<<<<तुम्ही मच्छर मारण्याकरिता काय करता ?>>>>

गाभा: 

प्रेरणा:गुळा॑बाचा मोहरलेला गोड लेख...http://misalpav.com/node/8165

तुम्ही मच्छर मारण्याकरिता काय करता ?

मच्छर हा जगातील वजनाने व अस्त्तित्वाने अतिशय तुच्छ किटक आहे,पण हाच तुच्छ किटक चावला की ऊच्च किटक होतो.मलेरिया ऊत्प्रेरक,साखरझोपहर्ता,हु॑हु॑भुणभुण़कर्ता,डास महाराज की जय..

(पुढिल सर्व कल्पना पुर्णत: डार्सनीक)

१) मच्छर मारण्याच्या अगरबत्त्या घेतो(पेटवायला खायला नव्हे).विशेषत कासव छाप अगरबत्ती
२) सकाळचा मराठी पेपरचा रोल करुन भि॑तीवर मच्छर मारतो.न मेल्यास स्वताच भि॑तीवर डोके आपटतो.
३) बायको-पो॑रा॑सकट मच्छरदाणीत झोपतो.
४) अ॑गभर ओडोमॉस लोशन चोळतो.
५)सर्व खिड॑क्या॑ना जाळी लावली आहे व ती नेहमी कि॑वा स॑ध्यासमयी ब॑द ठेवतो.
६) टाळ्या वाजवितो.(एक मच्छर आदमीको .......)
७) "एक मच्छर माझ काय बिघडवणार आहे" म्हणुन सोडुन देतो.
८) आपल्या स॑ध्यासमयीच्या मदिरामातेच्या आराधने दरम्यान आला तर दोन थे॑ब त्यालाही सोडतो म्हणजे तो ही आराधनेत "रम"माण होतो.
९) मच्छर ही आपल्या सारखा जिवीत आत्मा आहे म्हणुन चावा घेऊ देतो.
१०) .....................

इतरही अनेक गोष्टी मी मच्छर मारण्यासाठी करतो. पण त्या जाहिर खान (हारुन आलेल्या) ने च लिहिण्याच्या (सामन्या दरम्यान दुसर काय केल मच्छर मारण्याशिवाय,सारख्या टाळ्या वाजवित होता)लायकीच्या असल्याने टाकली नाहीत

(वरील लेखात कोणीही एकच मच्छर आहे तो कोण ते ज्याने त्याने समजून घ्यावे)

प्रतिक्रिया

मी डास दिसला की पकडुन पेटीत बंद करुन ठेवतो. महिन्यातून एकदा महानगर पालिकेच्या आयुक्ताना पेटी आकर्षक वेष्टनाने सजवुन भेट म्हणून देतो.
अवांतर- प्राणी जीवाना मारु नये.त्याने पाप लागते.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

वेळी मच्छर चावला की काय?

जागी ?

असेल तर रात्रभर झोप नाही.
त्याच वेदनांची प्रसुती दिसते.

>>
आणी वर गाण म्हणायच..
मच्छरके सनम्..तुझे मै॑नै...

सुहास

मि मछ्छराला ओडोमॉस लावतो..मग कासव छाप उदबत्तिचि धुरि देतो..अन मग त्याला मछर राग गावुन झोपवतो...मछ्छर छाप विषय.त्याला मछ्छर छाप प्रतिसाद.. गुं गुं रागात गाणे..असे मच्चर चाप जगणे..

शांत बसा..........मनेका गांधी आल्या वाटते..... प्राणी मात्रांवर दया करा असे त्या म्हणतात असे ऐकले आहे.

उगाच गुन्हा दाखल व्ह्यायचा मच्छर मारल्याचा.

आम्ही कॉम्प चालु ठेवुन व त्यावर मिपा वरील असले कौल उघडुन ठेवतो. डास वाचुन जीव देतात किंवा मरतात.

मी त्यांना शरदिनी ताईंच्या ठराविक कविता वाचायला लावतो आणी अर्थ सांगा असे सांगतो, सकाळपर्यंत बिचारे ब्रेन हॅमरेज ने मरतात.

ब्युटीपार्लर कविता वाचुन तर ईतके मेले की सहा महिने दिसले नाहीत.

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

आमचा पंथ बरेच जण पुढे नेत आहेत हे पाहुन आणंद झाला ...
चालू द्या !!

