मनाच्या कुपितले - स्टेज आणि मी

विनायक पाचलग's picture
विनायक पाचलग in जनातलं, मनातलं
30 Mar 2009 - 12:05 am

मनाच्या कुपितले या सदरातला हा पंधरावा आणि अंतिम लेख

मी आणि स्टेज
(माझा आत्तापर्यंत झालेला स्टेजप्रवास)

तशी अंगात स्टेजवर जावुन बडबडायची होउस दांडगी ,त्यामुळे दिसली स्पर्धा की घे भाग अस नेहमीच व्ह्यायच(नंबर यायचा नाही हा भाग सोडा,पण बोंबलायचो)अगदी बालवाडी पासुन .तेव्हाचे फोटो अजुन आहेत, आता ते पाहिल्यावर माझे मलाच हसु येते पण चालायचेच स्वतःवर हसण्यात जी मजा असते ती दुसर्‍याला हसण्यात नाही हे मात्र खरे ..असो , तर असे करत मी ४थीत आलो ,आणि कधी नव्हे ते मला शाळेसमोर भाषण करायची संधी मिळाली विषय होता लोकमान्य टिळक ....आलो अगदी तोर्‍यात आणि तीन मिनिटे खड्या आवाजात भाषण दीले आणि येवुन बसलो ,अगदी तोर्‍यात होतो पण थोड्या वेळाने एकाने सांगीतले की बाबा रे तु भारी बोललास हा पण तु ना लोकमान्य टिळकांचा जन्म १ ऑगस्ट १९२० सांगीतलास आणि माझा फुगा फटकन फुटला आणि हो इतिहास बदलला मी खरा पण तेव्हा त्याचा उपयोग कोणालाच झाला नाही ...तेव्हापसुन भाषण म्हणजे जरा भीतीच वाटायची.

पण शेवटी पडलो कोल्हापुरी त्यामुळे अंगातली खाज काही गेलेली नव्हतीच ..मग जरा आणि प्रयत्न केले आणि बर्‍यापैकी भाषणबाजी करायला लागलो..त्यात काय होते की मी माझी रा. ना. सामाणी विद्यालय ही शाळा बदलुन प्रायव्हेट मध्ये आलेलो आणि इथे काही वक्त्यांची मक्तेदारी होती(आणि का नसावी,गावातली सर्वोतम शाळा आणि तिथले ते वक्ते) आणि ती मोडता येत नव्हती तेव्हा मला खुपदा असे कळायचे की माझे भाषण इतरांपेक्षा खुप चांगले झाले आहे पण काय करु नंबर तर येत नव्हता ,कारण माझ्या भाषणाला तुच्छच लेखले जायचे ,झाले पण मी जिद्द सोडली नाही एव्हाना शाळेत एक बरा मुलगा म्हणून प्रतिमा तयार होत होती मग हळु हळु शिक्षक देखील माझ्याकडे लक्ष देवु लागले आणि शालेय क्रिकेट व फुटबॉल संघात असताना झालेल्या काही टवाळ मुलांच्या ओळखीने पोरे पण जास्त नादाला लागेनात .आणि आठवीत पहिल्यांदा मी वर्गवारी वक्तृत्व स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवला .आणि खर्‍या अर्थाने माझा डायस वरचा प्रवास सुरु झाला पण मध्ये काहीस्टेज काही सोडले नव्हते मधल्या काळात शालेय डान्स स्पर्धेत एक दोन डान्स केले (आत्ताच्या फिगरवर जावु नका काय तेव्हा आमीबी स्लीम ट्रीम होतो)आणि हो एकदा बक्षिस पण मिळवले पण" तुझ्या सारख्या मुलाकडुन मला खैके पान बनारसवाला या डान्सची अपेक्षा नव्हती " असे एका मॅडमनी म्हणलेले त्याचा अर्थ मला आज पर्यंत कळालेला नाही. पण मुळ मला आवडायचे ते भाषणच(आणि ती होउस या मधल्या काळात मी आईच्या ऑफीसमधल्या कार्यक्रमात भागवुन घेतली. काय करणार कोणाला पीडल्याशिवाय बरे वाटत नाही ) आणि मग विनायक पाचलग या नावाला थोडे वजन येवु लागले बाहेरच्या स्पर्धेत पाठवण्यासाठी नावाची चर्चा होवु लागली ,एव्हाना शाळेत होणार्‍या कार्यक्रमात मी माझी फटकेबाजी करायला लागलो होतो आणि वासरात लंगडी गाय शहाणी असे म्हणत मला चांगले चांगले देखील म्हणले जात होते त्यामुले मी पण खुशीत आलो होतो आणि काय तर मला निबंध तेव्हापण जमायचे बर्‍यापैकी(मला अब्रु असल्याने इथे प्रात्यक्षिक देत नाही) आणि मग सुरु झाले सगळे कुठे भाषणे लिही ,एकदा तर एक एकांकिकाच लिहिली आणि सादर केली या सगळ्यामुळे माझे आणि स्टेजचे अतुट नाते जडत गेले मग कुठे नाट्यवाचन ,एकांकिका स्पर्धात भाग घे ,आणी हो इथे पण मक्तेदारी होतीच पण काय होत की माझे पाठांतर चांगले होते आणि संस्कृतवर बर्‍यापैकी कमांड होती त्यामुळे संस्कृत मध्ये आम्हाला पायघड्या घालुन बोलवले जायचे आणि मग दोन तीनच स्पर्धक असल्याने नंबर पण यायचा ..पण ते सगळे करताना मजा यायची आणि महत्वाचे म्हणजे अधिकृत तास बुडवायला मिळायचे अहो बाकीचे राहुंदे या एवढ्या एका गोष्टीसाठी मी हजारदा नाटक केले असते .आणि हे मीच काय तुम्हीदेखील केले असते,खरे की नाही...

