गुन्हेगारी टोळ्यांचे अस्तित्व व आजच्या आधुनिक टोळ्या (संक्षीप्त स्वरुपात) -

विकि's picture
विकि in काथ्याकूट
20 Jun 2009 - 12:22 pm
गाभा: 

कायधाचे उल्लधंन केल्यास तेथे गुन्हा घडतो ही झाली गुन्ह्याची सर्वसाधारण व्याख्या. चार ,पाच जण किंवा त्याहून अधिक यांनी एकत्र पणे येऊन केलेला गुन्हा म्हणजे संघटीत गुन्हा. पण हाच सघटित गुन्हा अनेक जण येऊन म्होरक्यामार्फत करतात तेव्हा टोळी निर्माण होते. या टोळीतून फुटुन अनेक टोळ्या निर्माण होतात आणि त्यांच्यात अस्तित्वासाठी,हुकूमतीसाठी लढाई,खुनखराबा निर्माण होतो .अशीच लढाई मुंबईत सुरु होती. टोळ्या त्यांचे टोळीयुध्द यांचा भडका उडाला होता सामान्यजनांनाही त्याची झळ बसत होती. त्या गुन्हेगारी प्रवृतीच्या टोळ्यांचा थोडक्यात घेतलेला हा आढावा. प्रस्तुत लेखाचा त्या गँगवारचा उदात्तीकरण करण्याचा मुळीच हेतू नाही.
मुंबईच्या गुन्हेगारी जगताचा इतिहास रक्तरंजित आहे हे आपण जाणतोच पण त्या इतिहासाला तेव्हाचे सामाजिक स्वरुपही जबाबदार होते. बंद झालेल्या कापड गिरण्या ,एकत्र कुटूंब पध्द्ती,सिनेमा,राजकीय पक्ष,चाळ संस्कृती या सर्वांचा थोड्या फार प्रमाणात परिणाम किंवा प्रभाव तेव्हाच्या गुन्हेगारी जगतावर होता. हाजी मस्तान ,युसूफ पटेल,करिम लाला या तस्करांपासून सुरू झालेला हा प्रवास वरदाराजन, दाऊद,अरुण गवळी,छोटा राजन,गुरू साटम,बाबू रेशीम,अमर नाईक ,मंचेकर इथपासून ते अगदी छोटा शकील,अबू सालेम इथपर्यंत कुप्रसिध्द आहे.प्रत्येक गुन्हेगारी टोळ्यांचे मुंबईतील शहर,उपनगरात वर्चस्व होते. या टोळ्यांत मराठी कनिष्ट वर्गातील तरुणांचे प्रमाण जास्त होते. नाक्यानाक्यावर उभा राहणारा तरूण त्यात शि़क्षीत वा अशिक्षीत दोन्ही यांच्यावर त्या गुन्हेगारी टोळ्यांचा प्रभाव तेव्हा होता हे नक्की. हा या कंपनीचा तो ह्या कंपनीचा .तो कंपनी टच आहे या चर्चा तेव्हा सरस घडत. काही वाट चुकलेले तरूण योगयोगाने म्हणा वा भाई बनण्याच्या इर्षेने,परिस्थितीमुळे, बेरोजगारी, झटपट पैसा मिळविण्याच्या नादात तेव्हा गुन्हेगारी टोळ्यांना सामिल झाले आणि आयुष्याचा खेळखंडोबा करुन बसले.