अमेरिकेचा माज..

शाहरुख's picture
शाहरुख in काथ्याकूट
23 Jul 2009 - 3:59 am
गाभा: 

काँटिनेंटलच्या खुलाश्याचीच वाट बघत होतो मी..

माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांची भारतीय विमानतळावर विमानात प्रवेश करण्याआधी विमान वाहतूक कंपनीने झडती घेतल्याचे आपण वाचले असेलच..काँटिनेंटलवाले म्हणतायेत की "US Transportation Security Administration requires final security check without exemption"

साला, ओबामा भारतात येईल तेंव्हा त्याची पार नागडा करून तलाशी घेतली पाहिजे आपण..त्याच्याशी काही वाकडे नाही, पण 'मेसेज' जाणे जरूरीचे आहे.

प्रतिक्रिया

Nile's picture

23 Jul 2009 - 4:05 am | Nile

That apology though has not pulled Continental out of turbulence. Aviation Minister Praful Patel is bent on punishing those responsible for insulting the former First Citizen of the country.

क्या बात है! होप फॉर द बेस्ट. :)

आता यात पण निवासी-अनिवासी आणु नका म्हणजे झालं. =))

शाहरुख's picture

23 Jul 2009 - 4:14 am | शाहरुख

काँटिनेंटलचा किंवा त्यांच्या कर्मचार्‍यांचा मला यात तेवढा दोष नाही वाटत..आणि झडती घेणारे अनेकदा निवासी भारतीय पोरं-पोरीच असतात..

एकलव्य's picture

23 Jul 2009 - 5:04 am | एकलव्य

!

llपुण्याचे पेशवेll's picture

23 Jul 2009 - 5:09 am | llपुण्याचे पेशवेll

हो मान्य पण त्याना आदेश देणारे कोण असतात हा कळीचा मुद्दा आहे. कारण मध्यंतरी एअर फ्रान्स ने असा माज केला होता. भारतीय नेत्यांच्या बाबतीत नव्हे पण भारतीय प्रवाशाना सापन्त वागणूक दिली होती.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

शाहरुख's picture

23 Jul 2009 - 5:24 am | शाहरुख

>>हो मान्य पण त्याना आदेश देणारे कोण असतात हा कळीचा मुद्दा आहे

मला ही तेच म्हणायचे होते :-)

Nile's picture

23 Jul 2009 - 6:15 am | Nile

तुम्हाला काय म्हणायचं आहे नक्की? एका अमेरिकन अधिकार्‍याने मुद्दाम ही वागणुक देण्यासाठी या कर्मचार्‍यांना आदेश दिला?

अमेरीकन व्यापारी विमान वाहक कंपनी, मला वाटतं, फक्त नफ्याचा विचार करेल, अश्या फालतु राजकारणात पडून भारतीय प्रवासी गमवण्यात त्यांना काय हशील?

जरा विस्तृत बोलतात तर मला कळेल if I am missing something.

* आता 'एखाद्या अनिवासी भारतीय बॉस ने त्याच्या निवासी भारतीय कर्मचार्‍यांना करायला सांगीतलं' असे जर म्हणायचे असेल, तर आम्ही गपचुप चपला घालुन चालु पडतो. (;*

शाहरुख's picture

23 Jul 2009 - 7:51 am | शाहरुख

>>आणि झडती घेणारे अनेकदा निवासी भारतीय पोरं-पोरीच असतात..

वरील वाक्याचा या चर्चेशी संबंध नाही..तुम्ही निवासी-अनिवासी असा उल्लेख केला होता (का ते नाही कळाले) म्हणून ते लिहिले होते..

मी ही चर्चा वाचली तेंव्हा मला असे जाणवले की देशप्रेम व्यक्त होण्यासाठी किंवा देशाला ROI देण्यासाठी देशात राहणे गरजेचे आहे असे काहींना वाटते.

कदाचित पटणार नाही पण मी भारतात नोकरी करत होतो तेंव्हा मला बरेचदा असे वाटायचे की ज्या देशाने माझ्या देशावर १५० वर्षे राज्य केले त्या देशातल्या कंपनीसाठी काम करून (ती आमची ग्राहक होती) चूक तर करत नाहीय ना..पण हळूहळू मी स्वतःला समजावले की ग्लोबलायजेशन वगैरे जे काय म्हणतात ते हेच असावे..माझ्या कामाने माझ्या कंपनीला (जिचा मी नोकर होतो) फायदा होतोय ना, मग मी हे काम करायला हरकत नाही.

जर देशप्रेम व्यक्त करण्यासाठी जर भारतात राहणे गरजेचे असेल तर मग परदेशी कंपनीत काम देखील करता कामा नये..भारतीय कंपनीत काम करून परदेशी कंपनीला सेवा देखील पुरवता कामा नये.. कॉल-सेंटर्,बीपीओ सारख्या क्षेत्रात प्रगती करून देशाच्या पायाभूत सुविधांचा थोडीच विकास होणार आहे ??
तरीही आपण या गोष्टी करत आहोत..आणि अप्रत्यक्षरित्या देशाला त्याचा फायदा होत आहे असे मला वाटते.

"मी हे मिस करतो, ते मिस करतो" चा गजर करणारी लोकं, वार्षिक सुट्टीला भारतात जाण्याआधी मेसेंजर,ऑर्कुटवर "ने मजसी ने परत मातृभूमीला" असली वाक्यं टाकणारी लोकं मात्र माझ्याही डोक्यात जातात.

Nile's picture

25 Jul 2009 - 1:26 pm | Nile

पेशव्यांच्या वाक्याला तुम्ही दुजोरा दिलात, ते का हे मला निटसे कळले नाही म्हणुन तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे हे विचारलं.

असो त्या चर्चे संबंधी इथे काहीही बोलणे म्हणजे चांदणी वाटप केंद्र सुरु केल्या सारखे होईल. :)

एकलव्य's picture

23 Jul 2009 - 5:07 am | एकलव्य

पटेल आणि खासदारांची उगाच बोंबाबोंब चालली आहे. कलाम यांचे निमित्य करून स्वत:ला मिळणारी व्हिआयपी ट्रिटमेन्ट टिकविण्याचा प्रकार वाटतो.

the ex-President himself had no complaints. His personal secretary explained: “Dr Kalam has never objected to a security check, and he goes through all checks wherever he goes. In fact on arrival in US, he complied with the entire drill, even taking off his coat and shoes.”