अवांतर :- ह्यापेक्षाही हिणकस लिहीता आलं असतं ... पण असो ...

मी मच्छरदाणी लावते आणि ती खोचतच नाही. डास गंडतात आणि आत जातात, पण मी बाहेरच रहाते आणि बाहेरून मच्छरदाणी खोचते. डास आत आणि मी बाहेर ... मी बाहेर आणि डास आत!
टार्‍यासारखे अशक्त डास अपुर्‍या अन्नापोटी मरतात आणि उरलेले बॉडी बिल्डर (उदा: धमू, परा यांच्यासारखे) डास व्यक्तीगत मानहानीमुळे जीव देतात. अशा प्रकारे मी मच्छरदाणी लावून डास मारते.

ही चौदा उत्तरांची कहाणी तीना उत्तरी सुफळ संपूर्ण!
(या वरच्या वाक्याचा अर्थ कोणी सांगणार का मला? दोन रुपये बक्षिस देईन).

आम्ही तर ब्वॉ स्वतः डास मारतच नाही. आमच्या कडे एक स्पेश्शल बासरी आहे. ती वाजवतो. सगळे डास आमच्या मागे मागे येतात, मग आम्ही हळूच आमच्या शेजार्‍यांकडे ते डास सोडून येतो. सध्या शेजारचा फ्लॅट रिकामा आहे. येताय का?

बिपिन कार्यकर्ते

त्याहीपेक्षा एक सोप्पी कल्पना आहे माझ्याकडे. ती बासरी वाजवा आणि घरातच बसा. (उगाच घरातून उठायचे कष्ट कशाला घ्या?) सगळे डास तुमच्या घरात आले की मग बासरी तिथेच टाकून तत्परतेने (तेवढेच काय ते कष्ट), घरातून बाहेर जा आणि मग इन्व्हर्स ट्रान्सफॉर्मेशन करून सगळे डास घराबाहेर काढा!

गांधीवादही साधेल आणि रक्तही वाचेल.

मी कासवछापची कॉईल लावतो. मग ती कॉईल हवेत उंच उडवतो. त्याच्यावर एके४७ने गोळ्या झाडतो. मग त्या कॉईलचे बारीक बारीक तुकडे होतील. मग हेअरड्रायरने त्याच्यावर हवेचे झोत सोडत एकएक तुकडा एकाएका डासाच्या दिशेने सोडतो. डास मरतील.

बिपिन कार्यकर्ते

बिका, त्याचं असं होतं की कधी मधी कासवछापची अगरबत्ती आधीच मोडकी असते. अशा वेळी करण्याचा दुसरा उपाय.

साधीच उदबत्ती लावायची, कोणत्याही देवाची फ्रेम/मूर्ती जे काय शक्य असेल ते आपल्या "टार्गेट" खोलीत आणून ठेवायचं आणि त्यासमोरच उदबत्ती लावायची. आरती करायची आणि मग डासांना त्या दिवशी एकादशी असल्यासारखं वाटेल. मग धार्मिक डास उपास करतील. पण काही (माझ्यासारखे) डास 'एकादशी आणि दुप्पट खाशी' प्रकारातले असलेच तर अंगाला "ओडोमॉस" चोपडून बसायचं आणि देवाच्या मूर्ती/फ्रेमसमोर तीर्थ म्हणून "हिट"ची बाटली ठेवायची. मग डासांचा "दैवी" पद्धतीने खातमा होईल.

काली कर्मावालीची मूर्ती चालेल का? किंवा डासांच्या शरिरात प्रवेश करून त्यांना बाहेर पळवता येईल का? किंवा त्यांच्या विचारांवर ताबा मिळवून वगैरे करता येईल का?

(मान सतत हलवणारी स्मायली आहे का हो कुणाकडे?)

बिपिननाथ शास्त्री

तुम्ही म्हणता ते ठीक आहे हो, पण निरीश्वरवादी आणि/किंवा कर्मवादी लोकांना हे पटणार नाही. तेव्हा त्यांच्यासाठी वेगळा उपाय हवा. आणखी एक उपाय पहा:

मुद्दामच नवभारत टाईम्स आणायचा, त्यावर काळ्या मार्करने, मोठ्या अक्षरात इंग्लीशमधे 'टाईम्स ऑफ इंडीया' असं लिहायचं आणि त्याची गुंडाळी करायची. आणि मग हे हत्यार डासांवर चालवायचं. भय्ये डास असतील तर ते इंग्लीश पाहून पळतील, मराठी डास असतील तर ते निषेध म्हणून आपल्या घरातून निघून जातील आणि साहेबी डास तसेही आळशी असल्यामुळे चावणारच नाहीत.
मोहीम फत्ते, कसं?

