प्रतिसादक उत्क्रांत होतो का?

प्रभो's picture
प्रभो in काथ्याकूट
27 Oct 2009 - 8:56 pm
गाभा: 

मिपावर यापुर्वी सिद्धहस्त लेखकांविषयी चर्चा झालेली आहे. मिपावर यापुर्वी सिद्धहस्त टवाळकांविषयी चर्चा झालेली आहे. पण मिपावर यापुर्वी सिद्धहस्त प्रतिसादकांविषयी चर्चा झालेली नाही. या प्रतिसादकांपैकी काही जण आजकाल फारसे प्रतिसाद लिहित नाहीत तर काहीजण अजिबातच प्रतिसाद लिहितांना दिसत नाही. गेल्या काही महिन्यांत ज्यांचे प्रतिसाद आवडले त्या प्रतिसादकांसंदर्भात हा चर्चाविषय आहे. सध्या लिहीते असलेले तीन प्रतिसादक अवलिया, ||राजे|| आणि टारझन (फक्त तीन नावांची अनुमती असल्याने बाकीच्या कंपूने माफ करावे ही विनंती) हे या मिपावर लक्षवेधी आणि वाचनीय प्रतिसादलेखन करतांना आढळतात. तीन्हींची शैली, हाताळलेले विषय निराळे आहेत. नुकतीच अवलिया यांनी 'जियो' तर टारझन यांनी 'एक्सलंट' ही प्रतिसादमाला सुरू केलेली आहे. अवलियांचे 'वा! वा ! वा! छान' आणि राजेंच्या '+१' च्या प्रतिसादमाला प्रसिद्धच आहेत तसेच अपुर्णही. खुद्द या प्रतिसादकांना त्यांच्या प्रतिसादांच्या वैविध्याविषयी काय वाटते? वाचकांना त्यांच्या लेखनात काही बदल जाणवत आहेत का? थोडक्यात या प्रतिसादकांच्या प्रतिसादनात ते उत्क्रांत होत आहेत असे आपल्याला जाणवते का?

अक्षय , ह घे बाबा... :)

प्रतिक्रिया

अक्षय पुर्णपात्रे's picture

27 Oct 2009 - 9:17 pm | अक्षय पुर्णपात्रे

चालू द्या. चोर्‍या करून लेख लिहिणे कठीण झाल्यामुळे काही लेखक प्रतिसादक झाल्यासारखे दिसतात.

प्रभो's picture

28 Oct 2009 - 2:15 pm | प्रभो

जाऊ दे रे अक्षय, तो त्यांचा त्यांचा व्यक्तीगत प्रश्न आहे....आपल्याला काय करायचय??

--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

अवलिया's picture

27 Oct 2009 - 9:05 pm | अवलिया

हा हा हा मस्त बे प्रभो...:)

च्यामारी हा काथ्याकुट कसा आपल्या तब्येतीला जमणारा...

ते आपलं लेखक लिहिणार.. वाचणारा वाचणार.. आवडलं तर तसं सांगणार .. नाही आवडलं नाही सांगणार...

तिच्यामायचा ट* ती अनुभुती, तरलता घंटा आपल्याला काही कळत नाही.

फाटकन बील देतांना मालक आजची मिसळ झक्कास होती किंवा पुचाट होती असा आपला खाक्या.. :)

बाकी सध्या मनापासुन प्रतिसाद लिहायला बंदी घातल्याने आम्ही "जियो" आणि "वा वा " असे प्रतिसाद चालु केले हे जग जाहीर आहे. नसेल तर आता होईल.
असो.

नाही म्हणता म्हणता मोठा प्रतिसाद झाला. जास्त लिहिला तर उडवला जायचा भिती आहे. चालु द्या तुमचा काथ्याकुट... जमेल तशी भर घालतोच. :)

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

विसोबा खेचर's picture

28 Oct 2009 - 9:23 am | विसोबा खेचर

आम्ही "जियो" आणि "वा वा " असे प्रतिसाद चालु केले हे जग जाहीर आहे.

