दुनियादारी

प्रभो's picture
प्रभो in काथ्याकूट
20 Aug 2009 - 2:51 pm
गाभा: 

दुनियादारी..........

ही सु शिं ची कदम्बरी आपल्यापैकी खूप जणांनी वचली असेलच......ज्यांनी वाचली असेल त्यना नक्किच आठवली असेल.......
(ता क : हा काथ्याकूट आधी झाला असल्यास क्षमस्व...... )

ही माझी मराठी मधिल एक अत्यंत आवडती कादंबरी आहे.
ह्यावर मधे झी मराठी वर एक मलिका पण निघाली होती ज्यात 'दिग्या' ची भुमीका संजय नर्वेकर ने केली होती.....

तर मित्रहो....मला आपले आवडते/आवडती पात्र्/पात्रे कोणती हे जाणून घ्यायला आवडेल.....आणी का आवडते ते पन.....

तो हो जाये शुरु......

त्यातील माझं सग्ळ्यात अवडतं पात्र म्हन्जे.....एम के क्ष्रोत्री....

प्रतिक्रिया

मागच्याच महिन्यात 'दुनियादारी'वर खूप काथ्याकूट झाला आहे..
पण परत आवडेल... .. दुनियादारी ती दुनियादारी...

मी श्रेयस आहे ;) (म्हणायला काय जाते - हा हा हा.. )

पण माझे आवडते पात्र म्हणजे साईनाथ तो भुजंग आणि त्याची दिग्यावर मरणारी बहिण :D

हवेत सूक्ष्म धुम्रवलये न पाहू शकणारा बकरा आणि ३३ कोटी देव दाखवण्याचे आव्हान न पेलवणारा चित्रकार ... सगळे डोळ्यांसमोर उभे राहतात....

तुमच्या माहितीसाठी दुवे:

http://www.misalpav.com/node/7345
http://www.misalpav.com/node/7568

("दुनियादारी" प्रेमी) सागर

दशानन's picture

20 Aug 2009 - 4:28 pm | दशानन

श्रेयस & एम के :)

प्रभो's picture

20 Aug 2009 - 4:52 pm | प्रभो

अहो..काल रात्रिची परत एकदा वाचली.....म्हनून म्हटला काथ्याकूट करावा......

असो..... पोपट झाला....

सागर's picture

20 Aug 2009 - 5:26 pm | सागर

अहो प्रभो,

पोपट कसला? दुनियादारी हे जगणं आहे ... अगदी चिरतरुण ...
आज वाचून झाल्यावर सुद्धा परत दुनियादारी तुम्ही वाचलीत तरी तोच तरतरीत ताजातवाना फील येईन.... :)

दुनियादारी की जय हो...

विशाल कुलकर्णी's picture

21 Aug 2009 - 10:20 am | विशाल कुलकर्णी

सागरभौंशी २००% सहमत. माझ्यासारख्या सुशीभक्तांसाठी तर ही पर्वणीच आहे. आजही मी अस्वस्थ असलो की माझ्या बुकशेल्फमधुन दुनीयादारी काढतो. महिन्यातुन किमान दोनदा तरी दुनियादारी वाचणे होतेच. आवडते पात्र म्हणाल तर अर्थातच एम.के. श्रोत्री आणि दिग्या !

अवांतर : या दुनीयादारीमुळे मी माझं बारावीचं वर्ष गमावलं होतं, ऐन परिक्षेला बायोच्या पेपरच्या आदल्या रात्री दुनीयादारी वाचलं आणि दुसर्‍या दिवशी पेपरला काही आठवेच ना. साहजिकच बायो उडाला. त्यामुळे ट्रॅकच चेंज करुन सरळ डिप्लोमाला अ‍ॅडमिशन घेतलं. त्यावेळी बायो सोडला पण दुनीयादारी माझ्याकडे अजुनही आहे. गळ्याच्यान ! :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

संदीप चित्रे's picture

20 Aug 2009 - 8:53 pm | संदीप चित्रे

प्रत्येक पात्र त्याच्या / तिच्याजागी पर्फेक्ट आहे.

