मनाच्या कुपितले-जर्नल

विनायक पाचलग's picture
विनायक पाचलग in जनातलं, मनातलं
18 Mar 2009 - 7:02 pm

मनाच्या कुपीतले या सदरातला हा सलग बारावा लेख.
हे सर्व लेख तुम्ही इथेही वाचु शकता

जर्नल

हाय लोकानो काय चालु हाय ,अहो मला ओळखले नाहीत का! हा कसे ओळखणार म्हणा, तुम्हा सगळ्यांची शिक्षण होवुन लय दीवस झाले, आणि त्या काळात आमच्या भावंडानी तुम्हाला लय पीडलेला मग तुम्ही मला कसे ओळखाल. बाकी म्या जर्नल आणि माझा मालक म्हणजे ह्यो विन्या टारगट मी आपला त्याचा पामर .ए कोण ते म्हणले रे टॅब बंद करतो त्या विन्या मुर्खाचा नवा निबंध कशाला वाचत बसु,गप्प बस आज म्या बडबडणार आहे.

आणि अरे भावड्यानो माझ्यावर आजपर्यंत फक्त आकडेमोड आणि क्लीश्ट प्रमेय इतकेच लिहिले गेलेले आहे त्यामुळे मला काय असले ललित लिहायला जमणार आहे कपाळ माझे.ते नाही का एखाद्या अटटल बिडी ओढणार्‍याला सीगारेट दीली तरी त्याला बीडीच चांगली वाटणार कारण शेवटी सगळेच सवयीचा गुलाम. बाकी तुम्हाला ह प्रश्न पडलाच असेल की म्या इकडे कसा .अहो तसे माझ्या डोक्य्तात खुप दीवसापासुन इथे यायचे घोळत होते अगदी आमच्या घाटपांडे काकांचे आंबे इथे यायच्या आगोदरपासुन. अहो ते आमच विन्या सारख कायतरी मिसळपाव मिसळ्पाव म्हणून बडबडायचे मध्ये तर काहीतरी त्याचे बीनसले म्हणे तुमच्याइथे, म्हणून असल चिडलेल ...एकदा असाच पी सी वरुन उठुन आला आणि माझ्या अंगावर असे काही लिवायला लागलेला की माझ्या अंगवर असले रेघोटे उडाले म्हणून सांगु....म्हणून म्हणले एकादा इथे येवु तरी ,काय कुटुंब आहे म्हणे ऑनलाइन ,त्याचे काय आहे पोरे कशी अभ्यास करताना हळुच पोरींकडे बघतात ना तसाच मी पण इथे डोकावायचो हळुच , पण आज सर्वांग सुंदर दर्शन झाले म्हणायच.असो पण मी हे असे का बरळतोय आ....... मी इथे आलोय तुमच्याशी गप्पा मारायला पण हे कसले पुराण चालवलय मी .. असो ते तुमच्या अवांतर अवांतर चा परीणाम हा गुण मला बी लागला वाटते चालायचेच ..कुछ मिलने के लिये कुछ खोना बी पडता है(वाटल्यास तुमच्या इथे कोण प्रेमवीर राजे म्हणून आहे म्हणे त्याला किंवा त्यासारख्या इतराना विचारा)

बाकी आम्ही आज लय आनंदात आहोत कारण का तर उद्या परवा दहावी बारावी ची पोरे रीकामी झाली म्हणजे काय तर माझ्या आणि त्यामुळे ते त्या सरांच्या( अहो मीच रावण म्हटलेले बर दीसत नाही म्हणून सरच म्हणतो) तावडीतुन ती पोरे सुटली आणि महत्त्वाचे म्हणजे काही नवी खाद्ये (नवीन विद्यार्थीगण ) मला मिळाली तसे सरकारने आमची लय काळजी घेतली आहे त्या पोराना माझी सवय व्हावी म्हणुन त्यानी माझा छोटा भावु तयार केला आहे प्रोजेक्ट नावाचा( वाटल्यास एकदा विद्यालयात शिकणार्‍या एखद्या नातेवाइकाला बाबा रे या वर्शात तु कीती प्रोजेक्ट पुर्ण केलेस असे विचारा समजुन जाइल सगळे) त्यामुळे एकदा त्याला सहन केला मी मग ती पोर बी माझ्या जातकुळीला सहन करायला तयार होतत ..त्यामुळे मला बी फायदा होतो आहे कोणाला जास्त त्रास न देता ते बेणे शिक्षक आणि आणि ही टवाळे पोरे या दोघानाबी छान सांभाळता येतय ....

