१५०० अब्ज डॉलर !

दशानन's picture
दशानन in काथ्याकूट
5 Apr 2009 - 12:52 pm
गाभा: 

मंदीने अमेरिकेचा गळा काय आवळला, अमेरिका एकदम जमीनीवर आली, आपल्या पैशाला लागलेली गळती थांबवण्यासाठी ओबामा ने अनेक पाऊले उचलायला सुरवात केली व त्याच बरोबर भारतात सार्वजनिक निवडणूकीचे वारे वाहू लागले होते, व ओबामाला एक महत्वाचा मुद्दा कळाला जो मुद्दा भारतात राजीव गांधीच्या बोफोर्स लफड्यापासून शेबंड्या पो-याला ही माहीत आहे तो म्हणजे स्वीस बॅंकेतील काळा पैसा !

मंदीवरील एक उपाय म्हणून ओबामाने स्विस बैंकेमध्ये असलेल्या अमेरिकन खात्यांची माहीती मागवण्याची चाल खेळली, थोडासा दबाव टाकून स्विजरलैंड ला मजबूर केले की लिस्ट जाहीर करण्यासाठी. खरं तर गेली चारशे वर्षापासून स्विजरलैंड मध्ये गुप्त बैंक खात्यांची सुविधा आहे जी त्याकाळातील माफिया व गुन्हेगारांचा पैसा जमा करण्याची एकमेव म सुरक्षित जागा होती व बैंकेच्या नियमाप्रमाणे त्यांच्या खात्याची माहीती कुणाला ही मिळत नसे. पण मंदीमुळे व अमेरीकेच्या व तसेच बाकीच्या देशांच्या दबावापुढे बळी पडून स्विजरलैंड ने स्विस बैंकेतील खात्यांची माहीती जगासमोर उघडी केली.

त्या माहीतीमुळे अमेरीकेत भुकंप झाला की माहीत नाही पण भारतात मात्र सर्व सामान्यांचे डोळे फिरावेत व श्वास थांबावा असा हाल झाला, जगामध्ये सर्वात जास्त काळा पैसा स्विस बैंकेत कुठल्या देशाचा असावा तर तो देश आहे भारत, हो आपलाच महान भारत ! जेथे सचोटीने, सत्यांने, देशप्रेमाने भारावलेले काही वेडे देशाच्या आझादीसाठी अगदी मागे नाही साठ एक वर्षापुर्वी आपले जिवन त्यागले.. त्यांचा आत्मा क्लेषाने रडत असेल की काय करण्यासाठी आम्ही स्वातत्रं लढा दिला व काय झाले !

१५०० अब्ज डॉलर !

एवढा पैसे ! थांबा जरा हे वाचून कळणार नाही हा आकडा काय आहे, भारतावर जागतीक बँकेचे फक्त १५५ अब्ज डॉलरचे कर्ज आहे, हे कर्ज मुक्त होण्यासाठी १५ वर्षाचा कालावधी लागेल सध्याच्या प्रगती नूसार ! समजले किती पैसा आहे जो धुळ खात पडला आहे. जर हा सर्व पैसा भारतात आणला तर भारतावर कुणाचे ही कर्ज राहणार नाही उलट तो पैसा जर भारतात वापरला गेला तर त्या पैसातून भेटणा-या फक्त व्याजानेच दर वर्षी २५-३० जिल्हे पुर्ण विकसीत करता येतील ! देशाचा चेहरा मोहरा बदलून जाईल काही वर्षामध्ये एवढा आफाट पैसा आहे हा !

पण कुठला ही राजकिय पक्ष ह्या विषयी ब्र सुध्दा काढत नाही आहे ? ह्याचे काय कारण असावे ? साधे सोपे कारण सर्वांचाच पैसा आहे ह्यामध्ये, नेता, अभिनेता, व्यवसायीक सर्व जणांचा हा काळा पैसा, सामान्य जनता आपल्या रक्ताने देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी काबाडकष्ट करते व जे हारामखोर हाच देशाचा पैसा त्या स्विस बँकेत जमा करतात व देशाचे वाटोळे करतात, जर हाच पैसा भारतात राहिला असतात तर सध्या आपण विकसित देश असलो असतो ना की अविकसित तिसरी दुनिया !

तुम्ही विचार कराल त्या काय एवढे बाकी देशाचा पैसा पण तेथे असेलच ना !
जरा पहिल्या पाच ची लिस्ट बघा मी काय म्हणतो आहे ते कळेल.

१. भारत - १५०० अब्ज डॉलर.
२. रशिया - ४७० अब्ज डॉलर.
३. ब्रिटन - ३९० अब्ज डॉलर.
४. युक्रेन - १०० अब्ज डॉलर.
५. चीन - ९६ अब्ज डॉलर.

आपल्या खालच्या सर्वांची रक्कम आपल्या काळ्या पैसाच्या अर्धीपण नाही आहे =)) काय विनोद आहे नाही ! हसावे का रडावे हेच कळत नाही आहे.

अमेरिकेने दबाव टाकून हा आकडा बाहेर काढला व आता त्यांनी दुसरा दबाव टाकून त्यांच्या देशातील खात्यांची पुर्ण माहीती व मालकांची माहीती मागवली आहे व त्यांना ती मिळाली सुध्दा असावी आता पर्यंत. जर भारतात खरोखर असा एक ही पक्ष आहे जो म्हणतो की आम्ही योग्य तो दबाव टाकून तो सर्व काळा पैसा भारतात परत आणू त्यांनाच माझे मत, त्या शिवाय मी मतदान करणारच नाही उलट जे करत आहेत त्यांना पण माझे हेच सांगणे की बाबा रे ह्यांचा वर दबाव टाकण्याची आपल्या कडे पाच वर्षातून एकदाच संधी येते, त्यांनंतर आपण त्यांचे बिगारी मजदुर आहोत, ह्यांचे नाक दाबा, मतदान करु नका, काय होईल ? देशाचे अजून ४०-५० अब्ज डॉलर ह्या नाटका पायी खर्च होतील होई देत पण ह्यांना जनतेची ताकत तरी कळेल. जनतेनेच जर ह्यांना नाकारले तर ह्यांना जन्मभराची अक्कल मिळेल की काही कर पण देशाचे वाईट चिंतले की जनता फाट्यावर मारेल !

