मन

पद्मश्री चित्रे's picture
पद्मश्री चित्रे in जे न देखे रवी...
29 Aug 2009 - 5:36 pm

मन गवताचे पाते ,मन मेघ पावसाचे
मन पहाटवार्‍याचे , दव होउन बोलते..
मन नाजूक सतार ,मन अबोल गंधार
मन सांजावल्या रानी, कृष्ण बासरीचा स्वर...
मन रात्र शांततेची ,मन नक्षी चांदण्यांची
मन लाट सागराची, वाट आडवळणाची
मन तेज भास्कराचे,मन वार्‍याच्या वेगाचे
मन अलवार सूर नभी एकटे गुंजते
मन श्वास या देहात, मन पाखरु रानात
मन ज्योत राउळात कधी वीज आकाशात
मन पावसाचे थेंब ,मन जणु प्रतिबिंब
मन सुकल्या रानात, एक नाजुकसा कोंब..

शांतरसकविता

प्रतिक्रिया

दशानन's picture

29 Aug 2009 - 5:49 pm | दशानन

मन पावसाचे थेंब ,मन जणु प्रतिबिंब
मन सुकल्या रानात, एक नाजुकसा कोंब..

सुंदर ओळी !
आवडली कविता !

राघव's picture

29 Aug 2009 - 6:02 pm | राघव

फार साध्या शब्दांत अतिशय सुंदर लिहिलेत.. ब्येश्टेश्ट!!! :)

"मन पावसाचे थेंब ,मन जणु प्रतिबिंब".. खूप छान. येऊ द्यात अजून.

अभिनंदन!

राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )

कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी..
सदियों रहा है दुश्मन दौर-ए-जमाँ हमारा!

श्रावण मोडक's picture

29 Aug 2009 - 6:05 pm | श्रावण मोडक

सुंदर. आवडली.

अवलिया's picture

29 Aug 2009 - 6:28 pm | अवलिया

सुरेख...मस्त.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

यशोधरा's picture

29 Aug 2009 - 6:31 pm | यशोधरा

मस्तच लिहिलेस गं फुलवा...

मीनल's picture

29 Aug 2009 - 6:42 pm | मीनल

प्राजु ची कविता आठवली. साधारण अशीच आहे.
दोन्ही उत्तम आहेत.
प्राजु, कृपया टाक येथे .पुन्हा वाचू देत सर्वांना या कवितेच्या बरोबर.
मीनल.

हृषीकेश पतकी's picture

29 Aug 2009 - 7:02 pm | हृषीकेश पतकी

मन श्वास या देहात, मन पाखरु रानात
मन ज्योत राउळात कधी वीज आकाशात

मस्त जमलंय...

आपला हृषी !!

क्रान्ति's picture

29 Aug 2009 - 7:37 pm | क्रान्ति

खूप सुरेख लिहिलंस ग फुलवा!
मन नाजूक सतार ,मन अबोल गंधार
मन सांजावल्या रानी, कृष्ण बासरीचा स्वर...

सगळीच कविता खूप आवडली. वरच्या दोन ओळी अत्याधिक आवडल्या.

[कृष्णभक्त] क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी

मदनबाण's picture

29 Aug 2009 - 9:38 pm | मदनबाण

सुंदर कविता... :)

मदनबाण.....

Stride 2009 :---
http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html

प्रमोद देव's picture

30 Aug 2009 - 11:20 am | प्रमोद देव

कविता ’मनात’ ठसली.

विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Aug 2009 - 2:45 pm | बिपिन कार्यकर्ते

कविता मस्त आहे, आवडली.

बिपिन कार्यकर्ते

खादाड's picture

30 Aug 2009 - 2:57 pm | खादाड

छान !!! :)

मन's picture

30 Aug 2009 - 3:14 pm | मन

यावरुनच काही ओळी (बहुदा सुधीर मोघेंच्या (कवी ग्रेस ह्यांच्या दुसर्‍या एका कवितेवरुन बनवलेल्या))सहज आठवल्या...

मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा
स्वप्नातील पदर धुक्याचा, हातात कसा लागावा

मन थेंबांचे आकाश, लाटांनी सावरलेलं
मन नक्षत्रांचे रान, अवकाशी अवतरलेलं
मन गरगरते आवर्त, मन रानभूल, मन चकवा
मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा

मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे राऊळ
मन सैतानाचा हात, मन देवाचे पाऊल
दुबळया गळक्या झोळीत हा सूर्य कसा झेलावा
मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा

चेहरा-मोहरा याचा, कुणी कधी पाहिला नाही
मन अस्तित्वाचा सिंधू, भासाविण दुसरा नाही
या ओळखी नात्याचा, कुणी कसा भरवसा द्यावा

आणि हे ध्नि मुद्रित गीत म्हणुनही उपलब्ध आहे. बहुतेक श्रीधर फडक्यांनी चाल लावलिये सुरेख अशी.

आपलाच,
मनोबा

खूप दिवसांनी परत वाचली ही कविता.. परत तस्साच फील आला.. खूप सुंदर! :-)