मनाच्या कुपितले-पाऊस

विनायक पाचलग's picture
विनायक पाचलग in जनातलं, मनातलं
25 Mar 2009 - 1:44 pm

मनाच्या कुपितले या सदरातला हा सलग तेरावा लेख

पाऊस दाटलेला माझ्या घरावरीही हा

काल हे गाणे पुन्हा ऐकले. ऐकून बरे वाटले बाकी मी मराठी गाण्यांचा डाय हार्ड फॅन आहे हे तुम्ही जाणताच, त्यामुळे असे अर्थवाही, माझ्यासारखी पाल्हाळ न लावता

थोडक्यात अर्थ सांगणारे गाणे आवडणारच ना , बाकी मी काल झालेल्या पहिल्या पावसात देखील मनसोक्त भिजलो आता टाइप करताना देखील १० -१५ दा शिंकतोय.

हा आता तुम्हाला हा प्रश्न पडला असणार म्हणा की तू पावसात भिजलास त्याचा आम्हाला काय फायदा. तुझ्या अंगात मस्ती होती म्हणून भिजलास आता भोग फळ कर्माची. होय हो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण मला अचानक माझा स्वतःचा अभिमान वाटला का तर आजही मी माझ्यातलं लहानपण जपू शकलो, आणि कॉलेजकुमार आहे याचा बाउ न करता मनसोक्त भिजून आजारी पडू शकलो, सातवी आठवीतल्या मुलांबरोबर खेळलो देखील . बाकी माझे बरे आहे म्हणा मला पावसात भिजण्याची संधीतरी मिळते. नाहीतर मुंबैकर, जरा पाऊस पडला की यांच्या काळजात धस्स... असो पण त्याला नैसर्गिक नव्हे बातम्यांचा पाऊस कारणीभूत आहे असे मला वाटते. हा यावरून आठवले सध्या अवकळी पावसाचा काळ आहे ना आणि हे अवकळी पाऊस त्रास देतातच ना. खरेतर पाऊस ही गोष्ट अशी आहे की ती प्रत्येकवेळी फायद्याची असतेच असे नाही

आता बघा ना रविवारी पाऊस पडला तर तो झक मारायला कोणाच्या फायद्याचा ठरणार आहे, च्यायला एक सुट्टी बुडली म्हणून आपण शिव्याच घालणार ना, किंवा तुम्ही ट्रॅफिकमध्ये आहात आणि सुरू झाला पाऊस तर काय ये रे ये रे पावसा म्हणत बसणार नाही ना...

हा बाकी आपण घरात असताना पाऊस आला. भजी खाऊनं झाली की आपल्यातला कवी जागा होतो ही गोष्ट वेगळी पण असू दे की हो अहो जिथे साहित्य संमेलनाला अमेरिकेत जावे लागले तीथे असे आपल्यासारखे कवीच साहीत्यविश्व तारणार तेव्हा चालायचेच, आपल्यात लपलेला सुप्त राक्षस असतो तो पडतो कधीकधी बाहेर आणि महत्त्वाचे म्हणजे त्याचा त्रास आपल्याला कुठे होतो, आता कोण कुठला मी, जरा पावसात भिजलो म्हणून शिरिश कणेकरांसारखे लिहायला लागलो ,आता मला काही जमत नाही ही गोष्ट सोडा. पण वाचायचा त्रास तुम्हीच घेताय ना मग मला काय पडली आहे त्याची....

बाकी यावर्षी गोरगरीबांना सुखावणारा पाऊस पडो वा न पडो हा अवकळी पाऊस धुमाकुळ घालणार हे नक्की... अहो असे आश्चर्याने काय वाचताय मी काय भविष्यवेत्ता नाही जरा पी सी वरून उठा बाहेर बघा केवढा पाऊस पडतोय