When asked whether the ex-President raised any objections, his secretary replied: “Not at all. He’s above all this.”

- एकलव्य

तूर्तास आम्ही कॉन्टिनेन्टलने प्रवास करण्याचा बेत पक्का करण्यात मग्न आहोत...

Nile's picture

23 Jul 2009 - 5:18 am | Nile

हा हा हा! नेहमीचाच प्रकार. म्हणुनच म्हणलं होतं क्या बात है. बघु या किती पाठपुरावा करताहेत हे लोक. :)

(काँन्टीने सुखरुप प्रवास करुन आलेला) :)

शाहरुख's picture

23 Jul 2009 - 5:22 am | शाहरुख

कलामांना काही आक्षेप नाहीय हा त्यांचा विनम्रपणा..

मी पटेलांशी इथे सहमत आहे..भले त्यांचे घोडे देखील यात न्हाऊन निघाले तरी चालेल.

Nile's picture

23 Jul 2009 - 5:25 am | Nile

शाहरुख साहेब, बर्‍याचदा हे नुसत्या सनसनाटी बातम्या देतात.
हे पहा:

Kalam, however, did not seem forgiving. His statement released on Tuesday read, “What has happened is a fact and there is nothing to comment about now”.

स्वानुभवाने सांगतो हे IBN वाले काय वाट्टेल त्या बातम्या देतात.

एकलव्य साहेब आपण बातमी कुठुन दिलीत जरा दुवा द्याल का प्लीज?

एकलव्य's picture

23 Jul 2009 - 5:29 am | एकलव्य

... http://economictimes.indiatimes.com/Opinion/Frisk-everybody-/articleshow...

हे आर्टिकल जरा सेन्सिबल वाटले.

आणि हे एकलव्य साहेब तेव्हढं म्हणू नका हो...

Nile's picture

23 Jul 2009 - 5:54 am | Nile

धन्यवाद. :)

आणि हे एकलव्य साहेब तेव्हढं म्हणू नका हो...

एकलव्यराव काय फिट्ट होत नाही हो म्हणुन साहेब म्हणालो. ;)

शाहरुख's picture

23 Jul 2009 - 7:57 am | शाहरुख

तसे तर इकॉनॉमिक टाईम्स देखील मला मसालेदारच वाटतो. मी हिंदू मधील ही बातमी देखील वाचली होती आणि त्यात ही अश्याच प्रकारचा खुलासा होता.

अवांतर :- मलाही साहेब म्हणू नका..जेंव्हा समोरच्याला आदर द्यायची इच्छा नसते तेंव्हाच "साहेब" म्हटले जाते असे माझे निरिक्षण आहे आणि तुम्हाला तसे करायचे नव्हते असे मी धरून चालतो :-)

Nile's picture

25 Jul 2009 - 1:21 pm | Nile

हिंदुतील बातमी असे म्हणते:

hough Dr. Kalam has not commented on the incident, his aides said the former President has never objected to security checks at airports, and that he complied with them without a fuss during his tour to the U.S. in April.

असो.

मलाही साहेब म्हणू नका..जेंव्हा समोरच्याला आदर द्यायची इच्छा नसते तेंव्हाच "साहेब" म्हटले जाते असे माझे निरिक्षण आहे आणि तुम्हाला तसे करायचे नव्हते असे मी धरून चालतो Smile

तुमचे निरिक्षण माझ्या बाबतीत तरी चुक आहे. :)
तुम्हाला खरेतरं शाहरुख मिया म्हणणार होतो पण माझं उर्दू माझ्या मराठीपेक्षाही बत्तर असल्याने तसं धाडस केलं नाही. ;)

लंबूटांग's picture

23 Jul 2009 - 5:27 am | लंबूटांग

जर तुम्ही म्हणताय तसा मेसेजच द्यायचा असेल तर त्यांच्या माजी राष्ट्राध्यक्षाची एअर ईंडिया वाल्यांनी झडती घेतली पाहिजे.

सध्या ओबामा एअरफोर्स १ ने येईल हो... कशी झडती घेणार ;)

जोक्स अपार्ट, पण अमेरिकेत अल गोर या त्यांच्याच माजी राष्ट्राध्यक्षांना त्यांच्याच देशातील Nashville एअरपोर्ट्वर मिळालेल्या स्पेशल ट्रिट्मेंट ला आक्षेप घेऊन त्यांना सिक्युरिटी चेक करायला लावले होते.

एरवी सुद्धा कलाम आपणहून मेटल डिटेक्टर मधून जातात असे येथे त्यांच्या सेक्रेटरीनेच सांगितले आहे

मी जे घडले त्याचे अजिबात समर्थन करत नाही आहे अथवा ते पूर्णपणे चूक आहे असेही म्हणत नाही आहे. जर माजी राष्ट्रपतींना (मी तर म्हणेन कोणालाही) काही अपमानकारक वागणूक दिली गेली असेल तर नक्कीच त्याविरोधात आवाज उठवला पाहिजे पण routine security check केले म्हणून हे सगळे करण्यामागे राजकीय हेतू आहे असे मला वाटते.

त्या एअरलाईनच्या म्हणण्याप्रमाणे it was company policy to conduct security checks on all passengers and it did not make a distinction for VIPs हे जर का खरे असेल तर मग अश्या एअरलाईनला भारतामध्ये व्यवसायासाठी येऊच द्यायला नको होते. मग बरोबर सगळ्या पॉलिसी बदलल्या असत्या.

--आणि झडती घेणारे अनेकदा निवासी भारतीय पोरं-पोरीच असतात.. हो ना आणि झडती नाही घेतली म्हणून त्या बिचार्‍याची/ बिचारीची नोकरी गेली तर काय प्रफुल्ल पटेल हस्तक्षेप करणार आहे का?

