एमबीए / बीबीए

दशानन's picture
दशानन in काथ्याकूट
20 Jun 2009 - 10:06 am
गाभा: 

मला एमबीए करायचे आहे काय करु ?
भाकरीच्या गडबडीत शिक्षण कधी सुटले कळालेच नाही पण आता मला तातडीने एमबीए / बीबीए करायचे आहे कोणी योग्य सल्ला देऊ शकेल का ? ऑनलाईन डिग्री मिळते का ? मला सुरवात कशी व कुठून करावी लागेल ? माझे शालेय शिक्षण जास्त नाही आहे दहावी पासून सुरवात करायची आहे तर एमबीए / बीबीए पुर्ण होण्यासाठी किती कालावधी लागेल ?

ईन शॉर्ट मला एमबीए करायचे आहे ! मदत करा.

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

20 Jun 2009 - 10:18 am | विनायक प्रभू

ही कसली 'भिकारडी' स्वप्ने बघतो आहेस.
धंदेवाईक आहेस ना?
घिरुभाईने एमबीए केले होत का?
त्याने एमबीए ची गांडूळे अन्नाला लावली.
तु पण तसेच कर.
माझ्या 'गांडूळ' फॅक्टरी तले दोन पाठवु का मुलाखतीला.
मुलाखत घ्यायला अवलिया ला विनंती कर.
चांगले गांडूळ कसे निवडायचे ह्यावरचा एकदम अधिकारी माणुस.

अवलिया's picture

20 Jun 2009 - 10:50 am | अवलिया

मास्तरचे ऐकु नकोस...
काही कर पण एमबीए होवुनच जा !
आधी जमलेस तर विंजिनेर नायतर डागदर हो... कसे व्हायचे ते मास्तर सांगेलच... :)

--अवलिया

विनायक प्रभू's picture

20 Jun 2009 - 10:58 am | विनायक प्रभू

मिसगाईड करु नका हो अवलिया.
त्याला ३० पर्यंत पाढे पण म्हणता येत नाहीत.

अवलिया's picture

20 Jun 2009 - 11:02 am | अवलिया

कुणाला येतात ते आजकाल?
कॅलक्युलेटर, कंम्प्युटर्स असतांना पाढे?
कोणत्या जगात आहात ?

--अवलिया

विनायक प्रभू's picture

20 Jun 2009 - 11:49 am | विनायक प्रभू

मग शिईटी पास कसा व्हनार.
राजे शीटी मारतो पण वेगळीच.

दशानन's picture

20 Jun 2009 - 11:52 am | दशानन
प्रशांतकवळे's picture

24 Jun 2009 - 12:55 am | प्रशांतकवळे

राजे
जर लग्न झाले असेल तर एम बी ए होउ शकता.... Married But Available

प्रशांत

अवलिया's picture

20 Jun 2009 - 11:54 am | अवलिया

हे पण मीच सांगु?
तुमचा अन तुमच्या अनुभवाचा काय उपयोग ?

--अवलिया

विनायक प्रभू's picture

20 Jun 2009 - 11:57 am | विनायक प्रभू

आत्ताच आलेल्या बातमी नुसार राजे कडे खणखणीत एमबीए आहे.

दशानन's picture

20 Jun 2009 - 11:59 am | दशानन
निखिल देशपांडे's picture

20 Jun 2009 - 11:03 am | निखिल देशपांडे

मास्तर तुम्ही ३० पर्यंत म्हणत आहात...
मागच्या आठवड्यात मला बे एक बे पाठ करतोय सांगत होता.....
==निखिल

विकास's picture

21 Jun 2009 - 2:24 am | विकास

>>>त्याने एमबीए ची गांडूळे अन्नाला लावली.<<<

विचार करा गांडुळे नसली तर साधे ऑर्गॅनिक खत तयार करता येत नाही. ओला कचरा कमी करता येत नाही :-)

असो.

-----
वरील प्रतिसादाचे तात्पर्यः मिपावर जास्त येयला लागलो की प्रतिसाद देताना विचार एका चर्चेतून दुसर्‍या चर्चेत भरकटत जाऊ शकतात... ;)

विनायक प्रभू's picture

21 Jun 2009 - 8:12 am | विनायक प्रभू

सहमत

अनंता's picture

21 Jun 2009 - 10:51 am | अनंता

मला रिलायन्स मनीची फ्रँचायजी घ्यायची आहे काय करु ?
नोकरीच्या गडबडीत धंद्याची हौस कधी सुटली कळालेच नाही पण आता मला तातडीने रिलायन्स मनीची फ्रँचायजी घ्यायची आहे कोणी योग्य सल्ला देऊ शकेल का ? ऑनलाईन मिळते का ? मला सुरवात कशी व कुठून करावी लागेल ? माझे शिक्षण कॉमर्स शाखेतील नाही आहे पहिल्या पासून सुरवात करायची आहे तर त्यासाठी किती कालावधी लागेल ?