जय हिंद !

प्रतिक्रिया

सागर's picture

5 Apr 2009 - 1:10 pm | सागर

राजे ... एकदम मुद्द्याचे बोललात.
काळा पैसा एवढा स्विस बँकेत आहे की त्याचे आपल्या देशाचे नेतृत्व करणार्‍या नेत्यांना काहीच वाटत नाही कारण हा सगळा पैसा त्यांचाच तर आहे... दुसरे असे की या नेत्यांनी केवळ आपला पैसा सुरक्षित रहावा म्हणून देशाबाहेर नेऊन ठेवला पण सोईस्करपणे हे नेते विसरले की हाच अवाढव्य पैसा वापरुन विदेशी बँका आपल्या देशाला कर्ज देतात.
आपलाच पैसा आपल्यालाच कर्ज?... आणि विदेशी बँका आपल्या देशाकडून मिळणार्‍या फुकटच्या व्याजावर मोठ्या होत चालल्या आहेत. माझी खात्री आहे की जर स्विस बँकेतील काळा पैसा भारतात आणला तर तिकडे स्विस बँकेचे दिवाळे निघेल.
न जाणो या भीतीने स्विस बँकेने याधीच बँक बंद केली तर? सगळ्या बड्या तट्टूंचा हा पैसा बुडेल की राहीन? त्या ऐवजी कामे केली असती तर त्यांनी खाल्लेल्या पैशाकडे लोकांनी तितक्याशा गांभीर्‍याने पाहिले नसते....

आपण फक्त स्विस बँके बद्दल बोलतो आहोत. आपले भ्रष्ट नेते एवढे हुशार नक्कीच आहेत की जगात सगळीकडे हा काळा पैसा पसरुन ठेवला असेन. ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, इंग्लंड, अमेरिका, दक्षिण अमेरिका, जर्मनी व इतर युरोपीय देश... ह्या सगळ्या ठिकाणी चौकशी केली पाहिजे... :)
जगातील सर्वच विदेशी बँकांमधे असलेला आपला (काळा)पैसा गोळा केला तर आख्ख्या जगाचे डोळे पांढरे होतील...
कदाचित आपणच जगाला कर्ज देण्याएवढे श्रीमंत होऊ ....काय म्हणता? ;)
- सागर

दशानन's picture

5 Apr 2009 - 1:16 pm | दशानन

>>>कदाचित आपणच जगाला कर्ज देण्याएवढे श्रीमंत होऊ ....काय म्हणता? Wink

नक्कीच !

देशाचे वाटोळे केले आहे ह्या भ्रष्ट लोकांनी !

त्यामुळेच तर ह्या मतदानावर बहिष्कार टाकणार आहे मी !

सागर's picture

5 Apr 2009 - 1:24 pm | सागर

त्यामुळेच तर ह्या मतदानावर बहिष्कार टाकणार आहे मी !

पण असे केल्यामुळे अपात्र राज्यकर्ते सत्तेवर नाही का येणार?

तुमच्यासारखे सगळे विचार करतील असे नाही ना.....
असे अनेक लोक आहेत की जे फक्त हाताचा पंजा पाहून शिक्का मारतात ;)
त्यामुळे तुम्ही मत नाही दिले तरी नालायक उमेदवार निवडून येणारच....

त्यापेक्षा तुम्हाला योग्य वाटेल त्याला मत द्या. ते जास्त मौल्यवान असेन
सागर

दशानन's picture

5 Apr 2009 - 1:32 pm | दशानन

>>तुमच्यासारखे सगळे विचार करतील असे नाही ना.....

करतील का नाही हे माहीत नाही पण ही बातमी येऊन चार-पाच दिवस झाले, पण मला ना टिव्ही वर ना न्युज मध्ये ही बातमी दिसली :( एका हिंदी न्युज पेपर मध्ये ह्यावर दहा ओळीची बातमी होती व तो उत्तर भारतातील सर्वात जास्त खप असलेला दैनिक जागरण आहे !

बाकीचे विचार करो ना करो, पण खरोखर माझा राजनेत्यांवरील विश्वास गेला आहे, माझ्या मनात त्यांना मत देण्याची जरा ही इच्छा राहिली नाही आहे ना ह्या नाटकामध्ये एका मताने का होई ना भाग घेण्याची देखील.

बाय द वे,

ज्यांनी ज्यांनी नामांकन पत्र भरले आहे व आपल्या संपत्तीची माहीती दिली आहे ते पाहून माझे ऊर भरुन आले ;) देश का युवा नेता राहूल गांधी करोडपती आहे पण बेचा-याकडे एक साधी कार देखील नाही =)) उलटे ह्यांच्या वर एका बँकेचे कर्ज पण आहे ! ह्यांच्या कडे ३० एक लाख रुपये कॅश आहे व पाऊणे दोन कोटीची मालमत्ता आहे !

अजून एक मजेशीर गोष्ट !

तुम्ही कॉग्रेसचे घोषणा पत्र वाचले का ?

