user

विळखा - प्रेम, दोस्ती,जबाबदारी आणी एक आत्महत्या...भाग १

आपला एखादा मित्र असावा.जिवाभावाचा असावा आणी तो आपल्या बरोबर आयुष्यभर असावा असे कोणाला वाटत नाही..त्यात तो जर नेमका मित्र कुमारवयापासुन ते आजतागायत असेल तर ? आणी मध्येच तो साथ सोडुन गेला तर ?

"मित्र म्हणजे जीवन-प्रवाहाला वळण देणारे तट" असे कोणीतरी म्हटले आहे .

पण आधी मला माझ्या त्या सर्व मित्रांचा परिचय करुन द्यावा लागेल .

दहावीत असताना मी घरच्या रिस्थितीमुळे मी काम करायचो."अण्णा" संध्याकाळी दोन नेपाळी बरोबर घेउन "चायनीज" लावायचा आणी मी फोनवर आलेल्या आर्डरी आख्ख्या हाऊसिंग बोर्डात पोचवायचो.आणी तेथेच माझी ट्युशन ही असायची, जरा गणीत कच्चच होते..तेथेच ह्या सर्व मित्रांशी परिचय झाला आणी हळु-हळु मैत्री घट्ट होत गेली.

महिंद्र उर्फ महिंद्या : बाहेर असणार्‍या टपरीचा चालक, दहावी नापास झाल्यावर टपरी हाच नाद आणी छंद.त्याचे वडील त्या वेळी नुकतेच वारलेले त्यामुळे त्यांच्या जागी आई मनोरुग्नालयात सफाई कामगार. मनाने उदार आणी त्यामुळे मालकाच्या रोज शिव्या खाणार, सोबत आमच्या ही,सध्या सोलापुर मध्ये हवालदार.आजही पुण्यात आला की आमच्या सर्वांसाठी सिगरेट्स घेउन येतो.

राजेश कापडणे : ह्याला सहसा आम्ही "धडपडण्या" म्हणुन संबोधायचो, त्या काळी दहावीत नापास झाल्यावर सिमेन्स च्या ऑफीसात "ऑफीसबॉय" , पण दररोज कामावरुन घरी आला की ह्याचा वॉचमन(ह्याचा बा नेहमी दरवाजात खुर्ची टाकुन लावाडी करत बसलेला असतो,अजुनही ,त्यामुळे वॉचमन) ह्याचा दररोज काँग्रेस करायचा म्हणुन "राज्या" कामावरुन आला की सायकल थेट टपरीवर.आज मालक "आयडिया" कंपनी त उच्चपदस्थ, माझ आणी त्याच एका पोरीवरुन, हो हो, पोरीवरुनच वाजल आणी तो माझ्याशी आजतागायत बोलत नाही, मात्र माझी खबर ठेवतो .(मी ही त्याची ठेवतोच म्हणा.) न बोलवता ,आळंदीत लग्नात ही आला होता नुसतच फुल आणी पाकीट देउन गेला.एकही शब्द बोलला नाही. ईतकच काय त्या पाकीटावर देखील काहीही लिहीलेले नव्हते.पाकीटात मात्र भरभक्कम रक्कम होती. मी सेम टु सेम त्याच्या लग्नात हेच केल होत .ह्याला एक गोंडस बाळ आहे. ईतक्या तोंडाने चिडचिड्या माणसाला एकदम शांत बाळ आहे.माझ्याशी टचमध्ये नसला तरी माझ्याविषयी सगळ्या खबरा घेण्यात माहीर ..आमची कुठे ही काव-काव झाली की महाराज दोन्ही हात जोडुन बाजुला उभा रहाणार. आणी काव-काव संपली की सगळ्या गोष्टींच व्यवस्थित समालोचन करणार,पण कोणावरही कधी ही हात उचलणार नाही.