सागर,
माझ्या लेखाच्या दुव्यासाठी धन्स :)

टारझन's picture

20 Aug 2009 - 9:12 pm | टारझन

काय घाबरू नकोस रे प्रभो ... दुनियादारी २१ वेळा वाचून झाली तरी बोर नाही झालं .. त्यावर अजुन एक काथ्याकुट निघल्याने काय होणार ? हा टॉपिक तसा आमच्या आवडीचाच ...
आपल्याला तर बाबा साईनाथची भईणच आवडली .. काय क्यारॅक्टर होतं ते ?
देवी स्वप्नात येउन सांगुन गेलेली तिला .. की तिचं माझ्याशी लगिन व्हणार म्हणून .. उपास करत व्हती =))

- (डि.एस.पी. उर्फ दिग्या) टारझन

सागर's picture

20 Aug 2009 - 9:17 pm | सागर

टार्र्या ... खरे आहे रे बाबा... लै भारी =))

देवी स्वप्नात येउन सांगुन गेलेली तिला .. की तिचं माझ्याशी लगिन व्हणार म्हणून .. उपास करत व्हती

टारझन's picture

20 Aug 2009 - 9:29 pm | टारझन

होय रे सागरबाबा ,

दुनियादारी संपल्यानंतर तिचं लग्नही झालं, कुणा तिसर्‍याशीच!
बोळा निघाला आणि पाणी वाहतं झालं. त्याकरता ती आजही माझी आठवण काढते!

-(चालु) दिग्या

प्रभो's picture

20 Aug 2009 - 9:22 pm | प्रभो

सागरराव.....

साईनाथची भईण तुम्हालापण असच बोल्ली... जसा ती टार्याला बोल्ली होती???..

सागर's picture

20 Aug 2009 - 10:07 pm | सागर

टार्र्याने म्हटल्याप्रमाणे तो तिसरा कदाचित मीच असेन =))

विशाल कुलकर्णी's picture

21 Aug 2009 - 10:32 am | विशाल कुलकर्णी

१९९५ साली मी आणि माझ्या एका मित्राने सोलापुरात आमच्या ग्रिटिंग्जचे एक प्रदर्शन भरवले होते. सु. शि. माझ्या मावसभावाचे (नागेश क्षिरसागर) जिवश्चकंठश्च मित्र. त्यामुळे भाऊकडे वशीला लावुन 'सु.शि.' ना उद्घाटनासाठी म्हणुन बोलवले होते. एवढा मोठा लेखक पण मोठेपणाचा कसलाही बाऊ न करता आले. विशेष म्हणजे आम्ही येण्या जाण्याचा खर्च देवु केला होता तोही त्यांनी घेतला नाही.

सुशि म्हणजे एक व्यसन आहे माझ्यासाठी. त्यांची क्षितीज, हृदयस्पर्ष, जाता येता, झुम, बरसात चांदण्याची अशी पुस्तकं आणि मंदार पटवर्धन, डॅनी, दिनेश सायगल, बॅरिस्टर अमर विश्वास, गोल्डी, बॅ. दिक्षीत ,दारा बुलंद आणि मधुर्....आणि माझा फेव्हरिट फिरोज ईराणी ही अजरामर पात्रे आहेत.

मगे दुनीयादारीवरील एका लेखाला प्रतिसाद देताना "मुक्तसुनीत" यांनी म्हटलं होतं की
"दुनीयादारीकडं आयुष्याचा एक छोटासा तुकडा कायमचा गहाण पडला आहे." यातच दुनीयादारीचं मोठेपण लक्षात येतं. या सगळ्या आठवणी जागवल्याबद्दल तुमचे मनापासुन धन्यवाद प्रभोसाहेब.

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"