नाती गोती-२

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
30 May 2009 - 5:08 pm

Never underestimate spirited women ह्या उक्तीवर माझा संपुर्ण विश्वास आहे.
दोन दिवसांनी आई आपल्या मुलीला घेउन घरी आली. ह्यावेळी कधी नव्हे ती बायको पण उपस्थित राहीली.
मुलगी आईला उजवी ठरेल दिसायला अशी होती.
'"तुला सी.ई.टी त किती मार्क मिळतील असे वाटते " मी विचारले
" साधारण १६५ पर्यंत पडतील." मुलगी
"तु ओपन मधे बसतेस का?"मी
"हो" मुलगी
"मग मुंबई मधे मीळणे जरा कठीणच आहे. प्रायवेट सी.ई.टी चे काय? त्यात काय वाटते? तिथे तरी १७०+ मिळतील का?
" हो, सर. ह्या वेळेला स्टेट सी.ई.टी मधे फीजीक्स चा पेपर जरा कठीण होता. पण प्रायवेट मधे मिळतील्."-मुलगी
"किंवा दुसरा एक उपाय आहे. एक वर्ष आणखी अभ्यास कर आणि पुन्हा सी.ई.टी. दे"- मी
" नको, नको, काय आहे ते ह्याच वर्षी. परत विषाची परिक्षा नको-हिरॉइन मधेच म्हणाली.
" अहो, खुप जण देतात" मी
" ११ वीत झाल ते खुप झाले आता पुन्ना नको." आई
"चुकले मी माय, आता परत होणार नाही"
I have had my share of downfall and distractions sir. But I have learnt my lesson. Now I am focussed.- मुलगी अस्खलित इंग्रजी मधे.
मी काय समजायचे ते समजलो.
ऍडमीशन च्या इतर कटकटी समजवल्यानंतर आईने मुलीला घरी पाठवले.
मुलगी गेल्यानंतर आई म्हणाली,
" तसे मुलीला सर्व माहीत आहे तरी सुद्धा तुम्हाला जड पडले असते तीच्या समोर म्ह्णुन पाटवली परत"
काहीतरी गड्बड आहे सुरुवाती पासुन अंदाज होता, पण नेमके काय ते कळत नव्हते.
सर, माझी आई देवदासी. सोलापुर कर्नाटकाच्या बार्डर वर रहातो आम्ही. आईने सुरुवातीपासुन मला ह्या पेशापासुन दुर ठेवायचे ठरिवले होते. आमच्या गावच्या जमिंदाराची मुंबईत पण मोठी प्रापर्टी. वयाच्या १२ व्या वर्षी मुंबईला आले. जमिंदाराच्या घरी राहात होते. सुरुवातीची ६ वर्ष चांगली गेली. जमिंदाराचा मुलगा शिकायला मुंबईत आला आणि माझी परवड सुरु झाली. तो पण दिसायला सुंदर. विस्तव आणि लोणी कधी झाले ते कळलेच नाही. राहीले पोटुशी. जमिंदाराने पोट पाडायला पैशे दिले. मी नाय घेतले. खुप त्रास दीला. पण मी माझा पण नाय सोडला. बिदर ला आजाकडे जाउन पोरीला जनम दिला. ५ वर्ष संभाळले. नंतर जमिंदाराचा निरोप आला. त्याच्या पोराचे लग्न झाले होते. पण पोर होत नव्हती. माझ्या पोरीला दत्तक घेणार म्हणाले. मी म्हटले, काय का असेना आपल्याच बापाकडे जाते आहे ना. असुंदे. दीली पदरात त्याच्या बायकोच्या. म्हटले तीला, आक्का, पोट्च्या पोरी परमाणे सांभाळ.
तीने पण कधी अंतर दीले नाही पोरीला. ती आई, आणि मी माई. माझ्या आईला येड्स झाला, झुरुन झुरुन गेली. मरताना वचन घेतले पोरीला डॉक्टर करायचे.
सर, मला पैशाची आस असती तर आजपण कीतीपण मिळवु शकते. पोरीच्या बापाकडे सुद्धा कदीपण हात पसरला नाही. जे काय ते पोरीला दे.धुणीभांडी करुन दिस काढल. पण वाकडी वाट धरली नाय. सगळीकडे नजरने कापड फेडणारे दु:शासन बघितले.
२० लाख तर २० लाख, देईल तीचा बा.
भीती वाटते पोरीची.
११ वीत तर लाईन लागायची बिल्डींग खाली लांड्ग्याची.
लक्ष दिले असते तर आज ही पाळी आली नसती.
ह्या दुनियेत चागले दिसणे म्हणजे पाप बघा.
तरी मी त्या दोघाना मी सांगत होते लक्ष ठेवा म्हुन.
आता मोजा म्हनाव पैसे.
लिवुन घेतले होते मी आदीच, पोर देताना.
पोर दिल्यावर दुसरा संसार मांडला. नायतर लचकेच निघाले असते आंगाचे ह्या दुनियेत. आताच्या मालकाला सर्व माहीत आहे. तो पण कष्टाचा माणुस. फुकटचे नको म्हणतो. एकदाची का पोर कालेज मधे दाखल झाली की तीची दुनियाच वेगळी होइल. बस माझे वचन पुरे झाले.
बायकोने ओटी भरुन पाठवले त्या माईला.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