तर हळु हळू प्रयत्न करायला लागलो ,शब्दांची फेक हा माझा प्रांत कधीही नव्हता पण अभ्यासपुर्ण लिखाण आणि खरड्या आवाजातील मांडणी या जोरावर चालुन जायचे आणि मग बाहेर जवु लागलो ,बाहेर लायकी लगेच कळाली ,स्पष्ट बोलायचे तर माज जरा कमी आला.पण काय आहे की प्रत्येक स्पर्धेत परिक्षक बदलत नाहीत त्यामुळे पहिल्या वर्षी कोणत्या प्रकारच्या भाषणाला बक्षिस मिळाले ते पाहिले आणि तसे बघितले की दुसर्‍या वेळी बक्षिस मिळुन जायचे.

पण एकदा एक गमतीदार प्रसंग घडला ,पर्यावरण या विषयावर विवेकानंद कॉलेजवर स्पर्धा होती काही कारणामुळे जरा उशिरा पोहोचलो ,बाकी नेहमी प्रमाणे एक दोन पुस्तकातुन तयारी केलेली होती ,
आणि हा विषय तसा नावडता! तेव्हा फार काही स्वतःचे मुद्दे लिहिले नव्हते, गेलो आणि नाव दीले तर क्रमांक मिळाला २२ वा आणि स्पर्धक २४,मग काय बसलो भाषणे ऐकत आणि काय आश्चर्य जणू काही सगळ्यानी एकच पुस्तके घेतले होते सगळ्यांचे मुद्दे इकडुन तिकडुन सारखेच.. माझी जाम टरकलीच ..म्हणले ही शिळी कढी आता कशी पचनी पडनार आणी हो बाहेरचा परिसर माहीत नव्हता ( आता एक विवेकानंद कॉलेजमधला कोपरा आणि कोपरा माहित आहे .पण तेव्हा कुठला माहित असायला)तेव्हा उठलो शेवटच्या बाकावर गेलो आणि मुले काय बोलत आहेत त्याच्या नोटस काढु लागलो ,झाले माझा नंबर यायच्या आधी ५ मिनिटे त्या सगळ्या वाचल्या आणि गेलो थोड्या थरथरत्या हाताने सुरवात केली आणि काय झाले कोणास ठावुक एखाद्या अस्सल राजकारण्याप्रमाणे बोलु लागलो हा असा म्हणाला त्यात सा बदल हवा वगिअरे वेळेच काही भानच राहिले नाही आणी दहा मिनितानी जेव्हा वार्निंग बेल वाजली तेव्हा भानावर आलो आणि भाषण गुंडाळून सरळ घरी आलो आणि झोपुन टाकले बक्षिसाची अपेक्षा काय इच्छा पण नव्हती ,आणी उठल्यावर आइ सांगत होती की तुझ्या मित्राचा फोन आला होता तुला दुसरा नंबर मिळाला आहे माझे मला पटेना ,४ जणाना फोन लावला आणी मग खात्री केली ...पण जाम मजा आली हे सगळे करायला .आणि हो ते प्रस्तवीत भाषण अजुन जपुन ठेवले आहे कधी न म्हणलेले भाषण म्हणून.......

