मिसळपावची जडण घडण !

नीलकांत's picture
नीलकांत in काथ्याकूट
1 Apr 2009 - 3:59 pm
गाभा: 

आपलं मिसळपाव वापरायला जास्तीत जास्त सोप्पं आणि सुरेख करण्याचं ठरलेलं आहे. ह्या कामात मिसळपाववर भरभरून प्रेम करणार्‍या मिपाकरांना या धाग्यावर मिसळपाव बद्दल अपेक्षा, बदल आणि वेगवेगळ्या संरचना सुचवण्याबद्दल आवाहण करीत आहोत.

मिसळपाव. कॉमवर पहिल्यांदा आल्यावर तुम्हाला काय आवडलं? ते अधीक चांगलं कसं करता येईल?
मिसळपाव. कॉमवर पहिल्यांदा आल्यावर तुम्हाला काय आवडलं नाही? ते बरोबर कसं करता येईल?
मिसळपाव. कॉमवर नोंदणी करतांना काय अडचणी जाणवल्या? त्यात काही बदल सुचवायचे आहेत का?

रोजच्या काळात मिसळपाववर वावरतांना काय अश्या बाबी आहेत की ज्या अधीक चांगल्या केल्या गेल्या पाहिजेत?
कुठल्या अश्या सुविधा आहेत की ज्या मिसळपाववर दिल्याच पाहिजेत?
अश्या कुठल्या सुविधा आहेत की ज्या मिसळपाववर नसल्या तर चालतील?

लेख लिहीतांना काही अडचणी आहेत का?
लेखन विषय, लेखन प्रकार मधील विषय अपुरे आहेत का?

वारंवार विचारले जाणारे प्रश्न संगतवार लिहावेत का? अधीक काही प्रश्न त्यात टाकावेत का?

मिसळपाव जवळ भरपूर लेखन खजिना आहे. तो नव्या लोकांसमोर कसा मांडावा? याबाबत काही सुचवता येईल का?

रंगसंगती? दूव्यांची जागा, भाषा बदल आदी सर्व बाबींवर येथे चर्चा करता येईल. मात्र सर्व्हर आणि इतर सुरक्षीततेच्या बाबींवर चर्चा येथे नको. त्यासाठी मला किंवा सरपंचला व्य. नि. पाठवावा.

मिसळपाव तुमचं आहे, त्यामुळे तुम्ही या मिसळपावच्या नव्या जडणघडणीत सामील होऊ शकता. तुमची मते जरूर कळवा. तांत्रीक बाबतीत लिहीण्याची गरज नाही (ते तसं लिहीलंत तर हरकत नाही :) ) मात्र एक सदस्य म्हणून 'असं झालं तर उत्तम होईल.' असं जे वाटतं ते हवं आहे. बाकी जे शक्य झालं तेवढं देण्याचा मिसळपाव टीमचा प्रयत्न असेल.

या धाग्यावर या विषयी आधी चर्चा झालेली आहे. ती सुध्दा संदर्भ म्हणून वापरल्या जाईलच.

प्रतिक्रिया

अवलिया's picture

1 Apr 2009 - 4:21 pm | अवलिया

१) कुठलाही धागा उघडला की त्याच लेखकाचे इतर लेख सुद्धा एखाद्या ब्लॉक मधे दिसले तर बरे
२) मु़ख्यपृष्ठावरील स्वागत, सुचना, जडणघडण हजर सभासद हे ब्लॉक लेखाच्या धाग्यात नाही दिसले तरी चालेल
३) हजर संपादक असा ब्लॉक दिला तर (किंवा सध्याचे सगळे संपादक ) बरे होईल

अजुन जसे वाटेल तसे टंकतो

--अवलिया

दशानन's picture

1 Apr 2009 - 4:24 pm | दशानन

छान प्रस्ताव !

१. सर्च काम करत नाही आहे रे, रिइंडेक्स कर ना प्लीज ;)

२. एखाद्या लेखा बरोबर त्याच लेखकाचे अथवा त्या लेखा संबधीत माहीतीशी योग्य असे दुवे त्या लेखाच्या खाली अथवा डाव्या समासामध्ये भेटावेत अशी व्यवस्था जी गरजेची आहे.

३. मिपा तर्फे सुचना / नियम व्यनी द्वारे मिळावेत अथवा ईमेल द्वारे.

४. बेस मेनू (मार्गदर्शन) खालील जागी पण असावा.

५. भाषा बदल शॉर्ट कि काम करत नाही आहे त्या बद्दल काही तरी करा.

६. अनुक्रमेद्वारे लेखन मिळू शकेल अशी सुविधा.

७. नवीन सदस्य हा ब्लॉक काढला तरी चालेल असे वाटते, नवीन कोण आले हे पाहणे गरजे नाही.

८. नवीन सदस्य च्या जागी सर्वात जास्त पाहिले गेलेले / प्रतिसाद दिले गेलेले लेख दिसले तर उत्तम.