असो बाकी आम्ही लय भाग्यवान आहे आम्हाला कीत्येक घटनांचे साक्षीदर होता येते ना म्हणून... रामायणातल्या हनुमानाची (दुत म्हणून ....आठवा आमचे प्रेमपत्र एकडे तीकडे पाठवायचे काम) किंवा महाभारतातील संजय आहोत आम्ही .काही रामायणे घडवण्यात आमचा मोठा वाटा आहे बाकी इथे तरुणांचा मोठा ग्रुप दीसतोय (चायला सारखे कानात कंपु कंपु असे कोण गुण्गुणतय रे) त्याना आम्च्या दोस्तांचा,बंधुंचा अनुभव असेलच ,काय हो हसताय कसले गालातल्या गालात आमच्या भावुबंदांबरोबर(म्हणजे जर्नल हो) तुम्ही काय दोस्ती केलीत,काय गमजा केलीत त्याचा तपशील येवुंदे इथे अहो त्या विन्याला एकदा सर्वात जास्त प्रतीसद सर्वात कमी वेळात यायचे भाग्य मिळु दे बरे !.

बाकी आमची कहाणी काय सांगायची एकदा पोराला शिंगे फुटली की त्याला ज्या ज्या गोश्टी मिळतात उदा नवी गाडी ,नवे बुट नवा गॉगल ,नव मोबाइल आणि महत्वाचे म्हणजे दररोज आइबापाच्या शिव्यांची लाखोली...यासारखीच त्यातलीच एक न चुकणारी गोश्ट म्हणजे म्या अहो जर्नल .....जसा जन्मलेला माणूस एकदा तरी प्रेमात पडतोच .(आयला परत लाजले ,अहो मग कसे व्हायचे मिपाच्या वहिन्यांचे आणि तायांचे ) तसा प्रत्येकाला एकदा ना एकदा तरी आमच्या भावुबंदाशी भेटावेच लागते आणि मग जस जसा काळ पुढे जाइल तसे ते एकमेकांचे जीगरी दोस्त होतात ....आणी मग एक एक पराक्रम सुरु होतात ,त्याचे काय आहे जसा नव्याचे नवु दीवस असत्तत तसे आम्हीदेखील देवघरात ठेवल्याप्रमाणे पुजले जातो कारण काय तर म्हणे नंतर नाइट मारता येतेच की आमच्यावर खरडायला म्हणे आयला नंतर टल्ल व्हायची प्रॅक्टीस करायला ही बेणी आमचा वापर करतात बघा काय दीवस आलेत .बाकी काहीजणाना गाडीवरुन फीरणे आणि काहीना तोंड न दाखवणे(म्हणजे गुरुजनवर्ग आणि यांचे जानी दुश्मन) या कार्यक्रमातुन वेळ कोठे मिळतो आमच्याकडे बघायला ....,आणि महत्त्वाचे म्हणजे ज्यासाठी हा आमचा जन्म असतो त्या प्रॅक्टीकल या गोश्टीचा याना गंध पण नसतो .....अहो त्याना प्रॅक्टीकल म्हणजे वेगळेच काहीतरी वाटते अहो जसे इथे मिपाच्या शाळेत प्रभु मास्तर आहेत म्हणे तसे प्रत्येक शाळेत अपवादाने(होय अपवादानेच) चांगले शिक्षक असतात पण त्याना ओळखतय कोण ....आणि कधी काम लागलेच तर ते लाईटवाले सर कुठे आहेत ते ढोले सर कोठे आहेत असे विचारले जाते कोणाल वाटायचे की त्या पिक्चरमधल्या बच्चनसारखे लाइट लावुन फीरतात की काय सर आंगावर ..पण त्याचा अर्थ असा की ते लाइट शिकवणारे सर. काय भारी आहे की नाही आयडीया .मग तोपर्यंत आम्ही शांत असतो आमचे सगळे दोस्त सुप्तावस्तेत असत्तात पण आम्ही आनंदात असतो कारण ही वादळापुर्वीची शांतता आहे हे आम्हालाबी माहीत असतयच की वो आमचे बी केस्(पाने हो)उगाचच पांढरी नाही झालेली .मग हळूच एके दीवशी कॉलेजच्या नोटीस बोर्डावर एक नोटीस येते की ज्यानी जर्नल दाखवलेले नाही त्याना सहामाही परीक्षेला बसता येत नाही .