच्या नाट्यछटा

खेडूत's picture
खेडूत in जनातलं, मनातलं
30 Sep 2015 - 11:01 pm

रामराम मंडळी!
शतशब्दकथा लिहून आणि वाचून आपणा सर्वांना भरपूर विरंगुळा मिळाला असेल.असाच काहीसा, पण शब्दमर्यादा नसलेला, मराठी साहित्यातला एक वेगळा अन जुना प्रकार म्हणजे दिवाकरांच्या नाट्यछटा. का कोणास ठाऊक, पण शतशब्दकथा आणि नाट्यछटा यांच्यात काहीतरी नातं- साम्य तरी आहे असं नेहमी वाटतं .

इतिहासवाङ्मयकथाभाषासाहित्यिकसमाजप्रकटनविचारआस्वादसमीक्षा

कालचक्र

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
30 Sep 2015 - 8:27 pm

कोण्या एका काळी एका दुरदेशी एक महान तपस्वी एका निबिड अरण्यात एकाकी भटकत होता.
त्याची गृहस्थी सर्वदुर प्रदेशात एका कुटित आपल्या मुलांना घेऊन त्याची वाट पाहत अश्रुंचे ताटवे फुलवत राहीली.

कथाप्रकटनलेखप्रतिभा