मनाच्या कुपितले - बराक ओबामा

विनायक पाचलग's picture
विनायक पाचलग in जनातलं, मनातलं
11 Mar 2009 - 6:25 pm

मनाच्या कुपीतले या सदरातला हा अकरावा लेख
या सदरातील सर्व लेख तुम्ही येथे पाहु शकता.

बराक ओबामा - पासवर्ड फुटलाय.

बराक ओबामा, गेले वर्षभर अख्या जगभर ज्याची आणि फक्त ज्याचीच चर्चा चालू होती, ते हे व्यक्तिमत्व या काळात प्रत्येकाला या व्यक्तीबद्दल किती लिहू आणि किती नको असे झाले होते. पण, या व्यक्तीची संपूर्ण माहिती कुठेच मिळत नव्हती. त्यांच्या पुस्तकांचे मराठी अनुवाद केले गेले. पण, थोडक्यात योग्य माहिती मिळेल असं कोणतच साधन नव्हतं. त्यातच 'लोकसत्ता'' चे पत्रकार संजय आवटे यांचे 'बराक ओबामा- नव्या जगाचा सक्सेस पासवर्ड ' हे पुस्तक हातात पडले. आणि स्वर्ग गवसल्याचा आनंद झाला. "राज्यराज्यातून","नियतीशी करार" सारखी सदरे लिहणा-या आवटेंची निरीक्षणशक्ती चांगली आहे. हे माहित होतेच. त्यामुळे पुस्तक काहीसे वेगळे असणार याबद्दल मनात शंका नव्हतीच.

आणि अगदी तसेच झाले. त्यांनीसुध्दा या पुस्तकाला बराक ओबामांची माहिती, चरित्र असे संकुचित रूप न देता त्यांच्यातील गुण - दोष मराठी जनतेपुढे मांडले आहेत व त्यानूसार धडा घेण्यास सांगितले आहे. ही कल्पना नक्कीच अभिनंदनीय आहे. या पुस्तकाचे वेगळेपण हे त्याच्या पहिल्या पानावरूनच सुरू होते. पाहिल्या पानावर चितारलेला काल्पनिक प्रसंग हे पुस्तक -हदयाला भिडणारेच असणार याची जाणीव करून देतो. वर सांगितल्याप्रमाणे लेखकाला सामान्य तरूण आणि बराक ओबामा यांच्यातला दुवा शोधायचा होता. सगळयांच्यातले त्यांचे वेगळेपण स्पष्ट करावयाचे होते. म्हणूनच त्यांनी त्यांची सुरूवात आपल्या प्रस्तावनेपासुनच केली आहे. मुक्तकविता म्हणता येईल अशा त्यांच्या प्रस्तावनेत त्यांनी सामान्य तरूणांचे जीवन अगदी अचूकपणे पकडून दाखवले आहे.

फ्रेश स्वप्न पाहायला हवीत हे खरे
पण ती कोणत्या मॉलमध्ये ते ठावुक नाही
स्वतःमध्ये ब्दलायला हवे आहे हे खरे
पण म्हणजे काय करायचे ते माहीत नाही
असावेळी दोस्त
एक बराक हुसेन ओबामा भेटतो
"धिस इज युवर टाइम"
तो स्वच्च हसत स्पश्ट सांगतो
आणि त्याचा खणखणीत पुरावा देतो
गाण्यातली पहिली ओळ तो गुणगुणतो आणी मग गाणे आठवु लागते

.
लेखकाचे खरे कोउशल्य इथे आहे जेव्हा तुम्ही ओबामांचे विचार अशा रचनातुन मांडता तेव्हा ते फर अवघड असते कारण यासाठी तुम्हाला ओबामा या व्यक्तीतले , विचारातले वेगळेपण शोधावे लागणार आहे. ते वेगळेपण समजावून द्यावे लागणार आहे. यासाठी स्वतः कडे प्रचंड निरीक्षणक्षमता व चिंतनाची ताकद हवी आणि महत्वाचे म्हणजे विचारांची बैठक हवी. कारण त्याशिवाय हे सर्व करणे सर्वथैव अशक्य आहे. याशिवाय आपल्याला जे इतर मुद्दे मांडावेसे वाटतात ते देखील ओबामांमार्गे(पाथ म्हणुन वापर करुन) लोकापर्यंत पोहोचवायचे आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लोकांना चिंतनासाठी मोकळी स्पेस द्यावयाची आहे. कारण, प्रत्येकाची विचार करण्याची पध्दत वेगळी असते. आपण, आपलेच विचार तोंडावर मारले तर त्या पुस्तकाला काहीही अर्थ राहणार नाही आणि या सर्व पातळयांवर लेखक यशस्वी झालाय असे म्हणायला हरकत नाही.