माफी असावी. 'जियो..!' ही मूळ आमची ष्टाईल आहे. जुने संदर्भ तपासून पाहावेत..

आमची प्रतिसादशैली इतरांकडून पटकन उचलली जाते असे आमचे निरिक्षण आहे..

बाकी अलिकडे आम्ही खूपच बिझी असतो त्यामुळे पटकन एखादा लेख, पाककृती वगैरे समोर दिसल्यास त्यालाच केवळ प्रतिसादतो. इच्छा असूनही सर्व काही वाचायला, प्रतिसाद द्यायला टाईम भेटतोच असं नाही.

तात्या.

अवलिया's picture

28 Oct 2009 - 9:28 am | अवलिया

माफी असावी. 'जियो..!' ही मूळ आमची ष्टाईल आहे. जुने संदर्भ तपासून पाहावेत..

सहमत आहे. मी कुठेही ती स्टाईल मी चालु केली असे म्हटले नाही तर मी तसे लिहायला सुरवात केली असे म्हटले आहे.

बाकी सध्या मनापासुन प्रतिसाद लिहायला बंदी घातल्याने आम्ही "जियो" आणि "वा वा " असे प्रतिसाद चालु केले हे जग जाहीर आहे. नसेल तर आता होईल.

यापुढे "जियो" असे शब्द वापरतांना मुळप्रताधिकार तात्या अशी नोंद करत जाईल. ;)

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

सूहास's picture

27 Oct 2009 - 9:04 pm | सूहास (not verified)

=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))

=)) =)) =))

'वा! वा ! वा! छान'

जियो !!!

आणी

+१

बाकी ..

काही जण आजकाल फारसे प्रतिसादत नाहीत तर काहीजण अजिबातच प्रतिसादतांना दिसत नाही
मिपाच्या व्यवस्थापनावर पडणारा हास्यताण कमी करण्यासाठी प्रतिसादकांना आवर घालण्याचा प्रयत्न एकदा झाला होता. कदाचित त्याचा परिणाम असेल.
परमानंद घ्यारे
माझ्या या जागी चार ओळी रखडल्या आहेत, जमल्यास काढुन पहाव्यात.
http://13mera7.blogspot.com/

सू हा स...

आनंद घारे's picture

28 Oct 2009 - 8:00 am | आनंद घारे

या तंत्राचा छान उपयोग! का विडम्बन?
मूळ लेखच विडंबनात्मक असल्यामुळे त्याला आलेल्या प्रतिसादांचे सुद्धा विडंबन करण्याची आयडिया मस्त आहे आणि सोपीसुद्धा!
जियो!!!!!
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Oct 2009 - 5:39 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

काका तुम्हीसुद्धा! :-)

अदिती

आनंद घारे's picture

29 Oct 2009 - 8:23 am | आनंद घारे

की विक्रांती? एक शंका, हा शब्द बरोबर आहे ना?
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/

प्रकाश घाटपांडे's picture

29 Oct 2009 - 8:45 am | प्रकाश घाटपांडे

आमच्यापुरते बोलायचे झाल्यास आम्ही मिपावर नीष्क्रांत आहोत. नीमित्तमात्र अस्तित्व ठेवोनी आहे :H
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

विकास's picture

28 Oct 2009 - 4:00 am | विकास

मला वाटते, काही प्रतिसादक नक्की उत्क्रांत होत असतात - त्यांच्या संकेतस्थळावरील नावाने (लॉग इन आयडीने). अर्थात त्यातील काही हे उघड पणे दुसरे नाव घेतात आणि स्वतःची लोकप्रिय शैली न बदलता लिहीत राहतात . अर्थात ते प्रतिसादाव्यतिरीक्त स्वतःचे असे लेखनही करतात. तर काही, नवीन नावाने नव्यापद्धतीने संचार करू लागतात आणि अर्थातच त्यांची मर्यादा ही केवळ प्रतिसादक राहण्यापुरतीच असते. ;)

दशानन's picture

28 Oct 2009 - 8:51 am | दशानन

व वाघाच्या कातड्याखालील लांडगे पण असेच अलगद सापडतात ;)

*

=))

=))

=))

+ १ प्रभो !

