ध्यास... एक वेड

विमुक्त's picture
विमुक्त in जनातलं, मनातलं
14 Aug 2009 - 3:02 pm

You've got to find what you love - Steve Jobs

------------------------------------------------------------------------

परवा इंटरनेटवर Heinz Stucke बद्दल वाचलं.. एकदम वेडा माणुस आहे हा.. हा मुळचा Germany चा.. वयाच्या २० व्या वर्षी सायकल घेऊन जग बघण्या साठी घरातून बाहेर पडला.. आज पर्यंत ५४५००० कि.मी. सायकल चालवलीय आणि १९३ देश भटकलाय.. घरातून बाहेर पडला तेव्हा त्याच्याकडं एक सायकल, थोडेफार कपडे आणि फारच थोडे पैंसे होते.. त्याच्या फिरण्याला त्याच्या बाबांचा विरोध होता, त्यामुळं त्याला बाबां कडुन पैश्याची मदत मिळाली नाही आणि त्याला ती नकोच होती.. जवळचे पैसे संपले की असेल त्या देशात पडेल ते काम करायचा.. कधी एखाद्या दुकानात तर कधी एखाद्या बोटीवर काम करुन थोडेफार पैसे मिळवायचा.. पुरेसे पैसे जमले की पुढच्या प्रवासाला सुरुवात करायचा.. मग हळु-हळु त्यानं काढलेल्या फोटोंचे पोस्टकार्ड, लीहीलेले अनुभव विकून पैसे मिळू लागले.. बरेच अपघात आणि अडचणी आल्यातरी त्यानं प्रवास मात्र अखंड चालू ठेवला.. आता त्याला बर्याच sports कंपन्या sponser करतात.. आता तो ६८ वर्षांचा आहे.. अजूनपण तो सायकलवर भटकतोय..
तु इतकं का भटकतोस असं त्याला विचरल्यावर तो म्हणाला होता..
By that time I was 20, I did not particularly like my job and I did not see why I should spend the rest of my life doing something I did not care for very much .... just to make a living. "Is this all there is to life?", I asked, "I might as well go around the world"

---------------------------------------------------------------------------

माझा एक मित्र सध्या अमेरीकेत I.T. field मधे नोकरी करतोय.. इंजिनीयरींगला असताना नेहमी म्हणायचा की काहीतरी मस्त काम करायचयं लाईफ मधे.. पण मोठ्या पगारासाठी पहीली नोकरी न आवडणार्या field मधे पकडली.. मग त्याला अमेरीकेत जाऊन भरपुर पैसे कमवायचं वेड लागलं..
परवा बोलणं झालं त्याच्याशी..
मी विचारलं.. काय रे आतातरी खुष आहेस ना?..
तर म्हणाला.. पैसे कमवतोय रे.. पण काहीतरी missing आहे.. लाईफ मधे काही charm च नाहीये.. सकाळी उठलो की आज office ला जाऊन काहीतरी भारी काम करायचयं असं कधी वाटतंच नाही.. आणि आता तर मना सारखं कधी जगता येईल असं देखील वाटत नाही.. नुसतंच चाल्लयं..
मग मला वाटलं की त्यानं सुरुवातीलाच आवडत्या field मधे काम केलं असतं तर आज तो नक्कीच आनंदी असता.. शेवटी choice त्याची होती.. अशा वेळी James Hetfield च हे वाक्य आठवतं..
“I choose to live, not just exist”
खरंतर अजूनही त्याला हवं ते करता येईल पण तो मात्र खूप खचलायं आता..

----------------------------------------------------------------------------

माझं काम interesting आहे.. सोबत काम करणारेपण कामा बद्दल passionate आहेत.. कोणतीही गोष्ट मला हवी तशी implement करायचं स्वातंत्र्य आहे.. तरी सुद्धा हे नाही.. मला काहीतरी वेगळं करायचयं अशी जाणीव होते..