त्यांनी ज्या घोषणा केल्या आहेत त्यातील निम्या तरी ते जेव्हा सरकार मध्ये होते तेव्हा का पुर्ण केल्या नाही हा जाब कोण विचारणार :?

मी खरे सांगायचे तर कोणत्याही पक्षाचे घोषणापत्र वाचत नाही....
कारण त्या पोकळ वल्गना असतात... बोलायचे एक आणि करायचे एक यालाच राजकारण म्हणतात.... हे सत्य दुर्दैवाने मला माहीत असल्यामुळे घोषणापत्र वाचण्याच्या वायफळ कामात मी वेळ घालवत नाही... ;) काय म्हणतां?

दशानन's picture

5 Apr 2009 - 1:47 pm | दशानन

एक नजर !

भाजपा व क्रॉग्रेस दोघांनी पण गरीबी रेखे खालील लोकांना ३ रु. व दोन रु. भावाने तांदूळ व गहू देण्याचे लिहले आहे ;) म्हणजे गरिबांना स्वावलंबी न बनवता त्यांना भिकारी बणवण्याचा घाट =))
अभिनेता चिरंजीवीच्या पार्टीने प्रजा राज्यम ने तर ह्यावर जबरा चाल खेळली आहे... जवळ जवळ दिड करोड लोकांना (आंध्र प्रदेश) मुफ्त मध्ये तांदुळ / गहूं व कुंकिंग गॅस देण्याचे वचन दिले आहे =)) हसावे की रडावे हेच कळत नाही आहे .... ! जर फक्त तांदुळ मुफ्त मध्ये देशभर वाटायचे ठरवले तर तर कमीत कमी ४.५ हजार करोड रुपयेचा खर्च आहे =))

सागर's picture

5 Apr 2009 - 1:56 pm | सागर

सत्ता मिळाल्यावर मोफत वा २-३ रुपयाला धान्यवाटप ही नेते मंडळी करतीलच.
पण यामुळे सरकारी तिजोरीबरोबरच मेहनत करुन आयकर भरणार्‍या आपणा सगळ्यांवर वारेमाप भार पडणार यात काही शंका नाही... टाईट युवर सीट्बेल्ट्स ... आपल्या खिशाला कात्री आधीपासूनच लागत आहे आता ती कात्री छोटी छोटी भोके न पाडता थेट खिसाच कापून टाकेन असे एकंदरीत दिसत आहे ....

गुळांबा's picture

14 Apr 2009 - 5:08 pm | गुळांबा

२-३ रुपयांना धान्य वाटप गरजेचं आहे. पुर्वी १ रुपयात झुणका भाकर मुळे कितितरी गरिबांच्या पोटाला आधार झाला होता. अनेक लोक या योजनेबद्दल शासनाला दुवा देत होते. सोपा विचार करा. एके दिवशी शासनाने कर चोरी करणारा पकडला आणि प्रमाणिक पणे त्याच्या कडुन ३ कोटीचा ट्याक्स वसुल केला तर कितितरी जणांना एक महिनाभर १५ रुपये किलोचा तांदुळ २ रुपये किलोने देता येईल. त्यासाठी राजकिय इच्छा शक्ती हवी. टी. चंद्रशेखरसारखा एखादा आयएएस अधिकारी ठाणे शहराचा कायापालट करतो ते राजकिय इच्छा शक्तीच्या जोरावरच ना. मग इतराना हे का नाही जमत?

सागर's picture

14 Apr 2009 - 9:42 pm | सागर

पूर्णपणे सहमत आहे.
पण दुर्दैवाने सरकारी अनुदानाचा सगळा पैसा हे सगळे नेते लोक स्वतः खातात आणि स्विस बँकेत ठेवतात, हे आपल्या देशाचे दुर्दैवच आहे. जर सरकारी अनुदानाची ही उघड लुटालुट थांबली तर आपण देत असलेल्या निम्म्या कराच्या रकमेत देशाचा संपूर्ण विकास तर होईनच , शिवाय गोरगरिबांनाही जीवनावश्यक अन्नधान्ये खूप स्वस्तात मिळू शकतील... पण या नेते मंडळींनी १ अमेरिकन डॉलर = ५० रुपये ही जी आपल्या चलनाची दैना केली आहे त्यामुळेच हे शक्य होत नाहिये...
- सागर

राजे आत्ताच एक मजेशीर माहिती हाती आली आहे...

http://www.esnips.com/doc/524f6a2b-a8b4-4ce6-be03-74bbde4e1bfe/pending_c...(criminals)

ह्या एक्सेल फाईल मधे... सध्याचे नेत्यांवर चालू असलेल्या गुन्हेगारीच्या केसेस आणि सध्याचे स्टेटस दिले आहे...
ह्यावरुन तरी लोकांना नक्की कळाले पाहिजे की कोण साधू आहे आणि कोणं राक्षस ते ;)

विजुभाऊ's picture

6 Apr 2009 - 6:12 pm | विजुभाऊ

राजे मला वाटले की अरब म्हणजे दुबईतला अरब.
तुम्ही म्हणता तो अरब मराठीत अब्ज म्हणवला जातो आहे

आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं
जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं.
ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं
तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Apr 2009 - 1:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्वीस बॆंकेतले पैसे काढून सर्व उधा-या (जागतिक बॆंकेच्या कर्जासहीत ) देऊन टाकू आणि शिल्लक पैशातून, सार्वजनिक सुविधा, बेकारी, इतर प्रश्नांची सोडवणूक करायची. पण ते पैसे काढायचे कोणी आणि सुरक्षीत ठेवायचे कोठे हा प्रश्न आहेच. :(

अवांतर : भारतीय लोकांची यादी दिली पाहिजे राव त्यांनी !

