user

आभाळ ..

कोसळोनी यावे .. आभाळ आज वाटे
ओसंडोनी जावे अन् .. जळं साचलेले |

गुंफलेली माला जणू .. व्हावे त्या सरींनी
ओघळलेले मोती व्हावे .. थेंब पावसाचे |

चमचमत्या किरणां सवे .. इंद्रधनू रेखावे
शीळ घुमावी वार्‍याची .. हिरव्या, ओल्या बना मधे |

सळसळत्या पानांतूनी .. संगीत नवे जन्मावे
रंग रंगी, सुरेल कंठी .. खगांनी मग ते गावे |

रंगीत-गंधीत धात्रीने .. साज सुखाचे ल्यावे
मेघश्याम आभाळ तीला .. क्षितीजावर भेटावे |

अप्रतिम!! र

अप्रतिम!!

रंगीत-गंधीत धात्रीने .. साज सुखाचे ल्यावे
मेघश्याम आभाळ तीला .. क्षितीजावर भेटावे |

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

मस्त..

साधी मांडणी.. साधे शब्द.. हीच खासियत! नाही ? Smile

राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )

राघव

वा! मस्त !!

वा! मस्त !!

--अवलिया

--अवलिया
आपली माणसं आपलीच नाती तरी कळपाची मेंढरास भीती

वा! साधी,

वा! साधी, सुंदर कविता..!

तात्या.

--Life is a questions nobody can answer It… and the Death is an answer, nobody can question it..!

सुरेख कविता

सळसळत्या पानांतूनी .. संगीत नवे जन्मावे
रंग रंगी, सुरेल कंठी .. खगांनी मग ते गावे |

सुंदर कविता!

खूप सुरेख कविता!

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

क्रान्ति
अग्निसखा

सळसळत्या

सळसळत्या पानांतूनी .. संगीत नवे जन्मावे
रंग रंगी, सुरेल कंठी .. खगांनी मग ते गावे |

फारच सुरेख कविता... Smile

मदनबाण.....

Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka

मदनबाण.....

आधी आयपीएल नंतर कॉमनवेल्थ आणि आता लवासा !!!
http://alturl.com/cfq7h

धन्यवाद !

सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार !

सुरेल रचना !

खूप खूप आवडली ! अप्रतिम...

कपाळ करंटा

केवल अप्रतिम..

<<गुंफलेली माला जणू .. व्हावे त्या सरींनी
ओघळलेले मोती व्हावे .. थेंब पावसाचे |>>

के व ळ अ प्र ति म...

सुहास
पावसाची वाट पहाणारा..

Scroll to Top