मुंबई महानगर पालिकेचा बेफिकीर कारभार

घाशीराम कोतवाल १.२'s picture
घाशीराम कोतवाल १.२ in काथ्याकूट
28 Jul 2009 - 11:22 am
गाभा: 

मटा तील ही बातमी

मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे ७४ हजार नागरिकांना एड्सची भीती निर्माण झाली आहे फेब्रुवारी ते मे २००७ या काळात झालेली तब्बल ७४ हजार ७६४ नागरिकांची एचआयव्ही चाचणी पुन्हा करावी लागणार आहे. कारण तेव्हा वापरलेली तपासणी यंत्र सदोष असल्याचा साक्षात्कार पालिका प्रशासनाला आत्ता झालाय. त्यामुळे ह्या कालावधीत HIV तपासणी केलेल्या रुग्णानमधे घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे
सरकारी पातळीवर भ्रष्टाचार हा आता लपुन राहिलेला नाहि पण ह्या प्रकारामुळे लोकांच्या भावनेशी आरोग्याशी खेळ होत आहे हा प्रकार अत्यंत संतापजनक आणी चीड आणणारा आहे. गोरेगावला राहणा-या एका व्यक्तीला महापालिकेचा एचआयव्ही रिपोर्ट आणि खासगी हॉस्पिटलमध्ये देण्यात आलेला रिपोर्ट, यात तफावत आढळल्यानंतर हे सगळं प्रकरण उघडकीस आल्याचं समजतं.
समजा ह्या काळात एखाद्याने लग्ना अगोदर HIV तपासणी केली असेल आणी त्यात तो निगेटीव्ह असेल आणि आता जर तोच व्यक्ती पॉझिटीव्ह ठरला तर त्या व्यक्तीची पत्नी मुले ह्यांना ही हा आजाराचा संसर्ग झालेला असणार आहे मग ह्या निष्पाप जीव मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या गलथान कारभाराचे बळी ठरणार ना.
तुम्हाला काय वाटत ह्या भ्रष्टाचार्‍याच काय कराव ?

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

28 Jul 2009 - 11:44 am | चिरोटा

तुम्हाला काय वाटत ह्या भ्रष्टाचार्‍याच काय कराव ?

मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचार पाचवीलाच पुजला आहे.शव विछ्छेदनामध्येही पैसे खायला बघणारे पोलिस्, महापालिका अधिकारी्. ह्यांच्याकडून काय अपेक्षा करणार?
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

हरकाम्या's picture

28 Jul 2009 - 5:39 pm | हरकाम्या

अरे घाशीरामा रोज वर्तमानपत्रात आणि न्युज वाले या पालिकेच्या नावाने कायम बोंब मारत असतात. आपण यात वेगळी अशी भर का घालताय ?

विसोबा खेचर's picture

28 Jul 2009 - 6:33 pm | विसोबा खेचर

भ्रष्ट महापालिकेकडून अधिक काय अपेक्षा?

तात्या.

वेगाने ढासळत आहे त्याबद्दल चिंता करण्याची गरज आहे.

मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे ७४ हजार नागरिकांना एड्सची भीती निर्माण झाली आहे फेब्रुवारी ते मे २००७ या काळात झालेली तब्बल ७४ हजार ७६४ नागरिकांची एचआयव्ही चाचणी पुन्हा करावी लागणार आहे.


इतक्या लोकांना का बरे एडस् ची भिती भेडसावत आहे?
वेताळ