असो, त्या एअरलाईनने न जाणे हा सगळ्यात सोप्पा उपाय

पण ह्यात कॉन्टिनेन्टल वाल्यांचा दोष नाही आहे असे वाटते. TSA चे काही काही नियम खरेच अतिजाचक आहेत.

अनामिक's picture

23 Jul 2009 - 5:32 am | अनामिक

लंबूटांगशी १००% सहमत!

-अनामिक

शाहरुख's picture

23 Jul 2009 - 5:34 am | शाहरुख

हम्म्म..एअरफोर्स-१ चा उल्लेख होईल याचा अंदाज होताच..

माझ्या म्हणण्याचा उद्देश असा होता की जर त्यांना भारतीय माजी राष्ट्रपतीची झडती घेण्याची गरज वाटत असेल आपणही मुद्दाम झडती घेतली पाहिजे..सीमाशुल्क चुकवून सामान आणले असेल तर ;-)

आणि "निवासी भारतीय पोरं-पोरीच असतात" हे मी या चर्चेच्या संदर्भात म्हटले नव्हतेच ;-)

लंबूटांग's picture

23 Jul 2009 - 5:42 am | लंबूटांग

:) घेतलीच पाहिजे .. मला स्वतःला तरी असे वाटते की commercial airline ने प्रवास करत असताना सर्वांना सारखेच नियम असावेत.

सर्व प्रथम चर्चेचे शिर्षक दिशाभूल करणारे आहे. अमेरिकन कंपनीचा माज आणि अमेरिकेचा माज यात फरक करावा असे वाटते.

आता काँटीनेंटल बद्दलः

  • काही महीन्यांपुर्वी मी काँटीनेंटलने प्रवास करत होतो. बॉस्टन ते न्यूअर्क, न्यू जर्सी प्रवासात एकदम चांगला (म्हणजे जसा अमेरिकन विमान कंपन्यांचा अनुभव येतो तसा!) आला. बॉस्टनला विमानतळावर पोचल्यावर कागदपत्रे तपासली (कारण परदेश प्रवासाची तिथेच सुरवात होत होती म्हणून) आणि नंतर लवकरच्या विमानात जागा असल्याने तिकडे धावपळ होऊ नये म्हणून लगेच त्यांचे त्यांनीच विमान बदलून दिले.
  • न्यूअर्कला काँटीनेंटलचेच टर्मिनल असल्याने सगळी गेट्स काँटीनेंटलची होती. तिथे फक्त मुंबईला जाणार्‍या विमानप्रवाशांना सुचना देणारी बाई अक्षरशः ओरडत होती आणि बालवाडीतील मुलांना द्याव्यात तशा सुचना देत होती. कारण सोपे होते, इतके होऊनही ९०% भारतीय प्रवासी असलेल्या या विमानातील ८०% (भारतीय) प्रवासी नियम पाळत नव्हते मधे घुसण्याचा प्रयत्न करत होते. तरी देखील ते कर्मचार्‍याचे वागणे पूर्ण आक्षेपार्ह होते. कारण माझ्यासारखेपण होते जे सगळे नियम पाळून रांगेत उभे राहीले होते, हँडबॅग नियमात बसणारी होती वगैरे. पण नंतर काही प्रश्न आला नाही. विमानातील अनुभव चांगला होता.
  • मुंबईहून न्युअर्कला येतानाच्या विमानात जसी मा. राष्ट्रपती कलामांची जशी दिल्लीला झडती घेतली तशी घेतल्याचे आठवत नाही. म्हणजे तसे ते फक्त दिल्लीलाच करतात का हे पाहीले पाहीजे....आणि तसे असेल तर का हे पण पाहीले पाहीजे...

आता कलामांच्या अथवा तत्सम राजनैतिक अधिकार्‍यांच्या प्रवासाबद्दल:

  • मला वाटते की त्यांच्याबरोबर असलेल्या राजनैतिक आणि राजपत्रित अधिकार्‍यांचे काम असते की त्यांनी सर्व गोष्टींची काळजी घेणे. याचा अर्थ एखाद्या अधिकार्‍याने कलामांच्या आधी जाऊन काँटीनेंटलच्या कर्मचार्‍याला सांगणे महत्वाचे आहे असे वाटते.
  • हे केवळ कलामांच्याच बाबतीत नाही तर अशा कुठल्याही मंत्री अथवा राजकीय नेतृत्वासाठी लागू आहे असे वाटते. जॉर्ज फर्नांडीस जेंव्हा अमेरिकेत संरक्षण मंत्री म्हणून आले होते तेंव्हा त्यांना पण अशाच झडती मधून दोनदा जावे लागले होते. अशा मंत्र्यांच्याबरोबर अथवा नेत्यांबरोबर स्वतःची वर्णी करदात्यांच्या पैशाने लावणारे नक्की काय माशा मारतात असे वाटते.

आता अमेरिकेबद्दल

वर लंबुटांगने अ‍ॅल गोर बद्दलची बातमी सांगितली आहेच. त्यात देखील असेच आहे. गोर यांनी नियम शांतपणे पाळला आणि काही गैर नाही असे सांगितले.

पण आता एक अजून उल्लेख न झालेली गोष्ट सांगतो. जॉन एफ केनडीचे सगळ्यात धाकटे बंधू (आता वयवर्षे ७५+) टेड केनडी, हे अमेरिकन सिनेटमधील अतिशय दबदबा असलेले व्यक्तिमत्व आहे. दोन्ही पक्षांमधे त्यांचा खूप आदर केला जातो. अशा व्यक्तीचे नाव घेऊन दहशतवादी हल्ला करू शकतात अशी डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरीटीस गुप्तहेरसंस्थांकडून सांगितले गेले. अशी कथीत नावांची मोठी यादी, ज्यातील एखादे नाव घेऊन दहशतवादी विमानात येऊ शकतात म्हणून विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेस देण्यात आली होती.

