पैशाची कहाणी भाग २: कमोडिटी मनी

क्लिंटन's picture
क्लिंटन in काथ्याकूट
4 Apr 2009 - 11:28 am
गाभा: 

यापूर्वीचे लेखन

पैशाची कहाणी भाग १: वस्तूविनिमय पध्दती

पैशाची कहाणी भाग २: कमोडिटी मनी

मागील भागात आपण वस्तूविनिमय पध्दतीच्या मर्यादा बघितल्या आणि त्यामुळे सर्वांना मान्य असे माध्यम निर्माण करणे गरजेचे झाले हे ही बघितले.आता हे माध्यम म्हणून काय वापरावे हा प्रश्न होता.माध्यमासाठी वापरलेल्या वस्तूवरून पैशाचे तीन प्रकार सांगता येतील.पहिला म्हणजे कमोडिटी मनी (Commodity Money), दुसरा रेप्रेझेन्टेटिव्ह मनी (Representative Money) आणि तिसरा म्हणजे फ़ियाट मनी (Fiat Money).या तीन प्रकारांना योग्य मराठी शब्द मला मिळाले नाहीत म्हणून इंग्रजी शब्दच वापरत आहे.

कमोडिटी मनीमध्ये एखाद्या वस्तूची स्वत:ची किंमत आहे अशा वस्तू माध्यम म्हणून वापरात होत्या.उदाहरणार्थ सोने किंवा चांदी यासारखे बहुमूल्य धातू माध्यम म्हणून वापरात आणले गेले.म्हणजे वस्तूविनिमय पध्दतीमध्ये असलेली एक मोठी अडचण दूर झाली.म्हणजे एखाद्याला दूध विकून तांदूळ विकत घ्यायचे असतील तर तो त्याच्याजवळचे दूध एकाला विकून त्याबद्दल सोने घेऊ शकेल.आणि तेच सोने वापरून तांदूळ विकत घेऊ शकेल.म्हणजे आपल्याकडील दूध विकत घेऊन आपल्याला तांदूळ विकणारा माणूस शोधायचे कठिण काम करावे लागणार नाही.

कमोडिटी मनीमध्ये माध्यम म्हणून वापरल्या जाणारी वस्तू सहजगत्या उपलब्ध नको तसेच त्या वस्तूचे उत्पादन सहजगत्या करता येऊ नये.उदाहरणार्थ पाणी हे सहजगत्या उपलब्ध असलेली वस्तू माध्यम म्हणून वापरली तर असे वाटू शकेल की कोणीही गरीब राहणार नाही.कारण प्रत्येकाकडे मुबलक प्रमाणावर पैसा (पाणी हे माध्यम) उपलब्ध असेल.पण त्या परिस्थितीत त्या माध्यमाची काही किंमतच राहणार नाही.म्हणजे समजा विक्रेत्याकडून एखादी वस्तू १० माप पाण्याची किंमत चुकती करून विकत घ्यायची असेल तर त्याचवेळी त्याच वस्तूसाठी १५ माप पाणी देणारा ग्राहकही असू शकेल.तेव्हा विक्रेता ती वस्तू १५ माप पाणी देणार्‍यासच विकेल.पाणी मुबलक उपलब्ध असल्यामुळे त्याच वस्तूसाठी २०,५०,१००,२५०,५००,१००० माप पाणी देणारे ग्राहकही सापडतीलच.तेव्हा विक्रेता आपली वस्तू अधिकाधिक किंमत देऊ शकणार्‍या ग्राहकालाच देतील.म्हणजे त्या चलनाची काहीही किंमत राहणार नाही.हिटलर सत्तेवर येण्यापूर्वी एक जुडी भाजीसाठी पोती पोती भरून पैसे द्यावे लागायचे तशीच परिस्थिती काही प्रमाणावर निर्माण होईल.हे उदाहरण देण्यामागचा हेतू म्हणजे माध्यम म्हणून वापरली जाणारी वस्तू सहजगत्या उपलब्ध नको या मुद्द्याच्या समर्थनार्थ आहे.पाणी हे चलन म्हणून वापरल्यास इतर अडचणी निर्माण होतील त्याचा अंतर्भाव यात केलेला नाही.तसेच त्या माध्यमाचे सहजगत्या उत्पादन करता येत असेल तरीही अशीच परिस्थिती निर्माण होईल.तेव्हा या माध्यमासाठी वापरलेली वस्तू काही प्रमाणात तरी दुर्मिळ हवी.