ओबामांचा विजय हा इतिहास. ओबामांच्या गुणांचा, त्यांच्या प्लॅनिंगचा, जागतिक परिस्थीतीचा मेळ म्हणजे त्यांचा विजय. या विजयाला अनेक कंगोरे आहेत. हा विजय बदललेल्या जगाचा आहे, बदललेल्या जगामुळे झालेला आहे. सामान्य माणसाने ओबामा पाहताना हे जगही जाणले पाहिजे, कारण त्याशिवाय ओबामांचा अभ्यास अधुरा राहणार आहे. महत्वाचे म्हणजे, याच जगात आपण वावरत आहे. त्यामुळे विजयी होण्यासाठी हाग समजून घेणे फार महत्वाचे आहे आणि लेखकाला याची जाणीव आहे. म्हणूनच त्यांनी पुस्तकात ओबामांच्या चरित्राचा फक्त समावेश नाही. ज्या परिस्थीतीमूळे ते निवडून आले ती परिस्थीती त्याची वैशिष्ठये त्यांनी नीट मांडली आहेत. तीही मूळ कथासुत्राला धक्का न देता, जे ब-याच लोकांना जमलेले नाही. संजयजी लोकांना यश कसे मिळवायचे ते सांगत आहेत. अख्या पुस्तकात त्यांनी जे मुद्दे सांगितले आहेत त्यातील ब-यापैकी मुद्दे अनेक व्यक्तीमत्व विकासाच्या पुस्तकातून येऊन गेलेले आहेत. हे मुद्दे अजिबात नवीन नाहीत. नवी आहे, ते तो मुद्दे सांगायची पध्दत. आपण आपल्या विकासासाठी जे मुद्दे आवश्यक मानतो, तेच मुद्दे ओबामांकडे होते, काही त्यांनी प्रयत्नपूर्वक आत्मसात केले होते आणि त्यांच्या चरित्रातील तेच मुद्दे लेखक उचलतो. त्यांचे स्पष्टीकरण देतो. चरित्रातून हे मुद्दे फुलत जातात. त्यामुळे ते कोठेही बोजड होत नाहीत. 'बाप दाखव नाहीतर श्राध्द कर' असे म्हणत प्रत्येक मुद्दयाचे प्रॅक्टीकल उदाहरण आपणाला त्या चरित्रातच मिळत जाते. आणि ते मुद्दे डोक्यात घुमू लागतात. मी नेहमी असे लिहितो , की लेखकाला वाचकापर्यंत जे द्यावयाचे होते, ते देता आले तर ते पुस्तक खरे यशस्वी ठरते( वाचा -तुक्याची आवली) आणि याचठिकाणी आवटे खरे विजयी होतात. 10 भागात विभागलेले हे पुस्तक हळूहळू सामाजीक व मानसीक विकासाचे धडे देत जाते. हे सर्वांनाच मान्य आहे की ओबामांकडे होता तो ऍटिटयूड, आणि हा ऍटिटयूडच त्यांच्या गळयात विजयमाला घालून गेला. पहिल्या विभाग याचबाबत बोलतो. बराक ओबामांच्या विजयाचे सार ज्यामुळे तत्वात आहेत ती तत्वे इथे स्पष्ट केली गेलेली आहेत. अगदी सुस्पष्टपणे ''वाटेनुसार पाऊल सेट करण्यापेक्षा पावलानूसार वाट सेट करावी'' , ही वाक्ये याचा प्रत्यय देतात आणि आवटे हळूच अख्या पुस्तकांचे सार सांगून जातात. वर सांगितल्याप्रमाणे ते सद्यस्थितीचा आढावा घेतात आणि हे जग लोकांपुढे उलघडून ठेवतात. ''मनाची ठेवण बदलून आणि स्वतःला बदलून माणूस त्याच अख्खं आयुष्य बदलून टाकू शकतो''. असे ते जेव्हा लिहतात तेव्हा त्यांनी सक्सेस पासवर्ड फोडलेला असतो. जगजाहिर केलेला असतो. यामध्येच सहाजिकच त्यांनी जुने, नवे जग याचा आढावादेखील घेतला आहे. ज्यात नवीन काहीच नसले तरी पुढील चरित्र रंगवण्यासाठी ते अतिशय गरजेचे आहे.