मिळालेला काळा पैसा मग वेश्यावस्ती,लेडीज बार,जुगार किंवा कोणाला मदत लागल्यास त्याला दे असे होऊ लागले. एकदा येथे आले की परतीचा मार्ग बंद हे आपण अलि़कडेच आलेल्या सत्या,वात्सव या सिनेमांतून पाहीलेलेच आहेगँगवार(साधारण १९९३ हे वर्ष) जेव्हा जोरात होते तेव्हा यापैकी अनेक जण मारले तरी गेले कींवा यांनी कोणाचा तरी गेम तरी केला.पुढे अनेक राजकीय नेते, कामगार पुढारी यांच्या गुन्हेगारी टोळ्यांकडून सुपारी घेऊन हत्या झाल्याने(यांचा बोलाविता धनी कोणी वेगळाच) तसेच या टोळ्यांनी घातलेल्या हैदोसाला(खंडणी,धमकीसत्र) पाहून अखेर मुंबई पोलीसातील बहादुर अधिकार्‍यांनी त्यांना मिळालेल्या एन्काऊंटरच्या आदेशामूळे अनेक गुंडाना टिपले व गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडले.त्यासाठी त्यांनी ठराविक गुन्हेगारी टोळीच्या म्होरक्यांच्या खास म्हणजेच डावा हात उजवा हात यांना टिपून म्होरक्यांना एकटे पाडले व व टाडा,रासुका,मोक्का या कडक कायद्यांमुळेया टोळ्यांना थोड्याफार प्रमाणात का होईना नेस्तनाबूत केले. पोलीस कारवाईच्या भितिने अनेक जण भारतातून परागंदा झाले यातील अनेक जणांनी आपला काळा पैसा बांधकाम व्यवसाय,चित्रपट निर्मिती यांमध्ये गुंतविला.पुढे एन्काउंटर बाबत पोलीसांवर संशय व्यक्त झाल्याने पोलीसांनीही एन्काऊंटर थांबवले.
आज जवजवळ गुन्हेगारी टोळ्या शहरातून हद्दपार झाल्या आहेत हे चांगलेच झाले तरी त्यांचे अस्तित्व शिल्लक आहे कारण आजही मध्येच एखादी चकमकीची बातमी आल्यास अथवा एखादा गुन्हेगार सुटल्यास खळबळ निर्माण होते.मग या संघटीत गुन्हेगारी टोळ्यांना अंत आहे का ? हा प्रश्न निरुत्तरच राहतो.
तसे पाहील्यास आज गुन्ह्याची पध्द्त बदलली आहे आजचे युग हे संगणक युग आहे त्यामुळे सध्या व्हाईट कॉलर गुन्ह्यांचा जमाना आहे.जास्त व्याज देतो,लोन मिळवून देतो म्हणून कंपन्या संघटीत पणे स्थापन करणे आणि योग्य वेळ मिळताच पसार होणे, ,क्रेडीड कार्डाद्वारे पैसे काढणे,संगणक हॅक करणे त्यातून माहीती चोरणे अश्या प्रकारच्या सायबर गुन्ह्यांची सध्या चलती आहे तसेच मोटार सायकली,अलिशान गाड्या चोरणे.या बदललेल्या गुन्ह्यांत शिक्षीत व उच्च मध्यम वर्गातील तरुण जास्त करून आढळताना दिसतात. बदलती जिवनशैली,डिस्को पब्ज,मॉल्स,अलीशान मोटारी,सिनेमातील श्रीमंती,पाश्चात्य राहणीमान यांचे आकर्षण याला कारणीभूत आहे. जो पर्यंत माणसात खुनशी वृत्ती ,लालसा,कपटी मनोवृती शिल्लक आहे तो पर्यंत हे बदलणार तरी कसे व गुन्हे घडतच जाणार.

