व्हेज चीज ऑम्लेट

सायली पानसे's picture
सायली पानसे in पाककृती
14 May 2009 - 10:11 am

साहित्य: ( २-३ जणांसाठी )
२-३ अंडी
१ मोठा चमचा बटर
कांदा - १ ( छोटा )
टोमॅटो - १ लहान
सिमला मिर्ची - १/४ ( यात जर पिवळी आणी लाल सिमला मिर्ची असेल तर ति सुध्दा छान लागते)
कोथिंबिर किंवा पार्स्ले - १ चमचा
लसूण -३-४ पाकळ्या ठेचुन घ्या.
हिरव्या मिर्च्या -३-४
लाईट सोया सॉस- १/२ छोटा चमचा
टोमॅटो सॉस- १ चमचा
चिलि सॉस - १/२ चमचा ( हे नसले तरी चालेल )
काळि मिरि पावडर ( ब्लॅक पेपर )
मोझ्झारेल्ला चीज किंवा अमुल चिज . ३ चमचे किसुन .
मीठ चवी नुसार

एक टिप : खास शाकाहारी लोकांसाठी.
यात अंड्यांएवजी तुम्ही डोसा वापरु शकता...किंवा पोळी ल बटर लावुन तव्या वर भाजुन घ्या आणि त्यात वरिल सारण आणि चीज भरुन रोल करुन तव्यावर लालसर करुन घ्या खायला छान लागेल..

( आता पाकृ चे नाव सार्थकी लागेल.)

कॄती:
सर्व भाज्या बारिक चिरुन घेणे.

सर्व प्रथम एका जाड बेस च्या नॉनस्टिक पॅन मधे बटर घालुन त्यात ठेचलेला लसुण आणि हिरव्या मिर्च्या घालुन परतुन घ्या. त्यात कांदा घालुन परतुन घ्या.
आता यात टोमॅटो सिमला मिर्चि घालुन परता... यात आता सोया सॉस , चिलि सॉस आणि टोमॅटो सॉस घालुन नीत परता... मिठ मिरपूड आणि बरिक चिरलेलि कोथिंबिर किंवा पार्स्ले घालुन परता.

From mexican omlet" />

आता हे मिश्रण बाजुला काढुन ठेवा.

पॅन साफ करुन घ्या
पुन्हा त्यात बटर घालुन सर्व पॅन मधे पसरुन घ्या.

अंडी फेटुन घ्या आणि त्यात चविप्रमाणे मीठ घालुन घ्या.

पॅन मधे बटर वर फेटलेली अंडी पसरा.

From mexican omlet" />

१ मिनिट थांबुन त्यावर वर तयार केलेला मसाला पसरुन घ्या.
त्यावर किसलेले चिज घालुन गॅस मंद करुन झाकण लावुन शि़जुद्या आणि साईड ने थोडसा बटर सोडा.

From mexican omlet" />

१-२ मिनिटाने झाकण काढुन घ्या. वरिल बाजु शिजलि कि अलगद हाताने ऑम्लेट अर्धे दुमडा.

From mexican omlet" />

आता प्लेट मधे काढुन पिझ्झा कटर ने त्याचे हवे तसे तु़कडे करुन ब्रेड टोस्ट बरोबर खा.

From mexican omlet" />

प्रतिक्रिया

अनंता's picture

14 May 2009 - 10:15 am | अनंता

सायलीताई, आज गुरुवार आहे.
त्यामुळे केवळ प्रतिसाद ;)

सायली पानसे's picture

14 May 2009 - 10:18 am | सायली पानसे

धन्यवाद!

पिवळा डांबिस's picture

14 May 2009 - 10:21 am | पिवळा डांबिस

डिश दिसायला छान दिसते आहे. पण यात 'मेक्सिकन' काय आहे?
मला वाटतं की मेक्सिकन आम्लेटमध्ये साल्सा असतो...
चूभूद्याघ्या

सायली पानसे's picture

14 May 2009 - 10:26 am | सायली पानसे

मलाही नक्कि माहित नाही.. पण जेंव्हा हे करायला शिकले तेव्हा हेच नाव सांगितला होत म्हणुन तेच दिल.
कदाचित हा पण एक प्रकार असु श़केल ... चुभुद्याघ्या....
पण खायला मस्त लागते अस ज्यांना करुन घातले आहे ते म्हणतात..

(शुध्द शाकाहारी )सायली.