बस याच क्षणापासुन खरा आमचा गोंधळ सुरु होतो आणि त्याच दीवशी योगाय्योगाने काही स्पेशल कामासाठी एकादा ग्रुपमधला आलेला असतो आणि लकीली त्याचा नजरेत ते उत्तम पत्र दीसते आणि खाली प्रीन्सीपल आणि सर्व एच ओ डी ची सही बघीतल्यवर हळूच त्याचा हात मोबाइल कडे वळतो( आयला ती प्रतिक्षिप्त क्रीया का काय ते हो) आणि फ्री एस एम एस चा वापर करुन जवळ जवळ २० -२५ जणाना एक एस एम एस फॉरवर्ड होतो की बाबानो घोडेमैदान जवळ आलेले आहे आणि ही क्रिया सतत चालु राहते .आण अचानक कपाटतुन आम्ही टेबलावर येतो हाच त्यो आमचा पुनर्जन्म अहो पण आमच जन्म झाला आहे पण त्याना अनुभव नसतो ना की या बाळाला गोंजारायचे कसे ,काय औषधे द्यायची हे माहीत नको काय ?मग त्यसाठी एक शंभर प्रश्न असेच फॉरवर्ड होतात काय काय शिकवलय, ते कसे लिहायचे आमचा खांदा कसा सजवयचा ,पाय कसे सजवायचे, मग कोणीतरी हळुच हुश्श म्हणतो की बाबानो आता फ्क्त सहामाही झाली आहे म्हणुन बचावलात नाहीतर काय झाले असते ते विचार करा. आणि मग आमचा जग प्रवास सुरु होतो चायला बाइकवरुन कोठ कोठे फीरतो आम्ही.आणी मग एकदाचे आमच्यावर काय रंगरंगोटी करायची आहे ते त्या बिचार्‍याना समजते मग काय काय लिवतात आमच्यावर ,चायला रात्री बारा वाजले की मग आम्ही येतोय बाहेर(जणू काय घुबडच) मग पाच सहा पोरे आमचा एक एक अवयव बाजुला करतात ..चायला जणु काय हे एम डी डोक्टरच! मग आमच्यावर रंगरंगोटी केली की परत जोडतात भारी हाय की नाही लाइफ ......आणी मग काय आमचा प्रवास पुन्हा सुरु ..ए पव्या तुझ जर्नल पुर्ण हाय नारे मग दे मला चल आज नाईट मारतो मी बी असे म्हटले आनी त्याने ************ ही किंवा******** अशा एक दोन शिव्या घातल्या(मिपावर शिव्या चालतात असे समजले पण आमच्याकडे शिव्यांचा इतका साठा आहे की ब्रंडवीड्थ संपायची मिपाची तेव्हा ज्याने त्याने स्वतःच्या शिव्या घालव्यत) की आम्ही तीकडे गेलोच मग तीकडे पुन्हा पोस्टमार्टम .....त्यात अगोदर जर एखद्या सरावर राग असेल आनी दुर्दैवाने आम्ही त्या सराचे जर्नल असु तर ही पोरे आम्हाला भुल द्यायचे पण वीसरतात आणि मग काही न काही फग करुन्(आयला फग म्हणजे माहीत नाही,अहो दररोज हापीसात करताय की ओ ,अहो फशीव गंडीव ) पहीली सहामाइ मारुन नेली जाते शिक्षक बी सोउम्य वागत्यात त्याना बी रहायचे असते ना कालेजात ,कुठे बाहेर मार खाल्ला तर काय ...पण आता आम्ही पुन्हा कपाटात जात नाही एकतर टेबलावर अडगळीत पडतो नाहीतर वेगवेगळ्या कारणासांठी आमचा वापर केला जातो उदाहरण द्यायचे झाले तर कधीकधी काही काही गुलाबी पाने आमच्या मार्फत इकडुन तीकडे फीरतात मग उगीचच आम्हीपण शहारतो तेवढेच कबुतर झाल्याचे भाग्य! मग काही वेळेला काही स्त्रीलींगी पाने आमच्या भागात अडकतात का तर एखादा प्रयोगच नसतो एखाद्याकडे सॉरी एखादीकडे ...अहो नसतो कसला असतो की पण त्याना आमची कीव येते ना मग वरची चार पाने पुरुष(म्हणजे पुरषाने लिहिलेली) मधली स्त्री(म्हणजे स्त्रीनी लिहिलेली) आणि शेवटची पुन्हा पुरुश असे झाल्यावर जी मजा येते ती त्याना आम्हाला द्यायची असते ना ..