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

20 Jun 2009 - 12:26 pm | विनायक प्रभू

कलयुग हो.
काय होणार या देशाचे.
संस्कृती रसातळाला जाणार हो.
एकेकाळी सोन्याचा धुर येणार्‍या देशात बंदुकीच्या धुराला सामना करावा लागत आहे हो.

अवलिया's picture

20 Jun 2009 - 12:37 pm | अवलिया

अहो मास्तर काय कलयुग अन सत्ययुग ?

कुठल्या १०००० वर्षांपुर्वी मरुन बेपत्ता झालेल्या देशातील कल्पना घेवुन बोलत आहात ?ऑ !!!

अहो इथे माणसांची फिकीर नाही तुम्हाला अन संस्कृतीच्या गप्पा मारता आहात?
अहो माणुसकी पायी तुमच्या संस्कृतीला लग्नाआधी चार पोरे झाली? आता तिने काय करायचे ? सांगा? घेता जबाबदारी?

आणि सोन्याचा धुर जरा एकाच घरात असेल तर बाकी घरातील लोकांनी काय ठसके द्यायचे फक्त? आता नाही त्यांच्या पाशी तुमच्यासारखा समुपदेशक मग काय करणार ? बंदुकाच घेणार ना हातात?

समजुन घ्या हो तुम्ही!
आपलीच माणसे आहेत !
सर्व माणसे समान असेच आपले म्हणणे ना ? मग सोन्याचा धुर प्रत्येक घरातुन नाही निघु शकत तर बंदुकीचा तरी निधु द्या !!
आपल्याला काय? धुर पाहिजे ! आणि सगळीकडे पाहीजे... समानता !! बास !!!

--अवलिया

मराठमोळा's picture

20 Jun 2009 - 1:01 pm | मराठमोळा

सर्व माणसे समान असेच आपले म्हणणे ना ? मग सोन्याचा धुर प्रत्येक घरातुन नाही निघु शकत तर बंदुकीचा तरी निधु द्या !!
सिगारेटचा/गांजाचा निघाला तरी हरकत नाही... ;)

आपल्याला काय? धुर पाहिजे ! आणि सगळीकडे पाहीजे... समानता !! बास !!!
तालिबानला जावं लागेल. :P :?

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

अवलिया's picture

20 Jun 2009 - 12:27 pm | अवलिया

वा! मस्त लेख !!
तशा टोळ्या कॉर्पोरेट जगात पण असतात त्यांना टीम म्हणतात.
संकेतस्थळावर पण असतात (मराठि विशेषतः) त्यांना कंपु म्हणतात.
या कंपुचे पण अनेक प्रकार आहेत जागृत, निद्रिस्त अन मृत.
पण यावर नंतर कधीतरी ..... :)

--अवलिया

तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु

दशानन's picture

20 Jun 2009 - 12:38 pm | दशानन

ह्म्म्म्म !

अशी टोळि येथे पण कार्यरत आहे काय ?

नाना तुझा कंपु कुठला रे ?
मास्तर तुमचा कंपु तुमच्याकडेच आहे काय ?

थोडेसं नवीन !

कपिल काळे's picture

20 Jun 2009 - 12:52 pm | कपिल काळे

अवलियांनी वर्णिलेले बंदुकांचे धूर सध्या लालगढमधून निघत आहेत

शिंगाड्या's picture

20 Jun 2009 - 4:23 pm | शिंगाड्या

सहमत

तिमा's picture

21 Jun 2009 - 6:54 am | तिमा

विकि, तुमचा लेख आवडला. या राजकीय खुनांचा बोलविता धनी कोण यावर पण लिहिले असते तर वाचायला नक्कीच आवडले असते.
प्रतिक्रियेत लालगढचा उल्लेख कोणीतरी केला आहे म्हणून लिहावेसे वाटते.
ते लालगढचे घोषणा देणारे आदिवासी बघितले की त्यांचा राग येत नाही. तर त्यांना वर्षानुवर्षे गरीबीत ठेवणार्‍या राज्यकर्त्यांची चीड येते. आज जर नक्षलवादी वा माओवादी यांचे प्राबल्य वाढले असेल तर त्याला हे नालायक राज्यकर्तेच जबाबदार आहेत. अगदी केंद्रापासून राज्यांपर्यंतचे सर्व!

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

विकि's picture

23 Jun 2009 - 12:44 pm | विकि

या राजकीय खुनांचा बोलविता धनी कोण यावर पण लिहिले असते तर वाचायला नक्कीच आवडले असते. या विषयी लिहायला आणि वाचायला मलाही आवडेल.पण पुराव्याशिवाय कोणिही यावर लिहू शकत नाही. छोटा शकील टोळीने यापुर्वी केवळ प्रसिध्दीसाठी शिवसेना पदाधिकार्‍यांच्या हत्या केल्या होत्या. तसेच बहुतेक राजकीय खुनांच्या मुळ मारेकरी कधीही पोलीसांच्या हाती लागत नाही हे ही तितकच वास्तव आहे.
प्रतिक्रियेत लालगढचा उल्लेख कोणीतरी केला आहे म्हणून लिहावेसे वाटते. याचे उत्तर- मिपावरील वातावरण तापावे व वरील लेख मिपाप्रशासनाने नष्ट करावा असा कपिल काळेचा दुहेरी हेतू आम्ही हाणून पाडला त्याने लेखावर प्रतिक्रीया न देता मुद्दामहून लालगढला मध्ये आणले आणी सभासदांची दिशाभूल केली. मिपा प्रशासनच त्याबाबत त्याला योग्य ते शासन घडवेल अशी आपण आशा बाळगुया.