कुठे काय विचारता अहो जरा टीव्ही लावा की बघा केवढ्या बातम्यांच पावुस पडतोय अगदी उत्तर प्रदेशातून पडतोय. आयला समजले नाही काय आता चॅनेल सर्फ करताना कुठे तरी तुम्ही मतदरसंघांची लक्षणे (भाकिते) पाहिले असतीलच व ऍज युजवल तेथे उत्तर प्रदेशातील गेला बाजार बिहारातील काही चालू असेल आहे की नाही मॉडर्न पाऊस. च्यायला आपण हा पावुस बिनभोबाट सहन केला म्हणून आपल्याला काही नाही (बक्षीस हो) आणि नको त्या जागी पाऊस पाडुनही (ते मध्ये कृत्रीम पावसाचे झालेले तसे)त्या चॅनेलवाल्याना पैसे.. मानले बाबा, पण यात आश्चर्य ते काय जिथे महात्म्याच्या कपड्यांचा लिलाव होतो आणि जनतेला व्यसनाला लावून मिळालेल्या पैशातून एखादा आपल्याच वस्तू कारण नसताना दुसऱ्याकडून विकत घेतो . त्या देशात हे म्हणजे काय कीस झाड की पत्ती बाकी आता एक १० दीवसात बाजार भरणार आहे मोट्ठा इंडीयन पळपुटा लवाजमा (आय पी एल)म्हणून, तिथे अगोदरच पाऊस पडलेला आहे पैशांचा पण तो आपल्याला दिसला नाही ना( सरकार ज्या प्रकारे योजनांचा पाऊस पाडतेना तस होत म्हणे तो असे मला बातमीदारा़कडून समजले) म्हणून आता धावांचा पाऊस पडणार आहे म्हणे आणि त्यासाठी खास परदेशातून तज्ञांची टीम बोलवली आहे म्हणे त्यामुळे यशाची १००००००००००००% खात्री, शिवाय भारतीय जमीन उपजावू नाही असा आदेश पवार साहेबानी दिल्यामुळे आता त्यासाठी जंगलाची निवड केलेली आहे बाकी बायका आय पी एल बघतात कारण त्याना तो युवराज किंवा धोनी आवडतो ना म्हणून पण पुरुषाचे काय म्हणून तेथे उत्तम उत्तम नृत्यांचा पण पाऊस पडणार आहे म्हणे त्यामुळे आता आपण टीव्हीवर बघून ठरवू की पाऊस बघू भारी आहे की नाही(तेवढाच चान्स मारुन घ्यायचा) . हा विसरलोच की सध्या भारतात इंडीयन पोलिटीकल लीगपण सुरू आहे ना, आयला मग इथे तर पाऊसच पाऊस -भांडणांच पाऊस, आश्वसनांचा पाऊस राजकीय खेळ्यांचा पाऊस. आता सगळेजण एकच म्हणणार.. जेथे जाइ तेथे पाऊस सोबती..... बाकी आता अजून एक पाऊस जोरात सुरू आहे.. लेखांचा पाऊस, प्रत्येक जण केतकर झाला आहे आणि प्रत्येकाला एका एका पक्षाने विकत घेतले आहे त्यामुळे काय सुंदर लेखांचा पाऊस पडतो आहे, आणि हो हा पाऊस विशिष्ट प्रकारचा आहे बरका म्हणजे तो वेगवेगळ्या गावी वेगवेगळ्या वेळी पडतो म्हणजे एका गावचे(पेपरातले) दुसऱ्या गावात(पेपरात) एक दोन दिवसानी जशेच्या तसे येते अर्थात वाढलेल्या शुद्धलेखनाच्या चुकांसह(माझ्यासारखे, पण माझ्याकडे मनोगत जाणणारा शुद्धलेखन चिकित्सक तरी आहे त्यांचे काय) ... हा आणि हो सध्या अजून एक पाऊस पडतोय तो म्हणजे मेल्सचा. समजा तुम्ही भाजपा वा तत्सम पक्षाचे असाल तर गांधीविरोधी मेल येइल आणि गांधीवादी असाल तर पण गांधींचीच मेल येइल पण वरुणची शेवटी गांधीना पर्याय नाही म्हणे.......... बाकी हा पाऊस सध्या फार जोरात आहे याची जाणीव आम्हाला जास्त होत आहे कारण सध्या आमचा मेलबॉक्स असा पुर्ण भरला आहे .हा सध्या आणखी एक पाऊस चालू आहे अगदी तुमच्या शेजारी वा तुमच्या घरातच चालू आहे वैयक्तीक खरडींचा, त्याचे काय आहे सध्या मंदी चालू आहे. त्यामुळे संगणकावर काहीच काम नाही. बर पैसा भरती आहे की कंपनी मग करा टाइमपास, यु नळीवर तरी कीती वेळ फुकट व्हीडीवो बघणार मग येतात त्रास द्यायला पण तात्यांसारखांचा करडा वॉच असल्याने त्यांचे जास्त चालत नाही हा भाग वेगळा

पण या सगळ्याचे वैशिष्ट म्हणजे हे सगळे पाऊस वळिवाचे आहेत, म्हणजे काय तर कधी पडतील कधी कमी होतील आणि कुठे पडतील हे साक्षात देवदेखील सांगू शकत नाहीत.(नो वॉरंटी) पण सध्या एक मोसमी पाऊस पडतो आहे हा मोसम दर पाच वर्षानी येतो त्याला पैशाचा पाऊस असे म्हणतात. या पावसात मात्र सगळ्याना भीजता येते अगदी गुपचुपपणे आणि हो हे बाकीचे पाऊस थांबतील तरी पण हा पावुस थांबणार नाही कारण हा पावुस विचार करून पाडला जातो, आणि झोपेचे सोंग घेतलेल्याला उठवता येत नाही हे आपण जाणतोच तेव्हा जोपर्यंत एका पेगवर मते वीकली जातात तोपर्यंत हा पावुस पडत राहणार आहे अगदी कोणी जगभरातले सगळे शास्त्रज्ञ आणले तरी हा पावुस सतत पडत राहणार आहे त्याना पण तो थांबवता येणार नाही....