ईन शॉर्ट मला एमबीए करायचे आहे ! मदत करा.

एखादी गोष्ट गुप्त ठेवायची असेल तर सर्वप्रथम आपल्या पत्नीला सांगा ;)

टारझन's picture

20 Jun 2009 - 10:26 am | टारझन

एम.बी.ए. साठी कोणतं तरी ग्रॅज्युएशन लागतं रे भो .. आणि बी.बी.ए. साठी बारावी पास ~!! एम.बी.ए. साठी एंट्रंस एग्झाम्स असतात .. .त्याच्या थ्रू एम.बी.ए. ला अ‍ॅडमिशन मिळते... आपण आय.आय.एम. ह्या संस्थेमार्फत जर एम.बी.ए. केलं तर आयुक्षाचं सोनं होतं असं म्हणतात .. पण बरेच प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज पण आहेत...

असो .. आता थोडं सिरीयस ...

राजे फोकलिच्या !!! दुसरीनंतर डायरेक्ट १७ नंबरचा फॉर्म भरून दहावीत बसलास !!! आणि १०वी फायटर झालास ..... १० वी नंतर एम.बी.ए? बीबीए ?
राजें .. कोणीतरी रिक्वायरमेंट टाकली का हो ? की कसलासा क्रायटेरीया आहे का ? =)) राजे मेला आता ...

दशानन's picture

20 Jun 2009 - 10:44 am | दशानन

>>दुसरीनंतर डायरेक्ट १७ नंबरचा फॉर्म भरून दहावीत बसलास !!! आणि १०वी फायटर झालास ..... १० वी नंतर एम.बी.ए? बीबीए ?

=))

>>राजें .. कोणीतरी रिक्वायरमेंट टाकली का हो ? की कसलासा क्रायटेरीया आहे का ? राजे मेला आता ...

=))

थोडेसं नवीन !

विनायक प्रभू's picture

20 Jun 2009 - 10:31 am | विनायक प्रभू

पण तसेच वाटते.
आधी एमबीए झाल्याशिवाय 'आर्कियालॉजिस्ट' ला अ‍ॅडमिशन नाही अशी अट आली वाटते.

शितल's picture

20 Jun 2009 - 10:47 am | शितल

राजे,
तुम्ही एम्.बी.एम. झाल्यावर फॅक्लटी म्हणुन आलात तरच आम्ही ही एम्.बी.एम. शिकायचे मनावर घेऊ. ;)

अवलिया's picture

20 Jun 2009 - 10:48 am | अवलिया

वा! मस्त काथ्याकुट !!
वाचायला आवडेल :)

वाचनखुण म्हणुन साठवुन ठेवला आहे... :)

--अवलिया

निखिल देशपांडे's picture

20 Jun 2009 - 10:51 am | निखिल देशपांडे

राजे लेका आताच काही दिवसा पुर्वी बाराखडी पाठ करत होतास.... आता लगेच एम बी ए????

राजें .. कोणीतरी रिक्वायरमेंट टाकली का हो ? की कसलासा क्रायटेरीया आहे का ? राजे मेला आता ...

असेच म्हणतो....
सर्वात महत्वाचे क्रमशः कुठेय????

==निखिल

अवलिया's picture

20 Jun 2009 - 11:10 am | अवलिया

>>>मला एमबीए करायचे आहे काय करु ?
एमबीए कर

>>>भाकरीच्या गडबडीत शिक्षण कधी सुटले कळालेच नाही पण आता मला तातडीने एमबीए / बीबीए करायचे आहे कोणी योग्य सल्ला देऊ शकेल का ?
देतो की

>>>ऑनलाईन डिग्री मिळते का ?
इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठात चौकशी कर किंवा कोणतेही राज्यस्तरीय मुक्त विद्यापीठ. (फक्त दहावी असल्याने आधी बारावी, मग पदवी, मग एमबीए असा मोठा टप्पा होईल. आपली ताकद मधेच संपुन जाईल त्यापेक्षा मुक्त विद्यापीठ बेस्ट)

>>>मला सुरवात कशी व कुठून करावी लागेल ?
तु फक्त दहावी असल्याने आधी पदवी मिळवावी लागेल. मग एमबीए.