आता जेंव्हा जेंव्हा टेड केनडी विमानाने प्रवास करू लागले तेंव्हा त्यांना त्यांच्या घरच्या म्हणजे बॉस्टनच्या विमानतळापासून सर्वत्र थांबवले जाऊ लागले. सुरवातीस नियम म्हणून मान्य केले पण असे साधारण दोन वर्षे चालू होते. अर्थात केनडींना त्यांचे नाव या यादीतून काढायला दोन वर्षे वेळ लागला. त्यावर ते म्हणाले देखील होते की जर अमेरिकन सिनेटरला अशा अवस्थेतून जावे लागत असेल तर सामान्यांची काय अवस्था! अर्थात सुरक्षा व्यवस्था काम सोडून इतरच धंदे करत आहे असे म्हणावे लागले...

थोडक्यात मला वाटते ह्यात पुर्णपणे विमानकंपनी कर्मचार्‍यांचा मुर्खपणा आहे. पण वंशवाद अथवा मुद्दाम अपमान करणे वगैरे असेल असे वाटत नाही. तसे प्रसंगपण नक्की घडतात (विशेष करून मुसलमानांना तो हल्ली त्रास होतो. काहीजणांना उगाच उतरवले आणि नंतर माफी मागावी लागली). जसे विमानात तसे इतरत्रही, पण हा तसा वाटला नाही...

लंबूटांग's picture

23 Jul 2009 - 7:18 am | लंबूटांग

---९०% भारतीय प्रवासी असलेल्या या विमानातील ८०% (भारतीय) प्रवासी नियम पाळत नव्हते मधे घुसण्याचा प्रयत्न करत होते

अगदी अगदी..मी गेलो तेव्हा देखील असेच झाले. मला ते त्यांचे बोलणे खूपच खटकले पण नंतर विचार केला की आपण सुद्धा एखाद्याने २दा सांगून ऐकले नाही की ३र्‍यांदा नकळत वैतागून बोलतो. इथे इतक्या सगळ्यांना किती वेळा सांगणार .. बाकी अनुभव इथे दिला होताच मागे.

शाहरुख's picture

23 Jul 2009 - 8:24 am | शाहरुख

>>सर्व प्रथम चर्चेचे शिर्षक दिशाभूल करणारे आहे. अमेरिकन कंपनीचा माज आणि अमेरिकेचा माज यात फरक करावा असे वाटते.

मला 'अमेरिकेचा माज' हेच शिर्षक योग्य वाटते..टी.एस.ए. च्या आणि म्हणून अमेरिकेच्या धोरणाबद्दलच मला माझे मत मांडायचे होते.मला नाही वाटत यात विमानकंपनी कर्मचार्‍यांचा मुर्खपणा आहे.ते टी.एस.ए. च्या सुचनांप्रमाणेच वागणारच नाहीतर नोकरी जायची भिती !!

एक गोष्ट कबूल करतो की अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षाला भारताने अथवा इतर कोणत्या देशाने अशावेळी कशी वागणूक दिली पाहिजे याबद्दलचा 'प्रोटोकॉल' माहीत नसताना मी 'अमेरिकेचा माज' म्हणालो ही माझी चूक झालीय. जर हा प्रोटोकॉल भारताला अशा व्यक्तीची सुरक्षा-तपासणी करायचा हक्क देत असेल तर मी मिपाच्या संपादकांना ( ;-) ) स्वतःहून हा धागा उडवायची विनंती करीन. अन्यथा मला शिर्षक योग्य वाटते..

>>आता काँटीनेंटल बद्दलः

याचा इथे संबंध नाही कळाला.

>>आता कलामांच्या अथवा तत्सम राजनैतिक अधिकार्‍यांच्या प्रवासाबद्दल:

कलामांच्या बरोबरच्या अधिकार्‍याने संबंधित कर्मचार्‍याला सांगितले होते असे बहूतेक मी बातमीत वाचले.

>>आता अमेरिकेबद्दल

अमेरिका त्यांच्या नेत्यांना स्वतःच्या देशात कशी वागणूक देते हा त्यांचा देशांतर्गत प्रश्न आहे.

विकास's picture

23 Jul 2009 - 9:42 am | विकास

मला 'अमेरिकेचा माज' हेच शिर्षक योग्य वाटते..टी.एस.ए. च्या आणि म्हणून अमेरिकेच्या धोरणाबद्दलच मला माझे मत मांडायचे होते.मला नाही वाटत यात विमानकंपनी कर्मचार्‍यांचा मुर्खपणा आहे.ते टी.एस.ए. च्या सुचनांप्रमाणेच वागणारच नाहीतर नोकरी जायची भिती !!

कुठल्याही देशाचा कायदा हा त्या देशाच्या भुमीवर लागू होतो. अपवादः परदेशातील वकीलात, जी तांत्रिक दृष्ट्या ज्या देशाची वकीलात असेल त्या देशाची जमीन ही आंतर्राष्ट्रीय कायद्याप्रमाणे मानली जाते. तसेच एकदा विमानाच्या आत असला तर कदाचीत ते ज्या देशाचे विमान आहे त्या देशाचे कायदे लागू कदाचीत होऊ शकतात. थोडक्यात जी काही चूक आहे ती टिएसएची नाही तर विमानकंपनीची आहे. म्हणून या संदर्भात माज असलाच तर तो विमानकंपनीचा आहे.

...जर हा प्रोटोकॉल भारताला अशा व्यक्तीची सुरक्षा-तपासणी करायचा हक्क देत असेल तर मी मिपाच्या संपादकांना...
प्रोटोकोल हा त्या देशाच्या नियमाप्रमाणे जी काही व्हिआयपीला वागणू़क मिळायला हवी ती मागू शकतो. तसेच तो रेसिप्रोकेटीव्ह असतो. म्हणजे आपल्या आजी/माजी राष्ट्राध्यक्षाला जशी वागणूक मिळेल तशीच आपण त्या राष्ट्राच्या आजू/माजी प्रमुखाला देऊ शकतो. उद्या बिल क्लिंटनला कोणी आपल्या सुरक्षा रक्षकाने तपासले तर मला नाही वाटत क्लिंटन अगदी बुशपण काही हरकत घेईल. पण आपले अधिकारी तसे करतील का? आणि त्यांनी करायचे ठरवले तर त्यांचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष बॉसेस करून देतील का? हा प्रश्न आहे.