उन्मेष पैय्यावल : आमच्या आख्ख्या ग्रुपचा लिडर, ह्याच आम्ही अजुन ही एकतो.आठवीत असल्यापासुन त्याच्या काकाच्या हाताखाली गॅरेज मध्ये काम करायचा .जवळपास सर्व परदेशी कार च काम करु शकतो.सध्या सिटीप्राईड चित्रपटगृहात स्टोअर मॅनेजर, एक नंबर कावेबाज,हुशार आणी डेयर-डेव्हील. आमच्या सर्वात आधी ह्याच लग्न झाल .त्या लग्नामुळे मी खुश तर झालो पण .....पुढे सांगतोच. हा दोन मुलांचा पिता आहे.आम्ही दोघे नंतर बरच दिवस एकत्र काम करत होतो,त्यामुळे मला जवळचा.पण गेल्या काही वर्षांपासुन " आउट ऑफ टच"

अजित तावडे : "दळींदर" हा शब्द आख्ख्या नागपुरचाळीत कुठे ही एकला की समजावे की "तावडे अज्या" ईथेच कोठेतरी आहे."तावडे अज्या " नाव एकले आहे काय ? काही वर्षापुर्वी पिंपरीत एका व्यापार्‍याचा खंडणी साठी खुन झाला होता...तावडे अज्या एक वर्षापासुन बेल वर आहे..भांडणा-तंडणात माझा सख्खा पार्टनर , एखाद्या पोलीसाने आपल्या कारकिर्दीत ईतक्या गुन्हेगारांना नसेल झोडपले त्यापेक्षा जास्त सख्येंने आम्ही शास्त्रीनगर, गाडीतळ आणी जकात नाक्यावरची पोर झोडपलीत.आणी थोडाफार मार ही खाल्ला .क्लासला असताना दहावीपर्यंत एक शांत मुलगा होता.नापास झाल्यानंतर सगळच बिघडत गेल.

बब्या उर्फ पराग : हा आमच्यात जरा उशीरा आला .पण "काय तरास?" टाईपच्या स्वभावामुळे लवकरच आमच्या मिक्स झाला..त्यापुर्वी फक्त मी आणी उन्मेष त्याला ओळखत होतो,हो,फक्त ओळखत होतो.पण ग्रुप मधील बाकी मंडळींशी परिचय व्हायला जरा वेळ लागला..

योगेश साठये : आमच्यात सर्वात सधन, भटक्या आणी पैसै फिरविण्यात माहीर , माझ्या २४ ऑक्टो. २००९ पर्यंत टच मध्ये , मधली दोन वर्षे सोडली तर..

नीता तावडे-पैय्यावल :: अज्याची बहीण , माझी मानलेली बहीण आणी उन्म्याची आधीची एकुलती एक गर्लफ्रेंड आणी आता बायको.दिल्ली बोर्डात शिकलेली, तोंड केवळ झोपेत असताना बंद असते, हल्ली कुठेतरी काम करते म्हणतात ,माहीत नाही पण संसार मात्र उन्म्या बरोबरच करते.

संध्या सपकाळ - साठये :: हिलाही मी बहीण मानायचो ...खास स्त्री-प्रधान घरात वाढलेली...फटकळ आणी आत्मविश्वासु...योगेशची ती शाळेत असल्या पासुन गर्लफ्रेंड,योग्या तेव्हा कॉलेजात होता.

काही वर्षे आम्ही सोबत होतो.. बारावीत माझी काव-काव लई वाढली, दोन केस झाल्या,एक हाफ-मर्डर.आमच्या महात्मा गांधीने मला घरातुन औ.बाद ला मामा कडे पिटाळले..तरीही योगेश माझ्या टच मध्ये होता..तो दोन वेळा गावाकडे आला, मामांना भेटला .पत्रव्यवहार तर चालुच होता.आमच्यात सर्वात जास्त कमविणारा योगेशच होता.त्याचीच ही मला न समजलेली कहाणी.....

