महाजालावर कोल्हापुर

विनायक पाचलग's picture
विनायक पाचलग in जनातलं, मनातलं
28 Mar 2009 - 9:41 pm

सध्या माझे मित्र राजे हे आमच्या गावाबद्दल अर्थात कोल्हापुरबद्दल खुप लिहित आहेत
त्यामुळे अनेकाना कोल्हापुरबद्दल उत्सुकता असेल ती उत्सुकता ऑनलाइन भागवण्यासाठी हा लेख

सध्याचे युग हे संगणक युग आहे यापुढे सर्व व्यवहार संगणकावर होणार आहेत त्यामुळे सध्या महाजालावर कोल्हापुरची स्थिती काय आहे याचा यानिमित्याने आढावा घेणे आगत्याचे ठरते आणि म्हणुनच एक नेटीझन म्हणुन घेतलेला हा आढावा
तर प्रथम आपण गुगल कडे वळु गुगलवर एखाद्या गावाला योग्य स्थान असणे म्हणजे त्याबद्दलची योग्य माहिती उपलब्द्ध असणे महत्त्वाचे आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे कोल्हापुरची दखल गुगल कडे आहे गुगल मॅप द्वारे(http://maps.google.co.in/maps?hl=en&pwst=1&ei=HCSNSfaUMpLSkAWkh7jGDA&res...) कोल्हापुरचा आपणा सर्वाना नकाशा मिळु शकतो साहजीकच हा नकाशा अत्युत्तम अहे या नकाशाद्वारे तुम्ही कोणाचीही मदत न घेता कोल्हापुर फिरु शकता आणि सोबतीला गुगल अर्थ आहेच तेथे कोल्हापुर नीट दीसते आणि एकादे ठिकाण पाहायचे असल्यास क्लिएरिटीदेखील चांगली आहे त्यामुळे आपण कोल्हापुरची व्हर्चुअल टुर घरी बदल्या बसल्या करु शकता अगदी कोल्हापुर पाहिल्यासारखे वाटते. तेव्हा हा अनुभव नकी घ्या त्यामुळे प्रत्यक्ष कोल्हापुर पाहताना आणखीनच मजा येइल
आता वळु विकीपिडीया कडे जगातले जास्तीत जास्त लोक माहिती मिळवण्यासाठी याचा वापर् करतात त्यामुळे य्रेथे असणार्‍या माहितीला खुप मोलाचे स्थान आहे येथे(http://en.wikipedia.org/wiki/Kolhapur ) कोल्हापुरबद्दल प्रचंड माहिती आहे आणि महत्त्वाचे म्हणजे ती सतत अपडेट होत आहे त्यामुळे येथे येणार्‍याला कोल्हापुरबद्दल सर्वांगीण माहिती मिळत आहे येथे कोल्हापुरच्या इतिहासापासुन ते लोकसंख्येपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे येथे कोल्हापुरबद्दल सर्व काहि थोडक्यात आहे त्यामुळे पर्यटकांसाठी वा उत्सुकांसाठी ते उत्तमच आहे पण गाववाल्याना पण खुप नवी माहिती मिळेल
आणि महत्त्वाचे म्हणजे इतर मुख्य गोष्टींच्या,ठिकाणांच्या माहितीच्या लिंक असल्याने गावाबद्दल थोडक्यात आणि सर्व काही हवे असल्यास नकी विकिपीडीयावर जा याबाबतीत प्रश्न येतो तो माहितीच्या सत्यतेचा पण् येथील माहिती विश्वसनीय आहे असे म्हणायला हरकत नाही निदान मला तरी काही चुकीचे आढळले नाही तेव्ह एकदा पीडीया फेरी होउन जावु दे