याचा इथे संबंध नाही कळाला.

तुमच्या लेखाचा संबंध कळला तर माझ्या प्रतिसादाचा आपोआप कळेल! ;) (ह.घ्या.). मी फक्त माझे त्यांच्याबद्दल झालेले (चांगले नसलेले) निरीक्षण सांगत होतो इतकेच...

कलामांच्या बरोबरच्या अधिकार्‍याने संबंधित कर्मचार्‍याला सांगितले होते असे बहूतेक मी बातमीत वाचले.
मी तसे वाचले नाही आणि इथे (बॉस्टन) असताना काय झाले हे मी ऐकून आहे, म्हणून तसे वाटत नाही...

अमेरिका त्यांच्या नेत्यांना स्वतःच्या देशात कशी वागणूक देते हा त्यांचा देशांतर्गत प्रश्न आहे.
मुद्दा वागणुकीचा नाही, सगळ्यांना समान कायदा वापरताना ते कचरत नाहीत. आपल्याकडे असा कायदा आहे का की व्हिआयपींना तपासायचे नसते म्हणून? का असे गृहीत धरले जाते? खूप वर्षांपुर्वी वडखळनाका अशाच कारणामुळे कुप्रसिद्ध झाला होता त्याची आठवण झाली.

वास्तवीक "खबरदार जर टाच मारूनी जाल पुढे चिंधड्या" म्हणणार्‍याचे कौतुक करणार्‍या शिवाजीच्या राज्यातले आपण आहोत. कलामांनी त्याच अनुषंगाने अशा तपासणीला विरोध केला नाही. त्यांचा आपण जास्त विचार केला तर जास्त बरे होईल असे वाटते.

शाहरुख's picture

24 Jul 2009 - 2:14 am | शाहरुख

कुठे कोणता कायदा लागू होतो याचे मला ज्ञान नसल्याने मी तुम्हाला उत्तर दिले नव्हते (आणि अर्थातच कायद्याबद्दलचा तुमचा वरचा मुद्दा मान्य केला होता)

मी धागा सुरू करतानाच (बाय द वे, हा धागा लेख नसून फक्त बातमी आहे) विमानकंपनीने टी.एस.ए. च्या नियमांप्रमाणे हे केले असे म्हणल्याचा उल्लेख केला होता. त्यामुळे कुठे कोणते कायदे पाळले जातात हा मुद्दा मला विशेष मह्त्वाचा वाटत नव्हता.....कंपनीने टी.एस.ए. ची ढाल पुढे केल्याची शक्यता नाकारता येत नव्हती..पण आत्ताच हिंदू दैनिकात टी.एस.ए. चा यावरील खुलासा वाचला.त्यांनी विमानकंपनीने "आमची रेग्युलेशन्स पाळली" असेच म्हटले आहे.

एक गोष्ट स्पष्ट करतो की कायद्यापुढे सगळे समान हे मला ही मान्य आहे..चर्चेचा तो विषय नव्हताच....फक्त उद्या कोणि अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्ष ताजमहाल बघायला भारतात आला तर भारताने ही त्याची मुद्दाम तपासणी केली पाहिजे..तेंव्हा अमेरिकेने "ट्यँव ट्यँव" करता कामा नये.

विकास's picture

24 Jul 2009 - 4:07 am | विकास

दुव्याबद्दल धन्यवाद! मी आजच कर्क यांना उत्तर देताना टिएसएच्या संकेतस्थळावर शोधत होतो तर त्यांचा संबंध फक्त अमेरिकेपुरताच आहे असे किमान दोन ठिकाणी दिसले. अर्थात यात पण काहीतरी पळवाट असेल. तसेच माझा अनुभव (बाकी तितकासा चांगला नसला तरी भारतात तपासणी होण्यासंदर्भात) वेगळा होता त्यामुळेपण मला आश्चर्य वाटले.

आता मी आधी म्हणल्याप्रमाणे सर्वकाही रेसिप्रोकेटीव्ह असू शकते. त्यामुळे अमेरिकेच्या माजी सत्ताधार्‍यांना जर आपण तपासले तर कोणी ओरडा करेल असे अजिबात वाटत नाही. त्याची दोन कारणे आहेत (जी कलामांच्या संदर्भात आणि त्यांच्या प्रतिक्रियेसंदर्भात पण लागू होतात): एक म्हणजे नो बिग डील असे म्हणणे त्यात असते आणि दुसरे जे जास्त महत्वाचे असते ते म्हणजे त्यात एक "रोल मॉडेल" म्हणून स्वतःला दाखवणे, आपण कसे ग्रेट आहोत, मी पण नियम पाळतो हे दाखवणे हे असते. त्यामुळे मला नाही वाटत की कोणी आक्षेप घेतील असे. मात्र ते आपले अधिकारी आणि सरकार करेल का हा मोठा प्रश्न आहे. कारण लक्षात ठेवा, जर "कमर्शियल विमानातून" (टिएसएचे म्हणणे या संदर्भात आहे), कोणी जात असेल तर त्यांना (अमेरिकेतपण अ‍ॅल गोर सारख्या व्यक्तींना) पण तेच नियम लागू होतात हे मी आधीच सांगितले.

मात्र असे तपासणे हे आपल्या प्रस्थापित कायद्याप्रमाणे असले पाहीजे. तसेच एक उत्सुकता म्हणून प्रश्न पडला: कलाम इतर अनेक देशात प्रवास करत असतील. त्यात विशेष करून ते जेंव्हा प. युरोपातील देशात जातात तेंव्हा तिकडे काय कायदा असू शकेल या बद्दल कुणाला माहीती असली तर नक्कीच आवडेल. विशेष करून ब्रिटन आणि जर्मनीत.

