१६००० ......?

आज २०० अंकानी वरती उघडलेला बाजार आत्ता -१० आहे. वरती जायला लागला की त्ञाचे पाय परत जमीनीवर दाणकन येत आहेत.

बाजार १६००० स्पर्श करुन १५५०० ते १६५०० च्या दरम्यान कन्सोलिडेट ( याला मराठी शब्द काय?) होईल. बजेट रैली फार काही चांगली निष्पन्न होइल असे वाटत नाही

बाजारात फार मरगळ आहे. तेजीचा फायदा घेवुन जुने जाणते बाजारातुन बाहेर पडत आहेत. बाजार पुन्हा एकदा विक्रीच्या मा-यात गोता खाणार असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. उत्पादकांशी येत असलेल्या नेहमीच्या संबंधातुन एक गोष्ट जाणवत आहे ती म्हणजे बाजारात मागणी घटत चालली आहे व पैशाचे रोलिंग नीट होत नाहीये.

दोलर चढल्यामुळे आय टी आज जोरात आहे पण आयटीला सध्या फारसे चांगले भवितव्य नाही. कालपर्यत आय टी शेअर वर उड्या मारणारा गुजराती समाज आज आयटी चे नाव काढताच तोंडातला गुटखा पचकन थुंकुन दुर रहाण्याचा सल्ला देतो. मराठी माणुस त्याचा कुणी आयटीतला नातेवाइक सांगतो म्हणुन आयटी शेअर घेतो व फसतो. २२००-२३०० वर इन्फोसिस घेवुन उर बडवणारे मराठी व २३०० चा २१५० झाल्याबरोबर विकणारे गुजराथी मला माहित आहेत. अहो माझे एक परिचीत त्यांचा मुलगा याच कंपनीत... पोरानेच सांगितले म्हणुन २०००-२१०० चे १५० शेअर्स घेवुन कुरवाळत बसले. आता बोलाः)

मिसळपावकरांना सावध करावे म्हणुन लेखन.

नाना

ज्ञानोबा म्हणाले आहेत...

उपजे ते नाशे नाशले पुनरपि दिसे ।
हे घटीकायन्त्र तैसे परिभ्रमे गा ।।

शेअर बाजाराचे पण तसेच आहे. तो खाली गेला तसा तो वर पण जाईल रहाट गाडग्यासारखा.

जेव्हा भावूक सूचकांक २०,००० पोचतो तेव्हा सगळे आनंदात नफा करून घेत असतात मग तो कोसळल्यावर दु:ख कशाला?

consolidated = समेकित

http://www.shabdkosh.com/en2hi/search.php?e=consolidated&f=0

हे घटीकायन्त्र तैसे परिभ्रमे गा ।।

फार सुंदर!

तुका म्हणे उगा रहावे, जे जे होईल ते ते पहावे!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

नाना धन्यव

नाना

धन्यवाद. बहुतेक मि.पा.कर दीर्घमुदत निवेषक असावेत. आपले निष्कर्ष ट्रेडर्सला जास्त उपयोगी वाटतात . दीर्घमुदत निवेषकांसाठी काय सल्ला?

मोहन

नाही मी तर रोज व्यापार करते....

र्‍हस्व निवेशक Wink

दीर्घ मुदत आणि र्‍हस्व मुदत यांचे स्वत:चे फायदे तोटे आहेत.

अरे वा !

मी उगाचच सगळ्या मि. पा. करांना एकाच तराजूत तोलत होतो.
चु. भू. द्या. घ्या.

मोहन

नाना......

आज २०० अंकानी वरती उघडलेला बाजार आत्ता -१० आहे. वरती जायला लागला की त्ञाचे पाय परत जमीनीवर दाणकन येत आहेत.

नाही नाना आता बंद होताना फक्त + ११७. उद्या पुन्हा +++++++++++

दोलर चढल्यामुळे आय टी आज जोरात आहे पण आयटीला सध्या फारसे चांगले भवितव्य नाही.
एकदम मान्य

रोजच्या खरेदी विक्री तुन नफा मिळविन्यासाथी सध्या आय टी चांगले.

(उद्याचा ++++ बाजार पहाणारा) मनीष पाठक

हे करून पहा...

शेअर बाजारात आपले अंदाज खरे ठरतील की नाही पाहण्यासाठी आभासी खेळ virtual game
http://moneybhai.moneycontrol.com/ इथे.

तुम्हाला जर उद्या बाजार +++ वाटत असेल तर आज भरपूर खरेदी करा... (खोटी खोटी) म्हणजे बक्कळ पैसा कमवाल ... (खोटा खोटा)

फंड चा फंडा %%%%%

म्युचल फंड मधे गुंतवणुक करणार आहात?
या संकेत स्थाळाचा फेरफटका मारा.:---
http://www.valueresearchonline.com/

शेअर बाजार १४००० ते १२०००

According to Investment Guru, Marc Faber, the markets may get oversold in the next few months and then see a rally. New highs are pretty much out of question, he told CNBC-TV18. The Sensex may test 14,000 levels before slipping to 12,000 levels, he said. There is room for more downside in emerging markets (EM), says Marc Faber, Investment Guru, on CNBC-TV18. In fact, EMs may get oversold in the next six months, he adds. He sees 30-40% drop in EMs from current levels. In India, the Sensex may test 14,000 before slipping to 12,000, he adds. Source : moneycontrol.com

Sorry this in english & i'm not been able to translet it in good marathi.

इन्वेस्ट्मेंट गुरु मार्क फॅबर यांच्या अनुमाना प्रमाने शेअर बाजार १४००० ते १२००० पर्यंत जाइल .

मनीष पाठक

अरेरे

मनीषभौ, तुमचा गुरुच चुकलाय. बघा, काल तुमचा अंदाज +++ चा होता पण आता बाजार
-२८६ आहे.

गुरु बदला.

तुमच्या कचेरीच्या बाहेर पोपट घेऊन ज्योतिषी बसतो का? त्यालाच विचारा.

तुम्ही १२,००० म्हणताय, मी म्हणेन दिवाळीपर्यंत २२,०००. कारण शेअर बाजारात कोणतेही अंदाज कधीच लागू पडत नाहीत.

ओ नाना

ओ नाना तुमी लय घाबरवता राव....

तात्या

या नानाला हाकला बरं च्यायला ये हुनार ते हुनार मुन सारखा भ्याव दाव्तो
चांग्ली सम्ज द्या बरे

पक्या

आमचे १६०००

आमचे १६००० चे भाकित खरे ठरले याचे दु:ख वाट्ते

मार्केट १४००० पर्यंत फरफ्टेल

सावध रहा

नाना