माझा मित्र अजित माझ्याच कंपनीत काम करतो.. काम करताना खूप आनंदी असतो तो.. त्याचं काम झालं असेल तर इतरांना मदत करतो.. उगीचच माझ्या सारखं gtalk, orkut किंवा एखादा blog वाचण्यात कंपनीतला वेळ वाया नाही घालवत.. त्याच्या मुळं खालच्या वाक्याचा अर्थ मला कळतो..
“Find a job you love and you’ll never work a day in your life”

नक्की काय हवयं असा प्रश्न विचारला की दर वेळेस "मला भटकायचयं" हे एकच उत्तर मिळतं..
नुसतं भटकायचयं???.. असं कसं चालेल..
का नाही?.. Heinz Stucke नाही का नुसता भटकला..
अरे पण जवाबदार्यांच काय?..
गो.नी.दां. वर जवाबदार्या नव्हत्या का?..
आवडीचं काम करणार्या इतर लोकांवर जवाबदार्या नसतात का?..
असतातच.. पण ते झगडतात.. नुसतं मला जगायचयं मला जगायचयं असं रडत नाही बसत..
अडचणी येणारच.. धक्के बसणारच.. आणि जे हवयं ते खरच आवडीचं असेल तर ह्या सगळ्याचा त्रास अजीबात होत नाही.. Heinz Stucke म्हणतो तसं..
"Every blow that does not kill me only makes me stronger"

मग नक्की चुकतयं कुठं?..
कुठंतरी माझेच प्रयत्न कमी पडतायेत.. माझाच माझ्यावर पुर्ण विश्वास नाहीये कदाचीत.. अश्या वेळी kung fu panda मधल्या Oogway आणि Shifu मधल्या ह्या संभाषणाची आठवण होते..

Oogway: My friend, the panda will never fulfill his destiny, nor you yours until you let go of the illusion of control.
Shifu: Illusion?
Oogway: Yes.
Oogway: Look at this tree, Shifu: I cannot make it blossom when it suits me nor make it bear fruit before its time.
Shifu: But there are things we can control: I can control when the fruit will fall, I can control where to plant the seed: that is no illusion, Master!
Oogway: Ah, yes. But no matter what you do, that seed will grow to be a peach tree. You may wish for an apple or an orange, but you will get a peach.
Shifu: But a peach cannot defeat Tai Lung!
Oogway: Maybe it can, if you are willing to guide, to nurture it, to believe in it.
Shifu: But how? How? I need your help, master.
Oogway: No, you just need to believe. Promise me, Shifu, promise me you will believe.

स्वतावर विश्वास ठेऊन.. एकदम झपाटून मला प्रयत्न केले पाहीजेत..
अगदी इक्बाल सारखंच.. आणि इक्बाल म्हणतो तसंच..

कुछ पाने की हो आंस आंस...
कोईं अर्मान हो जो खास खास...
हर कोशीश मे हो वार वार...
कर दर्यांओंको आर पार...

तुफानोंको चीर के...
मंजीलोंको छीन ले...

ले कर सुरज से आग आग...
गांये जा अपना राग राग...
कुछ ऐंसा कर के दिखा...
खुद खुष हो जांये खुदा...

आशांये खिले दिल की...
उंम्मिदे हंसे दिल की...
अब मुशकील नही कुछ भी...

हे आता हळु-हळु उमगतयं मला.. आर या पार च धाडस मला आता केलंच पाहीजे.. मला हवं तसं मीच जगलं पाहीजे.. आयुष्यात एक ध्यास, एक वेड असलंच पाहीजे.. काहीतरी करुन दाखवणारी माणसं ही वेडीच असतात..

कथा

प्रतिक्रिया

भाग्यश्री कुलकर्णी's picture

14 Aug 2009 - 3:10 pm | भाग्यश्री कुलकर्णी

छान लिहीला आहे.