पिवळा डांबिस's picture

14 May 2009 - 10:39 am | पिवळा डांबिस

खायला मस्त लागत असेल यात मला शंका नाही.
आणि तसं कोणतं आम्लेट खायला बेकार लागतं? :)
पण तुमच्या रेसेपीतील सोया आनि चिली सॉस वगळला तर ही रेसेपी बिल्कुल ज्युलिया चाईल्डच्या आमलेटाच्या रेसेपीसारखी आहे.
मग त्यात हे जर दोन सॉस टाकले तर फारतर ते चिनी आम्लेट होऊ शकेल नाही का?:)
इथे मेक्सिकोला जवळ असणार्‍या दक्षिण कॅलिफोर्नियामधल्या मेक्सिकन खाणावळींमध्ये (मेक्सिकन रेस्तोरंटसमध्ये नव्हे तर जिथे खुद्द मेक्सिकन लोकं जाऊन खातात त्या खानावळींमध्ये) जे मेक्सिकन आम्लेट मिळतं त्यात कांदा, सिमला मिरची वगैरे साल्सामध्ये परतून घेतलेली असतात, म्हणून मी तसं म्हटलं....
राग नसावा....
अवांतरः तसं जगात सगळ्यात फस्क्लास आमलेट कुठे मिळत असेल ना तर ते बोरीबंदरावरच्या थ्रू ट्रेन स्थानकाच्या रेस्टॉरंटमध्ये (पहिल्या मजल्यावर)! त्याखालोखाल डेक्कन क्वीनच्या फर्स्ट क्लासमध्ये!!!! जगातली बाकी सगळी आमलेटं झक मारतात!!!!:))

सायली पानसे's picture

14 May 2009 - 10:46 am | सायली पानसे

काय काका रागवु कशाला? योग्य माहितिच दिलित कि तुम्ही...
उलट मी शोधते आहे याला काय नव देउ ते पण सापडत नाहिये ...तुम्ही सुचवा ना छानसे नाव?
(ज्युलिया चाएल्ड कोण ? मला खरच माहित नाहि...)
मी ऑम्लेट खात नाही ना... पण करतानाचा वास आवडतो मात्र खुप... मी ऑम्लेट च्या लारी वरुन मुद्दाम फेर्‍या मारायाचे वास आवडतो म्हणून ;-)

पिवळा डांबिस's picture

14 May 2009 - 10:54 am | पिवळा डांबिस

(ज्युलिया चाएल्ड कोण ? मला खरच माहित नाहि...)
आई गं....
अगं ज्युलिया चाईल्ड म्हणजे बघ अमेरिकेची तरला दलाल!!!!:)
ती साठ वर्षांहून अधिक काळ कुकिंगची प्रात्याक्षिकं देत होती (अलिकडेच वारली ती)
तिची अनेक पुस्तकं आणि व्हिडियो तर आहेतच पण तिच्या पब्लिक चॅनल्सवर अनेक सिरियल्सपण आहेत....

सायली पानसे's picture

14 May 2009 - 11:02 am | सायली पानसे

मी संजीव कपुर ची भक्त आहे एकदम .. ईथे तिथे पहात नाहि हो... म्हणुन ज्युलियबै महित नव्हत्या.
आता शोधेन त्यांची पण पुस्तके.

वल्लरी's picture

14 May 2009 - 10:23 am | वल्लरी

सही दिसते आहे गं मेक्सिकन ऑम्लेट...
आता पुढील वेळेस येईन तेव्हा तुला करायला लावेन .. ;)
आणि मी ही करुन बघेन,,, :)
---वल्लरी

विजुभाऊ's picture

14 May 2009 - 10:41 am | विजुभाऊ

मस्त रेसीपी.

विजुभाऊ's picture

14 May 2009 - 10:44 am | विजुभाऊ

पुण्यात रात्री शिवाजी नगर बसस्टॅन्ड च्या बाहेर मिळणारे बुर्जीपाव आणि आम्लेट याचीही तुलना कशाशीच होउ शकत नाही.
अस्सल पुणेकर त्याला दुजोराच देतील

पिवळा डांबिस's picture

14 May 2009 - 10:47 am | पिवळा डांबिस

देतील, जरूर देतील!!!!
=))

परिकथेतील राजकुमार's picture

14 May 2009 - 11:08 am | परिकथेतील राजकुमार

सहमत सहमत !
त्यात सध्या डेक्कनचे नाव सुद्धा ऍड केलेत तरी चालेल.

बाकी आम्लेट्ची पाकृ मस्तच. घरचे गावाला गेले की करुन बघायच्या डिश मध्ये अजुन एक भर पडली.

अंड्याची पा़कृ व्हेज कशी म्हणावी बॉ ??

अवांतर :- घरचे आजकाल गावाला का जात नसावेत ??

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

सायली पानसे's picture

14 May 2009 - 1:42 pm | सायली पानसे

प रा भौ.. व्हेजिटेबल्स घातलेल म्हणुन व्हेज चीज ऑम्लेट नाव दिला. त्यातु आज गुरुवार ना म्हणून तात्यांचा सल्ला पण मानला... पाकृ नाहि पण नाव तरी शाकाहारी देउ म्हंटले.

वेताळ's picture

14 May 2009 - 10:47 am | वेताळ

एकदा करुन बघायला हवे.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

विसोबा खेचर's picture

14 May 2009 - 10:47 am | विसोबा खेचर

हे काय सायली? गुरुवारी आम्लेट?? शिव! शिव! अगं आमचे दत्तमहाराज म्हणतात, 'गुरुवारी फक्त फळं खा!' म्हणून म्या बापड्याने फक्त फळांचं चित्र लावलं मुखपृष्ठावर! आणि नेमकी आजच तू आम्लेटाची पाकृ दिलीस होय?! :)

असो,

जबरा पाकृ...!

जियो...