तसेच कमोडिटी मनीसाठी वापरलेल्या वस्तूचा स्वीकार माध्यम म्हणून होण्यासाठी समाजातील बहुतांश लोकांना तरी त्या वस्तूपासून उपयोग झाला पाहिजे.नाहितर ती वस्तू सहजगत्या माध्यम म्हणून स्विकारली जाणार नाही. याचे कारण म्हणजे आपण ज्या काळाची चर्चा सध्या करत आहोत त्या काळात सर्व ठिकाणी राजसत्तेने एखादी गोष्ट माध्यम म्हणून स्विकारायची सक्ती केलेली नव्हती आणि सर्वसहमतीने एखादी वस्तू माध्यम म्हणून वापरात आणली गेली होती. समजा समाजातील मूठभर लोकांना दगडांचा उपयोग होत आहे असे समजू या आणि त्या मंडळींना दगड माध्यम म्हणून वापरावे असे वाटते. राजसत्तेने सक्ती केल्यास गावात दगड (पाण्याप्रमाणे मुबलक प्रमाणात नसतील तर) सुध्दा चलन म्हणून वापरले जाऊ शकले असते पण तशा सक्तीच्या अभावी दगड ही बहुतांश लोकांसाठी निरुपयोगी वस्तू असल्यामुळे तिचा माध्यम म्हणून वापर होणे कठिण होते.असे का यावर थॊडा विचार केल्यावर माझ्या लक्षात एक गोष्ट आली.समजा आज सोने हे माध्यम म्हणून वापरात आहे.समजा भविष्यकाळात दुसरे काही माध्यम म्हणून वापरात आले आणि सोने मागे पडले तर आपल्याकडे असलेल्या सोन्याची चलन म्हणून काही किंमत नाही पण त्याच सोन्याचे दागिने बनविता येतील आणि काहीतरी उपयोग होऊ शकेल.पण याऐवजी दगडासारखी निरूपयोगी वस्तू माध्यम म्हणून सध्या वापरात असेल आणि नंतर माध्यमात बदल झाला तर आपल्याकडे असलेल्या दगडांचे करायचे काय हा प्रश्न पडेलच.म्हणून कमोडिटी मनीसाठी वापरात असलेल्या माध्यमाचा दुसरा गुणधर्म हा की त्याची स्वत:ची उपयुक्तता समाजातील बहुसंख्य लोकांना असली पाहिजे. सोन्याचांदीविषयीचे आकर्षण जगभर आढळते.त्यामुळेच जगात सर्वत्र या दोन धातूंची उपयुक्तता लोकांना वाटत होती.आणि या दोन धातूंचा चलनाचे माध्यम म्हणून उपयोग झाला. सोने तृणवत मानणारे लोक समाजात असले तरी ते खूप कमी संख्येने असतात.जर समाजातील बहुसंख्य लोक माध्यम म्हणून सोन्याचा वापर करू लागले तर अशा लोकांपुढेही दुसरा पर्याय राहणार नाही आणि ते ही सोन्याचाच माध्यम म्हणून वापर करतील.

या प्रकारच्या कमोडिटी मनीचे उदाहरण म्हणजे द्वितीय महायुध्दात इंग्लिश सैन्याने पकडलेल्या जर्मन युध्दकैद्यांची छावणी.या युध्दकैद्यांना रेडक्रॉस कपडे,खाणे,सिगरेट वगैरे गोष्टी पुरवत असे.या युध्दकैद्यांनी सिगरेटचा वापर कमोडिटी मनी म्हणून त्यांच्या त्यांच्यात केला होता.सिगरेट ही वस्तू वर दिलेल्या सगळ्या अटींची पूर्तता करते हे लक्षात येईल.पहिले म्हणजे बाहेर सिगरेट कितीही मुबलक प्रमाणात उपलब्ध असली तरी युध्दकैद्यांच्या छावणीत रेडक्रॉस देईल तितक्याच प्रमाणात सिगरेट उपलब्ध होती.आणि दुसरे म्हणजे बहुतांश सैनिकांना त्या गोष्टीची उपयुक्तता होती.

आता या लेखमालेच्या पुढील भागात Representative Money विषयी अधिक लिखाण करेन. सुटसुटीत व्हावे म्हणून सगळी माहिती एकाच लेखात न टाकता स्वतंत्र लेख करत आहे.

क्रमश:

संदर्भ:

१) Macroeconomics हे ग्रेगरी मॅनकिव या हावर्ड विद्यापीठातील अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांचे पुस्तक.

२) International Economics हे रॉबर्ट कारबॉ या मध्य वॉशिंग्टन विद्यापीठातील अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांचे पुस्तक. त्यातील बहुतांश डोक्यावरून गेले हे सांगायलाच नको आणि मी त्या पुस्तकात अर्ध्याच्या पुढे जाऊ शकलो नाही.पण त्यात कमोडिटी मनी आणि इतर गोष्टी चांगल्या समजावून सांगितल्या होत्या. त्यावर मी माझा विचार करून माझी उदाहरणे दिली आहेत.

प्रतिक्रिया

मराठमोळा's picture

4 Apr 2009 - 1:29 pm | मराठमोळा

लेख महितीपुर्ण आहे.
एन सी डी ई एक्स च्या कार्यप्रणाली बद्दल थोडी माहिती दिली असती तर अजुन छान वाटले असते.

आपला मराठमोळा
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

क्लिंटन's picture

4 Apr 2009 - 7:12 pm | क्लिंटन

>>लेख महितीपुर्ण आहे.

