मराठी संकेतस्थळे

leo nardo di caprio's picture
leo nardo di caprio in काथ्याकूट
24 Jul 2009 - 11:44 am
गाभा: 

मराठी संकेतस्थळांचा इतिहास या संकेतस्थळावर देण्यात आलेला आहे.

सुरुवात कोणत्या संकेतस्थ्ळाने केली आणि होता होता त्याचा वटव्रक्ष कसा झाला त्याची इंत्यंभुत माहिती दिली आहे.

त्याच बरोबर काहि मराठी संकेतस्थळांची माहितीही दिली आहे.

http://mr.wikipedia.org/wiki/मराठी_संकेतस्थळे

प्रतिक्रिया

घाशीराम कोतवाल १.२'s picture

24 Jul 2009 - 12:19 pm | घाशीराम कोतवाल १.२

मस्त लिहिला आहे मराठी संकेतस्थळांचा इतिहास विकिपीडिया वर

**************************************************************
"मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा"
सौजन्य अदिती

आशिष सुर्वे's picture

24 Jul 2009 - 1:21 pm | आशिष सुर्वे

छान!!

काही अंश ईथे प्रसिध्द करीत आहे:

''प्रत्येक संकेतस्थळाला क्वचीत मर्यादा पडतात. त्यामुळे त्यानंतरच्या काळात मराठी माणसाला अभिव्यक्त होण्यासाठी विविध संकेतस्थळांची निर्मीती केली गेली. 'मनोगत' व 'उपक्रम' ही त्यापैकीच (www.manogat.com & www.mrupakram.org) ही संकेतस्थळे आजही जोषात चालू आहेत. या सर्व स्थळांवर अगदी इस्लामपूरपासून ते कॅलिफोर्निया पर्यंतचे सदस्य आहेत. व ते या स्थळांवर पाककृती ते जागतिक विषय यांवर चर्चा करत असतात. 'मनोगत' ने तर शुध्द मराठी लिखाणाची सोय उप्लब्ध करून दिलेली आहे. तर 'उपक्रम' ने खरडवही व व्यक्तिगत निरोप यांची सोय दिलेली आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे आपण घरी बोलतो त्याप्रमाणे बोलणे शक्य झाले आहे.

यानंतर, म्हणजे सर्वात महत्वाचे व सध्या खुपच प्रसिध्द असलेले 'मिसळपाव' हे संस्थळ (www.misalpav.com) वरील तिन्ही स्थळांचा उत्तम मिलाफ त्यांनी साधला आहे. गेल्या अवघ्या दिड वर्षात इथे विविध विषयांवरचे 5000 लेख आहेत. यावरून आपण महाजालावरच्या मराठीच्या प्रगतीचे विश्लेषण करू शकतो. महत्वाचे म्हणजे इथे अगदी 'ग्राफिटी' कार अभिजीत पेंढारकर ते अर्थविश्लेषक रामदासापर्यंत सर्व लेखक आहेत. त्यामुळे ख-या अर्थाने मराठीविश्व जवळ आलेले आहे. याशिवाय बजबजपुरी, मी मराठी इ. स्थळेही बाळसे धरत आहेत.''

-
कोकणी फणस

''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''

दशानन's picture

29 Sep 2011 - 1:23 am | दशानन

---

विकि's picture

24 Jul 2009 - 6:42 pm | विकि

नमोगताचा उल्लेख मिपावर खटकला.

शैलेन्द्र's picture

24 Jul 2009 - 9:53 pm | शैलेन्द्र

त्यात खटकण्यासारखे काय आहे?

शाहरुख's picture

24 Jul 2009 - 10:17 pm | शाहरुख

हेच म्हणतो..
आणि मनोगतला नमोगत म्हणणे ही काय भानगड आहे ??

(बर्‍याच दिवसांपासूनचे कुतूहल आहे म्हणून अवांतर केले )

विकि's picture

24 Jul 2009 - 10:41 pm | विकि

ती एक भावनिक भानगड आहे मी नाही सांगू शकत माफी असावी.

शैलेन्द्र's picture

25 Jul 2009 - 7:38 pm | शैलेन्द्र

"मराठी आंतरजालिय राजकारण" यावर कुणि लिहिता का विकीवर?

आशिष सुर्वे's picture

24 Jul 2009 - 8:34 pm | आशिष सुर्वे

कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता.
माफ करा.

-
कोकणी फणस

''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''

आशु जोग's picture

28 Sep 2011 - 11:29 pm | आशु जोग

मिसळपावचे नाव पाहून डोळे पाणावले

निर्मात्याचे आभार

सुहास झेले's picture

28 Sep 2011 - 11:40 pm | सुहास झेले

आज भरपूर खाणकाम केलेले दिसतंय....
काही धागे पुन्हा वर बघून डोळे पाणावले.. असो, चालू द्या ;-) :D :D :)