आपला,
(आमलेट प्रेमी) तात्या.

नाटक्या's picture

14 May 2009 - 10:50 am | नाटक्या

लाईट सोया सॉस, टोमॅटो सॉस, चिलि सॉस, काळि मिरि पावडर या गोष्टी मेक्सीकन मध्ये टाकत नाहीत ह्या चायनिज/एशीयन मध्ये असू शकतात... मेक्सीकन ऑम्लेट मध्ये पिडांकाकानी म्ह्टल्या प्रमाणे साल्सा आणि पिकांटे सॉस/वर्डे सॉस असतो.

- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)

पिवळा डांबिस's picture

14 May 2009 - 10:57 am | पिवळा डांबिस

मेक्सीकन ऑम्लेट मध्ये पिडांकाकानी म्ह्टल्या प्रमाणे साल्सा आणि पिकांटे सॉस/वर्डे सॉस असतो.
आयला नाटक्याशेठ, तुमचं आमचं भलतंच जमणार आहे असं दिसतंय!!!:)
आधी मटण, मग कॉकटेल्स, आता आमलेट!!!!
जियो!!!!

नाटक्या's picture

14 May 2009 - 11:02 am | नाटक्या

कॅलिफोर्निया! कॅलिफोर्निया!!

- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)

सायली पानसे's picture

14 May 2009 - 11:04 am | सायली पानसे

आपला सल्ला मानुन नाव बदलले आहे. :-)

पिवळा डांबिस's picture

14 May 2009 - 11:05 am | पिवळा डांबिस

आयला, तात्याला घाबरली वाटतं ही पोरगी!!!!
रेसेपीचं नांवच एकदम बदलून टाकलं....
:)

अगं सायली, हा तात्या लोकांना सांगतो की फळं खा म्हणून! पण स्वतः मात्र....
आपला,
(आमलेट प्रेमी) तात्या.

तू घाबरू नकोस!!!
:)

सायली पानसे's picture

14 May 2009 - 11:12 am | सायली पानसे

पण जर नाव चुक असेल तर बदलायला पहिजेच ना! वेळच्या वेळी चुक सुधारलि कि बर ना!

(अवांतर - शुध्द लेखनातल्या चुका फक्त नका काढु.... त्यात काहि सुधारणा होण्याच्या पलिकडची केस आहे.)

जागु's picture

14 May 2009 - 11:08 am | जागु

सायली करुन बघेन मी. छान वाटते रेसिपी.

नाटक्या's picture

14 May 2009 - 11:10 am | नाटक्या

असं घाबरायचं नाही!! तात्यांचं काही मनावर घेउ नका. पण 'व्हे़ज चीज ऑम्लेट' (ऑम्लेट आणि व्हेज?) हे जरा जास्तच वाटतं.

- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)

सायली पानसे's picture

14 May 2009 - 11:15 am | सायली पानसे

आता दमले हा! आता पुन्हा नाहि बदलणार... तरि विचारत होते नाव सुचवा म्हणुन तर नाही सुचवलत आता खा... व्हेज चिज ऑम्लेट.... :-)

विनायक प्रभू's picture

14 May 2009 - 11:16 am | विनायक प्रभू

भारी पाकृ

विनायक प्रभू's picture

14 May 2009 - 11:16 am | विनायक प्रभू

भारी पाकृ

सहज's picture

14 May 2009 - 11:19 am | सहज

हेच लई भारी सचित्र पाकृ.

अजुन येउ दे!

अवलिया's picture

14 May 2009 - 1:57 pm | अवलिया

हेच बोल्तो

--अवलिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 May 2009 - 1:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हेच लई भारी सचित्र पाकृ.

शिप्रा's picture

14 May 2009 - 11:25 am | शिप्रा

फ़ोटु आणि रेसिपी दोन्हि आवडले...:)

सायली पानसे's picture

14 May 2009 - 12:05 pm | सायली पानसे

सगळ्यांचे प्रतिसादाबद्दल मनापासुन धन्यवाद.

मि माझी's picture

14 May 2009 - 1:14 pm | मि माझी

'व्हे़ज चीज ऑम्लेट' नाव वाचून अंडी नसतील अस वाटल होत.. असो.. :(

कुंदन's picture

14 May 2009 - 5:24 pm | कुंदन

नावाबाबत हे अंमळ मागच्या वेळच्या "पौष्टीक मुगाचे डोसे" की " मुगाचे पौष्टीक डोसे" असे काहिसे झालेले दिसतेय. ;-)
पण आपल्याला काय , खाण्याशी मतलब.

बाकी पाकृ मस्त दिसतीये.
दुबई कट्टा ठरवा मग आता एक....

सायली पानसे's picture

14 May 2009 - 5:30 pm | सायली पानसे

अवांतर - पुढिल कट्ट्याची जवाबदारी चुचु तै उर्फ पर्नल तैं ना दिलि गेली आहे... तेंव्हा त्यांच्याशी संपर्क करणे.

सँडी's picture

14 May 2009 - 6:57 pm | सँडी

फ़ोटु आणि रेसिपी दोन्ही आवडले. :)

-संदीप.
काय'द्याच बोला.