यानंतरचा भाग आहे तो या जगज्जेत्याच्या स्वप्नांचा. बराक वेगळे आहेत आणि ते वेगळेपण आहे ते त्यांच्या स्वप्नात आणि तीच स्वप्ने लेखक इथे स्पष्ट करतो. ती सस्वप्ने त्यांची वैशिष्ठये आणि त्यातला लोकांचा सहभाग हे जेव्हा आपण वाचतो तेव्हा तिथेच आपल्यला 80% ओबामा समजतात. आणि याचे श्रेय जाते ते आवटेंच्या ओघवत्या आणि मुद्देसुद लिखाणाचा. या दोन भागात आपल्याला जग, ओबामा, आणि त्यांची स्वप्ने समजतात. ज्या गुणांवर त्यांनी जग जिंकले ते गुण समजतात आणि सक्सेस पासवर्ड पुर्णपणे समजतो. अगदी नव्याने आणि पूर्वी हजारदा सांगून तो विसरला असला तरी आता तो विसरायची शक्यताच मावळते.कारण तो तरूणांईच्या हिरोचा पासवर्ड असतो. हे झाले स्वप्न. यानंतर ते पडतात प्रवास स्वप्न ते सत्यच हा रोडमॅप ती स्वप्ने खरी झालेला दाखवून देतो. मागे मांडलेले विचार खरे आहेत हे सिध्द करून दाखवतो आणि यानंतर लेखक बराक ओबामांचे चरित्र थोडक्यात सांगतो. हे कथाकथन आहे. इथे लेखक आपल्याला ओबामांची कथा सांगत आहे. आवटेंची प्रवाही लिहण्याची क्षमता आहेच. त्यामुळेच हे लेखन इतके सुंदर झाले आहे की पुस्तक एका बैठकीत संपवावेसे वाटते आणि यात लेखकाने स्वतः कथा सांगायची जागा घेतल्याने तो त्या त्या जागी ते ते पासवर्ड उघडून दाखवतो. प्रत्येक महत्वाच्या गोष्टीचे विश्लेषण करतो. त्याचे इतिहास सांगतो. स्वदेशाच्या निमीत्ताने संबंध जोडतो. यामुळे आवटेसारख्या अभ्यासू व्यक्तीबद्दल आपोआपच देशाची राजकीय, सामाजिक परिस्थीती सांगायची गरज भासते ती पूर्ण केले जाते. याशिवाय ओबामा मॉडेल फक्त वैयक्तिक पातळीवर नव्हे तर सामाजिक, राजकीय, पातळीवर देखील किती उपयोगाचे आहे ते स्पष्ट करतो. एकूणच हा एक उलटा प्रवास आहे. अगोदर ज्या गोष्टीचे तात्पर्य सांगितले तीच गोष्ट नंतर उलघडवून सोयी करून सांगीतलेली आहे. पण, हा प्रवास उलटा आहे म्हणूनच सुसहय आहे. बाकी, ओबामांच्या चरित्राबद्दल वेगळे लिहायला नको. ते आता सर्वतोमुखी झाले. पण या पुस्तकाचे वैशिष्ठये म्हणाल, तर ते तिस-या व्यक्तिने सांगितलेले आहे आणि प्रचंड ओघावत्या शैलीत सांगितलेले आहे. चरित्राच्या इतरांशी जोडलेल्या संबंधामुळे ते संकुचित रूपातून बाहेर आलेले आहे. बाकी यानंतर येतो तो फक्त एक लेख असणारा वेगळा भाग.

नेहमीप्रमाणे हे यश फक्त ओबामांचे नव्हे. त्यांनी फक्त बदलणा-या परिस्थीतीचा लाभ घेतला व त्याला वेगळी दिशा दिली. तेव्हा हे जग काय होते, हा बदल काय होता याचा आढावा पुन्हा घेण्यात आलेला आहे. हा लेख तरी पहिल्या भागाची पुनरावृत्ती करत असली तरी याचा रोख व यामधील रोख पूर्ण वेगळा आहे. त्यांनी जगाला आणखी एका वेगळया दृष्टीने पाहिलेले आहे. खरेतर हा पुस्तकाच्या शेवटचा भाग आहे. यानंतर आवटेंच्या ओबामांवरील पहिला लेख, ओबामांचे भाषण इ. गोष्टी दिलेल्या आहेत. ज्याला पुरवणी लिखाण म्हणता येईल.