बर आता हे पाऊस पुराण थांबवतो, कारण यापैकी एखाद्या पावसात तुम्ही भिजून घ्याल असे मला माझे मन सांगत आहे तेव्हा उगाच मध्ये कशाला या, जावा मजा करा खुप भीजून घ्या, हा काळ तुमचा माझा प्रत्येकाचा आहे तेव्हा भीग जावो

आणि हो एक विशेष सुचना पावसात भिजताना थोडे पाणी नदीत पण जाइल याची व्यवस्था करा कारण मग ते पाणी नदीत आणि मग गंगेत जाइल आणि मग हे सुगीचे दीवस संपले की नंतर वाहत्या गंगेत हात धुवायला गंगा वाहती राहील बाकी चलतो

"हे गंधीत वारे फीरणारे, घन झरझर उत्कट झरणारे........................ '

थांबा थांबा फाट्यावर मारू नका जातो बाय..........................

विन्या भाकीतवाला

वाङ्मयसाहित्यिकसमाजजीवनमानराहणीप्रकटनलेखप्रतिभा

प्रतिक्रिया

योगी९००'s picture

25 Mar 2009 - 5:13 pm | योगी९००

चांगले आहे मन तुझे..मनात कुपी आहे का टाकी आहे ते जरा सांग..लेख आवडला ..

थोडक्यात अर्थ सांगणारे गाणे आवडणारच ना , बाकी मी काल झालेल्या पहिल्या पावसात देखील मनसोक्त भिजलो आता टाइप करताना देखील १० -१५ दा शिंकतोय.
४ थ्या वाक्यापर्यंत १०-१५ वेळा शिंकतोस म्हणतो म्हणजे पुर्ण लिखाण होईपर्यंत संगणक पुर्णपणे भिजला असला पाहिजे. त्यामुळे शुद्धलेखन चुका का याचे कारण ही समजले. या वेळी त्या चुका सुधार असे सांगणार नाही. मला आता माझ्याच संगणकाकडे बघवत नाही आहे.

थांबा थांबा फट्यावर मरू नका जातो बाय..........................
आम्ही फट्यावर मरत नाही...तर फाट्यावर मारतो...

(विनंती-लेख जरा गडबडीत टाइप केला आहे ,त्यामुळे काही चुका रहिल्या असण्याची शक्यता आहे वेळ मिळाल्यावर दुरुस्त करेन तोपर्यंत समजुन घ्या)
हे बहूतेक तू तुझ्या स्वाक्षरीमध्येच टाकून ठेव. आम्हाला आता याची सवय झाली आहे.

खादाडमाऊ

विनायक पाचलग's picture

25 Mar 2009 - 7:19 pm | विनायक पाचलग

प्रतिसादाबद्दल आभार
सध्या का कोणास ठावुक मला हे वारा पाऊस असच सुचतय
बाकी शुद्धलेखनाच्या चुका सुधारल्या आहेत

When god solves your problem You have faith on his abilities.But when he does not solve your problems,Remember He has faith in YOUR ABILITIES

विनायक पाचलग

मिहिर's picture

25 Mar 2009 - 10:19 pm | मिहिर

लेख चांगला आहे तसा. फार मोठे परिच्छेद वाचायचा कंटाळा येतो तुझे लेख वाचताना.

भाग्यश्री's picture

25 Mar 2009 - 10:34 pm | भाग्यश्री

ह्म्म.. ते गाणं चांगलं आहे..
पण या लेखामधून तुला त्या गाण्यापेक्षाही दुसर्‍याच गोष्टीवर लिहायचे होते किंवा कोणावर तरी शरसंधान करायचे आहे असे फार वाटले.. बरेच उल्लेख उगीच आलेत असं मलातरी वाटले... वैयक्तिक हेवेदावे लेखात आणू नयेत या मताची मी आहे..

पावसावर अजुन छान नक्की लिहीता येईल..