अरुण वडुलेकर's picture

14 Aug 2009 - 3:16 pm | अरुण वडुलेकर

संगीत, गायन याचा पराकोटीचा ध्यास घेऊन आपलं सारं आयुष्य त्यांत झोकून देणारं एक सर्वश्रेष्ठ नांव लता मंगेशकर

विशाल कुलकर्णी's picture

17 Aug 2009 - 9:51 am | विशाल कुलकर्णी

सुरेख लिहीला आहे लेख ! अशी कितीतरी उदाहरणे आपल्या अवतीभवती घडत असतात, त्यांच्याकडे पाहीले के आपले खुजेपण जाणवते. मग ते आनंदवनाचा ध्यास घेणारे स्व. बाबा आमटे असोत, आदिवासींच्या कल्याणासाठी झोकुन देणारे डॉ. अभय आणि राणी बंग हे दांपत्य असो की रायगडाचा ध्यास घेणारे डोंबीवलीचे श्री. सुरेश वाडकर असोत.
छान, आवडला ! :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************
वंदे मातरम .....!

सहज's picture

14 Aug 2009 - 3:16 pm | सहज

लेख छान आहे.

होउन जाउ दे!!

ज्ञानेश...'s picture

14 Aug 2009 - 3:21 pm | ज्ञानेश...

अप्लॉज! =D>

विमुक्ता, तू नुसता चांगला भटक्याच नाहीस, तर चांगला लेखकही आहेस.
आपण आपल्या जॉबला किती कंटाळलो आहोत, याची पुन्हा नव्याने जाणीव झाली.. :<

तुझ्या सर्व संकल्पांना माझ्या शुभेच्छा!
गो अहेड डूड.

"Great Power Comes With Great Responsibilities"

क्रान्ति's picture

14 Aug 2009 - 6:44 pm | क्रान्ति

खरंच मस्त लिहिलाय लेख. वेडाशिवाय, ध्यासाशिवाय जगणं म्हणजे साहिरच्या शब्दांत "जनम गंवाकर जाना!"

क्रान्ति
सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा
अग्निसखा
रूह की शायरी

दशानन's picture

14 Aug 2009 - 6:51 pm | दशानन

मस्त लिहले आहे... आवडले !

***

तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !

यशोधरा's picture

14 Aug 2009 - 6:57 pm | यशोधरा

आवडलं.

स्वाती२'s picture

14 Aug 2009 - 7:05 pm | स्वाती२

छान लिहीलय.

अवलिया's picture

14 Aug 2009 - 10:24 pm | अवलिया

मस्त :)

--अवलिया

llपुण्याचे पेशवेll's picture

15 Aug 2009 - 2:12 am | llपुण्याचे पेशवेll

विमुक्ता लई भारी लिहीले आहेस. आवडले..
मला २-३ वर्षापूर्वी एक फ्रेंच बाई भेटली होती. हॉस्पिटलात नर्स म्हणून काम करायची ती ४५-५० वर्षाची असावी. एकटीच होती. २-३ वर्ष काम करून पैसे जमवायचे आणि मग मस्त ४-५ महीने एकट्यानेच भटकायचे हा तिचा आवडता छंद. श्रीलंका हा तिचा आवडता देश. प्रत्येक भटकंतीमधे एकदातरी ती श्रीलंकेत येते. अशीच फिरत पुण्यात आली होती कोणाच्यातरी रेफरन्सने नारद मंदीरात आली तेव्हा भेटली होती. पुढच्या वेळेला भारतात आली की नारद मंदीरात येऊन किर्तनपरंपरेचा अभ्यास करणार असे म्हटली होती. बघू आता कधी येते ते.
या जर्मनबाबाबद्दल वाचून उगाचच या फ्रेंच बाईंची आठवण आली.

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

फारच जवळ जाणारं वर्णन वाटलं..

स्फुर्तिदायक लेख! आवडला!

फॉरेस्ट गम्प परत बघितल्यासारखा वाटला.

गोगोल's picture

15 Aug 2009 - 9:50 am | गोगोल

मला ही नोकरिचा असाच तिटकारा आला होता. केवळ पैसे मिळतात म्हणुन काम करायचे हे पटत नाही.

