रिलायन्स ग्रुप सावधपणे गुंतवा

राम राम मंडळी

दर ८ वर्षांनी येणारा शेअर बाजारातील मंदीचा नुकताच एक तडाखा आपण अनुभवला असेल

१९९२ मधे सेन्सेकला उचलुन धरणारे एसीसी वगैरे शेअर्स नतर चांगलेच लुडकले तर २००० मधे सेन्सेकला उचलणारे माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे २००३ पर्यंत काय झाले हे तुम्हाला माहित आहे

२००७ मधे सेन्सेकला उचलणारा रिलायन्स (इंडस्ट्री, एनर्जी. पेट्रो, कम्यु व केपिटल) आता उतरणार हि आमची अटकळ आहे

तरी या सर्व कंपन्यात डोळसपणे पैसे गुंतवा

नाना

आधार?

२००७ मधे सेन्सेकला उचलणारा रिलायन्स (इंडस्ट्री, एनर्जी. पेट्रो, कम्यु व केपिटल) आता उतरणार हि आमची अटकळ आहे
नानाश्री,
आपल्या वरिल भाकितास काही आधार की केवळ १९९२ आणि २००० मधील पॅटर्न ?

वा नाना वा

आपले भाकित खरे ठरले.
आधी विश्वास ठेवला नसता. पण आज काय पडलाय Reliance.
तुम्ही तर efficient market hypothesis च्या कानाखाली जाळ काढला.

वा नाना वा

अनिकेत

रिलायन्स नव्हेच तर सगळेच मार्केट डाऊन

आजचा शेअर बाजार सर्वसामान्यांशी विनोद करतोय की काय असे वाटण्याच्या स्थितीत आहे

रिलायन्स पॉवर - 345.65 (आय.पी.ओ. ४३० रु.)
रिलायन्स पेट्रो - 147.25 (काही महिन्यांपूर्वी हा २९५ पर्यंत गेला होता)
रिलायन्स एनर्जी - 1,501.95 (मागच्याच महिन्यात हा 2,641.00 पर्यंत गेला होता)
रिलायन्स इंडस्ट्री - 2,329.90 (मागच्याच महिन्यात हा 3,298.00 पर्यंत गेला होता)

नुसतेच रिलायन्स नाहीच तर सगळेच मार्केट डाऊन आहे.

पुंज लॉयड - 339.60 (मागच्याच महिन्यात हा 656.00 पर्यंत गेला होता)
टेक महिन्द्रा - 678.00 (२ महिन्यांपूर्वी हा १२०० पर्यंत गेला होता)

हा तमाशा आहे की काय? गुंतवणूकदारांच्या आयुष्याशी खेळच आहे हा ...
बर्‍याच गुंतवणूकदारांनी पुन्हा शेअरमार्केटचे तोंडही न बघण्याचा निर्णय घेतला आहे.

काल रिलायन्स पॉवरची लिस्टींग झाली आणि सर्वसामान्यांनी डोक्याला हात लावला...टी.व्ही. वर एकेकाच्या प्रतिक्रिया ऐकून हेलावून गेलो... हा शेअर बाजार मोठी स्वप्ने पाहणार्‍या सर्वसामान्यांना किती जोरात जमिनीवर आणतो हेच खरे
नवीन चालू असलेले आय.पी.ओ. पण कंपन्या मुदत वाढवत आहेत, परत घेत आहेत. कोणी गुंतवणूकच करायला तयार होत नाहीये अशा परिस्थितीत... देवा बाजाराला उचल रे.... नाहीतर लोकांपुढे मोठी संकटे उभी राहतील.....

(सर्वसामान्यांच्या कष्टाच्या पैशाचे नुकसान झाल्यामुळे दुखावलेला ) सागर

देव बाजाराला नव्हे...

तर लोकांना उचलेल बहुधा! सद्या तरी तसाच रागरंग दिसतोय.
शेयर बाजार हा हाव आणि भितीचा खेळ आहे. एकीकडे आपले शेयर्स वाढावेत असे लोकांना वाटते आणि त्याच वेळी नुकसान तर नाही ना होणार? म्हणून भिती वाटत असते.
ह्या खेळात उतरणार्‍यांनी नुकसान सोसण्याची मानसिक तयारी ठेवली तर मग कोणताही त्रास होणार नाही.
तेव्हा एकदा काय तो विचार पक्का करा.

