नाती गोती-१

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
30 May 2009 - 8:30 am

परत चालेलेल्या लाटेवर पायाखालची वाळु सरकतानाचा अनुभव घेताना अचानक अवलियाने प्रश्न विचारला,
"मास्तर, सर्वात आवडते पुस्तक कोणते?"
"अर्थात महाभारत"- मी
"का"?- अवलिया
मी विचारात पडलो आता उत्तर काय द्यावे.
"नंतर सांगा विचार करुन" अवलिया
कारने घाटकोपर ओलांडल्यावर परत तोच प्रश्न.
"मानवी मनाची आणि नात्यागोत्याची गुंतागुंत इतर कुठेही सापडणार नाही"- मी
"तुम्हाला पटते का बघा, आपण सर्व जण आपल्या आयुष्यात महाभारताचा कुठला ना कुठला अंश जगतोच्-अवलिया
_______________________________________________________
हातातली मिठाईची पेटी बायकोच्या हातात दिली. माझा एक विद्यार्थी संपुर्ण भारतात १० वी त १ ला आला होता त्या निमित्ताने. गेले ३ वर्षे हा नित्यक्रम आहे. आमच्या घरात मिठाईचे कौतुक नाही. ही पेटी आपोआप भावाकडे जाणार होती. आता आदराने आणलेली ही पेटी नाकारायची कशी हे मला कळत नाही. आता पेटीमागची यशाची गाथा चिरंजीवाना सांगणे क्रमप्राप्त होते. ह्या विद्यार्थ्याच्या सायन्स च्या पेपरला त्याच्या आईचे निधन झाले होते. तरी सुद्धा आईला दिलेला शब्द मुलाने संपुर्ण पाळला. कुठल्याही परिस्थितीत आपले ध्येय सोडायचे नाही ह्या वृत्तीचे आणखी एक उदाहरण .
"पेटीवरुन आठवले, हीरोईन भेटायला येणार आहे तुम्हाला"बायको
आता ही हिरॉईन कोण ते मला आठवेना.
अहो असे काय करताय, दोन वर्षापुर्वी ती मोलकरीण भेटायला आलेली आठवते का? राजकपुरला भेटली असती तर 'राम तेरी गंगा 'मधे 'संडासिनी' सोडुन हीलाच घेतली असती असे तुम्ही म्हणाला होतात"-बायको
"हां, हां, आले लक्षात. बोलव उद्या रात्री आठनंतर."
________________________________________________________

दोन वर्षापुर्वीचा प्रसंग आठवला.
"सर पोरीला डॉक्टर करायचे आहे. दहावीला ९०% पाडेल. तुमची फार मदत झाली तीला. आता १२ वीला शीटी परिक्षेत ९५% कसे पाडायचे ते सांगा. डॉक्टर करायचे यश्टीमेट पण सांगा" हीरॉईन
इथे बायको अवाक.
कुठलाही फाफटपसारा न करता एकदम मुद्याचे बोलणे शिकले सवरलेले पालक पण करत नाहीत.
"जात कुठली तुझी" - मी
बामण समजा -हीरॉइन
आता समजा म्हणजे काय ते मला कळेना. कॅटेगरी आहे हे मला कळत होते. आता एन्.टी ३ असेल तर १५०+ मार्क मिळाले तरी सुद्धा ऍडमीशन आरामात मिळणार होती मुंबईमधे. बामणाना १८५+ लागतात. मी माहीती दिली.
"नाही मला जातीच्या कागदावर ऍड्मीशन नको मला, ती तुम्ही सांगाल ते मार्क काढेल. आता खर्च सांगा"-हिरॉइन
शासकीय कॉलेज मधे मिळाली तर साधारण दोन ते तीन लाख डीग्री मिळे पर्यंत. प्रायवेट कॉलेजमधे साधारण २० लाख.- मी
"ठीक आहे" हिरॉईन
आता हैराण व्हायची पाळी माझी होती.
"कुठून आणणार आहेस तु २० लाख प्रायवेट कॉलेजकरता"
"सागेन तीच्या 'बा' ला. तु काय पण कर पण पोरगी डॉक्टर झाली पायजे. दरोडा घाल, मर्डर कर, मला माहीत नाय. तीला काहीही कमी पडल नाय पायजे".-हिरॉइन
तु एक काम कर तु तुझ्या मुलीला घेउन ये. मी तीला नीट अभ्यासाचे कसे करायचे ते सांगतो- मी
"उद्याच आणते सर" हिरॉईन
नंतर ती काही आली नाही. मी पण विसरुन गेलो. आता दोन वर्षानंतर काय विचारणार होती कुणास ठाउक.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