एक गोष्ट स्पष्ट करतो की कायद्यापुढे सगळे समान हे मला ही मान्य आहे..चर्चेचा तो विषय नव्हताच.
मी जे विशेष करून केनडीचे आधी उदाहरण दिले ते कायद्यापुढे सर्व समान हे दाखवायला म्हणून नव्हते तर नियम कसा अडाण्यासारखा इथले कर्मचारीपण पाळतात हे दाखवायला होते.

(विषयाशी संबंधीत पण चर्चेला) अवांतर :

काही वर्षांपुर्वी बॉस्टन विमानतळावर इंटरनॅशनल टर्मिनलवर उतरलो तर बाहेर बर्‍याच वृत्तवाहीन्या आणि गर्दी दिसली. आधी खुष झालो - शेवटी प्रसिद्धी कुणाला आवडत नाही? ;) पण नंतर समजले की ते माझ्यासाठी तिकडे नव्हते तर पाकीस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष मुशारफसाठी होते. मुशारफ त्यांच्या मुलाला भेटायला आणि बाकी काही गुप्त खलबतांसाठी आलेले होते कारण जाहीर काहीच कार्यक्रम नव्हता. अर्थात ते त्यावेळेस राष्ट्रप्रमुख असल्याने गोष्ट वेगळी होती म्हणून माध्यमांना चुकवून, सुरक्षा यंत्रणा वगैरेला चुकवून त्यांना मागच्या दाराने बाहेर काढण्यात आले होते.

तसेच त्या आधी (रालोआचे सरकार असताना) राहुल गांधींना बॉस्टन विमानतळावर अडवले होते आणि कथीत गोष्टीप्रमाणे त्यांच्याकडे बेकायदेशीर गोष्टी आणि चलन मिळाले होते. अर्थात त्यांना एका अर्थी अटकच झाली होती. मात्र रालोआच्या सरकारने वॉशिंग्टनमधे स्टेट डिपार्टमेंटमधे "योग्य" असा निरोप पाठवून त्यांची सोडवणूक केली होती...

रेवती's picture

23 Jul 2009 - 7:58 am | रेवती

जे झालं त्यात आपले माणूस तेही इतके सन्माननीय म्हणून असे वाईट वाटणे साहजीकच आहे. त्यात अमेरीकेचा असा काही माज असावा असे वाटत नाही. दिल्ली एयरपोर्टवर जरा जास्तच असे अनुभव सामान्य माणसाला येतात असे ऐकले आहे. आता आम्हालाही दोन दिवसात कळेलच.;) मुंबईचे माझे अनुभव सांगितल्यावर माझी दिल्लीकर मैत्रिण 'कित्ती बरे वागले असंच 'म्हणाली. तिच्या सुटकेसमधून तिच्यासमोरच सगळे चांगले नवे परदेशी (मेड इन इंडीया ;)) कपडे भेटवस्तू काढून घेतले, त्याचबरोबर सलवार कमीज सारखे भारतीय कपडे (जे ती भारतातूनच घेउन गेली होती) बॅगांमधून घेतले. आता पंजाब्यांचे कपडे फारच महागडे असतात. तीचा संताप झाला झाला होता, पण काय करणार? त्यानंतर चार वर्षे तिने धसकाच घेतला होता प्रवासाचा.......मागच्या वर्षी जाऊन आली........यावेळी सुखरूप.:)

रेवती

मैत्र's picture

24 Jul 2009 - 5:40 pm | मैत्र

तिच्या सुटकेसमधून तिच्यासमोरच सगळे चांगले नवे परदेशी (मेड इन इंडीया ) कपडे भेटवस्तू काढून घेतले, त्याचबरोबर सलवार कमीज सारखे भारतीय कपडे (जे ती भारतातूनच घेउन गेली होती) बॅगांमधून घेतले. आता पंजाब्यांचे कपडे फारच महागडे असतात. तीचा संताप झाला झाला होता, पण काय करणार?

मला काही वारंवार प्रवास करण्याचा अनुभव नाही आणि दिल्लिचा तर नाहीच. म्हणून वाचून नवल वाटलं की जर तुमच्या बॅगेतून इलेक्ट्रॉनिक वस्तु / कस्टम चुकवलेले किंवा कस्टमच्या यादीत येऊ शकेल असे काही ( जरी ते त्या देशातुन येताना जेवढे सरकारी नियमाप्रमाणे चालते तेवढेच असेल तरीही) असे कुठलेही सामान नाही.
मग भारतीय कपडे वगैरे वैयक्तिक सामान काढून घेतले तर गप्प का बसतात हे लोक ? याची दुसरी बाजू काय आहे?
ही तर उघड उघड चोरी आहे ?
पण काय करणार? याचं कारण समजलं नाही... हा संताप आणणारा प्रकार आहे.

चपला घ्यालायच्या व चालु लागायचे. बुट घातल्यामुळे इतके रामायण घडले. अशावेळी चपल्यांचे महत्व लक्षात येते. =)) :D

वेताळ

पर्नल नेने मराठे's picture

23 Jul 2009 - 10:09 am | पर्नल नेने मराठे

सहि :D
चुचु

चिरोटा's picture

23 Jul 2009 - 2:30 pm | चिरोटा

वाचलेल्या बातमीनुसार भारतिय कायद्यानुसार(की प्रोटोकॉल नुसार)माजी राष्ट्रपती,पंतप्रधान्,सभापती,सर्वोच्च न्यायाधीश ह्यां व्यक्तींचा तपासणीतून अपवाद करण्यात यावा असे आहे.हा कायदा देशाबाहेरच्या कंपन्यांनाही लागू आहे.काँटिने हा प्रोटोकॉल निश्चितच पाळला नाही म्हणून त्यानी आता माफी मागितली आहे. ही घटना घडली आहे एप्रिलमध्ये.आता सरकारला हिलरी क्लिंटन आल्यावर जाग आलेली दिसते.परदेशी(किंवा देशी) कंपनीने कायदा मोडल्यावर त्यांना धडा शिकवण्याची धमक सरकार दाखवते का? हा खरा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर नाही असे आहे.उद्या काँटिने भारतात १००० लोकांचे बी.पी.ओ. उघडण्याची घोषणा केली तर हेच सरकार कॉंटिचे पायघड्या घालून फटाके वाजवत स्वागत करेल. :D
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

सुनील's picture

23 Jul 2009 - 4:01 pm | सुनील

शीर्षकातच अवांतर, घ्या लेको चांदण्याच चांदण्या!