सागर's picture

5 Apr 2009 - 1:38 pm | सागर

अवांतर : भारतीय लोकांची यादी दिली पाहिजे राव त्यांनी !

दिलीपराव... यादी मिळणे अवघड आहे... कारण नेते लोक हे होऊ देणार नाहीत..
यादी प्रसिद्ध झाली तर देशातले सगळे भ्रष्ट नेते विदेशात पळून जातील... आणि माझ्यामते एव्हाना स्वीस बँकेने आकडा जाहीर केल्यापासून स्विस बँकेतील पैसा ऑनलाईन ट्रान्स्फर द्वारे या नेत्यांनी काढायला सुरुवात पण केली असेन.. ;)

हा सगळा काळा पैसा सगळ्या राजकारणी नेत्यांचा आहे हे उघड सत्य भारतातील सगळ्या जनतेला माहीत आहे =))

सौ मे से अस्सी बेईमान फिर भी मेरा भारत महान
जय हिंद !!!
सागर

दशानन's picture

5 Apr 2009 - 1:42 pm | दशानन

नक्कीच पैसा आपली जागा बदलत असेल :(

बाकी चुनचुन के मारुंगा टाईप एखादा होरो नाही का आपल्या कडे सध्या =))

* लिस्ट मिळेल हो, सहजा सहजी नाही मिळणार पण जरा जोर टाकला कि मीळेल ही पण हा जोर टाकणार कोण हा कळीचा मुद्दा ;)

क्रॉगेस कडून काहीही उमेद्द नाही आहे ना भाजपा कडून ... एकाला झाकावा .. दुस-याला उघडावा, असा हाल !

दशानन's picture

5 Apr 2009 - 1:56 pm | दशानन

सर,

बेकारी इत्यादी सर्व सोडा, पण हा पैसा जर भारतात आणला, समजा जर तो पैसा वाटायचा ठरवला प्रत्येक भारतीयाला तर, सर्वजण लखपती होतील एवढा पैसा आहे हा ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Apr 2009 - 2:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>जर तो पैसा वाटायचा ठरवला प्रत्येक भारतीयाला तर, सर्वजण लखपती होतील एवढा पैसा आहे हा
व्हायला पाहिजे तसे ! :)

यादी कळली असती आणि त्यातले ज्यांच्या पक्षांचे किंवा स्वतः ते नेते जर असतील तर लोकांनी त्यांना निवडणूकीच्या निमित्ताने घरी बसवले असते असे वाटते.

अवांतर : वार्षिक तीनलाखापर्यंतच्या उत्पन्न असलेल्यांना आयकरात सूट देऊ ही घोषणा मला वयक्तिक बरी वाटली.

-दिलीप बिरुटे
(स्वार्थी )

अविनाशकुलकर्णी's picture

5 Apr 2009 - 2:12 pm | अविनाशकुलकर्णी

मला जर निर्णय घेण्याचा अधिकार दिला तर तर मी फतवा काढेन..खातेदारासाठी "स्विस बॅंक पैसा अभय योजना" या नावाखाली योजना राबवेल.. खात्यातला पैसा भारतात उघडपणे आणा..५०% रक्कम सरकारला दान करा..व उरलेली ५०% रक्कम तुम्हि वापरा...जय हो.....जय हो.....जय हो.....

तिमा's picture

5 Apr 2009 - 3:25 pm | तिमा

हा काळ्या पैशाचा मध अशा अनेक भ्रमरांनी तिकडे नेऊन ठेवला आहे. ते सगळे, आतून एकच असल्यामुळे, एकमेकांना 'सहारा' देत असतात( त्यांचा पैसा इथून तिथे फिरत असतो) आणि एक महा भ्रमर(सिंग) त्याचा सर्व हिशोब ठेवत असतो म्हणे!!!

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

सर्वसाक्षी's picture

5 Apr 2009 - 4:49 pm | सर्वसाक्षी

राजे,

भ्रष्टाचार या एका मुद्द्यावर आपल्याकडे सर्वपक्षसमभाव दिसुन येतो.
असो. या निमित्ताने मोठे आकडे ऐकायला मिळाले!
धन्यवाद

अवलिया's picture

5 Apr 2009 - 5:31 pm | अवलिया

वा ! छान !!

--अवलिया

मराठमोळा's picture

5 Apr 2009 - 7:36 pm | मराठमोळा

काय बोलावे सुचेनासे झाले.. हा आपलाच पैसा हो.
पण काय करणार? जोपर्यंत सर्व जनता सुशिक्षित आणी जागरुक होत नाही तोपर्यंत हे दुष्ट्चक्र चालुच राहणार.
मागच्या निवडणुकीत एका पत्रकाराने मतदान करुन आलेल्या एका म्हतार्‍या बाईला विचारले "माई किसको वोट दिया?"
ती बाई म्हणाली "ईंदीरा गांधी को".
५०% च्या वर मतदान होत नाही, सुशिक्षित जनता मतदान करायला जातच नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीनाम्यात एक मुद्दा आहे "अनुसुचित जाती जमातीच्या लोकाना खाजगी नोकर्‍यात आरक्षणासाठी विधेयक आणणार" मतांच्या राजकारणासाठी काय होईल सांगता येत नाही.

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

मिसळभोक्ता's picture

5 Apr 2009 - 9:41 pm | मिसळभोक्ता

हे सगळे रुपये सर्कुलेशन मध्ये आले, की डॉलरचा भाव १०० रुपये. मज्जाच मज्जा.

