श्रीदिपलक्ष्मी दिवाळी २०१०

सरपंच's picture
सरपंच in विशेष
4 Dec 2010 - 7:34 pm

नमस्कार,

श्री दिपलक्ष्मी दिवाळी अंकाची आंतरजालावरील आवृत्ती मिसळपाववरून सर्वप्रथम उपलब्ध करून देताना मिसळपाव परिवाराला आनंद होतो आहे. या अंकाची मृद्रीत आवृत्ती मराठी साहित्य जगतात प्रसिध्दच आहे मात्र आता हा अंक सर्वत्र पोहोचायला सहज होईल.

खाली दिलेल्या दूव्यावर टिचकी मारून हा अंक उतरवून (डाऊनलोड) घेता येईल.

श्रीदिपलक्ष्मी दिवाळी २०१० :- आकार १२.१९ MB

श्री रायकरांचे आंतरजालविश्वात स्वागत आणि अश्या स्तुत्य उपक्रमासाठी अभिनंदन ! - मिसळपाव परिवार.

प्रतिक्रिया

डावखुरा's picture

4 Dec 2010 - 7:48 pm | डावखुरा

मिपा सदस्य लालसा कडुनही अभिणंदन...

गांधीवादी's picture

5 Dec 2010 - 5:57 am | गांधीवादी

अभिनंदन.
आजच उतरवून घेतला आहे, वाचून प्रतिक्रिया देईन.
त्यात काळे काकांचा लेख बघून आनंद झाला.

जरूर प्रतिक्रिया द्या. त्यातला तिसरा भाग 'मिसळपाव'करांना पूर्णपणे नवा आहे.

छान!
आमच्यासारख्या फुकट्यांची आयतीच सोय झाली म्हणायची!

शिल्पा ब's picture

5 Dec 2010 - 11:12 am | शिल्पा ब

हेच म्हणेन. :)

वा ! छान झाले.
अभिनंदनीय आणि स्तुत्य.

डाउनलोड करुन घेतला आहे. अनेक धन्यवाद.

सुधीर काळे's picture

5 Dec 2010 - 4:39 pm | सुधीर काळे

उतरवायला गेलो तर दर वेळी Firefox आणि Internet Explorer hang झाला. करण माहीत नाहीं.

अवलिया's picture

6 Dec 2010 - 1:16 pm | अवलिया

काय उतरवायला गेले?

सुधीर काळे's picture

6 Dec 2010 - 5:02 pm | सुधीर काळे

दिवाळी अंकच हो!
तुम्ही भलतेच शंकासुर बॉ! आणखी काय उतरवणार 'मिसळपाव'वर?

इंटरनेटस्नेही's picture

5 Dec 2010 - 5:12 pm | इंटरनेटस्नेही

मृखपृष्ठावरील चित्र तरी भारी आहे.. ;) करतो डाऊनलोड.

सुनील's picture

5 Dec 2010 - 5:46 pm | सुनील

अंक छान आहे! रामदासांची (अर्धीच का होईना) पण कथा वाचताना बरे वाटले. तसेच प्रकाश अकोलकरांचा लेखदेखिल मस्त!

अवांतर - उजवीकडे अंकाच्या मुखपृष्ठाचा फोटो पाहताना क्षणभर वाटून गेले, "आजची बायडी" हे सदर पुन्हा सुरू झाले की काय!

अविनाशकुलकर्णी's picture

5 Dec 2010 - 6:26 pm | अविनाशकुलकर्णी

उतरवायला गेलो तर दर वेळी Firefox आणि Internet Explorer hang झाला. करण माहीत नाहीं.

हो न.मला पण हाच अनुभव आला.......

मुखप्रुष्ट मस्त..मल प्रुष्ट दिसत नसल्याने काय लिहिणार?

आमोद शिंदे's picture

5 Dec 2010 - 8:06 pm | आमोद शिंदे

मस्त! रामदासांची कथा पुन्हा वाचली.

सुधीर काळे's picture

6 Dec 2010 - 8:22 am | सुधीर काळे

अखेर जमलं. दिवाळी अंक अखेर ’उतरला’ पण ऑफीसच्या संगणकावर! आता मी माझ्या फ्लॅश ड्राइव्हवर घेतो आणि घरच्या संगणकावर चढवतो!

वेताळ's picture

6 Dec 2010 - 9:46 am | वेताळ

त्यावरील युवतीचे चित्र देखिल प्रथमदर्शनी खुप आवडले.

वेताळ's picture

6 Dec 2010 - 9:50 am | वेताळ

त्यावरील युवतीचे चित्र प्रथमदर्शनी खुप आवडले.

अवलिया's picture

6 Dec 2010 - 1:16 pm | अवलिया

छ्या ! येवढा चांगला अंक पण मुखपृष्टावर बायडी ! ;)

अंक मुद्रीत स्वरुपातला वाचला होता ! मस्त !!

शिल्पा ब's picture

6 Dec 2010 - 2:02 pm | शिल्पा ब

<<छ्या ! येवढा चांगला अंक पण मुखपृष्टावर बायडी

आता एक तुम्ही वेगळ्या रस्त्याने जाणार असाल म्हणून काय झालं ? बाकी पब्लिकचं काय?

धमाल मुलगा's picture

6 Dec 2010 - 5:37 pm | धमाल मुलगा

दीपलक्ष्मीसारखा जवळपास गेली ५० वर्षे नियमीत प्रकाशित होणारा दिवाळीअंक डिजिटल स्वरुपामध्ये मिपाच्या अंगणी आला ह्याचा आनंद वाटतो.
मला वाटतं, मुद्रितस्वरुपात असलेल्या मराठी दिवाळीअंकाने संकेतस्थळावर प्रकाशित होणं, ही पहिलीच वेळ असावी. (चु.भू.दे.घे.). दीपलक्ष्मीसारख्या जुनी परंपरा असलेल्या मोठ्या दिवाळी अंकाने अशा प्रवेशाकरता मिसळपाव निवडावे आणि त्या मिसळपाव परिवाराचे आम्ही सदस्य आहोत ह्याचाही मोठा आनंद झाला.
मिपाच्या फेट्यामध्ये खोचला गेलेला हा आणखी एक मानाचा तुरा! :)

श्री.रायकरांचेही स्वागत.

राजेश घासकडवी's picture

6 Dec 2010 - 10:37 pm | राजेश घासकडवी

चांगला उपक्रम. नक्कीच उतरवून घेईन.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

7 Dec 2010 - 6:28 am | निनाद मुक्काम प...

आमच्या सारख्या माय देशापासून दूर राहणाऱ्या लोकांना हा अंक म्हणजे सुदाम्याचे पोहे आहेत .रोज एक एक कण चाखून खाणार आय मीन वाचणार आहे .
माझ्या जर्मन सासूला आपल्या प्रमुख सण दिवाळीच्या निम्मिताने साहित्यिक आतिषबाजी करणारे विविध विषयांना वाहिलेले . दिवाळी अंक हि संकल्पना प्रचंड आवडली
धनंजय जत्रा /किशोर सुद्धा येऊ दे .