मुंबईतील सीप्झ ही औद्योगिक वसाहत. येथे आत जाणार्‍या तसेच बाहेर येणार्‍या प्रत्येक व्यक्तीची आणि वाहनांची तपासणी करावी असा नियम आहे. या वसाहतीत काही निर्यात प्रधान सॉफ्टवेअर कंपन्यांची हपिसे आहेत. त्यांच्या परदेशी ग्राहकांची आवक्-जावक सीप्झमध्ये कायम सुरू असते.

ज्या दिवशी आमच्या कंपनीचा ग्राहक येणार असायचा तेव्हा सीप्झच्या सुरक्षा रक्षकांना खास सुचना जात -
१) "त्या" विशिष्ठ गाडीची कसून तपासणी करा
२) गाडीतील प्रत्येक व्यक्तीची कागदपत्रे नीट तपासा
३) व्यक्तींच्या लॅपटॉप आदी वस्तूंची व्यवस्थित नोंद करा

"आमच्या"कडील सुरक्षा व्यवस्था कशी कडक आहे हे "त्यांना" दाखवण्याचा हा खटाटोप!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ऋषिकेश's picture

23 Jul 2009 - 5:39 pm | ऋषिकेश

एक महत्त्वाचा मुद्दा नजरेआड करून चालणार नाहि की कलाम यांची झडती भारतभूमीवर घेतली गेली आणि हे (मलातरी) आक्षेपार्ह वाटले.

हीच झडती , प्रोटोकॉल तोडून, अमेरिकन भूमीवर घेतली गेली असती तर तिथे अमेरिकेचा माज वगैरे गदारोळ होणे ठिक वाटते. आता प्रशन अमेरिकेचा नाहि तर आपल्या भूमीवरील आक्षेपार्ह घटनेचा आहे.

इथे प्रश्न अमेरिकेचा नाहि तर प्रश्न कोणत्याही कंपनीच्या विमानात चढताना गंतव्यस्थानाचे प्रोटोकॉल्स आरंभस्थानीच का पाळले जावेत हा आहे/असावा असे वाटते

हे म्हणजे भारतात येण्यासाठी जॉर्ज बुश यांनी एअर इंडीयाने अमेरिकेत झडती घेण्यासारखे आहे (आता ते एअर इंईड्याने का येतील हा प्रशन तुर्तास विसरू ;) )

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

चिरोटा's picture

23 Jul 2009 - 6:16 pm | चिरोटा

संबधित विमान कंपनी ब्लेयर्/सार्कोझि/मर्केल पण हाच नियम लंडन्/पॅरिस/बर्लिनला लावेल का(किंवा कधी लावला आहे का) हे विचार करण्यासारखे आहे.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

विकास's picture

23 Jul 2009 - 6:34 pm | विकास

म्हणूनच वरच्या प्रतिसादात म्हणले होते की:

कुठल्याही देशाचा कायदा हा त्या देशाच्या भुमीवर लागू होतो. अपवादः परदेशातील वकीलात, जी तांत्रिक दृष्ट्या ज्या देशाची वकीलात असेल त्या देशाची जमीन ही आंतर्राष्ट्रीय कायद्याप्रमाणे मानली जाते. तसेच एकदा विमानाच्या आत असला तर कदाचीत ते ज्या देशाचे विमान आहे त्या देशाचे कायदे लागू कदाचीत होऊ शकतात. थोडक्यात जी काही चूक आहे ती टिएसएची नाही तर विमानकंपनीची आहे. म्हणून या संदर्भात माज असलाच तर तो विमानकंपनीचा आहे.

संबधित विमान कंपनी ब्लेयर्/सार्कोझि/मर्केल पण हाच नियम लंडन्/पॅरिस/बर्लिनला लावेल का(किंवा कधी लावला आहे का) हे विचार करण्यासारखे आहे.

यावसंदर्भात पण माझा अनुभव (आठवते त्याप्रमाणे) : काँटीनेंटलने अशी झडती मुंबईतून मी निघालो असताना घेतल्याचे आठवत तरी नाही. लंडन/पॅरीस/बर्लीन सोडा. तीच कथा न्युजर्सीहून निघताना पण केल्याचे आठवत नाही. तेच बॉस्टनहून न्युजर्सीला जाताना. तसेच मी इतरत्रही गेल्या वर्षात काँटीनेंटल अमेरिकेतल्या अमेरिकेत वापरली आहे, तेथे पण असा अनुभव आलेला नाही.

तात्पर्यः मला कुठेतरी या बातमीत (जी आयबीएन पासून सीएनएनपर्यंत सर्वत्र आहे) काही तरी दोष (flaw) आहे असे वाटते. असे सहज शक्य आहे की झालेले एक आहे (जी काँटीनेटलची चूक असेलही) पण त्याचे वर्णन वेगळेच येत आहे. मुद्दामून असे झाले नसेल पण एप्रिलमधल्या घटनेची चर्चा जुलैमधे संसदेत (सर्वांची आसने स्थिर झाल्यावर) होत आहे. त्यात नक्की काय झाले याचे डिटेल्स लक्षात न घेता राजकारण चालू झालेले असू शकते. राजकारणी अथवा कुठलेही (सरकारी, खाजगी कंपन्यांमधील) राजकारण हे अर्थाचा अनर्थ कसा करतात हे अमेरिकेत देखील जवळून पाहीले आहे...

सूहास's picture

23 Jul 2009 - 8:16 pm | सूहास (not verified)

ईलेकट्रानीक मिडीयाचा " टी.आर.पी." वाढविण्याचा केविलवाणा प्रयत्न...

बाकी चर्चा करण्यात काही रस नाही...आता ह्याला कोणी अवा॑तर म्हणत असेल तर म्हणो..