-- मिसळभोक्ता

नर्मदेत ला गोटा's picture

5 Apr 2009 - 10:50 pm | नर्मदेत ला गोटा

मुद्दा १ न्मबर....
भाजपा जाहिरनाम्यात : स्विस बन्केतील काळा पैसा परत आणु असा उल्लेख आहे.
मोदी म्हणतात : काळा पैसा परत आणु : कर्ज फेडु , उरलेल्या पैस्यात जन उपयोगी कार्य करु.

आता मतदान करायला हरकत नाही.
:)

चित्रादेव's picture

6 Apr 2009 - 2:05 am | चित्रादेव

मतदानात असा कौल ऑपशन नसतो का , 'कोणताच योग्या नाही मतदार'? असा एक ऑप्शन असेल तर मजा होइल. मतदानाचा हक्क बजवला पाहीजे असे म्हणतात पण इथे तर चोराचींच ल** ;)

चित्राजी,

असा पर्याय असतो... पण कोणी तो पर्याय वापरायचे कष्ट घेत नाहीत
मतदानाचा नकाराधिकार वापरण्याइतपत आपले मतदार दुर्दैवाने सुज्ञ नाहीत.
या पर्यायाची शक्ती एवढी आहे की विजेत्या उमेदवाराच्या मतांपेक्षा या पर्यायासाठी पडलेली मते जास्त ठरली तर तो उमेदवार जिंकला असे होत नाही... उलट निवडणूक पुन्हा घेण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाकडे येते व त्याच बरोबर इतर सर्व पक्षांचेही धाबे दणाणू शकते. सर्व पक्षांना अशा विशिष्ट परिस्थितीत लोकांची मते जाणून घ्यावीच लागतात. अन्यथा दुसर्‍या वेळच्या मतदानातही हेच चित्र दिसले तर निवडणूक आयोग कायदेशीर निर्णय घेऊ शकते. अर्थात या पुढच्या प्रक्रियेची मला जास्त माहिती नाही. :)
- सागर

आळश्यांचा राजा's picture

7 Apr 2009 - 12:43 am | आळश्यांचा राजा

असा पर्याय नसतो. यावेळी मतदानाला जाल तेव्हा आठवणीने पहा.

आळश्यांचा राजा

मी मतदानाचा नकाराधिकार याबद्दल म्हणत आहे. माझी खात्री आहे की हा पर्याय नक्कीच आहे. पण वापर कसा करायचा याची माहिती माझ्याकडे नाहिये. अलिकडेच याबद्दल वाचनात आले होते. शोधावे लागेल आता. :(
कोणाकडे याबद्दल माहिती असेन तर कृपया द्यावी ही विनंती....

घाशीराम कोतवाल १.२'s picture

7 Apr 2009 - 10:42 am | घाशीराम कोतवाल १.२

नक्किच असतो हा पर्याय पण तो गुप्त नसतो ओ त्यात तुम्हा १७ नं चा एक फॉर्म भरावा लागतो त्यात तुमचे नाव गाव सर्व माहिती
भरुन निवड्णुक अधीकार्‍याला द्यावी लागते मग हे गुप्त मतदान कसे ?
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

मैत्र's picture

7 Apr 2009 - 1:58 pm | मैत्र

http://eci.nic.in/PROPOSED_ELECTORAL_REFORMS.pdf

निवडणू़क आयोगाने सुचवलेल्या सुधारणांमध्ये ही एक आहे पण मंजूर झालेली नाही. कोतवाल यांनी म्हटल्या प्रमाणे मतदानाची गुप्तता राहत नाही हा एक मुद्दा आहे. यासाठी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन वर - यापैकी कोणीही नाही हा पर्याय द्यायला हवा.
पण ते अजून मंजूर झालेले नाही. आणि त्यासाठी संसदेची मंजूरी हवी असल्याने तो नियम होण्याची सुतराम शक्यता नाही...

मदनबाण's picture

6 Apr 2009 - 3:51 am | मदनबाण

इतका पैसा भारतात परत येईल का ? किंवा तसे करण्याचे कष्ट कोणी घेइल का?

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

सँडी's picture

6 Apr 2009 - 7:22 am | सँडी

हे सगळे रुपये सर्कुलेशन मध्ये आले, की डॉलरचा भाव १०० रुपये. मज्जाच मज्जा.
उलटं रुपया महाग होण्याची शक्यता अधिक.

या नेत्यांनी केवळ आपला पैसा सुरक्षित रहावा म्हणून देशाबाहेर नेऊन ठेवला...
मह्त्वाचं कारण म्हणजे स्विस बँकांची खाते आणि खातेदाराविषयीची गोपनियता! या एका मह्त्वाच्या कारणामुळेच तिथे पैसे ठेवणार्‍या परदेशस्थ खातेदारांची संख्या अधिक, आणि भ्रष्टचारी राजकीय नेते, माफिया यांचे प्रचंड प्रमाण!

हा सगळा काळा पैसा भारतात आणण्यासाठी फक्त भारत सरकारची इच्छाशक्तीच मह्त्वाची(इथे पहा) . आताच्या सरकारचे याविषयीचे मौन संशयास्पद वाटते. येणार्‍या सरकारने खरोखर हे आश्वासन पुर्ण केले तर देशाचे चित्रच पालटुन जाईल.
स्विस बँकांच्या नियमांविषयीची माहीती तसेच खाते उघडण्याविषयीचे 'कुतुहल' असल्यास हा दुवा:).
(जोखीम : हा दुवा कुठ्ल्याही स्विस बँकेचं संकेतस्थळ नाही. हे संकेतस्थळ बँकेचे खाते उघड्ण्यासाठी एक माध्यम/मध्यस्थ म्हणुन उपयोगात आणता येते, परंतु ही लोक किती गोपनियता पाळतात या विषयी शंका असते.)
खाते उघडण्यासाठी प्रत्यक्ष बँकेत जाऊन उघड्ल्यास सर्वात सुरक्षित! म्हणुनच अडवाणींनी स्विझर्लॅडला गेलेल्या सर्व मंत्री आणि राजकिय व्यक्तींची यादी सरकारकडे मागितली आहे.)

