पौष्टिक मुगाचे डोसे

साहित्य

मुगाची डाळ - हिरवी सालासकट येते ती.- २ वाट्या
आले - पाउण इंच
मिर्च्या - ३-४ ( तिखट आवदत असल्यास जास्त घ्याव्यात.)
लसुण - ६-७ कळ्या
जिरे- १/२ चमचा
मीठ - चविनुसार.

कृती

डाळ ५-६ तास पाण्यात भिजवुन घ्या... रात्रभर ठेवली तरी चालते.
मग त्यातले पाणी काढुन मिक्सर मधे वाटुन घ्या. वाट्ताना त्यात आले मिर्चि लसुण व जिरे घाला.
वाटताना थोडे पाणी घाला. आपण डोस्याला करतो तितपत पातळ करावे.
चविनुसार मीठ घालुन अर्धातास ठेउन द्यावे.
नॉनस्टीक पॅन मधे थोडा थोडा तेल टिश्युपेपर ने लावुन घ्या आणि डोसा करुन घ्या.......बाजुने थोडेसे तेल सोडा.
डोसा दोन्हि बाजुने परतुन घ्या.
आणि टोमॅटो सॉस किंवा लिंबाच्या लोणच्याबरोबर वाढा.
चविला मस्तच लागतो आणि पौष्टिक हि आहे.

<br />
<table style=

From mugache dose

" />

प्रतिक्रिया

सायली,

जियो...! :)

तात्या.

झकास!

सकाळच्या न्याहरीला तेच तेच खाऊन कंटाळा आला आहे. हा मुगाचा डोसा आणि रवा डोसा असे प्रकार आता करेन. धन्यवाद सायलीताई.

अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

पण पौष्टिक मूग ??
की मुगाचे पौष्टिक डोसे !!

पौष्टिक मुगाचे काय किंवा मुगाचे पौष्टिक डोसे काय सारखेच हो ..शेवटी पोटात जाण्याशी मतलब ... :-) :-)

भव्य महिलांचे कबड्डी सामने :P

मस्तचं दिसतो आहे डोसा..
करेन उद्या.. ब्रेक फास्ट साठी..
---वल्लरी

धन्यवाद सायली!
हा आंध्राचा टिपिकल डोसा आहे...
पेसर पप्पू म्हणजे मूग डाळ आणि पेसरट्टू म्हणजे मुगाच्या डाळीचा डोसा...

काही भर - यावर वरच्या - हिरव्या असलेल्या बाजूवर डोसा जरा झाला की तव्यावरून काढण्याआधी बारीक चिरलेला कांदा आणि जिरे घालतात.
मूग जरा उग्र असतात चवीला ते थोडे कमी होते व छान लागते.
तिथे 'एम एल ए' पेसरट्टू नावाचा प्रकार मिळतो. मसाला डोशात जशी बटाट्याच्या भाजी घालतात तसं यात उपमा घालतात.
यातही कांदा, आणि भरपूर हिरव्या मिरच्यांचे तुकडे असतात... गरम गरम मऊ उपमा या डोशाबरोबर झकास लागतो !

टीपः हैदराबादला गेल्यास हा प्रकार 'चटणीज' मध्ये मस्त मिळतो - ज्युबिली हिल्स आणि नागार्जुना हिल्स..

फारच छान मिळतो आणि ह्याच्या बरोबर घोंगुरा पिकल (आंध्रा भाषेत पिक्कल) मस्तच लागतं! वा तोंडाला पाणी सुटलं =P~ =P~

चतुरंग

करुन बघेन असा पण नक्कि. माहिती बद्दल मनापासुन धन्यवाद.

एस्स सार...

टीपः हैदराबादला गेल्यास हा प्रकार 'चटणीज' मध्ये मस्त मिळतो - ज्युबिली हिल्स आणि नागार्जुना हिल्स..

फक्त चटणी मधेच नाही तर कुठल्याही आंध्रप्रदेशी गृहिणीच्या घरी किंवा टीफीन रूम मधे हे नक्की मिळेल.... पर्वा नही!
(आंध्रप्रदेशी जेवण प्रेमी)यम. विंजिनेर राव

नका हो सकाळी सकाळी असे चांगले चांगले पदार्थ सांगू. आणि त्यात ते फोटो पण. मनावर ताबा राहत नाही.
:-)
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

मस्त दिसतो आहे डोसा..
मी मूगाच्या डाळीऐवजी अख्खे मूग भिजत घालून वाटते. बाकी सेम.
स्वाती

वाह वाह !
आता शनीवारी रवा डोसा आणी रविवारी मुगाचा डोसा फिक्स ;)

परा डोसा
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

पाकृ आणि फोटो दोन्हीही मस्त!
:)
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

मस्त दिसत आहेत डोसे..
उद्याची मतदानाची सुट्टी सार्थकी लावेन :-)

-स्मिता

फोटो बघुन लगेच करावे वाटले.

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

दोन दोन फोटो बघून जाम त्रास झाला.
हे लगेच होणं श्क्य नसल्यामुळे पटकन कचेरीत गेलो, एक मिसळ हाणली आणि तेव्हढ्यापुरता तरी शांत झालो . आता उद्या डोसे करून खाईन. आणि मी काढलेला फोटो पण टाकीन.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

सायली ताय,

आमच्या सारख्या 'बॅचरर्स'कडून, ज्यांना स्वत:च जेवण करून स्वत:च खाण्याचा शाप लाभलेला आहे, अशा सर्वांकडून.. शतश: धन्यवाद!!

मुंबईला जसा 'वडापाव', तसे.. बेंगरुलूला 'डोसे'!!
येऊद्यात अजून..

'विकांताला' करीन म्हणतो..

जागु ताय च्या पालेभाज्यांची वाट पहात असलेला..
-
कोकणी फणस

''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''