कपिल काळे's picture

23 Jun 2009 - 1:35 pm | कपिल काळे

असा दुहेरी हेतू आमचा नसून, आदिवासींना प्रगती पासून वंचित ठेवणे आणि ते बंड करुन उठले की थयथयाट करणे असा तो खराखुरा दुहेरी हेतू आहे.
त्यामुळे लालगढचा उल्लेख , ह्या लेखाच्या अनुषंगाने केल्यावर विकी तुझी फार पंचाइत झाली.

आपलाच मुद्दा योग्य हा टिपिकल कम्युनिस्टी हेकेख्रोरपणा आहे, दुसरे काय?

प्रकाश घाटपांडे's picture

21 Jun 2009 - 3:33 pm | प्रकाश घाटपांडे

जो पर्यंत माणसात खुनशी वृत्ती ,लालसा,कपटी मनोवृती शिल्लक आहे तो पर्यंत हे बदलणार तरी कसे व गुन्हे घडतच जाणार.

खर आहे! पण तीव्रता कमी करता येईल. बरेचसे गुन्हे हे न्याय मिळवण्यासाठी होतात. न्या चपळगावकरांचे कायदा आणि माणुस हे पुस्तक (पुर्वीची सकाळमधील लेखमाला) उत्तम आहे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

विकास's picture

21 Jun 2009 - 7:44 pm | विकास

चांगला आढावा आहे. "जो पर्यंत माणसात खुनशी वृत्ती ,लालसा,कपटी मनोवृती शिल्लक आहे तो पर्यंत हे बदलणार तरी कसे व गुन्हे घडतच जाणार." हे वाक्य चांगले आणि पटणारे आहे.

सहज's picture

22 Jun 2009 - 7:16 am | सहज

विकीराव असेच लिहते रहा. लेख चांगला आहे.

"जो पर्यंत माणसात खुनशी वृत्ती ,लालसा,कपटी मनोवृती शिल्लक आहे तो पर्यंत हे बदलणार तरी कसे व गुन्हे घडतच जाणार."

प्रो-अ‍ॅक्टीव्ह / प्री-एम्प्टीव्ह / दोन पावले पुढे रहाणे ह्या गोष्टी महत्वाच्या होत आहेत. गाफील राहून चालत/चालणार नाही.

बाकी तेवढ लालघर, बंगाल मधे काय घडले ते लिव्हा की राव.

मेथांबा's picture

22 Jun 2009 - 8:11 am | मेथांबा

बाकी तेवढ लालघर, बंगाल मधे काय घडले ते लिव्हा की राव.

नक्षलवाद सर्वत्र आहे. आज तो छत्तीसगढ, महाराष्ट्र, आंध्र मध्ये पण आहे. तिथे तर कम्युनिस्टांचे राज्य नाहीये ना?

आज जे लालगढ मध्ये घडलय ते महाराष्ट्रात पण घडु शकत होतेच
ना. गेल्या महिन्यात महाराष्ट्रात १६ पोलिस शहीद झाले ते येव्हढ्यात विसरलात का? उगाच बंगाली राज्यकर्त्यांना का बोल लावता?

^^^^
किसान मजूर उठतील, कंबर लढण्या कसतील एकजुटीची मशाल घेउनि पेटवतिल हे रान

>आज जे लालगढ मध्ये घडलय ते महाराष्ट्रात पण घडु शकत होतेच
तेही येउ दे.

>उगाच बंगाली राज्यकर्त्यांना का बोल लावता?
खल्लास!! कुठे बोलं लावलेला दिसला हो?

कपिल काळे's picture

22 Jun 2009 - 10:56 am | कपिल काळे

कुणी लावला बंगाली राज्य्कर्त्यांना बोल?

पण मेथांब्या ह्यांनी ही कविता आठवून दिली. साने गुरुजींची हे कविता आम्ही १५ ऑगस्टला म्हणत होतो शाळेत असताना.