रवि's picture

15 Aug 2009 - 12:15 pm | रवि

छान चिंतन ...............

रवि

अनंत अमुची धेयासक्ती अनंत अन आशा ......
एक नजर इकडेही टाका

प्राजु's picture

16 Aug 2009 - 5:38 am | प्राजु

लेखन आवडलं.

आर या पार च धाडस मला आता केलंच पाहीजे.. मला हवं तसं मीच जगलं पाहीजे.. आयुष्यात एक ध्यास, एक वेड असलंच पाहीजे..

ऑल द बेस्ट!! डू योर बेस्ट!! :)

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

एकलव्य's picture

16 Aug 2009 - 6:44 am | एकलव्य

विमुक्त मस्तच रे!

आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर प्रत्येकाने असा हा "वेडेपणा" केलेला असतोच असे मला वाटते. त्या वेड्या क्षणांना तर जीवन म्हणायचे बाकी सगळे निव्वळ श्वास घेणे आणि सोडणे.

(उभ्या आयुष्यभर नेहमीच शहाण्यासारखे वागणार्‍यांचे आयुष्य किती नीरस असेल असे एक उगाचच मनात चमकून गेले...)

- एकलव्य

विसोबा खेचर's picture

16 Aug 2009 - 9:44 am | विसोबा खेचर

मला हवं तसं मीच जगलं पाहीजे.. आयुष्यात एक ध्यास, एक वेड असलंच पाहीजे.. काहीतरी करुन दाखवणारी माणसं ही वेडीच असतात..

सह्ही बोला..!

तात्या.

मदनबाण's picture

16 Aug 2009 - 10:14 am | मदनबाण

मस्त लेख....
माझीही अशीच भटकंतीची इच्छा आहे...इतिहास शिकताना बर्‍याच वेळी अमुक एक प्रवासी.. अमुक एका देशाचा हिंदुस्थानात येऊन गेला..त्याने केलेल्या नोंदी,प्रवास वर्णन...इं. वर्णन वाचायला मिळे...मी विचार करत असे काय मिळत असेल नुसतच भटकुन...उत्तर मिळाले :---आनंद आणि अनुभव... :)
माझीही अशीच इछा आहे संपुर्ण हिंदुस्थान फिरण्याची आणि तिथले भरपुर फोटो काढण्याची...आपलाच देश अजुन आपण फिरुन का पाहिला नाही? हा विचार बर्‍याच वेळा माझ्या मनात येतो.
खरचं स्वतःला जे आवडतं ते करायला मिळाले तर त्याने मिळणारा आनंद वेगळाच !!!

चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतिहो. :)
http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo

रिचर्ड बाख च्या 'जोनाथन लिव्हिंगस्टोन सीगल' या पुस्तकाची आठवण झाली. त्यातले काही quotes द्यायचा मोह आवरत नाही.

त्यातल्या जोनाथन या सीगल ला लहानपणापासून जाणीव होते की most gulls don’t bother to learn more than the simplest facts of flight – how to get from shore to food and back again. For most gulls, it is not flying that matters, but eating.

त्याला स्वतःला मात्र उड्डाणातच परमसुख मिळत असतं.

त्याचे आई-वडील त्याला म्हणतातः
“Why, Jon ,why?” His mother asked. “Why is it so hard to be like the rest of the flock, Jon? Why can’t you leave low flying to the pelicans, the albatross? Why don’t you eat? Jon, you are bone and feathers!”

“I don’t mind being bone and feathers, Mum. I just want to know what I can do in the air and what I can’t, that’s all. I just want to know”

“See here, Jonathan,” said his father, not unkindly. “Winter isn’t far away. Boats will be few, and the surface fish will be swimming deep. If you must study, then study food, and how to get it. This flying business is all very well, but you can’t eat a glide, you know. Don’t you forget that the reason you fly is to eat”

सर्व ज्ञातीबंधनं झुगारून देऊन केवळ उत्कृष्ट उडणं याचाच ध्यास घेतलेला जोनाथन, अखेर त्याला कळतं: How much more there is now to living! Instead of our drab slogging forth and back to the fishing boats, there’s reason to life! We can lift ourselves out of ignorance, we can find ourselves as creatures of excellence and intelligence and skill. We can be free! We can learn to fly!