रेवती's picture

30 May 2009 - 8:36 am | रेवती

पुढचा भाग लगेच लिहावा अशी विनंती.

रेवती

मुक्तसुनीत's picture

30 May 2009 - 8:47 am | मुक्तसुनीत

कुणासाठी, कुणासाठी, कशासाठी, कुठवर
रेटायचा ऐसा गाडा इमानाने जन्मभर?

क्रान्ति's picture

30 May 2009 - 9:08 am | क्रान्ति

काय झालं, उत्कण्ठा वाढतेय!
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा

सहज's picture

30 May 2009 - 9:17 am | सहज

लवकर येउ दे पुढचा भाग!

श्रावण मोडक's picture

30 May 2009 - 11:15 am | श्रावण मोडक

पुढचा भाग? अंदाज बांधत बसत नाही.
अवांतर : इलाही जमादारांच्या ओळी अंदाज शब्दावरून सहजच डोक्यात आल्या - "अंदाज आरशाचा वाटे खरा असावा, बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा".

विसोबा खेचर's picture

30 May 2009 - 11:21 am | विसोबा खेचर

मास्तुरे,

येऊ द्या अजून..

तात्या.

जागु's picture

30 May 2009 - 11:32 am | जागु

पुढचा भाग लवकर टाका.

बिपिन कार्यकर्ते's picture

30 May 2009 - 11:46 am | बिपिन कार्यकर्ते

मास्तर, नानाच्या निरीक्षणाशी (आयुष्य, महाभारत) सहमत. पुढे काय झालं लिहा लवकर... :(

बिपिन कार्यकर्ते

ब्रिटिश's picture

30 May 2009 - 12:15 pm | ब्रिटिश

क्रीप्टीक इसारला का पार?

मिथुन काशिनाथ भोईर

अनंता's picture

30 May 2009 - 12:46 pm | अनंता

बघा ...ब्रिटिश सरकार, आता हाच प्रश्न मी विचारला असता तर ,मास्तरांनी छडीचा प्रसाद दिला असता!

प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)

दशानन's picture

30 May 2009 - 12:23 pm | दशानन

छान, पुढील भागाच्या प्रतिक्षेत :)

थोडेसं नवीन !

परिकथेतील राजकुमार's picture

30 May 2009 - 12:32 pm | परिकथेतील राजकुमार

गुर्जी वाचतोय...

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

लिखाळ's picture

30 May 2009 - 1:27 pm | लिखाळ

छान .. पुढे वाचण्यास उत्सुक.

-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

निखिल देशपांडे's picture

30 May 2009 - 1:51 pm | निखिल देशपांडे

गुर्जी लवकर येवु द्या पुढचा भाग....

==निखिल

मीनल's picture

30 May 2009 - 6:43 pm | मीनल

+1
मीनल.

टारझन's picture

30 May 2009 - 11:26 pm | टारझन

गुर्जी ... जर एवढ्याच लांबीचं लिवणार असाल तर दर आठ तासाला एक एपिसोड येउन द्या !!

अवांतर : ह्या मास्तरने सब्जेक्टिव्ह प्रश्नपत्रिका कधी सोडवली नसेल आयुष्यात ... केवढं तोकडं लिवतो ? स्टॅमिना ?

(गद्यकुमार) नालायक टारप्रभू