जसे जसे आठवत जाईल तसे तसे लिहीत जाइनच.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

1 Apr 2009 - 4:26 pm | घाशीराम कोतवाल १.२

मिसळपाव. कॉमवर नोंदणी करतांना काय अडचणी जाणवल्या? त्यात काही बदल सुचवायचे आहेत का?
आमचे एक स्नेही यांनी मिसळ पाव वर नोंदणी केली पण खात चालु व्हायला चार दिवस लागले तर हा वेळ कमी करावा
जेणे करुन नविन सदस्यांना त्रास होणार नाहि

फक्त एक सुचना जर एखादा धागा काहि कारणामुळे अप्रकाशित झाला असेल तर त्याची सर्व ठिकाणा वरुन हकालपट्टी व्हावी तो कोठुन ही सदस्यांच्या नजरेस पडु नये

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

आनंद घारे's picture

1 Apr 2009 - 9:14 pm | आनंद घारे

जर एखादा धागा काहि कारणामुळे अप्रकाशित झाला असेल तर त्याची सर्व ठिकाणा वरुन हकालपट्टी व्हावी . तो कोठुन ही सदस्यांच्या नजरेस पडु नये

"तुम्हाला येथे येण्याची मुभा नाही " असे काहीतरी सध्या येते ते अपमानास्पद वाटते.
******

आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/

चिरोटा's picture

1 Apr 2009 - 4:35 pm | चिरोटा

आर्.एस्.एस. सेवा(Really Simple Syndication) असली तर उत्तम.
मोठे लेख्,लघु कथा(साधारण ३/४ ए-४ पाने) ह्याना save as pdf पर्याय.
क्ष्^न + य्^न = झ्^न

नरेश_'s picture

1 Apr 2009 - 4:37 pm | नरेश_

१ दिनांक, वार देता आल्यास उत्तम.
२ दररोजच्या मराठी वृत्तपत्राच्या लिंक्स देता आल्यास उत्तम.
३ .अशी सूचनापेटी कायमस्वरूपी मुख्यपानावर असावी जेणेकरून मिपाकर वेळोवेळी त्यात आपले बहुमूल्य अभिप्राय / मते/सूचना व्यक्त करतील .
इतरांनी केलेल्या सूचनापेटीतील सूचना गोपनीय ठेवल्या तरी चालतील , किंबहूना गोपनीयच ठेवाव्यात.
४. विषयानुरूप पार्श्वरंग उदा. काव्य असलेल्या ठिकाणी गुलाबी बॅकग्राऊन्ड दिल्यास ते शोभून दिसेल.

जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)

llपुण्याचे पेशवेll's picture

1 Apr 2009 - 4:48 pm | llपुण्याचे पेशवेll

शोधामधे एखाद्या लेखकाचे सर्व लेख दिसण्याची सुविधा असावी.
शोधकरताना लेखाच्या विषयावरून, लेखकावरून, गटवारीवरून शोधण्याची सुविधा असेल तर चांगले होईल. उदा. चतुरंगरावांची मधुशाला शोधताना लेखकाचे नाव 'चतुरंग' आणि विषय 'मधुशाला' अशा दोन्ही विषयांची गाळणी लावता आली तर उत्तम. म्हणजे चतुरंगरावांची मधुशाला ही सापडलेल्या निकालात सर्वात वरती दिसेल.
तसेच सर्वात गाजलेल्या चर्चा ज्यात प्रतिसाद आणि वाचने यांची संख्या सर्वाधिक आहे ते दिसण्याची वेगळी सोय हवी.
विषयातील प्रतिसाद नवीन पानावर गेल्यास म्हणजे ५० पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्यास नवीन प्रतिसादापर्यंत पोचण्यासाठीचा मुख्यपृष्ठावरचा दुवा काम करीत नाही. त्यावर काहीतरी उपाययोजना व्हावी.

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

शक्तिमान's picture

1 Apr 2009 - 4:49 pm | शक्तिमान

पूर्वी एका काथ्याकुटात मी दोन सूचना केल्या होत्या.
त्या परत येथे मांडत आहे.

१. मिपावरील लेखसूची मधील लेखांचा क्रम हा प्रतिक्रियेप्रमाणे ठरतो. ज्या लेखावर काहीच वेळापूर्वी प्रतिक्रिया आली आहे.. तो लेख सर्वात वर येतो. ही व्यवस्था चांगली आहे.
यात अधिक भर म्हणून 'सॉर्ट लेख बाय नंबर ऑफ रीप्लायज्' (प्रतिसाद-संख्याअनुक्रमे लेखक्रम लावणे) असा पर्याय पुरवता येईल का?
म्हणजे ज्या लेखावर (साहित्यप्रकारावर) सर्वात जास्त प्रतिक्रिया असतील तो सर्वात वर येईल. यामुळे जुने उत्तम लिखाण शोधणे सोपे जाईल....

२. बर्‍याचदा असे आढळते की लेखाची वाचने ५०० च्या वर जातात पण लेखावर प्रतिसाद ५-६च असतात. यामागचे एक महत्वाचे कारण म्हणजे प्रतिक्रिया लिहिण्याचा कंटाळा... (पुरावा: कुठ्ल्याही कौलाला १०-१५ मतं नक्कीच मिळतात.. कारण एका क्लिकमध्ये मत नोंदवता येते.. पण प्रतिक्रियेचे तसे नाही.) यावर उपाय म्हणून प्रत्येक लेखावर (कवितेवर..इ.) 'लेख आवडला ' अशा स्वरूपाचे बटण्/लिंक पुरवता येईल का? एखाद्याला लेख आवडला तर तो त्यावर क्लिक करून तसे दर्शवू शकतो. एका सदस्याला एकदाच क्लिक करता येईल.
म्हणजे मग आपण जशी वाचन संख्या दाखवतो तसेच लेख आवडणार्‍यांची संख्याही दाखवता येईल. याची पुढची पायरी म्हणजे १ ते ५ अशी रेटींगची व्यवस्थाही करता येईल (जसे यूट्युब व्हिडीयोज् ला असते. ). आणि मग यावरही सॉर्टींग चा पर्याय दिला तर उत्तमोत्तम लेखन झट्क्यात सापडवता येईल..