याशिवाय जर आपणा कोल्हापुरची चित्रभेट घायची असेल तर गुगल इमेज सर्च वर जा .खजीना सापडेल फोटोंचा देखते रह जावोगे साब ! प्रत्येक व्यक्तीला हे फोटो नक्की आवडतील खुप म्हणजे खुप फोटो आहेत अगदे प्रत्येक वैशिश्ट्ये घेतली आहेत कुणीतरी .खुप वेळ जातो पाहणार्‍याचा पण त्या फोटोग्राफीला सलाम .एकुणात काय तर या आंतरराष्ट्रीय ठिकाणी कोल्हापुरबद्दल खुप काही आहे तेव्हा कोणाचाही हिरमोड होणार नाही
हे झाले मोठ्या स्थळांबद्दल आता इतर साइटबदल बोलु पहिल्या प्रथम दीसते ते हे स्थळ http://www.kolhapurworld.com/ एक अतिशय सुंदर स्थळ आहे हे .ते(साइटवरील लोक) म्हणतात की हे कोल्हापुरच अधिकृत स्थळ आहे, ते अधिकृत आहे की नाही ते माहित नाही पण इथे इतकी माहिती आहे की त्याला अधिकृत म्हणायला काहीच हरकत नाही या संस्थळाबददल म्हणाल तर हे म्हणजे कोल्हापुरबद्दल माहितीचा खजाना आहे फक्त थोड्या अधीक जाहीरातींचे खड्डे आहेत पण एवढा खजीना मिळाल्यावर थोडी माती मिळाली तर काय हरकत आहे आणि महत्त्वाचे म्हणजे त्यानी पहिल्या पानावर डॉक्टर, स्त्रीया,तरुण यांसाठी सुरु केलेला डीस्कशन फोरम ही संकल्पना उत्तम आहे त्यामुळे संवद साधणे अगदी सोपे झाले आहे पर्यटनासारखी वेगवेगळे विभाग केल्याने माहिती हुडकणे देखील खुप् सोपे आहे आणि मुळात म्हणजे रचना अगदी सोपी व छान आहे .पहिल्या म्हणजे पर्यटन विभागात त्यानी सर्व लहान मोठ्या स्थळांचा समावेश केला आहे त्यामुळे कोल्हापुरात बघण्याजोगे जे काही आहे ते सर्व तुम्हाला येथे समजु शकते याशिवाय तेथली राहण्याची खाण्यापिण्याची व्यवस्थाही दीलेली आहे त्यामुळे प्लॅनिंग करणे खुपच्च सोपे झालेले आहे आणि सर्वात महत्त्वाची गोश्ट म्हणजे त्यानी कोल्हापुर रैल्वे स्थानकाचे संपुर्ण वेळापत्रक दीलेले आहे त्यामुळे परराज्यातील लोक त्यानुसार आपल्या प्रवासाची आखणी करु शकतात .उतम असा रस्त्यांचा नकाशा देखील येथे उपलब्द्ध आहे त्यामुळे त्याची प्रिंट काढलीत की तुम्ही निदान रस्ता तरी चुकणार नाहीत .आणि एक गोष्ट सांगण्याजोगी आहे ती म्हणजे येथे दीलेले काही शब्दांचे भाशांतर त्यामुळे ज्याला मरठी येत नाही तोदेखील जुजबी मराठी बोलु शकतो जे आजच्या जगात महत्त्वाचे आहे आणि माहितीबाबत म्हणाल तर येथे प्रत्येक गावबद्दल खडा न खडा माहिती आहे त्यामुळे प्रत्येक गावाची तोंड ओळख आपणाला होवु शकते याशिवाय गावातील जिल्हापरिशद ते इंडस्ट्र् यासर्व बाबींबाबत खुप माहिती आहे इथे एवढी माहिती एकत्र केली गेलेली आहे की गावातल्या लोकानादेखील हे सगळे माहित असणार नाही तेव्हा गाववाल्यानीदेखील हे वाचले पाहिजे ,याशिवाय संपुर्ण भोउगोलिक माहिती आहेच जी आधुनिक शेतकर्‍याना खुप फायद्याची आहे आणि सध्या लोक कोल्हापुरात घर घ्यायला इनव्हेस्ट करायला उत्सुक आहेत हे जाणुन रीअल इस्टेटचा वेगळा विभाग तयार केला असुन तेथे विविध बिल्डरस्चे पते आणि प्रकल्पांची माहिती आहे याशिवाय यलो पेजेस मुळे गावातील खुप उद्योगांचे पत्ते व दुरध्वनी उपलब्ध आहेत त्यामुळे आयत्यावेळी झेरोक्सवाला वा दुकानदार हुडकायचा झाल्यास इथे यायचे काम होवुन जाइल्.