योगेश सुरेश साठये , हे नाव नेहमी असेच घ्यावे असा नेहमीच आग्रह धरणार्‍या योगेशने,बारावी झाल्यावर नेस ला अ‍ॅडमिशन घेतली, ईकडे अण्णुंना(योगेशचे वडील) मस्का लावुन वॅन घेतली आणी स्वतासाठी फोर-व्हीलरचे लायसन्स काढुन घेतले ,ती वॅन दररोज मुंबई उप-डाउन करायला लागली.त्याला धंद्यातल्या सर्व गोष्टी कळायला लागल्या,एयर-पोर्ट ड्रॉप,मुंबईचे रस्ते,कोकण पासुन ते शेगाव पर्यंतचा रस्ता माहीत पडला.स्वभावानेच भटक्या असल्याने त्याला ड्रायंव्हीग हाच मोठा आधार वाटायला लागला त्यात पैसा ही यायला लागला. योग्या छानपैंकी कमवायला लागला.घरात स्कुटर घेतली ,फोन घेतला,पेजर घेतला.मी औ.बाद वरुन परतेपर्यंत सेटल झालता म्हणा ना !! मी पुण्याला परत आल्यानंतर नेसला परत अ‍ॅडमिशन घेतली. प्राईड हॉटेलला(पुर्वीचे अशोका) वेटरची नोकरी धरली.मागोमाग उन्म्या नी ही तिथे हाउसकिपींगमध्ये नोकरी धरली आणी उर्वरित वेळेत गॅरेजच काम. ईथेच आमची बब्याशी गाठ पडली ,बब्या मेन्टेनन्स ला होता.दरम्यान, मी औ.बादला असताना अज्याला निताची आणी उन्म्याची खबर लागली.अज्यानी उन्म्याला घरात जाऊन फटके दिले.अज्या आमच्या ग्रुपपासुन वेगळा झाला आणी राज्या माझ्या घरापासुन जवळच रहात असल्याने माझी त्याच्याशी घसट वाढली आणी योग्या तर टच मध्ये होताच.तेव्हा साडेसात रु.ईनकमिंगला पडणारे मोबाईल घ्यायची आमची लायकी नव्हती.मग काय अण्णाच्या हॉटेलवर निरोपाचे देवाण-घेवाण व्हायची.

मग काय चार मित्रांच रुपातंर "चांडाळ चौकडी " त झाल.उन्म्या,योग्या राज्या आणी मी चौघ जण "अलमास"वर साधारण दिवसाआड असायचो.एखादा मिसींग असेल तर त्याची खबर कोण ना-कोण तरी द्यायचेच. संध्याचा योग्याशी ब्रेक-अप झाला, उन्म्या निताच नख बघायला तरसत होता..ग्रुपमध्ये दारु वाढायला लागली.तेव्हा मी आणी राज्या रेगुररली पित नव्हतो आणी उन्म्या प्यायचा पण कंट्रोल मध्ये,योग्याला मात्र सवयच लागली.

अशातच एक दिवस कामाला जाताना मला नीता दिसली. मी लगेच योग्याला पेज केल. आणी उन्म्याला स्कुटरवर टाकुन घेउन आला. पॅच-अप झाला.भेटीगाठी वाढल्या,मग बाहेर जाताना अज्याची नजर चुकवायची म्हणुन योगेशच्या वॅनचा उपयोग होउ लागला, योगेश ह्या दोघांची ड्रायव्हरची ड्युटी करायला वैतागायचा,मग परत संध्याशी पॅच-अप करुन घेतला. अशातच त्याच्या पैशाच्या अफरातफरीची खबर अण्णुंपर्यंत गेली.योगेश बाहेरील ट्रिपमधील काही पैसै दारुसाठी वळते करुन घ्यायचा. घरी सगळ्यात लहान असल्याने थोडे दिवस हे लाड चालले ,नंतर चावी काढुन घेण्यात आली. वॅनचा ताबा योगेशच्या मोठ्या भावाने घेतला. त्याला ते काम काही जमेना, शेवटी ती वॅन विकावी लागली.ईकडे योगेश त्यानंतर अजुनच प्यायला लागला. घरात अण्णु त्याला वैतागले होते.सवयीच सवयी..दारु ,गुटखा, तंबाखु,सिगरेट कुठुन येणार पैसा.
मग योग्या बदल्या* मारायला लागला.ह्या बदल्या मारताना उन्म्या ला आणी नीताला संभाळुन घ्यायचा.माझा आणी राज्याचा टच मात्र मिस होत होता..