विनायक पाचलग's picture

25 Mar 2009 - 11:21 pm | विनायक पाचलग

वैयक्तीक हेवेदावे नाहीत
पण शिरिष्कणेकर जसे एखादा साधा विषय घेवुन सगळ्याना मारतात त्याप्रमाणे लिहाय्चे होते पण जमले नाही असे वाटते

When god solves your problem You have faith on his abilities.But when he does not solve your problems,Remember He has faith in YOUR ABILITIES

विनायक पाचलग

दशानन's picture

26 Mar 2009 - 11:09 am | दशानन

विनायक ने खरडी मधून येथे त्याच्या बद्दलचे मत व्यक्त करायला सांगितले आहे त्यासाठी हा लेखन प्रपंच.

मित्रा,
मला सहा वर्ष झाली मराठी महाजालावर वावर करताना व अनेक लेख / कथा लिहल्या तरी ही माझ्यात जरा ही ही हिंमत झाली नाही की कुणाकडे जाऊन माझ्या बद्दल त्यांचे मत काय आहे विचारायला... तुला येथे येऊन चार महिने झाले तुझ्या बद्दल आम्ही (सगळ्यांनी ) कसे मत व्यक्त करायचे ? शिकणे ही हे कला आहे, कुणाकडे जाऊन जबरदस्तीने शिकता येत नाही त्यासाठी समोरच्या माणसाच्या मनात ही शिकवण्याची / लिहण्याची इच्छा होणे आवश्यक आहे. येथे तू अजून काही काळ व्यतीत कर. वाचत जा, जे दिसतय ते सर्व काही वाच. वाचनामुळे तुझ्यात बदल होईल, एक दृष्टीकोन मिळेल.

असे सारखे सारखे मागे लागून प्रतिसाद / मत मिळत नसतात विनायका. त्यासाठी भरिव कामगीरी करावी लागते, वाचन्यासारखं असले की अपोआप सदस्य वाचतात ही व प्रतिसाद देतात, फक्त तुझं मन राखावं व प्रतिसाद द्यावा हे मला पटत नाही त्यामुळे हे सर्व लिहतो आहे, माझा हा अधिकार ही नाही कि तुला काय कर व काय करु नको हे सागण्याचा पण ती विचारले आहेस म्हणून लिहतो आहे,
प्रत्येक गोष्टी साठी काळ जावा लागतो. काही शिकण्यासाठी साधना करावी लागते, तुला अजून खुप आयुष्य बघायचं आहे, जो पर्यंत तु जिवन म्हणजे काय असे समजत नाहीस तो पर्यंत तुझे लेखन समृध्द कसे होणार ? तु अजून घरातून देखील बाहेर पडला नाही आहेस, सध्या तु कॉलेज मध्ये शिकतो आहेस त्यामुळे तुला वारा, पाऊस व गाणी आठवतात पण जेव्हा तु जिवनाच्या कॉलेज मध्ये येशील तेव्हा तुला नवनवीन विषय भेटतील, नव नवीन शब्द भेटतील, अनुभव भेट्तील व कधी तरी मग तेच अनुभव तुझ्या शब्दातून बाहेर पडतील.
सध्या तु लेखन इत्यादी मार्ग सोड असे म्हणत नाही पण सध्या फक्त वाच, कमी त कमी दोन-तीन महीने, सर्वसाक्षी, रामदास काका, तात्या, सामंत काका, बिपिन, अदिती, बिरुटे सर, डांबिस काका, प्राजु, शितल, अवलिया, प्रकाश घाटपांडे, प्रमोद देव, विकास व अन्य मिपाकर ह्यांचे लेखन वाच, तु लिहलेले व त्यांनी लिहलेले ह्यात काय फरक आहे तांत्रिक दृष्ट्या व शाब्दिक दृष्ट्या हे शोध, आपले लेखन परिपक्क करण्यासाठी वेळ द्यावा लागेल तुला, असेल लगेच दोन-तीन महिन्यात समृध्द होता येत नाही .

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Mar 2009 - 10:41 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

हं, आत्ताच पाहिला हा लेख! चुकूनच माझं (अशुद्ध तस्मात् चुकीचं) नाव नजरेस पडलं म्हणून प्रतिक्रीया प्रपंच!

माझ्यावर विनोद करूच नयेत असं काही नाही, पण किमान ते विनोदी असावेत याची काळजी घेतली तर बरं! अर्थात, माझा व्यक्तीगत उल्लेख मला खटकलेला आहे, कृपया लेखकाने याची नोंद घ्यावी.

अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

कवटी's picture

26 Mar 2009 - 10:59 am | कवटी

नाहीतर मुंबैकर, जरा पाऊस पडला की यांच्या काळजात धस्स...
हा आम्हा तमाम मुंबैकरांचा आणि त्यानी २६/७ च्या (आणि इतर वेळीही गोची करणार्‍या पावसाच्या) भोगलेल्या वेदनेचा अपमान आहे.
मी याचा इथे जाहिर निषेध करतो.

कवटी