याच वर्षात स्टेजशी माझे नाते जोडणारी अजुन एक घटना घडली ,साधारणतः जानेवारी महिन्यात जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात एक उपकरण घेवुन इचलकरंजीला गेलेलो होतो. कंटाळुन आलो तर दुसर्‍या दिवशी एका सरांचा निरोप की विद्यापीठ हायस्कुल मध्ये एक स्पर्धा आहे जा दुपारी ,झाले काहिश्या नाखुशीनेच गेलेलो ..पण गेल्यावर मुडच पलटला विश्वकोशाचा सतरावा भाग सर्वात पहिल्यांदा आमच्या हातात पडत होता आणि आम्ही सतरा विद्यार्थ्यानी त्यातला एक एक भाग वाचुन त्यावरच्या आपल्या मताचे प्रकटीकरण करायचे होते झाले . झाले ३ तास बसलो वाचले आणी प्रकटीकरण केले आणि अचानक डॉ .विजया वाडानी प्रश्न केला विश्वकोशाबद्दल तु काय सांगशील ? त्यावेळी कसे सुचले ते आठवत नाही ,त्या भगवंताची कृपा.मी म्हणालो की शब्दकोशात शब्दला प्रतिशब्द असतात ते माहित आहे पण हा विश्वकोष शब्द स्मजवुन सांगतो म्हणून त्याला महत्व आहे ...झाले या वाक्यावर त्या इतक्या जाम खुष झाल्या की पुढारीत दुसर्‍याच दिवशी आलेल्या लेखात त्यानी माझ्या नवासकट माझी प्रतिक्रिया प्रकाशित केली ..यावेळी माझा आनंद गगनात मावेना खरेतर अवघ्या अर्ध्या गुणाने माझा त्या परिक्षेतला नंबर गेला होता पण त्याचा कधीच विसर पडला आणि त्या प्रकटीकरणापासुन माझे स्टेजशी नाते अधिक जुळत गेले .....

अशीच एक गोष्ट दहावीच्या सुरवातीची..मुख्याधापक संघाची नाट्यवाचन स्पर्धा म्हणजे एक मानाची स्पर्धा .पण प्रत्येक वेळी काही ना काही कारणानी मला मुख्य मराठी नाट्यस्पर्धेपासुन दुर ठेवण्यात आलेले होते ,अभ्यास प्रांतात जरी दबदबा असला तरी इथे मला कस्पटाएवढी पण किंमत नव्हती ,त्यामुळे मनात सल होतीच पण का कोणास ठावुक यावेळी मला अचानक काम करणार का म्हणून विचारले गेले मग काय मी एका पायावर तयार होतो ..झाल ,नटसम्राट घेतले बसवायला आणी जीव ओतुन प्रॅक्टीस केली शेवटी अपेक्षित फळ पहिल्या क्रमांकाच्या रुपाने मला मिळाले पण त्यापेक्षा आनंद मिळाला तो मनातील रुखरुख संपायचा..अहो अहंकार दुखायव्ल्यावर जो जखमी सिंह असतो ना तो फार त्रास देतो हो अगदी मनापसुन सांगतोय...