नया है वह's picture

1 Apr 2015 - 3:35 pm | नया है वह

'लेख आवडला ' अशा स्वरूपाचे बटण्/लिंक पुरवता येईल का? एखाद्याला लेख आवडला तर तो त्यावर क्लिक करून तसे दर्शवू शकतो. एका सदस्याला एकदाच क्लिक करता येईल.
म्हणजे मग आपण जशी वाचन संख्या दाखवतो तसेच लेख आवडणार्‍यांची संख्याही दाखवता येईल. याची पुढची पायरी म्हणजे १ ते ५ अशी रेटींगची व्यवस्थाही करता येईल (जसे यूट्युब व्हिडीयोज् ला असते. ). आणि मग यावरही सॉर्टींग चा पर्याय दिला तर उत्तमोत्तम लेखन झट्क्यात सापडवता येईल..

दिपक's picture

1 Apr 2009 - 4:57 pm | दिपक

१)"लेखन करा" ह्या लिंकवर टिचकी मारल्यानंतर "मिपाचे धोरण" पहिले दिसायला हवे.
२) एकाच लेखकाचे लेखन(फक्त त्याने सुरु केलेला धागा) अनुक्रमे दिसु शकेल काय.?
३)संपादक,नीलकांत आणि तात्या ह्यांच्या व्यक्तीरेखांची लिंक मुखपुष्ठावर दिसु शकेल का? (काही अडचणी आल्या तर मदतीसाठी).

प्राजु's picture

1 Apr 2009 - 5:33 pm | प्राजु

१.कोणत्याही लेखकाला जसे.. "माझे लेखन" मध्ये स्वतःचे लेख पहाता येतात तसेच.. त्याला इतर लेखकांचे लेखनही पाहता यावे. म्हणजे शोधत बसावे लागणार नाही.
एखाद्याच्या नावापुढे टिचकी मारल्यावर त्याच्या वाटचालीत त्याचे फक्त लेखन, आणि दुसर्‍या टॅग मध्ये (जसे आता आहे) त्याच्या प्रतिक्रियांसहीत त्याचे लेखन दिसावे.
२. एखाद्या लेख उघडला की, त्याच प्रकारातले इतर लेख (हे ही वाचून पहा) या टॅग खाली दिसावेत.. मग ते त्याच लेखकाचे असावेत असे काही नाही..
३. फोटो चढवताना ती फ्लिकर किंवा पिकासावर चढवून मग इथे चढवण्यापेक्षा डायरेक्ट हार्डडिस्क वरून चढवता यावी यासाठी एखादा ब्राऊसर असावा..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्राजू ताई,

इतर लेखकांचे लेखन पाहता येते.
जर मला तुम्ही लिहिलेले सर्व लेखन पहावयाचे असेल तर

www.misalpav.com/tracker/121/121

असं नवीन खिडकीत लिहून एंटर केले की आपले सर्व लेखन दिसेल.
ज्या लेखकाचं लेखन पहावयाचे असेल त्याचा बिल्ला नं आपल्याला माहिती असला की झालं.
याविषयी तात्यांनी इथं सविस्तर लिहिलं आहे.

प्राजु's picture

1 Apr 2009 - 5:41 pm | प्राजु

लेखन अप्रकाशित स्वरूपात साठवून ठेवण्याची सेवा ही गेले कित्येक दिवस काम करत नाहीये. ती चालू करावी.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

संदीप चित्रे's picture

1 Apr 2009 - 8:13 pm | संदीप चित्रे

प्राजु आणि राजे ('सर्च' आणि 'भाषा बदल शॉर्ट की'बाबत) यांनी मनकवडे असल्याप्रमाणे लिहून माझे टायपायचे कष्ट वाचवले... त्यांना धन्स :)

रेवती's picture

1 Apr 2009 - 7:22 pm | रेवती

पाककृती विभागात पेये ;) , मधल्यावेळचे खाद्यपदार्थ, पक्वान्ने, भाज्या असे उपविभाग केले तर पदार्थ शोधायला सोपे पडेल.
पाककृतीसंबंधी प्रश्न विचारायचे असल्यास वेगळा उपविभाग हवा; नाहीतर धाग्याचे नाव भारदस्त पदार्थाचे असते म्हणून
तो धागा उघडला की फक्त कृती हवी असल्याचे दिसते (आणि हिरमोड होतो ;)).
रेवती

त्यापेक्षा एक स्वतंत्र ब्लॉक तयार करा, वाचकांना कोणत्या विषयावर लेख , पाकृ , माहिती किंवा कविता हवी या संदर्भात. त्या ब्लॉकला आपली आवड असे साजेसे नाव देता येईल. म्हणजे मागणी तसा पुरवठा करता येईल ;)

जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)

अदि's picture

1 Jun 2015 - 1:29 pm | अदि

वाखू का बंद केल्य??? माझे वांदे झाले की राव... :( :( :(

अदि's picture

1 Jun 2015 - 4:40 pm | अदि

वाखू परत आल्या... धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड!!!

