घाम

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
13 May 2009 - 7:35 am

प्रिय के.एस.देवेगौडाजी,
कशी आहे आपली तब्बेत. आपल्याला मस्तकशुळ झाल्याचे विविध वाहीन्यांवर पाहीले म्हणुन हा पत्रप्रपंच.
मला डोके आहे असा गैरसमज झाल्यामुळे माझ्या सासुबाईंनी विशिष्ठ प्रकारांच्या फुलांचे एक तेल पाठवले होते. मस्तक शुळावर रामबाण उपाय. कुठल्या पत्यावर पाठवायचे ते व्य. नी. ने कळवा.
टोकन नंबर पुकारला जात नाही म्हणुन म्हणुन मधल्या वेळेत आपण मिपा उघडले की काय? ......
आणि माझे मारुती-१, मारुती २ हे लेख वाचलेत की काय?
ह्या लेखांनी काही सदस्यांना असाच मस्तकशुळ दिला होता.
त्यातल्या नायिकेच्या स्वभावाशी आपले वर्तन मिळते जुळते आहे ह्या भावनेचा आपल्याला त्रास झाला असेल तर क्षमस्व. असो.
साधारण एक तासाभराने जी पत्रकार परिषद घेतली त्यात आपण एकदम पवित्राच बदललात.
तुम्हाला इतका घाम का यावा बरे?
बाईंनी असे काय सांगितले बॉ.?
का जायचे त्यांच्याकडे. ?
तुमच्या प्रदेशातील समस्यांचा त्यांच्याशी काय संबंध. ?
आपल्या असल्या वर्तनाने विरोधी पक्षाना पंतप्रधानाना 'विक प्राइममिनिस्टर' म्हणायची संधी मिळते. आणि हे तयार झालेले खेकटे सघवी ना निस्तरावे लागते.असो.
तुमच्या आघाडीच्या एक हैद्राबादी डब्याचे कपलींग तुटल्याचे कळाले. त्याने असुरक्षिततेची भावना वाढीस लागली काय?
मला तरी असे वाटत आहे की मंत्रीपदाचा आंबा तुम्ही मागितला आणि बाईंनी तुम्हाला कडू मेथीचा काढा दीला.
आता ह्या पुढे काळजी घ्या काळजी.
फार मनावर घेउ नये. परमपूज्य काहीना काहीतरी व्यवस्था करतीलच.
इथे वेगळ्या पद्धतीने घाम पुसायचे तंत्र तमाम भारतीय जनतेला दिल्याबद्दल आपले मनापासुन अभिनंदन.
सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनातल्या इतर सामान्य क्रिया वेगळ्या प्रकाराने कशा कराव्या ह्यावर असेच संशोधन आपण करावे अशी नम्र विनंती.
तुम्ही सर्वजण रंगमंचावर येउन हातांचा गोफ गुंफता. अचानक हात वर करता. काखा दाखवता. निवडणूकीनंतर आपण काय करणार ह्याची पूर्वसुचना द्यायची ही पद्धत पण खूपच छान हो. वार्डरोब मालफंक्शन ची काळजी घ्या हो.
परमपूज्याना .२५ एम.जी. ऍम्प्रॉझॉल घ्यायची सवय करायला सांगा. सभेत झोप काढायची सवय देशाच्या प्रतिमेला घातक असते.
सभेत झोपतात तर झोपेच्या वेळी नेमके काय करतात हा मला न उलगडलेले कोडे.
आपल्या नावातच के.एस. आहे त्यामुळे आपल्याला सत्ता मिळणारच ह्याची मला खात्री आहे.
पुढील वाटचाली साठी शुभेच्छा.
आपला नम्र
वि.प्र.
ता.क. कोकणीत गौडा म्हणजे अंमळ्***(बीप बीप)

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

क्रान्ति's picture

13 May 2009 - 8:56 am | क्रान्ति

मला तरी असे वाटत आहे की मंत्रीपदाचा आंबा तुम्ही मागितला आणि बाईंनी तुम्हाला कडू मेथीचा काढा दीला.
=)) =)) =)) =)) =))
आंब्याच्या बदल्यात नुस्ती कडू मेथी? किमान मेथांबा तरी द्यायला हवा होता!
काढा विशेषज्ञ {!}क्रान्ति

विनायक प्रभू's picture

13 May 2009 - 12:48 pm | विनायक प्रभू

अरे बापरे, ह्या नावाची आय. डी आहे की काय?

सहज's picture

13 May 2009 - 9:03 am | सहज

"गौडाला जेव्हा घाम येतो" ही बोधकथा किंवा "मेथीचा काढा" ही पाकृ नाही आले म्हणजे मिळवले.

अवलिया's picture

13 May 2009 - 9:05 am | अवलिया

हा हा हा =))

प्रभुजी ! लगे रहो !!!

--अवलिया

आनंदयात्री's picture

13 May 2009 - 9:09 am | आनंदयात्री

न्युज चॅनेल वर गौडाचा घाम दाखवला तर काकांनी लेख टाकला .. वा छान !
बरे झाले काका तुम्ही एम टीव्ही रोडीज पहात नाही .. त्यात म्हणे उंटाची शी दाखवली ...

विनायक प्रभू's picture

13 May 2009 - 9:22 am | विनायक प्रभू

का शी करताना?
उंट कोण बरे?

प्रमोद देव's picture

13 May 2009 - 9:24 am | प्रमोद देव

बरे झाले काका तुम्ही एम टीव्ही रोडीज पहात नाही .. त्यात म्हणे उंटाची शी दाखवली ...

लय भारी अंदुशेठ!

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

परिकथेतील राजकुमार's picture

13 May 2009 - 11:30 am | परिकथेतील राजकुमार

खी खी खी

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

संदीप चित्रे's picture

13 May 2009 - 5:49 pm | संदीप चित्रे

>> तुम्ही सर्वजण रंगमंचावर येउन हातांचा गोफ गुंफता. अचानक हात वर करता. काखा दाखवता. निवडणूकीनंतर आपण काय करणार ह्याची पूर्वसुचना द्यायची ही पद्धत पण खूपच छान हो.
यातलं शेवटचं वाक्य तर खूपच खास आहे.

सँडी's picture

13 May 2009 - 5:56 pm | सँडी

मतमोजणीनंतर तर अजुन नवनविन प्रकार पहायला मिळतील. मजा येईल. :)

-संदीप.
काय'द्याच बोला.

प्राजु's picture

13 May 2009 - 9:49 pm | प्राजु

____/\____
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/