त्याच पुस्तकातून:

Jonathan Seagull discovered that boredom and fear and anger are the reasons that gull’s life is so short and with these gone from his thought, he lived a long fine life indeed.

..he learned to fly, and was not sorry for the price that he had paid.

इतकंच म्हणेनः Like Jonathan, you too won't be sorry!

विमुक्त's picture

17 Aug 2009 - 9:53 am | विमुक्त

जोनाथन लिव्हिंगस्टोन सीगल... खरंच खूप भारी आहे...

पाषाणभेद's picture

17 Aug 2009 - 2:24 am | पाषाणभेद

छान लेख लिहीलाय. आवडला.

वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

चिरोटा's picture

17 Aug 2009 - 12:22 pm | चिरोटा

लेख आवडला.
ध्यास ,वेडाचे आणि एक उदाहरण म्हणजे अ‍ॅपल कॉम्प्युटर्स. अ‍ॅपलचे एक संस्थापक स्टीव्ह वॉझनियाक(http://en.wikipedia.org/wiki/Steve_Wozniak) ह्यांचे 'I Woz' हे चरित्र वाचण्यासारखे आहे.त्याना इलेक्ट्रॉनिक्सचे खरोखरच वेड होते. संगणक सामान्य माणसाला परवडेल अशा दरात बनवण्याचे स्वप्न शाळेत असताना त्यानी पाहिले आणि १९७७ साली अ‍ॅपल II ची निर्मिती झाली. लहान मुलाना गणित्/विज्ञान शिकवण्याचे स्वप्नही त्यानी नंतर पुरे केले.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

विशाल कुलकर्णी's picture

17 Aug 2009 - 1:01 pm | विशाल कुलकर्णी

नागपुरातील "महाल" विभागात एक "मधुकाका भाकरे" नावाचे सदगृहस्थ राहात होते. (आता ते आहेत की नाही माहीत नाही, कारण मी त्यांना १५ वर्षापुर्वी भेटलो तेव्हाच ते सत्तरीच्या घरात होते). त्यांनी हस्ताक्षर कसे सुधारावे हे शिकवण्याची मोहीम हातात घेतली होती. स्वखर्चाने गावोगावी फिरुन ते हस्ताक्षर सुधारणेचे धडे देत, शिकवीत. जवळ जवळ चाळीस वर्षे त्यांचे हे कार्य चालु होते.

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

फ्रॅक्चर बंड्या's picture

17 Aug 2009 - 1:01 pm | फ्रॅक्चर बंड्या

मस्त आहे लेख आवडला
कशाचे तरी झपाटलेपण हवेच नाही तर जगण्यात मजाच नाय

समंजस's picture

17 Aug 2009 - 1:36 pm | समंजस

मनातलं बोलणारा लेख आहे!
(मात्र मला आता बराच उशीर झालाय...) :(

विमुक्त's picture

17 Aug 2009 - 1:57 pm | विमुक्त

उशीर वगेरे नाही होत हो कधी... हळु हळु आपल्याला आवडतं ते करायला सुरुवात करायची... एकदम drastic step नाही घ्यायची... जमल्यास बहुगुणी म्हणतात तसं jonathan livingston seagull वाचा... सुदंर आहे ते फार...

ऋषिकेश's picture

17 Aug 2009 - 2:50 pm | ऋषिकेश

नेमका लेख! खूप आवडला

ऋषिकेश
------------------
दुपारचे २ वाजून ४९ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक गीत "जपत किनारा शीड सोडणे नामंजूर.. अन वार्‍याची वाट पाहणे नामंजूर.."

विमुक्त's picture

18 Aug 2009 - 7:49 pm | विमुक्त

तुम्ही लेख वाचलात ह्याचा आनंद आहे... फार आभारी आहे...