धमाल मुलगा's picture

1 Apr 2009 - 8:56 pm | धमाल मुलगा

मिपाच्या वेगवेगळ्या थिम्स बनवून त्या सदस्यांना निवडण्याची सोय करता येऊ शकेल काय?
नाही, आहे ती थिम लय भारी आहेच, पण होतं काय ना, की भर हापिसात मिपा उघडलं की सतरा टाळकी वळून वळून पाहतात. ती लालभडक रंगसंगती लक्ष खेचुन घेते (हा फायदा असला तरी आमच्यासारख्या हापिसातून चोरुन मिपा खेळणार्‍यांचा तोटाच की हो!)
तर काही न्युट्रल (मराठी?) थिम्स (पुन्हा मराठी?) मिपाला जोडून त्या ज्याला हव्या त्याने त्यातील एखादी निवडून वापरता येऊ शकेल काय?

-(हापिसातला चोरटा जालभटक्या) ध मा ल.

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

नाटक्या's picture

1 Apr 2009 - 10:14 pm | नाटक्या

तात्या/निलकांत,

काल आपल्या चर्चेचा सारांश मी येथे देत आहे.

१. 'हॉटेलात आलेली माणसं' या एवजी 'खानावळीत आलेली माणसं' कसं वाटतं?

२. तसेच हजर सभासदांच्या ठिकाणी एक scroll-bar ठेवता आला तर सगळे हजर सभासद दिसू शकतील अशी व्यवस्था करता येवू शकेल.

३. लिहीण्याची पध्दत बदलण्यासाठी हॉट-की ठेवता येतील का? जसे म्हणजे इंग्रजी आणि म्हणजे मराठी. मोठ्या लेखाच्या शेवटी प्रतिक्रिया देताना याचा खुप उपयोग होइल..

४. मुख्य पान जर फ्रेमस वापरून केले तर वरचा भाग आणि डावी बाजू जेथे हजर सभासद, लिहीण्याची पध्दत वगैरे गोष्टी आहेत ते स्थिर ठेऊन बाकीचा भाग खाली-वर सरकवता येईल. तसेच जर आपण मुख्य पानावर असलो तर मधला भाग आपोआप रिफ्रेश (पहा सी.एन.एन ची वेबसाइट) करता येवू शकेल. त्यामुळे सभासदाला स्वताहून पान रिफ्रेश न करावे लागता आपोआपच नवीन पान दिसू लागेल.

५. सभासदाला निरोप द्यायचा असेल तर व्य.नि. आणि ख.व. असे दोन पर्याय आहेत. ह्या दोन्ही साठी सर्व्हर मधील डेटाबेसची जागा लागते आणि दिवसेंदिवस जास्त सभासदांमुळे डेटाबेस फुगत जाईल/जातो आहे. ह्या मुळे मिपावर अतिरिक्त ताण येतो आहे. तसेच या डेटाबेसचा backup घेणे वगैरे कामे वेळखावू आणि जिकीरिची होतील. मी लोकांच्या खरडी पाहील्यात त्या बर्‍याचदा इतक्या फुटकळ असतात कि विचारू नका (अर्थात त्यात मी सुध्दा आलोच). नमुन्या दाखल:
--- काय ग/रे जेवलास का?
--- काय म्हणताय!!
--- आज बर्‍याच दिवसांनी?
--- विकांताला काय केलेस?
--- शुभप्रभात..

या असल्या फुटकळ खरडी आणि व्यनि साठी मिपाची डेटाबेसवरची ७०-८०% जागा व्यापली असावी. त्या पेक्षा खरडवही आणि व्यनि या दोन्ही सुविधा जर काढुन टाकल्या आणि त्या ऐवजी जर याहू/स्काईप सारखे IM/CHAT चे पर्याय वापरता येतील का? याचे अनेक फायदे होतील:
===> डेटाबेस लागणार नाही. निरोप एकडुन तिकडे पाठवला कि काम संपले. ज्याला हवा असेल त्याने तो निरोप त्याचा संगणकात जपून ठेवावा.
===> निरोप तात्काळ पोहोचवल्यामुळे ताबडबतोब त्याचा प्रतिसाद सुध्दा मिळू शकेल. त्यामुळे कार्यवाही करण्यासाठीचा वेळ वाचवता येईल.
===> व्यनि पाठवला तर तो त्या व्यक्तीने सभासद नोंदणी करताना दिलेला ई-संपर्काच्या पत्त्यावर (जो काही याहू, हॉट-मेल, जी-मेल, रेडिफ असेल तो) फॉरवर्ड करावा. त्या मुळे मिपाचा सर्वर फक्त फॉरवर्डींग एजंट म्हणून काम करेल. ज्याने त्याने आपआपला मेलबॉक्स सांभाळावा, मिपाचा सर्वर हा फक्त कविता/लेख/पाककृती इ. आणि त्यांना येणार्‍या प्रतिक्रिया एव्हढ्याच गोष्टी डेटाबेस मध्ये ठेवेल.
===> मोकळी झालेली जागा मिपाच्या आगामी प्रकल्पांसाठी वापरता येतील. (जसे सध्या चित्रे बाहेर ठेऊन त्याची लिंक टाकावी लागते त्या एवजी चित्रे मिपावरच साठवता येतील. उद्या जर पिकासा/ऑर्कुट बंद झाले तर मिपाच्या कार्यावर त्याचा परिणाम होणार नाही).

जर माझ्या कडुन काही मदतीची अपेक्षा असेल तर निसंकोचपणे कळवावे. बाकी निलकांत आणि तात्या समर्थ आहेतच.

- नाटक्या

विसोबा खेचर's picture

1 Apr 2009 - 11:54 pm | विसोबा खेचर

सगाळ्यांच्या मोलाच्या सूचनांबद्दल ऋणी आहे..