आता उठवू सारे रान
आता पेटवू सारे रान
किसान मजूर उठतील
कंबर लढण्या कसतील
एकजूटीची मशाल घेउन पेटवतील हे रान
स्वातंत्र्याचे रान.

कोण आम्हां अडवील
कोण आम्हा रडवील
अडवणूक करणारयांची उडवू दाणादाण
उडवू दाणादाण

खाउ न आता लाठ्या
खाउ न आता काठ्या
शेतकरी कामकरी
मांडणार हो ठाण, मांडणार हो ठाण

अशी थोडीफार आठवते. पूर्ण कोणाकडे असल्यास द्यावी.
१५ ऑगस्टल- भर पावसात ही कविता म्हणताना रान कसं काय पेटणार असा प्रश्न पडायचा.

विकि's picture

22 Jun 2009 - 12:33 pm | विकि

यांना विनंती आहे की कृपया लेखावर प्रतिसाद लिहा. उगाच लालगढला मध्ये आणू नका. सभासदांची दिशाभूल करू नका.
मिपा प्रशासनाला विनंती आहे की कपिल काळे सारख्या व्यक्तिची त्वरीत दखल घ्यावी. माझ्या मते मिपावरील वातावरण तापावे असाच कपिल काळे चा हेतू दिसत आहे.

कपिल काळे's picture

22 Jun 2009 - 12:45 pm | कपिल काळे

अरेरे !! च्च च्च च !!....

बंगाली राज्यकर्ते कुणी आणले मध्येच.

मला आठवली ती कविता मेथांबा ह्यांनीच तर लिहिली आहे. त्यांनी लिहिलेली कशी चालली ?

चिरोटा's picture

22 Jun 2009 - 9:59 am | चिरोटा

चांगला लेख आहे.

जो पर्यंत माणसात खुनशी वृत्ती ,लालसा,कपटी मनोवृती शिल्लक आहे तो पर्यंत हे बदलणार तरी कसे व गुन्हे घडतच जाणार.

असहमत्.असे असते तर टोळी युध्धे सगळ्या देशात असली पाहिजेत.पण तसे नाही. सरकारी यंत्रणा जिकडे जास्त किडलेली असते,प्रशासन्,पोलिस प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचारी असतात अश्या ठिकाणी टोळी युध्धे जास्त पहावयास मिळतात.काही वर्षापुर्वी एका मुंबईच्या माजी पोलिस अधिकार्‍याने म्हंटले होते की मनात आले तर सरकार आणि पोलिस चोविस तासात सगळे टोळीयुध्ध संपुष्टात आणू शकतात पण तसे न करणे त्यांच्या व्यक्तिगत फायद्याचे आहे.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

विकि's picture

22 Jun 2009 - 12:21 pm | विकि

तुमचा संपुर्ण रोख राजकीय व्यवस्थेवर आहे असे दिसते. पण मानवी मनोवृतीचे काय.

चिरोटा's picture

22 Jun 2009 - 12:46 pm | चिरोटा

अश्या प्रकारची मनोव्रुत्ती जगभर सगळीकडेच असते.अगदी पुढारलेल्या देशातही. सरकारी यंत्रणा,पोलिस्,प्रशासन ह्यानी असल्या व्रुत्तीना जाती-धर्म्,पैसा ह्यांचा विचार न करता आटोक्यात आणायचे असते.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

विकि's picture

23 Jun 2009 - 12:48 pm | विकि

प्रतिसाद लिहीणार्‍या सर्व मान्यवरांचे व वाचकांचे (अपवाद सोडून) जाहीर आभार.

वेताळ's picture

23 Jun 2009 - 12:45 pm | वेताळ

आम्ही पण तुमचा लेख वाचलाच आहे की. आम्हा वाचकांचे पण आभार मानायला हवे होते.त्याबद्दल आपला सर्व वाचकांकडुन जाहिर निषेध.

खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

नितिन थत्ते's picture

23 Jun 2009 - 2:57 pm | नितिन थत्ते

आता तुम्ही प्रतिसाद दिला आहे. म्हणजे आता तुम्ही नुसते वाचक नाही राहिले. :)

खराटा
(रंग माझा वेगळा)

जागु's picture

23 Jun 2009 - 3:11 pm | जागु

हम्म...