सुहास

_समीर_'s picture

23 Jul 2009 - 8:20 pm | _समीर_

"साला, ओबामा भारतात येईल तेंव्हा त्याची पार नागडा करून तलाशी घेतली पाहिजे आपण"

सबंध चर्चेतले हे वाक्य प्रचंड आवडले.

प्रदीप's picture

23 Jul 2009 - 8:54 pm | प्रदीप

एप्रिल मध्ये झालेल्या घटनेचा आताच इतका बोलबाला का होत आहे, ह्याचे नक्की कारण ठाऊक नाही. राजकारण्यांना संशयाचा फायदा देत आपण असे समजूया की झालेल्या घटनेची इथंभूत माहिती मिळून तिची संपूर्ण शहानिशा झाल्यावर मगच तिच्याबद्दल जाहीर बोलणे राजकारण्यांना उचित वाटले असावे. सदर घटना अशीच घडली ह्याबद्दल कुणाही संबंधिताचे दुमत नाही .

वरील चर्चेत अनेकांनी डॉ. कलामांनी ह्याबद्दद्ल अजिबात आक्षेप घेतलेला नाही, ह्यावर भर दिला आहे. एक अत्यंत सुसंकृत, सभ्य व्यक्ति अशावेळी व नंतरही व्यक्तिगतरित्या जे करेल/ म्हणेल, तेच त्यांनी केले. कसलाही आक्रस्ताळेपणा नाही, कुरकुर नाही. पण इथे झालेला अपमान डॉ. कलाम ह्या व्यक्तिचा नसून भारताच्या एका माजी राष्ट्रपतिचा होता, हे लक्षात घेतले पाहिजे. एक व्यक्ति म्हणून माझी अथवा माझ्या कुटुंबियांची अशी तपासणी झाली तर माझेही त्याबद्दल अजिबात काहीही म्हणणे नसेल. (अवांतरः चार वर्षांपूर्वी मी सहकुटुंब अमेरिकेला गेलेलो असतांना माझ्या पत्निच्या तिकीटावर आमच्या येथूनच चेक इन केल्यावर एक विशीष्ठ मार्क केला गेला. तो मार्क म्हणे विशेष तपासणीची खूण होती. त्यानंतर पहिल्यापासूनच सर्वच प्रवासात (त्यात अमेरिकेतील शहरांमधील --इंटर्नल-- प्रवासही आले) तिला वेगळे करून खास तपासणी करण्यात आली. ह्याबद्दल आम्हा कुणाचीही काहीही तक्रार नव्हती, व नाही). पण इथे ही कुणी साधीसुधी व्यक्ति नव्हती.

विकासांचा आपल्या राजनैतिक अधिकार्‍यांनी कलाम विशेष व्यक्ति आहेत, ह्याची विमानकंपनीस अगोदर नीट जाणीव करून दिली नसेल, ह्या म्हणण्यात तथ्य आहे म्हणावे, तर संबंधित कंपनीनेच तसे कुठे आपल्या कृतिच्या समर्थनार्थ म्हटलेले माझ्यातरी वाचण्यात आलेले नाही. झाला तो गैरसमज होता असे त्यांच्या प्रतिपादनात कुठेही आलेले नाही. उलट त्यांनी टी. एस. ए. च्या नियमांनुसार आम्ही हे केले आणि ते बरोबर होते असा प्रथम सूर लावला होता. नंतर तो त्यांनी बदलला व माफी मागितली.

हे भारतात सहज होऊ शकते कारण आम्हाला स्वतःचा मान नाही, झालेल्या प्रकरणातले गांभिर्य इथेच कितीतरी सुशिक्षित वाचकांनी सरळ झटकून टाकले आहे! सरकारचे ('शासना'चे) तर विचारूच नका!! हे असे हीच विमान कंपनी इतरस्त्र करण्यास धजावली नसती. युरोपातील अथवा ब्रिटनचे जाउ द्या, चीनच्या बाबतीतही ते असे काही करण्यास अजिबात धजावणार नाहीत. आणी त्यांच्या बाबतीत तशी आगळीक त्यांनी केलीच, तर चीन आकांडतांडव करील, जशास तसेही करून दाखवेल. त्यांची तशी पत आहे हे खरे पण तशी त्यांची हिम्मतही आहे, आणि राष्ट्राचा अपमान ते अजिबात सहन करीत नाहीत. आपण एकतर हे काहीच विषेश झालेले नाही असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणार, अथवा लक्ष दिलेच तर चार दिवस त्यावर थोडा गोंधळ घालून मग सर्व काही शांत होणार.

गोल्डमन सॅकला जपानमध्ये २००० सलापासून आतापर्यंत दोनवेळा तेथील कायद्यांचे उल्लंघन करण्याच्या आरोपावरून प्रत्येक वेळी एक महिना काही विशीष्ठ व्यवहार करण्याची बंदी घालण्यात आली. त्याची येथे आठवण झाली.

माझ्या मते भारतीयांनी सदर विमान कंपनीच्या सेवेवर सुमारे महिनाभर उत्स्फूर्त बहिष्कार घालावा. तेव्हा त्यांना केलेल्या कृत्याची खरी किंमत कळेल. (त्यांना समजेल अशा भाषेत उत्तर देणे जरूरी आहे, हे सरकार करू शकत नाही, जनता करू शकते). पुढील वेळी असे करतांना हजार वेळा विचार करतील मग ते.

विकास's picture

23 Jul 2009 - 11:43 pm | विकास

माझ्या मते भारतीयांनी सदर विमान कंपनीच्या सेवेवर सुमारे महिनाभर उत्स्फूर्त बहिष्कार घालावा.

ही कल्पना चांगली आहे. त्याहीपेक्षा जास्त प्रभावी कदाचीत ऑनलाईन पेटीशन/साईन कँपेन ठरू शकेल ज्यात प्रवाशांच्या पेक्षा कित्येकपटीने जास्त (प्रत्येकी १) सह्या जाऊ शकतात आणि जालावर राहू शकतात. काँटीनेंटल अथवा कुठलिही कंपनी अशा बॅड पब्लीसिटीस जास्त घाबरेल.