तात्या.

ऋषिकेश's picture

2 Apr 2009 - 2:58 am | ऋषिकेश

(आहे तसे मिपा आवडतेच तरीही) विचारल्या आहेत तर काहि वाहत्या गंगेत माझ्याहि काहि सुचवण्या
१. व्यनी पाठवताना "रिप्लाय टु ऑल" पर्याय देता येईल का?
२. ख.व. म्हणजे आमच्या सारख्या (सद्धया कामाच्या व्यापामुळे असलेल्या)धुमकेतुंसाठी वरदान आहे. ते तसेच असु द्या
३. 'लेख आवडला ' अशा स्वरूपाचे बटण्/लिंक अथवा रेटिंगची सोय या "शक्तीमान" प्रस्तावाला अणुमोदन
४. रंगसंगती बदलावी (कारण हि साईट ऑफीसात उघडली रे उघडली की सगळ्यांच्या नजरेत भरते ;) )
५. "एखाद्या लेखा बरोबर त्याच लेखकाच्या अन्य लेखनाचे दुवे त्या लेखाच्या खाली अथवा डाव्या समासामध्ये भेटावेत अशी व्यवस्था जी गरजेची आहे." --> राजेंशी सहमत
६. प्रतिक्रियांवर सहमत/ +१ ऐवजी प्रतिक्रीयेच्या खाली "सहमत" अशी लिंक द्यावी व पुढे सहमत सदस्यसंख्या द्यावी.
७. काही अडचणी आल्या तर मदतीसाठी संपादकांची अथवा हजर संपादकांची लिंक असावी या सुचनांशी सहमत
८. कौल टाकताना ५० अक्षरांची प्रस्तावना सक्तीची करता येईल का?
९. वाचनखुणा साठवता याव्यात हि अपेक्षा.
१०. कोणत्याही लेखकाला जसे.. "माझे लेखन" मध्ये स्वतःचे लेख पहाता येतात तसेच.. त्याला इतर लेखकांचे लेखनही पाहता यावे. म्हणजे शोधत बसावे लागणार नाही ... प्राजुच्या सुचनेशी सहमत

-ऋषिकेश

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Apr 2009 - 10:26 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

२. ख.व. म्हणजे आमच्या सारख्या (सद्धया कामाच्या व्यापामुळे असलेल्या)धुमकेतुंसाठी वरदान आहे. ते तसेच असु द्या
पण त्याबरोबरच सगळ्या खरडी किंवा एका पानावरच्या खरडी एकदम उडवायची सोय असेल तर उत्तम! आमच्यासारख्या पडीक लोकांना नीलकांतला त्रास न देता संस्थळ इतिहासासाठी असणार्‍या निरुपयोगी खरडी एकदम उडवता येतील.

'लेख आवडला' आणि 'सहमत' यांचे काउंटर्स उपयुक्त ठरतील.

८. कौल टाकताना ५० अक्षरांची प्रस्तावना सक्तीची करता येईल का?
अगदी. शिवाय, एक-दोन ओळींचे काथ्याकूट आवरायलाही काही उपाय करता येईल का?

१०. कोणत्याही लेखकाला जसे.. "माझे लेखन" मध्ये स्वतःचे लेख पहाता येतात तसेच.. त्याला इतर लेखकांचे लेखनही पाहता यावे. म्हणजे शोधत बसावे लागणार नाही ... प्राजुच्या सुचनेशी सहमत
सध्या युआरएलमधे 'newtracker' असा शब्द 'user'च्या जागी टाकला तर लेखन दिसतं, पण सभासदाच्या 'वाटचाली'बरोबर आणखी एक टॅब देता येईल तर उत्तम!

alt+tab बटण दाबून खिडक्या बदलल्या किंवा फाफॉमधे ctrl+page up किंवा ctrl+page down वापरून टॅब्ज बदलल्या तर मिपाची लिपी रोमन होते. (तीन फ्लेवर्सचे लिनक्स आणि विण्डोज व्हिस्टाचा अनुभव) त्यासाठी लिपी बदलण्यासाठी कीबोर्ड शॉर्टकट मिळाला तर उत्तम!

मधे कोणीतरी सुचवलं होतंच, पानाच्या खालीसुद्धा 'स्वगृह'ची लिंक आली तर page up किंवा alt+back, refresh करण्याचा त्रास वाचेल.

(माझ्या बाबतीत फरक पडला नाही तरी) रंगसंगतीचा मुद्दाही कळीचा वाटतो; पण कृपया कवितांना गुलाबी रंग वगैरे नका हो ठेवू! एकतर तो रंग डोकं उठवतो आणि काही कविता 'गुलाबी' नसतात, उदा: ही एक सुंदर कविता.

अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

मराठमोळा's picture

2 Apr 2009 - 3:41 pm | मराठमोळा

मिपावर मराठी म्हणी, वाक्प्रचार, ग्राफिटी आणी मराठी शब्दकोष, मराठी लेखक, कवी आणी त्यांची ओळख यासाठी एक विभाग उघडता येईल का?
त्याने मराठी भाषेच्या ज्ञानात भर पडण्यास मदतच होईल.

आपला मराठमोळा
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

क्रान्ति's picture

2 Apr 2009 - 7:42 pm | क्रान्ति

प्राजुशी सहमत, विशेषतः फोटोसाठी.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Apr 2009 - 10:39 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खरडवहीत स्वागताचा मजकूर अजूनही मला हव्या तशा रंगात एचटीएमल च्या काही अपूर्ण सुविधामुळे करता येत नाही असे वाटते.