पण आता एक घडत होते ,अभ्यासामुळे भाषणे नीट जमत नव्हती ,तयारी होत नवह्ती शिक्षक वरवर तारीफ कराय्चे पण मला स्वतःला जाणवत होते आणि अपेक्षा तर वाढतच होत्या आणि इतर उद्योग करायची खाज सुटत नव्हती , म्हणून मग गप गुमान कविता वाचन आणि निवेदन या भागात हात पाय मारु लागलो ,आणि हे सगळे हात पाय सोसायटीत मारत असल्याने होम पीच तर होतेच पण आउट झालो तर नॉट आउट देणारे बकनरही होतेच त्यामुळे उगाचच अहम ला जोड मिळत गेली पण अती न झाल्याने जमीनीपासुन एखादेच बोट वर आलो चार बोटे आलो असतो तर काय झाले असते कोणास ठावुक..कदाचीत मिपावर १ महिन्याच्या वर थांबुच शकलो नसतो.असो जावु द्या.

पण एवढे करुन अजुन मनाजोगे भाषण काय घडत नव्हते आणि दहावी मुळे तेवढा वेळ मिळत नव्हता शेवटी एकदा गेलो आणि सांगीतले की निरोप समारंभात मी भाषण करणार ..म्हणले काय होइल ते होइल ह्या पीचवर खेळायचेच .यावेळी फक्त मनापासुन मुद्दे काढले आणी गेलो आणि पुन्हा एकदा दैवी चमत्कार झाला माझ्या नकळत उत्तम भाषण झाले .आणी संगणकाच्या सराना मी ते रेकॉर्ड करायला सांगीतले होते ..शेवटेचे भाषण ना त्या डायसवरचे ......मग घरी आलो लिहुन काढले अहा काय समाधान वाटले सांगु ..या कला ज्या समाधान देतात ना त्याला मात्र तोड नाही ....मान गये आणि अशा संध्या मिळाल्या ना त्यामुळे शाळा मला इतकी आवडु लागली की बस ....आणि हो आजही कधी टेंशन आले की ते भाषण उघडुन वाचतो बास मन प्रस्सन होत आणि काय पाहिजे हो एका भाषणातुन.