>>>माझे शालेय शिक्षण जास्त नाही आहे दहावी पासून सुरवात करायची आहे तर एमबीए / बीबीए पुर्ण होण्यासाठी किती कालावधी लागेल ?
कमीत कमी चार वर्षे पदवी + २ वर्षे पदव्युत्तर = एकुण सहा वर्षे कमीत कमी. (पळुन गेला नाहीस आणि वेळच्यावेळी पास झाल्यास )

>>>ईन शॉर्ट मला एमबीए करायचे आहे ! मदत करा.
केली.
अ‍ॅडमिशन घेतलीस की सांग, अभिनंदनाचा धागा काढेल :)

--अवलिया

दशानन's picture

20 Jun 2009 - 11:24 am | दशानन

लेका दहावी पासून सुरवात करायची आहे ... नाना तुम भी ना :D

थोडेसं नवीन !

अवलिया's picture

20 Jun 2009 - 11:32 am | अवलिया

अरतिच्या....
एय भो... दे सोडुन ... आपले ते काम नाही....
योक जहिरात दे... पन्नास येतील... लाव कामाला... :)

हे एमबीए होणे आपले काम नोहे राजा !!
उगाच कशाला उंटाच्या शेपटीचा मुका घ्यायचा ? दे सोडुन.. :)

दोन पेग मार अन गपगुमान विसरुन जा बरे हे स्वप्न.... :)

--अवलिया

विनायक प्रभू's picture

20 Jun 2009 - 11:39 am | विनायक प्रभू

सहमत
पण १२ वी ५०% ने पास झालास तर डॉक्टर होउ शकतोस.
मला माहीत असलेले एक शिक्षण सम्राट ३० लाख घेउन आलात कुणालाही डागदर करतात.
माझे नाव सांगितलेस तर २ लाख जास्त मागतील.
डुख आहे माझ्यावर.
पण कट प्रॅक्टिस करणार नाही ही शपथ लिहुन द्यावे लागते त्याचे काय?
ते तुला कसे काय जमेल बॉ?

अवलिया's picture

20 Jun 2009 - 11:47 am | अवलिया

कट प्रॅक्टिसची गरजच काय?
एक फाउंडेशन काढायचे.... आयकर खात्याकडुन सुट मिळवायची
फार्मा कंपन्या, संबंधित सगळ्यांकडुन देणग्या घ्यायच्या.
त्यांना फायदा .... करात सुट.
आपला फायदा... थोर समाजसेवक !

--अवलिया

दशानन's picture

20 Jun 2009 - 11:50 am | दशानन

:)

सही बोल्या नाना तु !

थोडेसं नवीन !

नितिन थत्ते's picture

20 Jun 2009 - 11:36 am | नितिन थत्ते

राजेंनी बहुधा कोणीतरी पाहून ठेवल्ये जिने यम बी ये झालास तर बोल असे ठणकावले असावे. तेव्हा निदान बीबीए तरी करू असे राजेंनी ठरवलेले दिसतंय. :D

खराटा
(रंग माझा वेगळा)

अवलिया's picture

20 Jun 2009 - 11:40 am | अवलिया

हम्म. असेच दिसते :)

राजे, असे असेल तर तिला सांगा आधी तु बी ए (बाळाची आई) हो मग मी होतोच यमबीये :)

--अवलिया

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Jun 2009 - 12:28 am | llपुण्याचे पेशवेll

नाही नाही.. तू पण तिला सांग की, तू आधी MBA (माझ्या बाळाची आई) हो.. मग मी MBA करेन.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

पिवळा डांबिस's picture

20 Jun 2009 - 10:48 pm | पिवळा डांबिस

राजा मला एक सांग,
तुला हे एमबीए कशासाठी करायचंय?
धंदा करण्यासाठी? - मग आत्ता तू काय करतोयस, म्हशी चारतोयस?
नोकरी करण्यासाठी? - चांगला असलेला धंदा सोडून नोकरी करायची ही कसली अवदसा आठवतेय?
पोरीसाठी? - तिला म्हणावं मी आहे हा असा आहे. पटत असेल तर बघ नायतर चालू पड!!!
:)

Nile's picture

21 Jun 2009 - 6:51 am | Nile

परतिसाद मिलविन्यासाठी?- अरे मंग जा ना फुडच्या सफरीला (जेके. ;) )

अजय भागवत's picture

24 Jun 2009 - 6:43 pm | अजय भागवत

आईन्स्टाईन म्हणाला (म्हणे), “The only thing that interferes with my learning is my education.”

त्यावरुन दुसरी एक म्हण कोणीतरी तयार केली, "I was born intelligent but education ruined me".