अवांतरः खाते उघडण्यासंबंधीचा दुवा व ईतर माहीती केवळ "माहीती"साठीच दिलेले आहे. दुरुपयोग करु नये. नंतर नसते लचांड नको. :)

-सँडी
एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.

मिसळभोक्ता's picture

6 Apr 2009 - 10:28 pm | मिसळभोक्ता

उलटं रुपया महाग होण्याची शक्यता अधिक.

उग्गाच कैच्याकै बोलू नकोस. अवलियाला विचार.

-- मिसळभोक्ता

सँडी's picture

7 Apr 2009 - 9:54 am | सँडी

वा! काय भाषा आहे?
लवकर बरे व्हा!

-सँडी
एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.

प्राजु's picture

6 Apr 2009 - 7:08 am | प्राजु

अतिशय माहितीपूर्ण आणि उत्तम लेख , राजे!!!
अशाच उत्तम लेखांची तुमच्याकडून अपेक्षा आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चिरोटा's picture

6 Apr 2009 - 10:58 am | चिरोटा

इतका पैसा भारतात परत येईल का ? किंवा तसे करण्याचे कष्ट कोणी घेइल का?

नाही.तशी शक्यता अजिबात नाही.जर स्विस बॅन्केच्या नियमानुसार खाते गुप्त ठेवण्याच नियम असेल तर होणार नाही.शिवाय वर म्हन्टल्याप्रमाणे ह्यात सर्व पक्षीय्-डावे,उजवे,मधले,वरचे,खालचे,टोकाचे सगळेच आहेत.एवढेच नव्हे तर ह्यात 'सन्माननिय' उद्योगपती,स्टॉक ब्रोकर्स्,बिल्डर्स, साखर्/गूळ्/तान्दूळ्/गहू/डाळ सम्राटदेखील आहेत.तेव्हा ह्या सगळ्यान्ची यादी प्रसिध्ध करायची म्हणजे मरण ओढवण्यासारखेच आहे.!! तेव्हा ही निवडणूकीचीच बडबड आहे.
Covert Operation- देशादेशातली गुप्तचर खाती अश्या प्रकारची कामे करतात.म्हणजे भारतिय गुप्तचर खाते(रॉ) आणि स्विस गुपचर खाते ह्याच्या सहकार्याने अश्या प्रकारची कामे करता येतात्.अर्थात सत्तेवर असणार्यान्चे-पन्तप्रधान्/ग्रुहमन्त्री ह्यान्चे तरी किमान पाठबळ पाहिजे.बर्‍याच वेळा खाजगीत उच्च अधिकार्‍याना,राजकारणी लोकाना कोणी कुठे पैसा ठेवलाय ह्या विषयी सर्व माहिती असते.पण 'तेरी भी चूप..' नुसार कोणीच काही बोलत नाही.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

अविनाशकुलकर्णी's picture

6 Apr 2009 - 2:15 pm | अविनाशकुलकर्णी

बोफोर्स चा पैस कुठे परत आला?? का आला/

चिरोटा's picture

6 Apr 2009 - 2:28 pm | चिरोटा

बोफोर्स प्रकरणात बाहेरुन लाच घेतली होती.म्हणजे पैसा देशात आला होता. :D
विन चड्डा, हिन्दुजा ह्या एन्.आर्.आय. दलाल लोकानी देशातल्या राजकारणी आणि बाबू लोकाना तोफा खरेदी करण्यासाठी लाच वाटली असा तो आरोप होता.आजच्या मानाने 'किस झाड की पत्ती' असा ६४ कोटी रुपयान्चा घोटाळा होता.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

अभिरत भिरभि-या's picture

6 Apr 2009 - 6:09 pm | अभिरत भिरभि-या

अरब म्हणजे नक्की किती ?
अरब म्हणजे मराठीतले अब्ज काय ?
मले हिंदी येत नाय :(
(अरबी) अभिरत

सागर's picture

7 Apr 2009 - 7:26 am | सागर

होय अरब म्हणजे अब्जच :)
डोक्याला फडकं बांधुन २ दोर्‍या बांधणारे अरब नव्हे.... ते अरब वेगळे ;)

चित्रादेव's picture

7 Apr 2009 - 1:43 am | चित्रादेव

तरीच म्हटले असा पर्याय असता तर आमच्या कानावर कसे आले नाही कधीच.

काश ही माहीती जरा कोणी त्या गरीब्,अडाणी जनतेपर्यन्त पोहचवू शकेल. कारण ह्या चोर नेत्यांची भाषण एकून त्याना मतदान करणारी हीच गरीब जनता असते.
काल टीवी वर मनेका का मेनका काय कचाकचा भांडत होती त्या साद्वी बरोबर. छे! कठीण आहे.