प्रतिसादाचे सर्व अधिकार राखीव आहेत.

अक्षय पुर्णपात्रे's picture

28 Oct 2009 - 7:09 pm | अक्षय पुर्णपात्रे

साक्षात विठ्ठलानेही हातच टेकले असते या प्रतिसादकांसमोर. तुम्ही मात्र चुकीच्या खडकाखाली शोधताय. ;) जरा ते विकेंद्रीकरणाचं मनावर घ्याना.

विकास's picture

29 Oct 2009 - 9:41 am | विकास

साक्षात विठ्ठलानेही हातच टेकले असते या प्रतिसादकांसमोर.

हो ना कसे अगदी मनातले बोललात. वास्तवीक अशा प्रतिसादकांचे कान मोठ्ठे असतात, तेच पकडणे सोपे नाही का जाणार?

तुम्ही मात्र चुकीच्या खडकाखाली शोधताय.

आम्ही काही शोधत नाही. आम्ही पडलो हिंदू - एकात अनेक आणि अनेकात एकाला पहातो... फक्त ब्रम्ह आहे हे माहीत असले तरी समोर जो देव दिसतो त्याचे स्तोत्र तरी म्हणायला कमी करत नाही... ;)

जरा ते विकेंद्रीकरणाचं मनावर घ्याना.
लिहीन लिहीन. आणि हो विकेंद्रीकरण म्हणजे एका नावातून अनेक नावे तयार करणे हा उद्देश माझा नाही हे आधीच स्पष्ट करतो. :)

टारझन's picture

28 Oct 2009 - 11:46 am | टारझन

काय चालू आहे रे मुलांनो (पक्षी: तात्यावलिया) ?
सुखाने जगु देणार की नाही मला ? चोच्यांनो.. बघिन बघीन आणि जाईन निघून एकदाचा .. मग बसा टाळ कुटत !!

आणि काय विडंबण टाकलंय रे बाबा ? प्रायव्हेट चाट वर दिलेले मुद्दे घाला लेखणात नेक्स्ट टाईम पासून :)

शुभेच्छा !!

-- (गावभरच्या प्रतिक्रिया/लेख/नावांचं विडंबण करणारा) संत टारबा
गद्य विडंबणाची फॅशन टार्‍याने प्रथम मिसळपावावर आणली, आणि मग ती अंतरजालावर प्रचलित केली.

विशाल कुलकर्णी's picture

28 Oct 2009 - 11:52 am | विशाल कुलकर्णी

च्या मारी टोपी....
सुटलेत सगळे नुसते ! ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

परिकथेतील राजकुमार's picture

28 Oct 2009 - 3:53 pm | परिकथेतील राजकुमार

सिद्धहस्त प्रतिसादक आणी उत्क्रांत????

प्रभो (आपल्या-माझ्या खवतील संवादाप्रमाणे भाड्या न लावता),
सिद्धहस्त प्रतिसादकांच्या लेखनशैलीबद्दल मी पामराने शब्द काढणे म्हणजे पान खाउन अमेरीकेत थुंकण्यासारखे आहे....सिद्धहस्त आपण त्यांनाच म्हणतो ज्यांच्या भात्यात सर्व प्रकारचे हिन आणी हिणकस बाण आहेत आणी ते सोडायचे कसे हेही ते जाणतात...

स्पष्टोक्तीबद्दल क्षमस्व...पण माझ्या मते तुमचा टारगेट प्रतिसादक वर्ग चुकलाय. सिद्धहस्त प्रतिसादकांना उत्क्रांतीची गरजच काय???

उत्क्रांतीची गरज असते सर्वसामान्य प्रतिसादकास जो काळपरत्वे उत्क्रांत होउन सिद्धहस्त व्हावा....

--पराभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे कोदा,सामंता विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच ते प्रतिसादक,बाकी सगळे शून्य !!