एकाच शब्दात सांगायचे तर हे स्थळ म्हणजे ऑल अबाउट कोल्हापुर आहे आणि हे स्थळ चांगले यासाठी की याला फक्त माहितीचे पोतडे एवढेच स्वरुप दीलेले नाही मुलींचा वेगळा विभाग ,इतर विभाग यामुळे हे इंटरॅक्तीव आहे इथे एक दीर्घकथाही आहे ज्यामुळे लोकाना मनोरंजनातुन ज्ञान मिळेल काही फोटो आणि खुप व्हीडीओ आपले मनोरंजन देखील करतात यामुळे ही साइट बघताना कीती वेळ जातो ते समजतच नही तेव्हा गावकरी आणि पर्यटक दोघानीही एकद तरी या साइटवर चक्कर माराच नाहीतर तुम्ही का चांगल्या अनुभवाला मुकाल http://www.ourkolhapur.com/ he sthaL dekheel varachyaa sthaLaasaarakhec aahe.
आता वळु सरकारी साइटांकडे प्रथम दीसते ते जिल्हाधीकारी कर्यालयाची साईट(http://kolhapur.nic.in/ ) या साइटेचे वर्णन माहितीने भरलेले जुने खोके असेच करावे लागेल इथे माहिती खुप आहे पण ती नुसती घुसडली आहे सर्वात साध्या आणि जुन्या डीजाइन्मुळे हे असे घडते आहे पण एक गोष्ट नकीच वाखाणन्याजोगी आहे ती अशी की हे सरकारी संकेत्स्थळ असुन देखील उतमरित्या अपडेट होत आहे येथे आपणाला माहिती मिळेल ती कोल्हापुरच्या महान व्यक्तींबद्दल जे इतर बहुतेक ठिकाणी नाही याशिवाय जर तुम्हाला मतदानासंबंधी शंका असतील तर मात्र तुम्ही अगोदर इथे या कारण इथे सर्व नवी मतदार यादी आणि मतदान अधिकार्यांची माहिती आहे ,सरकरच्या विविध योजनांची देखील माहिती आहे सर्व शासकीय माहिती इथे उपलब्द्ध आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे इथे आमदार खासदार ते चित्रपटगृह यासर्वांचे दुरध्वनी क्रमांक उपलब्द्ध आहेत तेव्हा आयत्यावेळी पंचाइत होण्यापेक्षा आताच जावुन ते नंबर लिहुन घ्या पण एक खेदाची गोष्ट अशी की त्यानी हाती घेतलेल्या १७ संगणक संबधीत प्रोजेक्ट पैकी ३च पुर्ण असुन २ वर काम चालु आहे तेव्हा ही स्थिती फार चांगली नाही एकुणात हा प्रयत्न एकदा भेट देण्याजोगा जरुर आहे .
आता बोलु कोल्हापुर महानगर्पालिकेच्या या http://www.kolhapurcorporation.org/ संकेत्स्थळाबद्दल अहाहा संकेत्स्थळ असावे तर असे जरी सध्या पालिकेत "इ गवर्नन्स" चा घोटाळा चालु असला तरी हे स्थळ म्हणजे सर्वोत्कृष्ट संस्थळ आहे अत्युतम रचना, कल्पकतेचा कळस आणि २ भाषात माहितीची उपलबद्धता. आहाहा माहितीचा खजिना आहेच पण एकापेक्ष एक सुंदर ऍनिमेशन्स देखील आहेत. येथे इ पेमेंट .टॅक्स कॅल्कुलेटर इ सोयी देखील पुरवलेल्या आहेत पब्लीक नोटस प्रेस रीलीज इत्यदी द्वारे कामकाजाचे संपुर्ण अधुनिकिकरण झाल्याचे दीसुन येते आता महापालिका म्हटल्यावर खुप माहिती ,विभाग आलेच पण उत्क्रुश्ट रचनेमुळे एवढी माहिती कधीही अंगावर आल्यासारखे वाटत नाही हु इज हु ,विविध कमीट्या इत्यदी सर्व डीटेल माहिती आणि १०० वर्षापुर्वीची फोटो गॅलरी . मानल बाबा महापालिकेला