आमच्या कडे एक स्पेश्शल बासरी आहे. ती वाजवतो. सगळे डास आमच्या मागे मागे येतात,

___/\__ कधीकाळी कृष्णाकडे अशी बासरी होती , असं म्हणतात :)

(सर्वसाधारण बासरीवाला ) टार्कृष्ण

बासरी आहे ना? मग झालं तर. स्पेश्शल नसली तरी चालतं.

बिपिन कार्यकर्ते

एकदा कुबड्या खवीस यांच्याकडून ती बासरी मंतरून घे रे टार्‍या, होईल पेश्शल तीच बासरी!

एकदा कुबड्या खवीस यांच्याकडून ती बासरी मंतरून घे रे टार्‍या, होईल पेश्शल तीच बासरी!

=)) =)) =)) =)) येडा खवीस म्हणायचंय का तुला ?

बिका भाव .. समुपदेशन सुरू केलं का ? मला पण पेश्शल बासरी हवीये ... प्रभूबाबा ... ऐक रे माझं म्हणनं ...

नाही नाही. हल्ली सगळ्याचं विडंबन येतं, अगदी फडतूस धाग्यांचंसुद्धा, तर मंत्र म्हणायला असे विडंबित आय.डी. का नको? टार्‍या तू कु.ख. कडूनच तुझी बासरी मंतरून घे.

आणि तुला कोणी पेश्शल बासरी नाही दिली तरी घाबरू नकोस. तू "गोबेल्स नीती" वापर, तुझ्याकडे पेश्शल बासरी आहे असं रोज धागे, प्रतिसाद, खरडी, व्यनी यांच्यातून सांगत रहा, हळूहळू मिपाकरच काय, डाससुद्धा त्यावर विश्वास ठेवतील. डरने का नही मामू, क्या?

आम्ही गांधीवादी असल्याने डास मारीत नाही. आम्ही उपोषण करतो. त्यामुळे डासांचे हृदयपरिवर्तन होऊन डास 'वैष्णव जन तो' हे भजन म्हणू लागतात. (ते फार बारीक आवाजात म्हटल्यामुळे लोकांना ते गुणगुणणे वाटते.) आणि आम्हाला चावत नाहीत.
अर्थात ही गोष्ट डासांना माहिती आहे की नाही याची खात्री नसल्याने मच्छरदाणीही लावतो.

खराटा
(रंग माझा वेगळा)

मच्छरदाणीही लावतो

मग पंच्याचं काय करता?

बिपिन कार्यकर्ते

मग पंच्याचं काय करता?
तुकडे करुन डासांना लंगोटी बनवुन देतो...
बिचारे थंडिने काकड्त असतात ... तेवढिच उब त्यांना ;)

--अवलिया

तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु

तुकडे करुन डासांना लंगोटी बनवुन देतो...
एके-४७ वापरून तुकडे करायचे का कसं? जरा (पंचा नव्हे, उपाय) उलगडून सांगा नीट!

तुमच्याकडे काय काय साधने आहेत ती सांगा !
त्यातील शुचिर्भुत साधनेच वापरता येतील !!

--अवलिया

तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु

आम्ही वेळप्रसंगी नाण्याने टेलिस्कोपचे स्क्रू पिळतो. लॅटरल थिंकिंगची कमतरता नाही. आणि शुर्चीभूत म्हणाल तर सगळ्या वस्तू एकदम चकाचक पुसल्या आहेत, दुकानदाराने, विकत घेतल्या तेव्हा! स्वच्छता आणि पावित्र्य यांच्याशी काही तडजोडच नाही आमच्याकडे. तेव्हा उपाय सांगा ...

हम्म. उत्तम !
असेच असेल तर लंगोटी कधी पाण्याने अस्वच्छ केलीच नसेल तुम्ही.
त्यामुळे हातात धरुन अलगद टोके ओढलीत तरी काम होईल.
न जमल्यास शेळिच्या दुधात दोन दिवस भिजवुन ठेवा, हवे तसे तुकडे करता येतील.

