(आय विश)

आमची प्रेरणा सुवर्णमयीताईंची 'आय विश' ही कविता! smiley

मराठी जालावर मोजक्या वर्षांचे नवकाव्य
मागे मी वाचत वाचत.
पद्यविभागात दिसणार्‍या नवकविता पाहून 'कर्म, कर्म' म्हणत होतो मी.
वाचकांना वाचवण्याकरता
दिल्या ढुशा मी त्या नवकवितांना ..कित्येकदा

त्याने उंचावर दिसणार्‍या गोमट्या कविता बघितल्या..चढला वरती
एक कल्पना घेऊन म्हणाला, "आय विश, आय विश मर्ढेकर, आरती प्रभू , ग्रेस, धामणस्कर'

डोक्यात आणखी एक कल्पना घेऊन
गुळगुळीत कागदावर सुसाट पुढे लिहीत गेला.. मी वाचेस्तोवर
एका वाचकावर नवकविता ठेवून ..गेला पुढे .
मी धास्तावलो.. विचारले त्याला..

तो मागे फिरला, वाटेत अनेक अर्धमेले वाचक होते.. कधीचेच..
प्रत्येक वाचकाजवळ जात
आय विश आय विश असे फुटफुटला

मला म्हणाला, 'आता सगळे वाचक उठून वाचू लागतील,
रिडल पझल सुटलं म्हणतील'
'आय विश'

चतुरंग

प्रतिक्रिया

काय पण नवकविता आहे. झिट यायचीच बाकी राहीली आहे.
प्र. के. अत्रे आठवले.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

smileysmiley

-Nile

हेच म्हणतो.
धो धो आणि खो खो ...

हुच्च!!

+३

वाचकांना वाचवण्याकरता
दिल्या ढुशा मी त्या नवकवितांना ..कित्येकदा

smileysmileysmiley


मस्त कलंदर..

नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

हाणतिच्यामायला smiley

जबरा !

थोडेसं नवीन !

आय विश, आय विश मर्ढेकर, आरती प्रभू , ग्रेस, धामणस्कर'smiley
वा॓! चालू द्या.

हा हा हा !!!
रंगाशेट आय विश smiley
(तुम्हाला कळले असेलच मला काय म्हणायचे ते smiley )

--अवलिया

तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु

--
प्रत्येक हिंदूद्वेष्टा हा विचारवंत नसतो पण प्रत्येक विचारवंत हा हिंदूद्वेष्टा असतो..

अपेक्षाभंग झाला नाही smiley
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

>>>अपेक्षाभंग झाला नाही

खरे आहे! smiley

त्याने उंचावर दिसणार्‍या गोमट्या कविता बघितल्या..चढला वरती
एक कल्पना घेऊन म्हणाला, "आय विश, आय विश मर्ढेकर, आरती प्रभू , ग्रेस, धामणस्कर' .. हे फार आवडलं, आणि

आय विश आय विश असे फुटफुटला - हि ओळ तशीच ठेवली हे ही फार आवडलं.

लैच भारी विडंबन...

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

जबरा..! smiley

-- या आमच्या शिळोप्याच्या ओसरीवर.. बसा घटकाभर..!