चिरोटा's picture

7 Apr 2009 - 10:53 am | चिरोटा

कारण ह्या चोर नेत्यांची भाषण एकून त्याना मतदान करणारी हीच गरीब जनता असते

गरीब जनता तशी स्वभावाने गरीब नसते.बाहेरच्या जगाला भारतिय लोकान्ची (गरीब्/मध्यम्/श्रिमन्त सगळे) ओळख बेरकी आणि चालू अशी आहे.अगदी आपण दुसर्‍या प्रान्तात गेलो तरी आपल्याला तसा अनुभव येतो.रिक्षावाले,दुकानदार्,भाजीवाले कोणीही घ्या.माणूस बाहेरून आला आहे हे कळले की चान्स मारायचा आणि लुबाडायचे ही व्रुत्ती भारतात सगळीकडे दिसते.निवडून आल्यावर राजकिय नेत्यान्मध्ये हीच व्रुत्ती दिसते.जयललिताना मत देणार्‍या लोकाना जयललिता कोण/कशा आहेत हे पक्के माहित असते.तीच गोष्ट लालू,पवार्,मायावती याना निवडुन देणार्‍यान्ची.
क्ष्^न + य्^न = झ्^न

हे २००९ मध्ये लिहले होते!

अर्धवटराव's picture

29 Oct 2014 - 12:50 am | अर्धवटराव

स्वतंत्र भारताकडे एव्हढा पैसा आला कुठुन? आपलं वार्षीक बजेट किती? ६५ वर्षांच्या बजेटची बेरीज तरी एव्हढी होते काय? मुळात एव्हढा पैसा निर्माण कधि झाला? मुकेश अंबानीकडे $२.५ अब्ज पेक्षा थोडा कमि पैसा आहे. म्हणजे आजवर भारताने ६०० मुकेश अंबानी स्वीस बँकेत कोंबले म्हणावं काय? शिवाय जगातल्या इतर देशातल्या बॅकांमधे अधिकचा पैसा कोंबला? आणि हे सर्व कॅश ?

टवाळ कार्टा's picture

29 Oct 2014 - 8:18 am | टवाळ कार्टा

याला म्हणतात अस्सल पाठिंबा :)

अर्धवटराव's picture

29 Oct 2014 - 10:09 pm | अर्धवटराव

.

टवाळ कार्टा's picture

29 Oct 2014 - 10:16 pm | टवाळ कार्टा

चुकीच्या गणिताला

अर्धवटराव's picture

29 Oct 2014 - 11:00 pm | अर्धवटराव

:)

क्लिंटन's picture

29 Oct 2014 - 10:46 pm | क्लिंटन

हे आकडे २००९ मधले म्हणजे व्हॉट्सऍप लोकप्रिय व्हायच्या आधीचे आहेत. तरीही त्यावेळीही कल्पनाशक्तीची इतकी भरारी बघून मिपाच्या भाषेत डोळे पाणावले. १५०० अब्ज डॉलर म्हणजे १५०० बिलिअन डॉलर म्हणजे १.५ ट्रिलिअन डॉलर. भारताचे जीडीपीही २००९ मध्ये तितके नव्हते.

आणि मला एक प्रश्न नेहमी पडतो.समजा १.५ ट्रिलिअन डॉलर भारतीयांनी स्वीस किंवा अन्य कुठल्या बॅंकांमध्ये ठेवले असले तरी त्या बॅंकांच्या बॅलन्स शीटमध्ये लाएबिलिटी साईडला ते दिसायला हवेत ना? समजा त्या खातेदारांची नावे माहित नसली तरी आकडे तरी दिसायला हवेत की नाही? स्वित्झर्लंडचे २००९ मध्ये पर कॅपिटा नॅशनल इनकम होते ६६,६३० डॉलर . तर २००९ मध्ये लोकसंख्या होती ७७ लाख ८५ हजार. आकडेमोडीच्या सोयीसाठी ८० लाख (८ मिलिअन) मानू. ६६,६३० गुणिले ८ मिलिअन बरोबर ५३३,०४० मिलिअन डॉलर बरोबर ५३३ बिलिअन डॉलर. यातले अगदी सगळे पैसे बॅंकेत ठेवले असे मानले तरी हा आकडा १.५ ट्रिलिअन पेक्षा एक तृतीयांशाहूनही कमी आहे. म्हणजे अख्ख्या स्वित्झर्लंडमधील बॅंकांमध्ये स्वीस लोकांनी एकही पैसा ठेवला नाही तरी एकूण डिपॉझिटच्या तिप्पट रक्कम केवळ भारतीयांकडून डिपॉझिट होते? हे सगळे पैसे खरोखरच भारतात आले तर स्वित्झर्लंड भिकेला लागेल :)

ब्यांकांमध्ये "ठेवले" याचा अर्थ ब्यांकेच्या लॉकरमध्ये कॅशने भरलेल्या थैल्या आहेत असा काहीसा पब्लिकचा समज आहे.

भारतात "आणायचे" म्हणजे त्या सगळ्या थैल्या एखाद्या मोठ्ठ्या जहाजात भरून मुंबै बंदरात आल्या आहेत आणि परतलेल्या काळ्या पैशांचा तो मंगल कलश** भूमीवर आणण्यासाठी सगळे सणासुदीचे कपडे घालून तयार झालेले आहेत असं काहीसं कल्पनारंजन उगाचच करतो.

--------
** मंगल कलश हे नाव काळा पैसा भारतात आणणार्‍या जहाजासाठी मस्त आहे. आय एन एस मंगल कलश. ;)

सतिश गावडे's picture

29 Oct 2014 - 11:11 pm | सतिश गावडे

आय एन एस मंगल कलश.

अफलातून कल्पना आहे. :)

काळा पहाड's picture

29 Oct 2014 - 11:39 pm | काळा पहाड

आय एन एस रामदेव

सुहास..'s picture

29 Oct 2014 - 10:53 pm | सुहास..

विषय घेतलास ते , उद्या देतो जरा डिट्टेल , आज राजकारणा विषयी लिहायचा कोटा संपलाय ..

श्रीरंग_जोशी's picture

29 Oct 2014 - 11:14 pm | श्रीरंग_जोशी

१५०० अब्ज डॉलर म्हणजे सध्याच्या विनिमय दराने ६० हजार अब्ज रूपयांपेक्षा अधिक रक्कम होईल.