पण कळत - नकळत पुस्तकात अनेक त्रुटी राहून गेल्या आहेत. पहिली त्रुटी अशी सांगता येईल की काहीवेळा ओबामांचे चरित्र खूप लांबलय जर हे ओबामांची माहिती सांगणारे पुस्तक असते तर त्याचे काही वाटले नसते, मात्र या पुस्तकात तुम्ही त्याचे विविध गुण, प्लस पॉईंट दाखवता आहात त्यावेळेला जो भाग महत्वाचा नाही तो पटकन आटोपता घेणे, महत्वाचे आहे. पण काही ठिकाणी लेखक येथे अपुरा पडला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पुस्तकाच्या उलटया प्रवासामुळे लोकांना पहिल्या तीन भागातच पुस्तकाचे ब-यापैकी सार समजणार आहे. त्यामुळे ज्यांनी पूर्वी ओबामांचे चरित्र वाचलेले आहे. ते पुढचा भाग न वाचण्याची शक्यता जास्त आहे. ज्यामुळे लेखकाच्या लेखनाला पूर्ण न्याय मिळू शकत नाही. अजून एक गोष्ट खटकण्याजोगी आहे, ती म्हणजे त्यांनी विविध घटनांचा ब्राम्हणत्वाशी लावलेला संबंध. त्यांचा तो संबंध आहे की नाही हा भाग जरी बाजूला ठेवला तरी जी संकल्पना अजुन लोकांनाच समजलेली नाही त्याबाबत लोकांचा गोंधळ उडण्याची शक्यता असते. त्यामुळे हे लिखाण टाळले असते. तरी फार काही फरक पडला नसता असे मला वाटते. आणि राहता राहीली गोष्ट ती शेवटच्या विभागाची. हा विभाग उत्तम आहे. पण, त्यांची भाषणे या विभागात ठेवण्याचे प्रायोजन मला समजलेले नाही. त्यावर विश्लेषणदेखील करण्यात आलेले नाही.

मात्र एकूणात या पुस्तकाला एक उत्तम पुस्तक म्हणता येईल. समाज जेव्हा एखादया व्यक्तीच्या प्रेमात असते तेंव्हा त्या अनुषंगाने अनेक लिखाण केले जाते व वाचकापर्यंत पोहोचवले जाते. पण त्याचवेळी काहीतरी वेगळे करण्याचा प्रयोग वाखाणण्याजोगा आहे. आवटेंनी कोणतेही मानधन न स्वीकारून हे वेगळेपण सिध्द केलेले आहेच. आश्चर्य आणि विशेष कौतुक वाटते ते लिखानाच्या गतीचे. मार्च 2008 मध्ये विचारास सुरवात झाल्यावर डिसेंबर मध्ये पुस्तक बाजारात देखील आले. त्यांच्या या गतीला नक्कीच दाद दिली पाहिजे.

एकूणात काय, तर एक जगावेगळं व्यक्तिमत्व एका जगावेगळे पध्दतीने सांगितलेले आहे. तेंव्हा जगावेगळं व्हायचा प्रयत्न करायचा असेल तर आणि तरच हे पुस्तक जरूर वाचा. तेव्हाच ओबामाला डोक्यावर घेऊन नाचण्याचे सार्थक होईल.
विनायक वा. पाचलग
कोल्हापूर

अवांतर- संजय आवटे हे लोकसत्ताचे पत्रकार ,मध्ये मी येथे खास लोकसत्तासाठी हा लेख टाकला होता ,तोच लेख लोकसत्तात यावा म्हणुन मी धडपडत होतो यावेळी ऑर्कुटवर संजय आवटे भेटले. यानंतर त्यांच्याच एका मेसेज मधुन या पुस्तकाबद्दल समजले,आणि ते उत्सुकतेने वाचल्यानंतर स्वतःला ते आवडले यावेळी लक्षात आले की मागे एकदा एकाधाग्यात जेव्हा आपण या पुस्तकाचा उल्लेख केला असता याची अधीक माहिती द्यावी असे कोणीतरी म्हटले होते म्हणुन हे परिक्षण लिहिले .साहजीकच हे परिक्षण स्वतः लेखकाने वाचले असुन त्यांचा प्रतीसाद येथे देत आहे.