मग काय एकाद्या दीवशी आमचा कागद वापरुन भेळ खाल्ली जाते ,कातर म्हणे भुक लागली होती असु दे हो तेवढीच आम्हाला बी चव मिळते पण आम्हाला काय ते आवडत नाही बाबा,आम्हाला माणसाची डोके खायला आवडते त्याची चव काय असते म्हणुन सांगु.आहा...मग त्यापुढे पंचपक्वाने बी झक मारली मग बघता बघता वर्ष संपते आणि पुन्हा एक कागद नोटीस बोर्डावर चिकटतो मग पुन्हा तेच चक्र यावेळी त्या चक्राची गती जास्त असते कारण आता घोडे मैदान फारच जवळ असते याशिवाय आता सरांपुढे आपले काही चलणार नाही याची खात्री पटलेली असतेच..

मग काय कसे बसे सगळे पुर्ण करायचे आणी मायबाप सरांकडे ते सर्टीफाय करायाला फीरायचे आणि तुम्हाला अजुन एक गंमत सांगतो ..अहो त्या कॉलेजमधल्या सराना कोण भटका कुत्रा बी कीमत देत नसतोय पण हा आठवडा म्हणजे त्यांचा आठवडा असतो.. काय पण मान असतो त्याना सगळे कसे टापात असतात आणि मग ही पोर पॅसेजमध्ये गाडी लावुन भिकार्‍यासारखे प्रत्येक सरामागे फीरत असतात "कोणी सही देता का सही .......अरे या हुशार(ह.घे)पोराला कोणी सही देता का सही " असे म्हणतात आणि आम्ही त्याचाच खाकेत बसुन त्या कॉलेजसम्राटचे नाटक शांतपणे बघत असतो मग काय सर पण आता शेर होतात आणि त्यांची सरावलेली नजर हळूच आमच्या अंगावर रंगवताना झालेल्या चुका शोधते मग शिव्यांची लाखोली सुरु होते अगदीच बाद पोरगे असेल तर आम्हाला फाडले जाते (आणि परत लिहा असे म्हणून आम्हाला कचराकुंडी दाखवली जाते) आणी मग अचानक एकाद्या नव्या जर्नल चा जन्म होतो मग काय शिक्षक अगदी थाटात हे लिहुन आण ते कर मग सही देतो असे म्हणतात आणि आधी सरासमोरुन जाताना सराला भीक पण न घालणारा पोरगा गप ती सगळी कामे करतो तेव्हा त्या सरांच्या चेहर्‍यावरचा असुरी आनंद काय असतो म्हणून सांगु अहाहा आसुरी हास्य ही संकल्पना इथेच रुजली म्हणे .मग एखाद्या नवरीप्रमाणे यांचे नखरे चालु होतात आता काय हे चहा प्यायला गेलेले असतात मग ही पोरे सगळ्या टपर्‍या हुडकतात पण हे तर वर्गातच ..पचका करतात तो असा मग कधी ते आजारी पण पडतात ..आयला इथे एखादा ओशध घेवुन घरी जात नाही हे त्या सराचे भाग्य! मग लाख लफडी करुन एकदाची सही मिळती .आणी ते काळे पेन एकदा माझ्या अंगावर आले की परत तो राजा होतो( तोच तो सो कॉल्ड विद्यार्थी) मग पाच मिनिटापुर्वी ज्यांचे हाजे हाजी केले ते कोण ? ते काय सर आहेत का असा प्रश्न तो बिन्दीक्कत विचारतो ..भारी आहे की नाही अवघ्या एका क्षणात सरडा रंग बदलतो तो असा .पण त्या अगोदरचा प्रसंग म्हणजे काय आहाहा .अहो मध्येतर अचानक एका शिक्षकाने आताच्या आता लिहि म्हणल्यावर कट्यावरचा ग्रुप स्टडी रुम मध्ये घुसतो आणि कॉलेजच्या इमारतीला धन्य वाटते ............

