यंदाच्या पावसाळ्यात मुंबई महापालीका सज्ज

विकि's picture
विकि in काथ्याकूट
25 Jun 2009 - 3:09 pm
गाभा: 

खास मिपाकर वाचकांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या कार्याबाबत माहीती.अधिक माहीतीसाठी येथे टिचकी मारा
मुंबई देशाची आर्थिक राजधानी.लोकसंख्या १ कोटी २२६० एवढी प्रचंड .लोकसंख्येच्या बाबतीत जगातील पाचव्या क्रमांकाचे शहर.शहरात तसेच उपनगरात अनेक लोक झोपडपट्या,चाळी यांतून दाटीवाटीने राहतात. दर १ किमी.परीसरात जवजवळ २८ हजार लोक राहतात.दक्षीण मुंबईसारख्या विभागात कार्यालयांची संख्या जास्त असल्याने दिवसाचे सरासरी पॉप्युलेशन ४० लाख व रात्रीचे २ लाख आहे.मुंबईची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.दिवसाला सरासरी १ हजार लोक येथे येतात.शहरात १६ हजार धोकादायक इमारती आहेत.ड्रेनेज लाईन ब्रिटीन कालीन असून नव्या लाईनबाबत काम सुरू आहे. मुंबईत सरासरी २२६० एवढा मिमि पाऊस पडतो.पावसाळ्यात हवामान खात्याने ४.५फुट एवढ्या उंचीच्या लाटा उसळण्याचा केलेला अंदाज तसेच २६ जुलै २००५ ची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी वेळीच उपाययोजना पालीकेने केल्या आहेत,
यंदा मुसळधार पाऊस पडल्यास शहरातील व्यवस्था कोलमडून जाऊ नये, कमी प्रमाणात जिवीत वा वित्तहानी व्हावी यासाठी यासाठी मुंबईमहानगर पालीकेने आपला आपात्कालीन विभाग अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज केला आहे. शहरात काही आपत्कालीन घटना घडल्यासा १०८ हा दूरध्वनी क्रमांक असून या क्रमांकावर एकाच वेळी दहा जण हा क्रमांक फिरवू शकतात.येणार्‍या सर्व तक्रार त्या त्या वार्ड ऑफिसरला सांगितल्या जातात व ताबडतोब तक्रार निवारण करण्यात येईल असा दावा देखील पालीकेने केला आहे.तसेच अनधिकृत बांधकामासाठी १९१६ हा क्रमांक आहे..महापालीकेने स्वतंत्र अश्या ११ हॉटलाईन्स तयार केल्या असून त्या नवी मुंबई,आर्मी,नेव्ही,पोलीसा आयुक्तालय,ट्राफीक कंट्रोल,बेस्ट कंट्रोल,मंत्रालय,मध्य-पश्चिम रेल्वे,कुलाबा-सांताक्रुझ वेधशाळा इत्यादींना जोडलेल्या आहेत. दुर्घटना घडल्यास गरजेनुसार ताबडतोब हॉटलाईनद्वारे संपर्क केला जाईल. आपात्कालीन विभागात ३ दूरचित्रवाणि संच असून इलेट्रोनिक्स मिडीया जे प्रसारण करते ते खरे की खोटे याचा आढावा घेतला जातो. मुंबईची जमीनीची पातळी समुद्रसाठी पासून जवळपास सारखी असून हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार ४.२ फुट उंचीच्या लाटा उसळल्यास फ्लुडगेट बंद करण्यात येईल जेणेकरून समुद्राचे पाणी आत येणार नाही. पालीकेने याबाबत संपुर्ण खबरदारी घेतलेली आहे. ताबडतोब संपर्क साधण्यासाठी वीएचएफ(वेरी हाय फ्रीक्वेन्सी)ही प्रणाली ही वापरण्यात येईल.मुंबईत पालीकेने ३५ ठीकाणि रेन गेज बसवले असून त्यातील २८ ठीकाणची आकडेवारी(पावसाचे प्रमाण) संगणक जोडणिद्वारे या विभागात पाहावयास मिळते.टाटा कन्सलटंसी सर्व्हीस ने या कामी महापालीकेला मदत केली आहे.महापालीकेची ईओस(ईमर्जंन्सी ऑपरेटींग सिस्टम )ही सेवा २४ तास कार्यरत आहे. इस्पितळांमध्ये पालीकेने १२०० खाटा दुर्घटना घडल्यास राखीव ठेवल्या आहेत. तसेच प्रत्येक वॉर्डामध्ये टायर-ट्यब यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.त्याच बरोबर मुंबई महानगरपालीका आपत्कालीन घटना घडल्यास नागरीकांनी कसे तोंड धावे यासाठी कार्यशाळाही घेत आहे.