--अवलिया

तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु

तुमच्याकडे काय काय साधने आहेत ती सांगा !
त्यातील शुचिर्भुत साधनेच वापरता येतील !!

--अवलिया

तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु

--
प्रत्येक हिंदूद्वेष्टा हा विचारवंत नसतो पण प्रत्येक विचारवंत हा हिंदूद्वेष्टा असतो.. >>>>

_/\_

भेंडी नान्या , कुठे मेलास रे !!! आय मिन गेलास रे !!!!! साल्या कशात काय नसताना हा( माझा , नवीन होतो तेव्हा ;) ) धागा उजवलास रे !!!!!!

असे केले तर डास आपोआप मरतील. बाकीचे उपाय नकोतच. एकदम ऑर्गॅनिक उपाय, आय मीन कुठलेही केमिकल वगैरे न वापरता.

बिपिन कार्यकर्ते

बिका, आत्महत्या हे पाप आहे. डास असले तरीही काय झालं, असे अघोरी उपाय नका करू प्लीज.

त्यापेक्षा डासांमधे भांडणं लावून दिली तर, धोतर बरं का हाफचड्डी यावरुन तर?

सासरचं धोतर अधिक प्रभावशाली असेल. हाफचड्डीला माझा व्यक्तिश: विरोध आहे, पळून जाण्यासाठी सोपं पडेल.

बिपिन कार्यकर्ते

>>हाफचड्डीला माझा व्यक्तिश: विरोध आहे
विकासभौ वाचताय ना?

खराटा
(रंग माझा वेगळा)

संपादकांच्या लक्षात आणून देण्यासाठी धाग्यावर प्रतिसाद देण्याऐवजी खरड, व्यनी असे मार्ग वापरले तर बरे असं माझं व्यक्तीगत मत आहे! (ह.च घ्या हो खराटाकाका)

माझ्यामते डासांना लुंगी द्यावी आणि मग त्यांची भगवा झेंडा आणि वाघाचं चित्रं दाखवून पुंगी वाजवून टाकावी.

आता ही पुंगी कुठून आली? मगाशी बासरी म्हणत होतीस.

बिपिन कार्यकर्ते

विकास संपादक आहेत हे माहिती नव्हते. मी आपलं खाकी हाफ चड्डी समजून लिहिलं.
(साक्षात संपादकांशी पंगा? जाशील कुठं खराट्या?)

खराटा
(रंग माझा वेगळा)

अहो खराटा असणार कुठे असून असून? तिथे डासांचंच साम्राज्य असतं! जरा सांभाळून रहा हो ... पण तुम्ही खराट्याचाच वापर डासांवर करु शकता.
तसंही हाप-चड्डी घातल्यावर डास जास्तच त्रास देतात. विकासरावांना माहित असेलच म्हणा!

>>>साक्षात संपादकांशी पंगा? जाशील कुठं खराट्या?

अहो काळजी करू नका... एकतर मी काही झाले तरी कम्युनिस्ट नाही तेंव्हा सेन्सॉरशिप करत नाही :D दुसरा भाग म्हणजे जर माझ्यावर काही टिका असेल अथवा माझ्याशी वाद चालला असेल तर मी तेथे माझा संपदकाचा अदृश्य अंगरखा बाजूस ठेवून देतो (कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट) आणि इतर संपादकांना पण त्या वर काही करायला सांगत नाही. तात्पर्य बिनधास्त चालूं देत...

>>मी आपलं खाकी हाफ चड्डी समजून लिहिलं.

आणि हो मी फक्त शाळेतच खाकी हाफ चड्डी घातली होती आणि पांढरा शर्टसुद्धा (शनिवारचा एनसीसीचा दिवस सोडल्यास) :-)

लुंगी उचलल्याशिवाय पुंगी कशी वाजवणार?
(उठाव लुंगी बजाव पुंगी)
खराटा
(रंग माझा वेगळा)

कृपया अवांतर लिहू नका. इथे मच्छर मारण्यासंबंधाने काही गंभीर चर्चा चालू आहे. काही उपाय सुचवा. चड्डी / लुंगी / पुंगी साठी दुसरा धागा काढावा.