१९९९ साली राज्यात आघाडीचे सरकार आले तेव्हा त्यांनी युती शासनाने राज्यावर ३० हजार कोटी (म्हणजे ३० अब्ज) रूपयांचे कर्ज करून ठेवले आहे व राज्याच्या तिजोरीत उंदीर फिरताहेत असा आरोप केला होता.

१५ वर्षांनी आघाडी सरकारने सत्ता सोडताना हेच कर्ज जवळजवळ दहा पटींनी वाढून ३ लक्ष कोटी (म्हणजे ३०० अब्ज) रूपये झाले आहे.

धाग्याच्या शीर्षकातील रकमेतून हे कर्ज ३०० वेळा फेडता येईल :-) .

दिवाकर देशमुख's picture

3 Nov 2014 - 1:59 pm | दिवाकर देशमुख

जरा गुजरात वर देखील किती कर्ज आहे त्याचे आकडे देखील नजरे खाली घालुन घ्या. म्हणतो मी ;)

चौकटराजा's picture

30 Oct 2014 - 11:08 am | चौकटराजा

मला वाटते हे पूर्ण प्रकरण फक्त मते मिळविण्यासाठी होते. काही मुद्दे विचारार्थ देत आहे.
१. या एकूणच रकमेविषयी अनेकांचे मतभेद आहेत.
२. हा सर्व पैसा " काळा" म्हणजे कर न भरलेला हे गृहित फार मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष चुकीचे ठरू शकते.
३.ही काही रक्क्कम धाग्यात दाखविली आहे तीत हवाला चे पैसे ही समाविष्ट असण्याची शक्यता आहे. सबब ते मिळणे
शक्य नाही.
४.कालच एका चर्चेत असे सांगण्यात आले की जागतिक बॅंकेच्या पहाणीनुसार सुमारे १६० देशांचे सरासरी " असे " उत्पन्न
३४ टक्के आहे. त्यात भारताचे जी डी पी च्या २१ टक्के आहे. त्यात भारतातील " काळा " पैसा ही आला. म्हणजेच
हे सगळे स्वीसचे पैसे मिळाले तरी भारताचे उखळ पांढरे होईलच असे नाही. बाकी याचे खरे रूप काळच दाखवेल.

मराठी_माणूस's picture

30 Oct 2014 - 12:06 pm | मराठी_माणूस

ह्या विषयावर कालच्या अग्रलेखात बराच प्रकाश टाकलेला आहे.
http://www.loksatta.com/sampadkiya-news/row-over-black-money-remark-1035...

दशानन's picture

30 Oct 2014 - 9:31 pm | दशानन

हा खूप जुना लेख आहे, वर दिलेले आकडे तेव्हा हेडलाइन असत सर्व न्यूज मध्ये!

पिंपातला उंदीर's picture

31 Oct 2014 - 7:50 pm | पिंपातला उंदीर

माध्यमांमधून सांगितल्या जाणार्या घोटाळ्याच्या रकमा ना काही आधार नसतो . ३जी घोटाळा आणि कोळसा घोटाळा हि याची उदाहरण . मात्र खरी गम्मत हि नाही . मनमोहन सरकारवर याच माध्यमांचा हवाला देऊन आरोप करणारे लोक आता मात्र 'आपल ' सरकार आल्यावर त्याना 'सांभाळून ' घेत आहेत ते बघून डोळे पाणावले . आता रोबर्ट वाध्रा आणि बोफोर्स प्रकरणात गांधी घराण कस निर्दोष आहे याचे पण पुरावे नमोभक्त आणि कॉंग्रेस वाले एकत्र देतील कारण इस हमाम मे सब नंगे है हे सत्य दोन्ही बाजूच्या आंधळ्या भक्ताना जितक्या लवकर कळेल तितके बरे . वाध्रा प्रकरणात बदले कि राजनीती नही करेंगे असे म्हणून आणि काळ्या पैश्याच्या प्रकरणात सपशेल कोलांटी उडी मारूनसिद्ध केल आहे . सीमेवर सैनिक मरत असताना शरीफ यांच्या आईला साडी पाठवणे वैगेरे वैगेरे तर आहेच . हेच मनमोहन सिंग यांनी केल असत तर त्यांचे कसले कसले फोटो नमोभक्तानि फिरवले असते देव जाणे . Bottom line is सरकार कुणाचेही येवो मुलभूत बदल होण्याची शक्यता फारकमी असते . एका ठराविक चौकटीत त्याना काम करावे लागते . मग ते ममो असोत कि नमो

आजानुकर्ण's picture

4 Nov 2014 - 8:27 am | आजानुकर्ण

मनमोहन सरकारवर याच माध्यमांचा हवाला देऊन आरोप करणारे लोक आता मात्र 'आपल ' सरकार आल्यावर त्याना 'सांभाळून ' घेत आहेत ते बघून डोळे पाणावले

हे बाकी खरं बोललात. आपले प्रधानसेवक प्रचाराच्या काळात 'एकदा काळा पैसा भारतात आणला की प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा करता येतील' अशा स्वरुपाची घाऊक विधाने करत असत. आता मात्र रेडिओवरील चर्चेत नक्की किती काळा पैसा आहे याबाबत ते अनभिज्ञ असल्याचे कळले.

नमो नमो!!

दिवाकर देशमुख's picture

3 Nov 2014 - 1:58 pm | दिवाकर देशमुख

तर कृपया नरेंद्र मोदी यांना कळवावे त्यांना काळा पैसा किती आहे हे निवडुन आल्यानंतर विसर पडलेला आहे