आता नुकताच घडलेला प्रसंग ..कॉलेजच गॅदरींग आहे हे मला अचानक समजले ..मग करणार काय ,काही चुकीचे झाले तर शिव्या ,अंडी ,टॉमेटॉ मग ऍज युजवल सुत्रसंचालन घेतले अगदी ५ जणांच्या निवड चाचणीतुन निवड पण झाली .झाले ३ दिवस ,मी जिमखान्यात पडुन होतो पण काही केल्या कला विभगाची कार्यक्रमाची लिस्टच तयार होइना ,सर म्हणायचे सकाळी दुपारी आता उद्या ये आणी गॅदरींगच्या आदल्या दिवशी बाँब पडला,कोण मुलगी होती म्हणे कॉलेजमध्ये की जी टॉमॅटो या स्थानीक एफ एम वर काम करते त्यामुळे म्हणे तीला देण्यात येत आहे ...माझे डोकेच सणकले ,कोण कुठले येत आमच्या मेहनतीवर पाणी फेरते आणि हो मला अशी माहिती कळाली होती की मध्यंतरी सुरवातीला एफ एम मध्ये माणसे नव्हती तेह्वा काही पोराना घेतलेले ,त्यात तिला घेतलेले म्हणे ..म्हणले वा चायला मग त..से मी पण गेलेलो की ऑडीशनला सीलेक्शन पण झालेले पण दहावीमुळे पुढे विसरलोच सगळे... एवढेच काय शाळेतल्या ५ वीच्या पोराना पण घेतलेले २०० रुपयात म्हणल वा ..पण गप्प का बसु ? शेवटी जरा भांडल्यावर तुम्ही तिच्या हाताखाली काम करा असा आदेश आला .बर म्हणल दगडापेक्षा वीट मवु मग सामान्य विद्यार्थ्यासारखा तीला जावुन विचारले की बाइ काय करुया आपण. पण ही बया पुन्हा दिवसभर गायब्..मग डोके सणकले डायरेक्ट मराठी डिपार्ट्मेंटच्या हेडना भेटलो मग जरा वचक आला आणि मग संधी देतो मह्णले तुम्ही दोघे निम्मे निम्मे वाटुन घ्या म्हणले .चला म्हणल प्रयत्नांचे सार्थक होइल पण कसचे काय.... आता एक नवीनच स॑कट आले काय तर म्हणे सुरक्षीततेच्या कारणामुळे कार्यक्रमांची लिस्ट बाहेर देता येणार नाही..झाले अगोदर उरलेले १२ तास ..त्यात लिस्ट नाही मग आम्ही काय डोंबलावर बोलणार का काय ....चायला आता मात्र हद्द झाली अरे असाल तुम्ही शिक्षक असेल तुम्हाला काळजी,पण आम्ही काय बिनअकलेचे पैदा झालेलो नाही ....म्हणल याला इंगा दाखवायचाच ..झाले जी एस ला गाठल ,ओळखीचा होतच,हळूच लीस्ट घेतली ,मित्राच्या गाडीवर बसुन १० मिनिटात ५ झेरोक्स घेवुन खिशात वर अगदी साळसुद पोरासरखे मला द्या ना म्हणून मागे फिरत होतो .चायला पेठेतले रक्त आहे ,सरळ तोपर्यंत सरळ आणि एकदा वाकड्यात गेलो की मग संपल .मग आलो घरी ,लिवले आणि गेलो दुसर्‍यादिवशी सकाळी कॉलेजवर...गेलो आणि प्राचार्याना भेटलो वस्तुस्थीती सांगीतली ..मग काय वरुन आदेश आल्यावर सगळा वचपा काढला ,सहा तास संचलन करणार मीच.जा गेलीस उडत टॉमॅटॉ एफ एमात....... मग मात्र ते स्टेज आणि मी !!!!सगळा राग काढला के शेवटी त्या सरांचा आणी त्या पोरीचा चेहरा बघण्यालायक झाला होता..आजपण ते सर माझ्याशी बोलत नाहीत ,परवा सिंदबाद चा लेख एका सरानी दाखवला त्याना माझे नाव सांगता आणि मग मी लिहिलाय म्हणून सांगीतले अग आइ ग त्याना काय करावे ते सुचेना शेवटी उठले आणि निघुन गेले .अख्या कॉलेजात मला आत्तापर्यंट भेटलेला एवढाच वाइट माणूस ..पण हा अनुभव मला प्रॅक्टीकल अप्रोच देवुन गेला ,कला क्षेत्रात पण कुरघोड्या कराव्या लागतात य कटु वास्तवाची जाणीव करुन गेला