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

25 Jun 2009 - 3:19 pm | चिरोटा

नाही नाही म्हणत नवरी सज्ज झाली एकदाची वरुणराजाला हार घालायला.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

अमोल केळकर's picture

25 Jun 2009 - 3:23 pm | अमोल केळकर

परमेश्वरा , पाऊस पाड रे बाबा आणि मुंबई महानगरपालिकेची अब्रू वाचव रे देवा ! :D
नाही तर सर्व व्यवस्थेवर पाणी पडेल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

सूहास's picture

25 Jun 2009 - 3:57 pm | सूहास (not verified)

बघुया... 8>

सुहास

वेताळ's picture

25 Jun 2009 - 5:29 pm | वेताळ

सगळ ठिक आहे आता निदान पाऊस तरी सुरु होऊ दे.
वेताळ

विकास's picture

25 Jun 2009 - 6:56 pm | विकास

>>सगळ ठिक आहे आता निदान पाऊस तरी सुरु होऊ दे.<<

अहो आपल्याकडे पाऊस पण "तुला देतो पैसा" म्हणल्याशिवाय सुरू होत नाही. ;)

श्रीयुत संतोष जोशी's picture

25 Jun 2009 - 6:47 pm | श्रीयुत संतोष जोशी

अत्यंत विनोदी माहिती दिली तुम्ही विकीसाहेब.

कारण दर वर्षी महापालिका हे असंच सांगते की आम्ही सज्ज आहोत म्हणून आणि पहिल्या पावसातंच सगळी वाट लागते उदा. पाणी साठणे ; रेल्वे बंद पडणे ; एखाद दोन धोकादायक ईमारती पडणे इ.इ.इ.

जाऊ दे . चालायचंच.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

विसोबा खेचर's picture

26 Jun 2009 - 12:10 pm | विसोबा खेचर

यंदाच्या पावसाळ्यात मुंबई महापालीका सज्ज

हा हा हा! विनोद आवडला..!

विकिसाहेब, हास्यास्पद शीर्षकाबद्दल धन्यवाद!

आजच सकाळच्या बातम्यांनुसार मुंबैत पाऊस पडून लालबाग, हिंदमाता, नाना चौक परिसरात एकेक फूट पाणी साचले आहे! :)

तात्या.

विकि's picture

26 Jun 2009 - 4:09 pm | विकि

आजच सकाळच्या बातम्यांनुसार मुंबैत पाऊस पडून लालबाग, हिंदमाता, नाना चौक परिसरात एकेक फूट पाणी साचले आहे!
मिळालेल्या माहीतीनुसार तुम्ही जे मुंबईतील भाग लिहीलेत ते खोलगट भाग आहेत आणि तेथे पाणी नेहमी तुंबतेच आणि पावसाच्या सुरुवातीला दोन तीन दिवस कचर्‍यामुळे पाणि तुंबण्याचे प्रकार घडतात नंतर गटारांद्वारे पाणि वाहून जाण्याचे काम सुरू होते(सधस्थितीत).जुन्या पालिकेला विसरून जा आता पालीका आधुनिक झाली आहे.

विकि's picture

26 Jun 2009 - 3:58 pm | विकि

प्रतिसाद लिहीणार्‍या सर्व मान्यवरांचे व वाचकांचे जाहिर आभार.