-दिलीप बिरुटे

मि.पा वरील काही लेख अप्रतीम आहेत ते स्वतःच्या संग्रही असावे असे वाटते . कृपया हे लेख .pdf (Read Only) format मध्ये डाउनलोड करायची सुवीधा असावी त्यावर मि.पा आपले Copyrights आणी Publishing rights निर्विवाद पणे ठेवू शकते.
शोध हा प्रकार मि.पा वर अवघड जातो . उदा. जर फक्त प्रवासवर्णनांचा शोध घ्यायचा असेल तर तो कसा घ्यावा कळत नाही . कृपया याचा विचार व्हावा .
~ वाहीदा

Meghana's picture

3 Apr 2009 - 4:30 pm | Meghana

मिपा वर लॉगइन केल्यावर जर लॉगआउट न करता खिडकी बंद केली आणि दुसर्‍या दिवशी पुन्हा मिपा उघडले
तर तसेच लॉग इन दाखवते. ह्या ठिकाणी खिडकी बंद केल्यावर शक्य असल्यास ऑटो लॉगआउट करण्यात यावे.

अविनाशकुलकर्णी's picture

5 Apr 2009 - 5:44 pm | अविनाशकुलकर्णी

मला असे वाटते कि..थोडा मेक अप/मेक ओव्हर करायला हवा..लूक एकदम आकर्षक असा हवा..मुलगी दिसातला चांगली आहे..मेक अप ने अधिक सुंदर वाटेल..बाकि लेख वगैरे तर छान असतात..

वाहीदा's picture

19 Apr 2009 - 12:55 am | वाहीदा

मिपा ही ईतकी Attractive site आहे की उघडल्या उघड्ल्या लगेच नको त्या लो़कांच्या नजरेत भरते त्या मुळे Firewalls लागले आहेत त्यावरही office मध्ये
नजर लागेल site ला ईतकी नको Attractive !!
It is truly fascinating and captivating already
~ वाहीदा

Nile's picture

18 Apr 2009 - 9:45 am | Nile

मी पुर्वी काही ईथे मुद्दे मांड्ले होते: http://www.misalpav.com/node/6868#comment-105792

याशिवाय, य.व. व व्य. नि. सुरु करायला ईतका वेळ लागतो हे पाहुन आश्चर्य वाट्ले! number of posts वगेरै अट आहे का?

++ for the chat suggestion.

Other that that if we could introduce "ranking" (informal)/status to members it would be a good idea.

Thanks,
Nile

Nile's picture

1 May 2009 - 6:40 am | Nile

जर उशीर झाला नसेल तरः

माझ्या असं लक्शात आलं आहे की ५० प्रतिसादांनंतर "क्ष नविन" ची लिंक काम करत नाही.

जर सभासदाच्या वाट्चालीत असे दोन पर्याय असतील तर फार सुरेख होईल: क्ष चे लेखन आणि क्ष चे प्रतिसाद (मुळात आहे का?) एखाद्याचे लेखन, प्रतिसाद शोधण्यात याचा फार उप्योग होईल.
तसेच प्रतिसाद दाखवताना जर त्याची snippet दाखवता आली तर क्या बात है.

मला कल्प्ना आहे की काही गोष्टी अमलात आणणे शक्य नाही पण सुचना द्या म्हणतायं म्हणुन. ;)

प्रसाद गोडबोले's picture

31 Mar 2015 - 7:47 pm | प्रसाद गोडबोले

स्वसंपादनाची सुविधा दिल्याबद्दल आभार !!

उपप्रतिसाद आल्यानंतरही प्रतिसाद स्वसंपादित करता येत आहे :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 Mar 2015 - 5:27 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

आता बघं करुन

अत्रुप्त आत्मा's picture

31 Mar 2015 - 5:36 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emo/laughing/smiley.gif

तुषार काळभोर's picture

1 Apr 2015 - 4:05 pm | तुषार काळभोर

याला बूच मारणं म्हणतात ना??

लई दिवसात मिपावर बूच मारणे हा प्रकार पाहिला/ऐकला/वाचला नव्हता..

होबासराव's picture

31 Mar 2015 - 5:35 pm | होबासराव

हया जुन्या लेखात दिसणारे आय डि आता मिपावर सक्रिय नाहित, आणि तात्या अभ्यंकरानी सुद्धा बरेच वर्ष झाले काहि लिहिलेले नाहि

संग्राम's picture

31 Mar 2015 - 5:51 pm | संग्राम

सध्या फक्त पानाच्या शेवटी पेजिनेशन किंवा पुढच्या पानांच्या लिंक्स दिसतात ...हीच सुविधा जर धागा संपल्यावर पण दिलीत तर प्रतिक्रिया वाचणे सोपे होईल.

या बरोबरच
img1

अशीही सुविधा द्या

img2

स्वसंपादन! आगं बने! खरंच का?

------------
स्वसंपादितः खरंच की!

बॅटमॅन's picture

1 Apr 2015 - 4:55 pm | बॅटमॅन

ए ईईई धत्तड तत्तड स्वसंपादण दिल्या गेले आहे! धण्यवाड!

अन हे घ्या उपप्रतिसादोत्तर स्वसंपादन! लयच कचकूण धण्यवाद!