आणी हो मी मध्ये नाटकाला संगीत दील्याचे इथे लिहिले होतेच ...
आणि आज स्थळ-शाहु स्मारक
वेळ-संध्याकाळी सहा वाजता
संपुर्ण अनोळखी चारशे लोकांसमोर मी निवेदक म्हणून उभा
चार शब्द बोललो आणि आज पहिल्यांदा प्रोफेशनल निवेदन केल ..अजुन एक टप्पा पार केला ..मग काय ऍज युजवल इथे लिहिला
(सुचना-हा लेख मी काय केल हे सांगायला नाही .फक्त हे सगळे अनुभव सांगायची इच्छा होती आणि ती प्रमोद काका आणि प्राजु ताइ यांछ्या लेखाने अनावर झाली म्हणून लिवले बाकी अजुनही प्रवास चालुच आहे या कलेच्या राज्यात अमुर्तातुन मुर्ताकडे जायचा ....आणि हो चालत राहील देखील कायमचा....... आणि हा प्रवास असाच चालु राहु दे .हीच इच्छा ह्या अजुन एका नवनिर्मीतीचा प्रकार संपताना इश्वराकडे करतो...)
तुमचा
(भावविभोर)विन्या
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मनोगत -आज या लेखाद्वारे मी माझ्या मनाच्या कुपितले या सदराचा शेवट करत आहे, आणि हो हे सदर वाचणार्‍या सगळ्यांचे माझे मनापासुन आभार,खरेतर हे लेख वाचणारे सगळ्या व्यक्ती माझ्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठ्या आहेत्,त्यानी माझे लेख वाचणे,जाणीवपुर्वक आणि वेळ काढुन प्रतिक्रिया देणे ह्यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट नाही ,या सर्व अनुभवाबद्दल मी माझा महाजाल प्रवास या तीन लेखांच्या लेखमालेत लिहिनच पण इथे सुद्धा मनापसुन आभार मानतो.
खरेतर साप्तहीक सदर वगैरे लिहिणे म्हणजे भंकसपणाच होता,एखाद्या वृत्तपत्रातुन सदर लिहिण्याची इच्छा होती ,पण ती पुर्ण होणे शक्य नव्हते आणि मिपावर पण सारखे लेख पाडल्याने लेख पाडु कोदा असे मत झाले होते ,म्हणून मग स्वतःवर बंधन आणि आनंद या दोन्ही निकशाना अनुसरुन ही लेखमाला लिहिली आणि लोकानी ती अगदीच नाकाराली नाही .एकही लेख प्रतीसादाशिवाय बाजुला गेला नाही ही माझ्या दृष्टीने फार महत्वाची गोष्ट होती. हा काही वेळा घोळ झाले ,पण मुळ घोळ माझ्या विचारात होता ...मी वेगवेगळ्या ठिकाणी लिखाण वाचत होतो विविध लेखनप्रकार पाहत होतो पण य सगळ्यातुन का कोणास ठावुक मला असे जाणवले की ,जीवनातल्या मुळ प्रश्नांविषयी किंवा जगण्याच्या पद्धतीविषयी लोक फार कमी लिहितात म्हणून मग खुप चिंतन करुन मी असे वैचारीक लिहायला लागलो पण काही दिवसात असे लक्षात आले की माझे विचार फार तोकडे असुन यापेक्षा वाचकांचे अनुभव आणि चिंतन खुप उच्च दर्जाचे आहे ,त्यामुळे तो मार्ग सोडला आणि मनाला येइल ते लिहाय्चे ठरवले यातुनच मग सगळे प्रकार हाताळले ,काही जमले काही नाही पण लिहित राहलो ..तेव्हा शेवटी फक्त मला लिहायला संधी मिळाली ज्यांछ्यामुळे आणी खरेतर संपादकीय ला अप्रत्यक्ष बंड असुनही मला लिहु देणार्‍या तात्यांचे आणी वेळोवेळी मला मार्गदर्शन करणार्‍या सर्वांचे आभार मानतो व ही मुर्ख बडबड येथे थांबवतो,.....................