क्रमश ...

अग्ग्ग्ग्ग्ग्गं...........

अरे काय बे हे?
टोट्टल दुनियादारीच करुन बसला की! Smile

.

नाव सुहास आहे ना Smile

क्वाईट

क्वाईट इंटरेस्टिंग बडी ... वाचतोय ..

असेच

असेच म्हणतो आहे,

छान वेग आहे रे...

फटाफट लिही...

*****

मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही

असंच म्हणतो

दुनियादारीच करून राहिला ना भौ हा सुहास तर ...

---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

मस्त

मस्त रे..रंगलीय मस्त.....धम्याशी सहमत.....टोट्टल दुनियादारीच
लवकर टाक बे पुढचा भाग....बाकीच्यांसारखं (आणी माझ्यासारखं) नको करूस.....

--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

सॉलिट्ट्ट

सॉलिट्ट्ट्ट् अनुभव दिसतोय !!! पुढच्या भागाची वाट बघतोय...
लवकर टंकन करावे...

मदनबाण.....

अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.

मदनबाण.....

indian lost land to china... Sad
http://www.youtube.com/watch?v=5RPZbG7OmvE

छान छान

छान छान वाचतो आहे!

अवांतर : शिर्षक वाचून वाटले की तुम्हालाही एखादे नाईल छाप मुक्तक सुचले आहे की काय?

वाचतोय.

श्री सूहास, वाचत आहे.

अवांतर : श्री मात्र, थोडा बदल. शीर्षक वाचून वाटले की तुम्हालाही एखादे वाळवंटछाप निवडुंगी कल्पनादारिद्र्य प्रदर्शनात मांडावेसे वाटले की काय?

वाचतोय.

हा हा! आमच्या बद्द्ल एवढी माहीती गोळा केलीत या बद्द्ल प्रथम अचंबा वाटला, पण मग, न मागता, संदर्भ लागले आणि उलगडा झाला, तुम्ही नविनच आहात याची खात्रीही पटली! असो, कुणाच्या भवितव्या बद्द्ल आम्ही कशाला बोला? Wink

-Nile

हा हा

श्री सूहास, या धाग्यावर अवांतराबद्दल क्षमस्व. हे शेवटचे.

श्री नाइल, मागच्या वर्षी भर उन्हाळ्यात नाइलाजाने तीन आठवडे तुमच्या गावात काढावे लागले होते. त्या 'कोरड्या' जगातील निवडुंग चांगलेच लक्षात राहिले. (बाकी चर्चा खरडवहीत.) पुलेशु.

.

Smile.

-Nile

आठवण

दुनियादारीचीच झाली. वाचतोय. रोज एक भाग पडला पाहिजे.

+१

वाचतोय. रोज एक भाग पडला पाहिजे.

+२

वाचतोय. रोज एक भाग पडलाच पाहिजे, दोन टाकल्यास हरकत नाही.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

--अवलिया
आपली माणसं आपलीच नाती तरी कळपाची मेंढरास भीती

+३

वाचतोय....दोन टाकल्यास हरकत नाही. सहमत.

-माझी खादाडी.

एकदम मस्त..

एकदम मस्त.. वाचत आहे !!

--टुकुल

छान

छान छान.
दुस-या भागाची वाट बघत आहे.
लवकर येऊ दे.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

वाचतोय रे.

वाचतोय रे. फुल्टू दुनियादारी.
बादवे. खरडीला उत्तर न दिल्याबद्दल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

पुण्याचे पेशवे
|| हल्ली आम्ही संवेदणशील 'वाचण' बंद केले आहे ||

भन्नाट...

सुहास!

अज्या वगैरे लोकांची नावं बघितल्याबरोबर पुढच्या गोष्टींचा अन्दाज येतोय. मस्त रे! सगळं नीट येऊ दे. कळू दे हे पण सगळ्यांना!

Scroll to Top