अतिशय छान उपक्रम.....

उमेश__'s picture
उमेश__ in काथ्याकूट
19 Jun 2009 - 4:42 pm
गाभा: 

महाराष्ट्र राज्य युवा धोरण जाहीरनामा

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेना संचालनालयामार्फत ज्या विविध योजना राबविल्या जातात, त्या योजनांमधील जवळपास ८०% योजना या क्रीडा क्षेत्राशी संबंधित असून युवक कल्याणविषयक फार कमी योजना राज्य शासन राबवित आहे. मुळात महाराष्ट्र राज्याच्या एकूण लोकसंख्या (२००१ च्या जनगणनेनुसार - ९,६८,७८,९२७ यातील १३ ते १५ वर्ष वयोगटातील युवांची लोकसंख्या ४,१३,४७,८२१) ४२.६८% लोकसंख्या ही युवांची असून या वर्गातील लोकसंख्येकरिता, त्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता शासनाने कुठलेही धोरण ठरविलेले नाही. या कारणास्तव यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, नवमहाराष्ट्र युवा अभियानाने, महाराष्ट्र राज्यातील युवांच्या सर्वांगीण विकासासंदर्भात शासनाने स्वयंसेवी संस्था, संघटनांनी विविध योजना कार्यान्वित कराव्यात आणि त्या संदर्भातील धोरण शासनाने लवकरात लवकर तयार करावे, अशी मागणी केलेली आहे. अभियानाने फक्त मागणीच न करता या संदर्भातील आदर्श धोरण कसे करावे, याचा आराखडा जाहीरनामा स्वरूपात शासनाकडे बुधवार दिनांक १२ ऑगस्ट २००९ रोजी सुपूर्द करण्याचा संकल्प केलेला आहे.महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेस ५० वर्ष पूर्ण होत आलेली असतानादेखील महाराष्ट्र शासनाने युवांविषयीचे धोरण जाहीर केलेले नाही. तसेच शासनाची महाराष्ट्रातील युवांविषयीची भूमिका निश्चित नाही. या कारणास्तव नवमहाराष्ट्र युवा अभियानातर्फे ‘महाराष्ट्र राज्य युवा धोरण जाहीरनामा’ उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. १९८७ हे वर्ष जागतिक युवा वर्ष म्हणून घोषित केले गेले. त्यानंतर १९८८ साली भारत देशाचे पहिले युवा धोरण जाहीर करण्यात आले. त्यात अजून भर घालून २००३ साली केंद्र शासनाने दुसरे युवा धोरण जाहीर केले आणि त्यात दर ५ वर्षांनी धोरणाच्या अंमलबजावणीसंदर्भातील अवलोकन सामाजिक संस्थांनी तसेच शासनाने करावे असे सुचविले. या धोरणास आता ५ वर्षे पूर्ण झालेली असून याची महाराष्ट्र राज्य पातळीवर किती प्रमाणात अंमलबजावणी झाली, याचे अवलोकन महाराष्ट्रातील सामाजिक संघटना, संस्था, अभ्यासक सहकार्याने करण्याचेदेखील नवमहाराष्ट्र युवा अभियानाने या उपक्रमांतर्गत ठरविले आहे.

http://navmaharashtra.blog.co.in