संसदेच्या शाळेत...

संसदेच्या शाळेत...

मतदारसंघानी 'भूगोल' बदलला
नेत्यांनी 'इतिहासा'ला वापरले
नको ती 'भाषा' सर्वानी वापरली
कुणी कुणी' भाषे'ला वापरले

तीन पायांची शर्यत, जोडाफेक
कोलांट्यांसारखे 'खेळ' झाले
निवडणूकीच्या तमाशामध्ये
'नागरीकशास्त्रा'चे हसे झाले

संसदेच्या शाळेत कुणालाच
'नीतीशिक्षणा'ची नाही ओढ
यानंतर फक्त गणिताचा वर्ग
बेरजा, वजाबाक्या, आकडेमोड...

-अविनाश ओगले

लेखनविषय:: 
Taxonomy upgrade extras: 

प्रतिक्रिया

ओगलेभाऊंची लौकिकाला साजेशी कविता. छान जमली आहे.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

"फाटके होते खिसे अन नोटही नव्हती खरी
पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची " -अरुण म्हात्रे

अगदी वेळीच आली. शेवटच्या चार ओळी खास. ओगले खासीयत म्हणूया त्याला आता!!!

सद्य परिस्थितीला अत्यंत समर्पक, व चपखल बसणारी कविता.
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

"अनामिका"
"सेक्युलर "असणे म्हणजे जर 'हिंदू' वा इथल्या भल्याबुर्या इतिहासाची लाज वाटणे असेल तर मी 'सेक्युलर' असण्याची मला लाज वाटेल, 'हिंदू' असण्याची नव्हे."

हेच म्हणतो!

आवडली! smiley

आवडली smiley

नाहि आवडली

ऋषिकेश
------------------
प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? smiley

ऋषिकेश
------------------
माझे मिपावरील लेखन इथे वाचा

एकदम मस्त कविता आहे. शेवटचे कडवे वाचताना अटलजींच्या "कौरव कौन, कौन पांडव" कवितेतील,

दोनोँ ओर शकुनि का फैला कूटजाल है |
धर्मराज ने छोड़ी नहीं जुए की लत है |
हर पंचायत में पांचाली अपमानित है |
बिना कृष्ण के आज महाभारत होना है,
कोई राजा बने, रंक को तो रोना है |

या ओळी आठवल्या...

संसदेच्या शाळेत... ऐवजी संसदेच्या नौटंकीत... असे नाव द्यावे का?

वा ! मस्त !!

--अवलिया

--
प्रत्येक हिंदूद्वेष्टा हा विचारवंत नसतो पण प्रत्येक विचारवंत हा हिंदूद्वेष्टा असतो..

एकंदर शिक्षण व मुल्यांबद्दल भाष्य करणारी!

मस्त कविता... smiley

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

सध्याच्या परिस्थितीला समर्पक. smiley
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

Prof.(Er.)Suresh Khedkar
भल्या भल्यान्चा क्लास घेणारी अभ्यासू कविता. अभिन्दन.

Prof.(Er.)Suresh Khedkar