योगानंद विद्यापिठ स्थापना व प्रवेश सुचना

सदानंद ठाकूर's picture
सदानंद ठाकूर in काथ्याकूट
28 Jun 2009 - 11:54 am
गाभा: 

आजचे शुभदिनी योगानंद विद्यापिठाची स्थापना व प्रवेशाची अधिसुचना जाहिर करताना आम्हाला अत्यंत हर्ष(वायू) होत आहे.
बहूत समयानंतर आमचे या स्वप्नपूर्तीचे क्षणी आमचे नयनातून आनंदाश्रूचा महापूर वहात आहे.

या विद्यापिठातिल सोई व सुविधा:
निसर्गरम्य हिरव्यागार वनश्रीने नटलेला परिसर (डोळे फाड फाडून पहात रहावा असा).
डोळे फाडून, वटारुन, टवकारुनहि दृष्टीक्षेपात मावणार नाहि एवढा कँपसचा परिसर.
आस्थाश्री, आस्थाभूषण, संस्कार गौरव, पंडिताचार्य - आध्यापक व्रतस्थ वर्ग (शोधून शोधून आण्लले आहेत).

प्रवेश प्रक्रिया व प्रवेश योग्यता:
१० वी पास नापास ते पदवीधर, द्वीपदवीधर, डॉक्टर, वकिल, निवृत्त वगैरे सर्वांसाठी मुक्त प्रवेश.
सद्या सीईटी भानगड नाही. पुढे मारामा-या होतिल.

विद्यादान(?) कालावधी - २ वर्ष व तदनंतर ६ महिने प्रात्यक्षीक अनिवार्य

शिक्षणाची पध्दतः
१ल्या वर्षी निरनिराळे संस्कृत ग्रंथातील ३०० श्लोकांचे अर्थासह पाठांतर.
पुढिल सहा महिने वेगवेगळे विषयांवर प्रवचन योग्य श्लोकांचे वापराचे प्रशिक्षण.
पुढिल सहा महिने नृत्य, नाट्य, संगीत व सादरिकरण प्रशिक्षण.
तदनंतर ६ महिने प्रात्यक्षीक सहाध्यींसमोर.

पदवीदान - राजकिय धेंडाचे उपस्थीतित प्रथमतः विद्यार्थ्याचे नामांतर तदपश्चात पंडित, आचार्य, योगानंद वगैरे पदवी प्रदान.

पदवीपश्चात संधी :
कोणत्याही तालुक्याचे ठीकाणी विस्तिर्ण जागेत स्वतःचा आलिशान आश्रम स्थापून, समोर लँड क्रुझर दिवसातून थोडावेळ प्रवचन देवून उर्वरित वेळेत अत्यानंदात मग्न रहाण्याची संधी.
तसेच निरनिराळ्या दुरदर्शन वाहिन्यांवरुन भक्तगण वाढवण्याची संधि.

सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी

फी - प्रत्यक्ष भेटा मग सांगतो.

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

28 Jun 2009 - 11:57 am | नितिन थत्ते

भारी
=))

खराटा
(रंग माझा वेगळा)

विसोबा खेचर's picture

28 Jun 2009 - 12:06 pm | विसोबा खेचर

जबरा...! :)

तुमच्या विद्यापिठाच्या आश्रमात छान छान शिष्या असतीलच ना? त्यांना शिकवायला मी आचार्य म्हणून येऊ का?

आश्रमाच्या मागच्या बाजूस त्या मुलींकरता (म्हणजे माझ्या शिष्यांकरता) आणि माझ्याकरता वातानुकुलीत क्वार्टर्स बांधून दिलेत तर फारच छान होईल..:)

आम्ही आमचे साधनावर्ग तिथेच घेऊ! :)

आपला,
श्री श्री श्री श्री स्वामी तात्यानंद महाराज! :)

विनायक प्रभू's picture

28 Jun 2009 - 12:33 pm | विनायक प्रभू

मी घेईन म्हणतो.
वातुनुकुलीत क्वार्टर ची गरज नाही.
क्वार्टर मारल्यावर गरज लागत नाही.

सहज's picture

28 Jun 2009 - 12:30 pm | सहज

प्रवेश एव्हाना संपले असतील ना? तुमच्या त्या रिलायन्स पॉवर की काय जितका ओव्हरसब्स्क्राईप होणार नाही तितके अर्ज येणार बघा.

:-)