हे झाले गावाबद्दल आता गावातल्या इतर गोष्टीबद्दल .कोल्हापुरला विद्यापीठाचा लाभ झाला आहे त्यामुळे प्रथम ते स्थळ पाहणे आलेच पण गजब म्हणजे विद्यापीठाची २ स्थळे आहेत तेथे माहिती सेम असुन डीझाइन वेगळे आहे जे स्थळ पहिल्यांदा सापडते ते http://www.unishivaji.ac.in/ तर फारच जुने आणि साधे असल्याचे जाणवते आहे पण सर्व माहिती ऍड करण्याचा बर्‍यापैकी प्रयत्न झाला आहे आणि ते बर्‍यापैकी अपडेटही होत असल्याचे दीसतेय या स्थळाचे वैशिश्ट्य म्हणजे ऑनलाइन सीलॅबस आणि स्टुंड्ट हेल्पलाइन या सुविधा या सुविधांमुळेच विद्यापीठाला इ लर्निंग मध्ये आघाडी घेता आलेली आहे एकुण काय तर विद्यार्थ्यानी तिकडे जावेपण पण बाकिच्यानी कामाव्यतीरीक्त तिथे जायची काही गरज नाही
आता एका वेगळ्या उपक्रमाबद्दल सध्या http://www.kolhapurmall.com/ हे संकेतस्थळ एक वेगळा उपक्रम राबवत आहे कोल्हापुरमधील लोकांचे नातेवाइक परदेशात आहेत त्याना विविध प्रसंगावेळी आपल्या गावातील लोकाना भेटी पाठवाव्यस्शा वाटतात त्यांची सोय हे स्थळ करते येथे आपण आप्ल्या कोल्हापुरातील नातेवाइकाना भेटवस्तु पाठवु शकतो तेहे जगाच्या अगदी कोण्त्याही कोपर्यातुन तेव्हा तुम्ही बाहेर असाल तर काळजी नको आता सण या स्थळामर्फत साजरे करा .
ह्या झाल्या महत्त्वाच्या साइट्स याशिवाय विविध कॉलेजेस, रोटरी क्लुब ,कोल्हापुर टुरीझम यासारख्या वेगवेगळ्या साइट्स आहेत काही साइट्स बद्दल माहिती देणे अनावधानाने राहुनही गेले अस्णार आहे त्यासर्वच चांगल्या आणि त्या त्याविशयावर माहिते देणार्या अहेत ,अगदी गांधीनगर बद्दल माहिती देणारे हे स्थळ देखील आहे तेव्हा आपण नकीच त्याचा वापर करु शकतो विषेश म्हणजे कोल्हापुरातेल सर्व मोठ्या हॉटेलांची स्थळे असुन ते चांगली आहेत याशिवाय के.एस्.ए ,कुफा इत्यादींची उत्कृष्ट स्थळे आहेत याशिवाय ambabai,panhala,jotiba हे डोमेन अगोदरच विकत घेतलेली दीसतात तर काही स्थळे तयार होताहेत एकुणात काय तर कोल्हापुर महाजालावर प्रचंड प्रगती करत आहे आणि ही खुप चांगली गोश्ट आहे
तर दोस्तानो मी एक www.charcha.tk हे संकेतस्थळ चालवतो यानिमित्याने सर्फींग करताना मला हे सगळे सापडले आणि गावापोटीच्या आत्मीयतेने ते आपणाला सांगीतले याचा आपणाला फायदा होवो आणि कोल्हापुर महाजालविश्वात अशीच प्रगती करो हीच अंबाबाइचरणी प्रार्थना.......
विनायक पाचलग
अस्सल कोल्हापुरी

