निबंध- प्रवास -एक आनंद यात्रा

विनायक पाचलग's picture
विनायक पाचलग in जनातलं, मनातलं
26 Mar 2009 - 10:22 pm


आपला,
विन्या विद्यार्थी

मांडणीप्रवासवावरवाङ्मयसाहित्यिकसमाजजीवनमानप्रकटनविचारलेख

प्रतिक्रिया

मिहिर's picture

26 Mar 2009 - 10:59 pm | मिहिर

एवढी लिहायची व दुसर्यांना वाचा म्हणून सांगायची हौस दांडगी तर लेख निदान स्कॅन करून चिकटवू नकोस.

गोगोल's picture

26 Mar 2009 - 11:12 pm | गोगोल

ईनू भाव .. मिष्टिक से ड्राफ्ट अपलोड झाला ना... अल्लड काळे ढग खाली म्याडम ची खुण तशीच राहिली की

विनायक पाचलग's picture

26 Mar 2009 - 11:26 pm | विनायक पाचलग

ती खुण माझीच आहे
मुळ हस्तलिखितात ते नाही म्हणून
बाकि हे लिखाण ऑक्टोबर महिन्यातले आहे
फकत निबंधासारखे आहे म्हणून निबंध

When god solves your problem You have faith on his abilities.But when he does not solve your problems,Remember He has faith in YOUR ABILITIES

विनायक पाचलग

भाग्यश्री's picture

26 Mar 2009 - 11:42 pm | भाग्यश्री

निबंध शब्दबंबाळ वाटला..
शाळेनंतर अशा टाईपचे वाचायची सवय निघून गेल्याने बोर झाले..

तुला खरंच लिहून लोकांची वाहवा मिळवायची असेल तर प्लीज सहज सोपं लिही!
माझी खात्री आहे बर्‍याच लोकांना हे असं जड शब्द असलेलं लिखाण आवडत नाही.
प्रवासाचेच उदाहरण घेतलेस तर त्यात किती प्रकारांनी फुलवता येईल! तू केलेल्या प्रवासामधले किस्से, काही उदाहरणं, प्रवासावर आधारित इतिहासातले वगैरे काही महत्वाचे प्रसंग असतील तर ते.. आणि अजुन बरंच काय काय..
हे म्हणजे केवळ शाळेत निबंध स्पर्धा आहे, विषय प्रवास! आणि मुलं लिहीतायत पुस्तकांमधून पाठ केलेला निबंध, त्याच त्या क्लीशे ओळी.. असं वाटतंय !

एक कुतुहल म्हणून प्रश्न : तू बाकीच्या लोकांचे लिखाण वाचतोस का रे? आजकाल लोकं कसं लिहीतात, लोकांना काय आवडते? विषय काय असतात.. थोडं वाचन वाढवलंस ना मुला तर हे सगळं तुला समजेल..

( अजुन एक फुकट सल्ला! : मीही साधारण तुझ्याच वयाची असताना मराठी संकेतस्थळांवर आले. ७-७.५ वर्षांपूर्वी.. केवळ मायबोलीच होती तेव्हा. मलाही फार लवकर फेमस व्हावं असंच वाटायचं! त्या वयात वाटतं तसं.. पण थोडं दमाने घे.. भरपूर लिही! पण भरपूर वाचही! लोकांनी काही सांगितलं तर विचार कर त्यावर.. ऐक जरा..
तू नशिबवान आहेस की तुला इतके सांगणारे भेटत आहेत.. आणि ते ही इतक्या कोवळ्या वयात. जर नीट ऐकलंस्,विचार करून त्याप्रमाणे कृती केलीस तर खरंच पुढे जाशील! )

मीनल's picture

26 Mar 2009 - 11:43 pm | मीनल

स्वतःच्या एखाद्या लेखावर ऑलरेडी मेहनत घेऊन झाली आहे. ते स्कॅन करून मिपावर टाकल आणि ड्बल मेहनत वाचवली तर काय झाल? वेळ, श्रम दोन्ही वाचले.शिवाय इतरांना वाचायला ही मिळाला चांगला लेख.
लिहायची व दुसर्यांना वाचा म्हणून सांगायची हौस असण काही चूक नाही.