रेवती's picture

30 May 2009 - 5:19 pm | रेवती

कहाणी वाचली.
खर्‍या आईची जिद्द दिसते मुलीला डॉक्टर बनवण्याची.
जमिनदार पैसे खर्च करणार आहे हे काय कमी आहे?

रेवती

बिपिन कार्यकर्ते's picture

30 May 2009 - 5:22 pm | बिपिन कार्यकर्ते

बरेच जण म्हणतात, मास्तराला काय सरळ नीट लोक भेटतच नाहीत का? मला वाटतं की, भेटत असतीलच पण हे असले वेडे फकिर लोकच चर्चेचा / लेखाचा विषय होऊ शकतात.

या बाईबद्दल एवढेच म्हणावे... हॅट्स ऑफ. जर का एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला तर सगळं काही शक्य होतं हे परत एकदा अधोरेखित केले या बाईंनी. मोठेपण कसे कधी कुठे उदयास येईल, काही भरवसा नाही.

त्या बाईंना माझ्याकडून अभिनंदन आणि शुभेच्छा सांगा.

बिपिन कार्यकर्ते

श्रावण मोडक's picture

30 May 2009 - 5:38 pm | श्रावण मोडक

ह्म... अच्छा.

चतुरंग's picture

30 May 2009 - 5:40 pm | चतुरंग

चिखलातून बाहेर पडायची जिद्द असली की त्याचं कमळ होतंच! (ही असली जिद्द बायकांमध्ये प्रामुख्याने दिसते असं माझं मत आहे).
ती सुकन्या डॉकटर होणार तिला शुभेच्छा आणि तिच्या माऊलीला माझा नमस्कार सांगा.
(मला किशोर शांताबाई काळेंची आठवण झाली)

चतुरंग

क्रान्ति's picture

30 May 2009 - 5:53 pm | क्रान्ति

त्या मातेला! तिला आणि लेकीला आभाळ भरून शुभेच्छा!
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा

अवलिया's picture

30 May 2009 - 5:54 pm | अवलिया

हम्म.

--अवलिया

अनंता's picture

30 May 2009 - 6:56 pm | अनंता

____/|\____

प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)

मीनल's picture

30 May 2009 - 7:39 pm | मीनल

सहमत.
मीनल.

पोलिसकाका_जयहिन्द's picture

30 May 2009 - 7:39 pm | पोलिसकाका_जयहिन्द

मास्तर, तुमचे लेखन खुप छान असते.

"Why to worry and have wrinkles when you can smile and have dimples."

My blog .... just to spread smiles...
http://ulta-pulta-jokes.blogspot.com/

वेताळ's picture

30 May 2009 - 7:46 pm | वेताळ

कधी कधी असत अस..चमत्कार होतात कधी कधी.
चांगली कर्म केली तर शेवट देखिल चांगला होतो ह्यावर अजुन आपला विश्वास आहे.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

सहज's picture

31 May 2009 - 6:57 am | सहज

अगदी मालीका निघू शकेल कुठल्याही वाहीनीवर अशीच कथा आहे.

मुलीने डॉक्टर होउन, खर्‍या आईला आयुष्यात सुख द्यावे हे आवर्जून समजवा त्या मुलीला.