राहती जागाजीवनमानतंत्रप्रकटन

प्रतिक्रिया

सुशील's picture

28 Mar 2009 - 10:31 pm | सुशील

विनायक छानच लिहिले आहेत की. कोल्हापुरची जालावरची सफर मस्त घडवलीत.

-सुशील
----------
अवांतर: चारोळ्या वगैरे करत असाल तर मि सुरु केलेल्या धाग्यावर या. तुमचे स्वागतच आहे.

टारझन's picture

28 Mar 2009 - 10:49 pm | टारझन

ही प्रतिक्रिया होती की स्वतःच्या लेखाची ऍड्वर्टाईज ? =)) =)) =))
त्रास द्यायचा णवा फंडा =))

असो , विनायकरावांच्या लेखणाबद्दल मी काय बोलावे , नेहमी प्रमाणे लिहीलंय ..

सुशील's picture

28 Mar 2009 - 10:53 pm | सुशील

चांगल लिहिल आहे म्हणून मी सुचवल. मला माज्या लेखाची जाहिरात करायची काय गरज? तु तुझ काम बघ.....

टारझन's picture

28 Mar 2009 - 10:58 pm | टारझन

तु तुझं काम बघ ..

=)) =)) =)) भावना पोचल्या

मला माज्या लेखाची जाहिरात करायची काय गरज?

=)) =)) =)) प्रचंड विनोद ..

असो .. शेवटचा प्रतिसाद ..

योगी९००'s picture

29 Mar 2009 - 3:06 am | योगी९००

तु आल्यापासून पाहतो आहे, काही सदस्यांकडून तुला विनाकारण टार्गेट लेले जाते,तुझी या ना त्या कारणावरुन चेष्टा केली जाते
मला हे मुळीच मान्य नाही. बर्‍याचदा विनायकाच्या लिखाणावर याच सदस्यांनी चांगल्या प्रतिक्रिया सुद्धा दिलेल्या आहेत. सर्वांना विनायकात असलेले गुण माहित आहेत. त्याची चेष्टा होते ते त्याच्या वाचनीय नसलेल्या किंवा अवजड शब्द वापरून लिहिलेल्या लेखांमुळे.. यामुळे विनायकाने ओढूनताणून ते लेख लिहिले आहे असे वाटते. आणि बर्‍याच वेळा त्याची चेष्टा झाली ती त्याच्या वारंवार लोकांना ख.व. मधून पाठवलेल्या गेलेल्या आमंत्रणांमुळे, ज्याचा बर्‍याच सदस्यांना वैताग आला होता.

मि.पा. वर जरी शुद्धलेखनाचा आग्रह नसला तरी कमी शुद्धलेखनाच्या चुका अपेक्षित आहेत. ज्याबद्दल बर्‍याच लोकांनी सल्ले देवून सुद्धा फार सुधारणा आढळली नव्हती. (हल्ली थोडी सुधारणा आहे). सर्वांना त्याच्यात सुधारणा व्हावी असेच वाटते आहे. उगाच कोणी कोणाला टोकत नाही याच मताचा मी आहे. आणि हो..मला नाही वाटत की कोणी वैयक्तिक आकसाने त्याला हिणवत असेल. माझ्यामते स्वतः विनायक हे समजण्याइतका समंजस आहे आणि म्हणूनच येथे अजून आहे.

तू ज्या चिकाटीने लिहीतो आहेस ते पाहून तुझे कौतूक वाटत आहे.
हे मात्र पटले. हे खरंच कौतूकास्पद आहे.

एक ना एक दिवस मिसळपावच्या सिद्धहस्त लेखकांमध्ये तुझे नाव नक्कीच वाचायला मिळेल.
हे फक्त मलाच नाही तर जे सदस्य विनायकला टार्गेट करतात त्यांनासुद्धा आवडेल.

खादाडमाऊ

भाग्यश्री's picture

29 Mar 2009 - 3:18 am | भाग्यश्री

पूर्ण सहमत!!

हा लेख आवडला.. बरीच नवीन माहीती व संकेतस्थळे मिळाली!! :)

सँडी's picture

29 Mar 2009 - 9:24 am | सँडी

चिकटी आवडली. लिहित रहा.

नरेश_'s picture

29 Mar 2009 - 10:12 am | नरेश_

चांगलं लिहितोस मित्रा.
अजून सरस, सकस येऊ दे.

सही /-

आगरी बोली - आगरी बाना.

सुहास's picture

2 Apr 2009 - 5:06 am | सुहास

http://www.mykolhapur.net/

ही सुध्दा एक छान साईट आहे... आणि मराठीतून आहे...

... सुहास