अत्रुप्त आत्मा's picture

31 Mar 2015 - 6:05 pm | अत्रुप्त आत्मा

ठेंकूऊऊऊऊऊऊऊऊऊ http://www.sherv.net/cm/emo/happy/dancing-happy-star-smiley-emoticon.gif

आता सही पण जिवंत करा.

ब़जरबट्टू's picture

1 Apr 2015 - 4:47 pm | ब़जरबट्टू

बघू बघू..

अय्या... खरच की... :)

पिलीयन रायडर's picture

31 Mar 2015 - 6:22 pm | पिलीयन रायडर

स्वसंपादन??? ट्राय करते!!!

_____________ खरंच की! पण आता लोक शब्द फिरवणार... ;)

मुक्त विहारि's picture

8 Apr 2015 - 10:34 pm | मुक्त विहारि

+ १

मराठी_माणूस's picture

1 Apr 2015 - 12:19 pm | मराठी_माणूस

जर प्रतिसाद खुप असतील (एका पेक्षा जास्त पानावर) आणि नंतर काही नविन प्रतिसाद आले जे वेगवेगळ्या पानावर आहेत तर , पहील्या पानावरचे नविन प्रतिसाद "नविन" असे लाल अक्षरात दिसतात पण मग पुढल्या पानवरचे मात्र असे टॅग केलेले नसतात. मग त्या पानावरचे नविन कुठले आणि जुने कुठले ते कळत नाहीत.

मलाही हा प्रश्न खूप दिवस पडला आहे. हि बग असावी बहुतेक

भिंगरी's picture

1 Apr 2015 - 3:31 pm | भिंगरी

हेच म्हणते

विजय_आंग्रे's picture

1 Apr 2015 - 4:14 pm | विजय_आंग्रे

मला वाटते, प्रतिसादाखाली असलेले, "उत्तर द्या" हा ऑप्शन काढुन टाकल्यास ही समस्या येणार नाही.

मराठी_माणूस's picture

1 Apr 2015 - 4:24 pm | मराठी_माणूस

कसे काय ?

मंदार कात्रे's picture

1 Apr 2015 - 12:49 pm | मंदार कात्रे

मिसळपाव ने जाहिराती स्वीकाराव्यात असे मनापासुन वाटाते . इतके दर्जेदार सन्स्थळ कसे चालते ,याचे आर्थिक गणित मला ज्ञात नाही. पण जाहिरातीच्या माध्यमातून संस्थळ आर्थिक द्रूष्ट्या अधिक स्वयंपूर्ण होइल व अधिक चान्गल्या सोयीसुविधा देवू शकेल असे वाटते.

प्रियाजी's picture

1 Apr 2015 - 12:53 pm | प्रियाजी

लेखाच्या खाली लगेच त्याच लेखकाच्या इतर लेखनाची लिंक दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. लगेच तुमचाच काचेची बरणी अणि २ कप चहा हा लेखही वाचला. तोही खुप आवडला. इतर लेखही सवडीने नक्की वाचीन.

खरोखर मनापासून धन्यवाद. एक सुचवावेसे वाटते. जास्त लेख असतील तर पुढे >,
मागे क्लिक करता येइल अशी बटने असावीत सध्या कोणत्या क्रमाने लेखांची लिस्ट येते ते माहीत नाही. दिनांकाच्या चढ्/उतरत्या क्रमाणे लिस्ट केले तर उत्तम.

भिंगरी's picture

1 Apr 2015 - 3:32 pm | भिंगरी

ते फोटोच जर सोप करा की.

प्रीत-मोहर's picture

1 Apr 2015 - 7:11 pm | प्रीत-मोहर

बिल्ला नंबर वरुन लेखकाचे लिखाण दिसत नाहिए तेव्हढे द्या प्लीज. खूप गैरसोय होते. परवा श्रामोंचे लेखन शोधत होते काहीच दिसले नाही राव :(

मेघनाद's picture

7 Apr 2015 - 9:30 pm | मेघनाद

ह्या संबंधी मी काही काळापूर्वी मिपा वर विनंती केली होती त्याचा हा दुवा. इथे वाचा

१ . मिपावरील सदस्याच्या नावावर टिचकी दिल्यास उघडणार्या पानावर सदस्यांचे छायाचित्र एकतर दिसत नाही किवा किवा ते अगदीच छोटे दिसते, तेव्हा हे छायाचित्र मोठे म्हणजेच चेपु वरील छायाचित्र एवढे दिसेल अशी सोय करावी जेणेकरून लेखक/लेखिका कोण आहे हे समजून घेणे सोपे जाईल व मिपा कट्ट्यावर भेटणारे सर्वच अनोळखी वाटणार नाहीत.

२ . सदस्यांच्या द्रश्य ह्या पानावर चेपुच्या सदस्यत्वाचा दुवा देण्याची ऐच्छिक सोय असावी.

३. सर्व लेख मालिकांमध्ये पुढील व मागील भागांचे दुवे स्वयंचलित रित्या डकवले जातील अशी सोय असावी जेणेकरून लेखक दुवे देण्यास विसरला असता लेखमालिकेतील सर्व लेख सहज रित्या वाचता येतील. मी स्वतः दुव्यांअभावी काही लेखमालिका पूर्ण वाचूच शकलो नाही.

४. एखादा लेख वाचत असताना त्या लेखकाच्या इतर लखांचे दुवे जर डाव्या किवा उजव्या बाजूस दिले गेले तर त्या लेखकाच्या इतर लेखनाचा आनंद वाचकांना सहजच घेता येईल.