आयला परवा मीबी लय मजा बघितल्या या विन्या बरोबर गेलेलो तर एक तास नुसता ह्यो इकडुन तीकडे चकरा मारतोय का तर म्हणे सर आता येतील मग येतील एकदाचा तो सर आला आणि त्याने पहील्यांदा फाडला तो त्या विन्याच्या एका दोस्ताला. का तर रेघा काळ्या डार्क पेनने पाहीजेत फेंट ने नाही ..त्यो स्टडीतत गेला आणि आमच्या विन्याचा म्हणजे तुमच्या मिपवाल्या कोदाची वेळ आली त्या सरांनी माझ्यावर झोकात सही केली मला वाटले पीडणार आता पण त्याला या वेड्याचे उद्योग माहीत ओते म्हणे म्हणजे काय स्वतःची साइट वगिअरे! तरी त्याने विचारलेच की विनायका आता पेपरात लेख कधी(ए कोण चीडले रे ,असु देत की तुम्हाला न आवडु देत काय पेपर वाचणार्‍याना निबंध आवडतात काय लोकसत्ता,सकाळ काढुन बघा शनिवार रवीवारचा) ह्यो म्हणला हाय ६ तारखेला हाय मग त्याने लगेच सही केली की हा पण लगेच शेर झाला आणि आम्ही बाहेर पडणार इतक्यात विन्याचे दोन दोस्त आले त्यानी एक मजा दाखवली ,काय तर एकाच्याच अंगावर तीन सह्या ,का म्हणे तर एकच जर्नल तीघानी दाखवले व सह्या घेतल्या ..चायला अ॑सल चिडलो मी आमच्या जातकुळीचा असा वापर. थु पण काय करणार विन्याचा भक्कम हात(तो भक्कम आहे पतत नसेल तर त्याची खव बघा) ..असो

तर असे आम्ही जर्नल भावु ,आम्ही आता जस्त पाल्हाळ लावत नाही ,कारण फाट्यावर मारुन घ्यायला आम्हाला वेळ नाही ,आणि तुम्ही जरी हापीसात पाट्या टाकत असलातरी त्याला पण डोक लागतयच बर आम्ही निघतो आणि त्या पराला आणि विन्याला सांगु नका मी इथे आलेलो म्हणूण धरुन बदडतील मला बाकी चलतो आणि हो मनातल्या मनात आमच्या भावुबंधाना शिव्या घातल्यात तर तुमच्या पुढच्या पीढीला पीडणार असणार्‍या जर्नलची शप्पथ.....................................................काय...

विन्याचे जर्नल

मांडणीविनोदवाङ्मयसाहित्यिकशुद्धलेखनसमाजजीवनमानशिक्षणप्रकटनविचारलेखप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

सूहास's picture

18 Mar 2009 - 8:15 pm | सूहास (not verified)

महत्वाचे म्हणजे दररोज आइबापाच्या शिव्यांची लाखोली.

सत्य आहे!!सत्य आहे!!सत्य आहे!!सत्य आहे!!

लेख अतिउत्तम

सुहास..

"व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे,"
"वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "

chipatakhdumdum's picture

18 Mar 2009 - 9:03 pm | chipatakhdumdum

मी काही स्वतः या अनुभवातुन गेलेलो नाही, पण माझी मुलगी आणि पुतणी यान्चे हेच उद्योग चालतात. शम्भर टक्के बरोबर..

प्राजु's picture

18 Mar 2009 - 9:45 pm | प्राजु

गुड गोईंङ!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

नरेश_'s picture

18 Mar 2009 - 10:17 pm | नरेश_

मेडिकलच्या शेवटच्या वर्षाची गोष्ट असेल . परीक्षा झाली , निकालही लागला. अर्थात पासही झालो.
अचानक एक दिवशी आव्या (अविनाश) आला नि माझे जर्नल घेऊन गेला ! फक्त पहिल्या (सर्टिफिकेटच्या) पानाची
अदलाबदल केली नि वर्षभराच्या कोर्‍या जर्नलचे रुपांतर एका मिनिटात सुरेख जर्नलमध्ये केले !!!
शिक्षकांना फाट्यावर मारणे म्हणजे काय ते पहिल्यांदाच अनुभवले ;-)

सही /-

आगरी बोली - आगरी बाना.

भाग्यश्री's picture

18 Mar 2009 - 10:44 pm | भाग्यश्री

छान लिहीलेय.. थोडं मोकळं होऊन लिहील्यासारखे जाणवते आहे..
११वीतली (१२वीमधली का नाही आठवली कोण जाणे!)
केमिस्ट्री-फिजिक्सचे जर्नल्स, इंजिनिअरींगची सबमिशन्स आठवली!

अवलिया's picture

19 Mar 2009 - 9:17 am | अवलिया

छान ... येवु दे अजुन.. :)

--अवलिया