विन्या

मांडणीसंस्कृतीनाट्यवाङ्मयसाहित्यिकसमाजजीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

हा लेख मला अगदी मनापासून आवडला.
कारण कुठेही तू शब्दांचे अवडंबर माजवलेले नाहिस.. आणि अगदी नीट सांगायचं तर वापरलेली बोली भाषा आणि रूळलेले शब्द.
हा लेख खरोखर तू लिहिल्यासारखा वाटतो आहेस. एरवी , तू लिहिलेले लेख, चुकून प्रमोद काकाच नाव बदलून लिहित आहेत की काय अशी शंका यायची. (प्रमोद काका, हलके घ्या प्लिज)
मात्र, हा लेख अगदी तुझ्या मनाच्या तळापासून आला आहे हे निर्विवाद .
असाच लिहित रहा.. मिपाकर डोक्यावर घेतील तुला. :)
(ओब्वियसली, मिपावर लेखन गाजलं म्हणजे तो यशाचा शेवटचा कळस नव्हे.. पण मिपाचं हे व्यासपीठ तुझ्या साहित्यिक वाटचालीसाठी स्टेपिंग स्टोन नक्कीच ठरू शकतं..)
ऑल द बेस्ट! :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

दशानन's picture

30 Mar 2009 - 9:22 am | दशानन

अगदी हेच म्हणतो !

उत्तम लेख !

धनंजय's picture

30 Mar 2009 - 11:50 pm | धनंजय

विनायकांना माझ्याही हार्दिक शुभेच्छा.

सोपान's picture

30 Mar 2009 - 10:10 am | सोपान

खुप छान लेख लिहिला आहेस. असाच लिहीत रहा.
पु.ले.शु.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

30 Mar 2009 - 12:32 pm | घाशीराम कोतवाल १.२

विन्या मित्रा तोडलस
अवांतर अरे विन्या अवधुत गुप्ते स्टाईलने घे बाबा !!!
कारण तो पण कोल्हापुरचा तु पण कोल्हापुरी दादाना
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

अभिज्ञ's picture

30 Mar 2009 - 12:43 pm | अभिज्ञ

विनायक,
छान लिहिले आहेस.
मनाची कुपी वगैरे शब्दच्छल समजला नाहि.जे काहि लिहिले जाते ते सर्व मनातूनच आलेले असते असे मला वाटते.
चांगले लिहितो आहेस.
तसेच एकाच धाटणीत स्वतःला अडकवून घेउ नकोस.
लिहायचे तर प्रतिसाद किती आले?किती वाचने झाली वगैरे प्रकारांची जास्त काळजी करु नये.
लिहित रहा.परंतु एक लक्षात ठेव "अतिपरिचयादवज्ञा" मात्र होऊ देउ नकोस.
पुलेशु.

अभिज्ञ.

दिपक's picture

30 Mar 2009 - 12:51 pm | दिपक

मस्त रे... लेख छान लिहिला आहेस :)

प्रमोद देव's picture

30 Mar 2009 - 12:54 pm | प्रमोद देव

छान!
लेखनात बरीच प्रगती झालेय. मुख्य म्हणजे टंकलेखनात खूपच सुधारणा आहे.
अजून सुधारणेला नक्कीच वाव आहे; पण तू आता मनावर घेतले आहेस तेव्हा यश फार दूर नाही.
पु.ले.शु.

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

विनायक पाचलग's picture

30 Mar 2009 - 2:35 pm | विनायक पाचलग

आपले शुभाशिर्वाद असेच सदैव राहु देत हिच इश्वरचरणी प्रार्थना

स्वार्थाचा लवलेशही नसावा
गर्वाचा स्पर्शही नसावा
असा जन्म लाभावा कि देहच चंदन व्हावा......

विनायक पाचलग

जयवी's picture

30 Mar 2009 - 3:43 pm | जयवी

विनायका....... तुझी धडपड...... थेट आतपर्यंत पोचली :)
फार प्रामाणिक वाटलं तुझं लिखाण !
पुढच्या सगळ्या स्टेज शोज साठी तुला भरभरुन शुभेच्छा !!

असं मनापासून आणि स्वतःच्या अनुभवांतून तावून सुलाखून निघालेलं लेखन हेच खरं 'मनाच्या कुपीतलं'.
कोदा, अखेर जमलं.

chipatakhdumdum's picture

30 Mar 2009 - 10:30 pm | chipatakhdumdum

:H वाहवा विन्या...