नूतन सावंत's picture

1 Jun 2015 - 10:46 am | नूतन सावंत

मी.पा.च्या नावे लेखन या पानाचे दृश्य स्वरूप पूर्वीप्रमाणे करता येणे शक्य नाही का?फार गोंधळ होतो एखादी लिंक शोधताना,पूर्वी कसे भटकंती,कलादालन,पाककृती असे विभाग असत आणि त्या त्या विषयाशी संबंधित लेख तिथे जाऊन वाचता येत असत.त्यशिवाय सदस्याचे इतर लेखन ही सोयही पुन्हा चालू करता आली तर बरे होईल.
पूर्वी साठवलेल्या वाचनखुणा गेल्यामुळेही फार अडचण झाली आहे.परत शोधताना अडचण येते आहे .वरील पैकी एक सोय तरी हवीच असे नम्रपणे नमूद करीत आहे.कृपया, सं.मं.ने नोंद घ्यावी,ही विनंती.

रुस्तम's picture

1 Jun 2015 - 12:32 pm | रुस्तम

नमस्कार,
मिसळपावची रचना बदलण्यात येत आहे. त्यासाठी काही पाने यापुढे उपलब्ध नसतील. मुख्यपानावर सर्वच प्रकाशित साहित्य उपलब्ध असेल.

नाव आडनाव's picture

1 Jun 2015 - 11:00 am | नाव आडनाव

एक विनंती - जर शक्य असेल तर पुढच्या पानांच्या लिंक लेखाच्या लगेच खाली पण दिल्या तर चांगलं होइल. बऱ्याच चर्चांना तीन - चार पानं असतात. ट्याब वर वाचतांना आणि नेट्वर्क स्पीड कमी असेल तर पानाच्या एकदम खाली यायला वेळ लागतो. ते पान वाचलं असेल तर, दुसऱ्या / पुढच्या पानावर जाण्यासाठी या नवीन लिंक मुळे थोडं सोप्पं होईल.

अदि's picture

1 Jun 2015 - 1:34 pm | अदि

सग्ळ्या लेखकांना लेख पूर्ण करायची सक्ती करणे..

IE वा Firefox मध्ये व्हिडिओ एंबेड कोड चालतो, पण हाच व्हिडिओ कोड क्रोम मधून एंबेड करता येत नाही, असं का?

iframe width="560" height="315" src="https://www.youtube.com/embed/8-HnmVg0-O8" frameborder="0" allowfullscreen>

वरील उदाहरणातील ओपनिंग आणि क्लोजिंग (iframe) टॅग्ज मुद्दाम काढलेले आहेत.

श्रीरंग_जोशी's picture

28 Aug 2016 - 6:38 pm | श्रीरंग_जोशी

मला ही समस्या एकदाही आली नाही. वरची चित्रफीत क्रोमद्वारे एम्बेड करून पाहतोय.

बहुगुणी's picture

28 Aug 2016 - 6:50 pm | बहुगुणी

माझ्या क्रोम मधून ड्रूपल मध्ये एडिट करतांना काही तरी प्रॉब्लेम आहे हे नक्की. कालच लक्षात आलं की पूर्वपरीक्षण करतांना व्हिडिओ दिसत नाही, पण प्रकाशित केल्यावर दिसतो. असो, प्रश्न सुटलाय, धन्यवाद!

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Aug 2016 - 12:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

क्रोममध्ये व्हिडिओशिवाय अजून काही लिखाण आणि/अथवा चित्र आणि/अथवा दुसरा व्हिडिओ असला तर पूर्वपरीक्षणात समस्या येते. केवळ एक व्हिडिओ असला तर येत नाही.

अविनाशकुलकर्णी's picture

28 Aug 2016 - 6:30 pm | अविनाशकुलकर्णी

धागा प्रकाशीत झाल्यावर एडिट करता आला पाहिजे व काही वेळा डीलिट पण करता आला पाहिजे..कोमेंत्ट बाबतित पण...
हे महत्वाचे आहे व ही सोय असणे अत्यंत गरजेचे आहे...
विनंती वजा निवेदन संपले

महासंग्राम's picture

29 Aug 2016 - 9:33 am | महासंग्राम

एडिट करता आला पाहिजे व काही वेळा डीलिट पण करता आला पाहिजे.

संपादक मंडाळाशी संपर्क साधून तुम्ही हे करू शकता

अत्रुप्त आत्मा's picture

29 Aug 2016 - 12:30 pm | अत्रुप्त आत्मा

मिपा स्मायली सुरु झाल्याच पाहिजेत!

सतिश रानडे's picture

29 Aug 2016 - 12:47 pm | सतिश रानडे

१- बऱ्याचवेळा लॉग इन करताना त्र्यास होतो मराठी नाव लिहून झाल्यावर छोटी चूक दिसल्यास दुरुस्त करताना अक्षरांची बरीच सरमिसळ होते-
२. लेखाच्या नावाने उदा मसालेभात वगैरे चटकन शोधता येत नाही

पिलीयन रायडर's picture

30 Aug 2016 - 8:29 am | पिलीयन रायडर

१. हो, क्रोममध्ये तरी असं नक्कीच होते. ह्यावर उपाय म्हणजे जर चुकलं आणि डिलीट केलं तर एंटर करुन परत बॅकस्पेस करायचं.

२. गुगलचा वापर करुन शोधा सध्यातरी. गुगल वर "site:misalpav.com मसालेभात" असं सर्च करता येतं.