विनायक, लिहीत रहा.वाचायला देत रहा.
कुणाला आवडेल किंवा नाही आवडणात लेखन. काही हरकत नाही.कारण प्रत्येकाच्या आवडी निवडी ,अपेक्षा वेगवेगळ्या असतात.

मीनल.

सहज's picture

27 Mar 2009 - 7:48 am | सहज

पुर्णता सहमत.

फक्त अधुन मधून प्रतिसादातुन योग्य तो बोध घेउन बदल करत रहा इतकेच.

लिखाळ's picture

27 Mar 2009 - 12:55 am | लिखाळ

निबंध चांगला आहे.
स्कॅन करुन टाकल्याने चांगले टंकन आणि योग्य जागी विरामचिन्हे, परिच्छेद असलेला लेख भराभर वाचता आला.

-- लिखाळ.

धनंजय's picture

27 Mar 2009 - 1:08 am | धनंजय

वेगवेगळ्या परिच्छेदांना ओवणारा धागा आवडला. पुढील समर्थ लेखनाच्या खुणा दिसतात.

"अल्लड काळे ढग" बद्दल पुनर्विचार - हादेखील पुढे येणार्‍या आत्मपरीक्षक वृत्तीची खूण सांगतो.

शुभास्ते पन्थाना: सन्तु ।

विनायक पाचलग's picture

27 Mar 2009 - 11:34 am | विनायक पाचलग

आपल्या सर्वांचे प्रतिसाद दिल्याबद्दल आभार
१.सदरचा लेख हा मी सप्टेंबर मध्ये लिहिला आहे,आणि तो लेख पुन्हा टाइप करण्याइतका वेळ नसल्याने स्कॅन करुन टाकला आहे
यामाग फक्त स्वतःचे लिखाण मग ते कसेहि असो लोकांपर्यंट पोहोचावे हि इछा आहे
आणि हो मध्ये माझे काहि लिखाण निबंध टाइप वाटते असे लोकाना वाटले आणि ते योग्य ही आहे
म्हणून लेख टाकतानाच निबंध असा उल्लेख केलेला आहे
बाकि माझे मिपावर वाचन सुरु असते मात्र सध्या जनरीक होस्ट प्रोसेस बंद पडत असल्याने नेट सारखे बंद पडते त्यामुळे प्रतिसाद देवु शक्त नाही आहे
क्षमस्व.......
When god solves your problem You have faith on his abilities.But when he does not solve your problems,Remember He has faith in YOUR ABILITIES

विनायक पाचलग

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Mar 2009 - 6:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विनायक, आपण चांगले लिहिता...लिहित राहा !

अवांतर : एखाद्याच्या लेखनाला वारंवार न आवडणा-या प्रतिक्रिया लिहिल्याच पाहिजेत, हे वयक्तिक मला तरी रुचत नाही. थोडीफार गम्मत बरी असते पण त्यामुळे एखादा सदस्य प्रचंड नाराज होऊ शकतो, तेव्हा सदस्यांना / मित्रांना विनंती की अतिअवांतर प्रतिक्रिया टाळता आल्या तर टाळाव्यात ! काही प्रतिक्रिया अप्रकाशित केल्या आहेत.

-दिलीप बिरुटे

आनंद's picture

27 Mar 2009 - 7:05 pm | आनंद

छानच लिहलयस.

रहावत नाही म्हणुन विचारतो, मित्रांशी गप्पा मारतानाही अशीच ज..ड भाषा वापरतोस काय रे?

दिपक's picture

28 Mar 2009 - 2:12 pm | दिपक

छान आहे रे लेख ! :)