बिपिन कार्यकर्ते

>>इथे मच्छर मारण्यासंबंधाने काही गंभीर चर्चा चालू आहे

बरं बरं.
एक मच्छर मिसळपावपर ४० प्रतिक्रिया लाता है.
(और खराटेको टवाळखोर बनाता है)

खराटा
(रंग माझा वेगळा)

सहमत आहे. डासांचा प्रश्न अतिशय ज्वलंत आणि सर्वांच्याच जिव्हाळ्याचा आहे. तेव्हा कृपया अवांतर चर्चांसाठी खफ किंवा खव वापरा!

मिसळपावच्या मुक्त वातावरनाचा मिपाच्या जुन्याच जाणकार लोकांनी घेलेला गैरफायदा पाहून आज मला शरम वाटते .

असो , मिपा आपलंच आहे .. जोवर चालेल तोवर चालवेल .. नाय तर पडेल बंद.. मग बसा गोट्या खेळत ...

(शरमप्रेमी) टारोबा टेचर

एक मुंगी नेसली लुंगी.........

:B :B :B बाकरवडी :B :B :B

मी डासांच्या हाफचड्डीबद्दल म्हणतोय, विकासभौंच्या नव्हे.

बिपिन कार्यकर्ते

त्यापेक्षा डासांमधे भांडणं लावून दिली तर,

डासांना "मराठी धर्मात" सामावुन घ्या! मग भांडणं लावण्याची गरजच नाही! >:)

हे सगळं वाचुन फिस्सकन हसु आलं... :D :D

दिपाली :)

दिपाली ताई, तुम्ही या प्रकारानेही डास मारू शकता. म्हणजे डासाच्या समोर जाऊन अशाच फिस्स करून हसा, म्हणजे डास एकतर वार्‍यामुळे उडून जाईल. आणि जेव्हा स्थिरस्थावर होईल तेव्हा त्याला त्याच्या अपमानाची जाणीव होईल त्यामुळे तो पुन्हा तुमच्या वाट्याला जाणार नाही.

नशीब (डासाचं )इकडे डास नाहीये... नाहीतर तसाच मेला असता बहुतेक :)

दिपाली :)

रोज रात्री गाणे गा,,, सिनेमात कसे 'गुल' झालेले दाखवतात तसे डास गुल होतील,,, (त्यानंतर स्वत: 'गुल' व्हा :> )

नेहा

आत्ताच घडलेल्या घटनेमूळे एक नवीन उपाय सापडला आहे.हे सर्व वाचत असताना लक्षात आलं की एक डास टंकफलकाच्या शेजारी बसून सर्व वाचत आहे. आता याचं काय करावं असा विचार आमच्यामनात आला आणि तेवढ्यात तो भेलकांड्या खात खात कसाबसा ऊडाला हवेत वेडावाकडा झोकांड्या खात प्रयत्नपूर्वक घराबाहेर ऊडून गेला.

ज्यांना डासांचा त्रास होत असेल त्यांनी या विषयावरचे सर्व मतप्रदर्शन छापून भिंतीवर लावावे. आळशी लोकांना मारत बसयला सूद्धा डास शिल्लक रहाणार नाही.

एच.बी.

मच्छर हा जगातील वजनाने व अस्त्तित्वाने अतिशय तुच्छ किटक आहे,पण हाच तुच्छ किटक चावला की ऊच्च किटक होतो.मलेरिया ऊत्प्रेरक,साखरझोपहर्ता,हु॑हु॑भुणभुण़कर्ता,डास महाराज की जय..

ही वाक्य मस्त रे! :)

तात्या.

मी गांधीवाद मानत नसल्याने रोज रात्री झोपताना किटकनाशकाचं इंजेक्शन टोचून घेऊन झोपतो. डास चावला की खल्लास!!!

आम्ही येथे पडीक असतो!

अतिशय माहितीपुर्ण धागा. मान्यवरांची चर्चा पाहुन डोळे पाणावले.

आम्हि टेनिस खेळ्तो.त्यामुळे रोज सकाळी डासांना सोबत म्हणुन फ़ुलदाणि,बल्ब, काचांचे टुकडे पण असतात कचरापेटित.आम्चाहि थोडा व्यायाम होतो.अंगाला आलेल्या घामाच्या वासाने डासहि जवळ फ़िर्कत नहित!

सुखि संसाराची सोपी वाटचाल!

Smiley मेलोss मेलोssss काय हे??? Smiley