धन्यवाद मराठमोळा.

>>एन सी डी ई एक्स च्या कार्यप्रणाली बद्दल थोडी माहिती दिली असती तर अजुन छान वाटले असते.
एन सी डी ई एक्स म्हणजे National Commodity and Derivatives Exchange Ltd हे मला गुगलून आताच समजले.त्यांच्या संकेतस्थळावरून या संस्थेचे काम वेगळे असावे असे वाटते.त्याचा या लेखातील ’कमोडिटी मनी’ या संकल्पनेबरोबर फारसा संबंध नसावा असे वाटते. तरी कोणा मिपाकराला अधिक माहिती असल्यास ती इथे द्यावी ही विनंती.मला तरी याविषयी फारसे काही माहित नाही.

>>कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
हे बाकी खरंच. पण मला अर्थशास्त्राचा कर्करोग झाला आहे असे समजू नका बरं का.

---विल्यम जेफरसन क्लिंटन

मराठमोळा's picture

4 Apr 2009 - 7:41 pm | मराठमोळा

एन सी डी ई एक्स आपल्याकडे नविन संकल्पना (२००३ पासुन कार्यरत) आहे आणी अजुनही पुर्णपणे स्थिर अवस्थेत नाहीये.
ज्याप्रमाणे आपले बी एस ई आणी एन एस ई काम करते त्याप्रमाणे तुम्ही लेखात उदाहरणे दिल्याप्रमाणे (म्हणजेच कमोडिटी मनी चा वापर करुन) ही संस्था कमोडिटी एक्स्चेंज चे कार्य करते.

आपला मराठमोळा
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

सागर's picture

5 Apr 2009 - 1:52 pm | सागर

हे बाकी खरंच. पण मला अर्थशास्त्राचा कर्करोग झाला आहे असे समजू नका बरं का.

:) पूर्णपणे सहमत

अर्थशास्त्रापेक्षा क्लिंटनसाहेबांची दुसर्‍या महायुद्धावरच्या इतिहासावर जास्त पकड आहे... हा हा....
लेख वाचायला वेळ लागतो आहे. दोन्ही भाग वाचून प्रतिसाद देईन ... :)

प्रकाश घाटपांडे's picture

4 Apr 2009 - 1:50 pm | प्रकाश घाटपांडे

आमच्यासारख्या अर्थनिरक्षराला समजेल अशा सोप्या भाषेत विवेचन. धन्यवाद क्लिंटन साहेब.
मराठमोळा-

एन सी डी ई एक्स च्या कार्यप्रणाली बद्दल थोडी माहिती दिली असती तर अजुन छान वाटले असते.

आम्हाला भ्या वाटल अस्तय. हे प्रकरन काय आरडीएक्स वानी हाय कि काय?
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

दशानन's picture

4 Apr 2009 - 2:22 pm | दशानन

>>>आमच्यासारख्या अर्थनिरक्षराला समजेल अशा सोप्या भाषेत विवेचन. धन्यवाद क्लिंटन साहेब.

अगदी अगदी हेच म्हणतो !

सुंदर लेख.

मराठी_माणूस's picture

4 Apr 2009 - 2:20 pm | मराठी_माणूस

माहीतीपुर्ण सदर, धन्यवाद

शाल्मली's picture

4 Apr 2009 - 6:35 pm | शाल्मली

११वी - १२वीत असताना हे सगळे आम्हाला इकोनॉमिक्समध्ये होते.
परत एकदा त्याची उजळणी करताना छान वाटले.
पुढचा भागही लवकर येऊद्या.

--शाल्मली.

क्लिंटन's picture

4 Apr 2009 - 7:16 pm | क्लिंटन

मराठमोळ्याबरोबरच घाटपांडे साहेब, राजे, मराठी माणूस, शाल्मली आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. शाल्मली आपल्याला अर्थशास्त्रासारखा सुंदर विषय ११वी-१२वी पासून अभ्यासता आला याबद्दल आपला हेवा वाटतो.

---विल्यम जेफरसन क्लिंटन

मदनबाण's picture

5 Apr 2009 - 3:43 am | मदनबाण

व्वा.उत्तम लेख्,,,सोप्या भाषेमुळे लेख समजला... :)

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

सुधीर कांदळकर's picture

5 Apr 2009 - 4:35 pm | सुधीर कांदळकर

माझें आर्थिक अज्ञान थोडेंफार कमी झालें.

रंजक पण उपयुक्त माहिती. सोप्या सुगम आणि रंजक भाषेंत. इतका क्लिष्ट विषय इतक्या सोप्या भाषेंत! सोपें लिहिणें जास्त कठीण असतें.

धन्यवाद.

सुधीर कांदळकर.

अनिल हटेला's picture

6 Apr 2009 - 7:53 am | अनिल हटेला

>>इतका क्लिष्ट विषय इतक्या सोप्या भाषेंत! :-)

म्हणुनच वाचतोये आणी विशेष म्हणजे सगळच डोक्यावरून नाय जातये !! ;-)

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..