लज्जतदार मका

जागु's picture
जागु in पाककृती
16 Mar 2009 - 3:39 pm

लागणारे साहित्य :
उकडलेल्या मक्याचे दाणे १ वाटी
१ मोठा बटाटा उकडुन, कुस्करुन
अमुल बटर २ चमचे
पाव वाटी किसलेला ओला नारळ
चवी पुरते मीठ
१ चमचा साखर
२ चिमुटभर काळे मिठ
२ चिमुट्भर काळीमिरी पावडर
अर्ध्या लिंबाचा रस
पाव चमचा मिरचीपुड,

कृती :
मके व बटाटा गरम असतानाच वरील सर्व जिन्नस एकत्र करावे. लहान मुलांना खुपच आवडते. शिवाय पौष्टीक आहेच.

प्रतिक्रिया

श्रीया's picture

16 Mar 2009 - 4:05 pm | श्रीया

सोपी आणि पौष्टीक पाककृती.
जर ह्याचे वडे/कटलेट्स करुन तळून घेतले तर चांगले लागतील काय?

जागु's picture

17 Mar 2009 - 10:57 am | जागु

जर वडे किंवा पॅटीस करायचे असतिल तर बटर आणि खोबर घालू नका.

परिकथेतील राजकुमार's picture

17 Mar 2009 - 11:00 am | परिकथेतील राजकुमार

फोटु कुठे आहे ??
हा चालेल काय ?


परा कपुर
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

जागु's picture

17 Mar 2009 - 12:05 pm | जागु

फोटोबद्दल धन्यवाद राजकुमार.