प्रमोदकाका ...अगदी खरे बोललात

प्रमोदकाका ...,

देव बाजाराला नव्हे...तर लोकांना उचलेल बहुधा! सद्या तरी तसाच रागरंग दिसतोय.

अगदी खरे बोललात.... सध्या तरी अशीच परिस्थिती आहे.
पण मनाची तयारी ठेवली की त्रास होत नाही. मी स्वतःदेखील तोट्यात आहे रिलायन्स पॉवर घेऊन... पण ही परिस्थिती कायम नाही राहणार

अजून एक सांगावेसे वाटते की,
सध्याच्या परिस्थितीत गुंतवणूकदारांनी भांबावून न जाता , संयम दाखवून शेअर्स होल्ड करावेत.
ही परिस्थिती कायम नाही राहणार... तेव्हा तोट्यात शेअर्स विकण्यात काय अर्थ आहे.... तेव्हा बाजार चढायची वाट पहा..

अर्थसंकल्प जाहीर झाल्यावर बाजाराला पुन्हा एकदा चांगले दिवस येतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही.....

तेव्हा वेट ऍन्ड वॉच हे धोरण सध्या तरी योग्य राहील असे वाटते...
- सागर

मी ही हेच म्हणतो

ह्या खेळात उतरणार्‍यांनी नुकसान सोसण्याची मानसिक तयारी ठेवली तर मग कोणताही त्रास होणार नाही.
तेव्हा एकदा काय तो विचार पक्का करा.

मी ही हेच म्हणतो. तुम्ही एकदा या खेळात उतरलात ना की मग काही ही होवो. एक म्हण आठवते सामान्य गुंतवणुक दारांसाठी "गरीबाच्या पोराला सोंगटयांचा खेळ हवा कशाला?"

आपले घाम गाळुन कमावलेले पैसे योग्य ठिकाणी गुंतवा म्हणजे झाल. त्यासाठी हा शेअर बाजाराचा जुगार नको. आणि खेळायचाच असेल तर योग्य माणसाचे मार्गदर्शन (न्युज चेनल सोडुन) घ्या व थोडे पेशन्स बाळगा की.

शेअर बाजारा बाबत आपले तात्या, पंतकाका, नाना, सागर ही व अनेक मंडळी आहेतच मार्गदर्शन करायला

रीलायंस बाबत :- तरी बरे नानांनी अगोदरच सांगीतले होते रिलायंसवर लक्ष ठेवा.

(बाजारात सावधपणे गुंतवणारा) मनीष पाठक

या सतत

या सतत खाली जाणा-या मार्केटमुळे कशी गंमत चाललीये ती बघा

माझ्या एका मित्राने १ लाख रुपये साधारण ९ महिन्यापुर्वी गुंतवुन ते शेअर २०००० सेन्सेक्स होता तेव्हा विकले व १ लाख ९० हजार रुपये मिळवले
९० हजार फायदा
मधल्या काळात न ऐकता अतिशय फुगलेल्या समभागात १०००० पदरचे टाकुन एकुण दोन लाख गुंतवले
झपाट्याने खाली आलेली किंमत आजमितीस ७० हजार होवुन गेली
नुकसान १ लाख तीस हजार
पण मागील नफ्यावर १० टक्याने कर भरणे आले व हा समभाग माहित नाहि किती दिवस पण संभाळणे आहेच

सांगा बरे हा फायदा की तोटा की भ्रामक कल्पनांचे खुळ? ः)

नाना

रिलायन्स ग्रुप IPO

भविश्यातिल रिलायन्स ग्रुप IPO

* रीलायंस Hair Cutting**

* रीलायंस Cycle Services**

हुं

रिलायन्स ग्रुप सावधपणे गुंतवा

एकवेळ रिलायन्स परवडली पण कुडमुडे भाकितकार आणि त्यांच्या कधी न ऐकलेल्या कंपन्यांबद्दलच्या शिफारसींपासून लांबच राहा.

अवांतर: मी तर ऐकलेय की तुरुंगात असताना देखील हर्षद मेहता टीप्स द्यायचा आणि केतन पारेखला स्टँडर्ड चार्टर्ड बँकेचे २८ वर्षाचे प्रत्येक दिवसाचे शेअर्सचे भाव तोंडपाठ होते.

>
>
मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...

रिलायन्स.....

रिलायन्स ग्रुप आपले सर्व पेट्रोल पंप बंद करतोय अशी बातमी आहे.