Dear Vinayak,

Read the piece sent by u on my Barack Obama book.

You have written it nicely and I do agree with many points you raised.

Nice piece.

Thank u,.

Regards.

- sunjay awate

(बाकी संजय आवटे हे आमच्या सांगण्यावरुन सध्या मिसळपाववर वाचनमात्र आहेत्,त्यानी येतेह खाते उघडले आहे का ते मला माहीत नाही असो....)

धोरणमांडणीभाषावाङ्मयसाहित्यिकसमाजजीवनमानराजकारणप्रकटनविचारलेखसमीक्षा

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Mar 2009 - 6:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विनायक,

संजय आवटेंच्या 'बराक ओबामा' पुस्तकाची चांगली ओळख करुन दिली.
आभारी आहे !

-दिलीप बिरुटे

मदनबाण's picture

11 Mar 2009 - 6:53 pm | मदनबाण

''मनाची ठेवण बदलून आणि स्वतःला बदलून माणूस त्याच अख्खं आयुष्य बदलून टाकू शकतो''. असे ते जेव्हा लिहतात तेव्हा त्यांनी सक्सेस पासवर्ड फोडलेला असतो.

एकदम पटिंग मनको...

अवांतर :-- पासवर्ड फुटलाय.... :-- कसं काय??? पासवर्ड स्ट्रेंथ कमी पडली का ??

(पासवर्ड क्रिप्टीक ठेवता येतो काय... :? )
मदनबाण.....

"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

मुत्सद्दि's picture

11 Mar 2009 - 7:16 pm | मुत्सद्दि

मुक्तकविता म्हणता येईल अशा त्यांच्या प्रस्तावनेत त्यांनी सामान्य तरूणांचे जीवन अगदी अचूकपणे पकडून दाखवले आहे. आणि हे जगताना तुम्हाला बराक ओबामा कुठे भेटेल आणि तो का भेटला पाहिजे हे सांगितले आहे. आणि संजय आवटे हे नेटवर वावरणारे असल्याने ते फ्ल्युएंट(सलग),आणि मनाला भवणारे झाले आहे. त्यामुळे निम्मी लढाई त्यांनी येथेच जिंकली आहे. आता त्यांना त्यांचा उद्देश्य पूर्ण करण्यासाठी लोकांपुढे ओबामांचे जीवन सांगायचे आहे आणि त्यातील वेगळे वाटणारे बारकावे दाखवून देत तरूणांना योग्य रस्त्यावर आणायचे आहे. म्हणजेच, पुस्तकाचा मार्ग तयार आहे, पण खरे सांगायचे तर हा मार्ग खूप अवघड आहे. कारण यासाठी तुम्हाला ओबामा या व्यक्तीतले , विचारातले वेगळेपण शोधावे लागणार आहे. ते वेगळेपण समजावून द्यावे लागणार आहे. यासाठी स्वतः कडे प्रचंड निरीक्षणक्षमता व चिंतनाची ताकद हवी आणि महत्वाचे म्हणजे विचारांची बैठक हवी. कारण त्याशिवाय हे सर्व करणे सर्वथैव अशक्य आहे. याशिवाय आपल्याला जे इतर मुद्दे मांडावेसे वाटतात ते देखील ओबामांमार्गे(पाथ म्हणुन वापर करुन) लोकापर्यंत पोहोचवायचे आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लोकांना चिंतनासाठी मोकळी स्पेस द्यावयाची आहे. कारण, प्रत्येकाची विचार करण्याची पध्दत वेगळी असते. आपण, आपलेच विचार तोंडावर मारले तर त्या पुस्तकाला काहीही अर्थ राहणार नाही आणि या सर्व पातळयांवर लेखक यशस्वी झालाय असे म्हणायला हरकत नाही.

माफ करा,हे सर्व काय आहे? व कशासाठी आहे? हे अजिबातच समजले नाही.
आवटे ह्यांचे पुस्तक आपण लोकांना फारच भयावह करून दाखवताय असे भासते.

जाता जाता,
विनायक,
आपले वय अदमासे १६ ते १७ वर्षे आहे, तेंव्हा हि असली जड व तत्वज्ञानी भाषा सोडा व हि असली पुस्तके हि वाचणे बंद करा.
त्याचबरोबर आपल्या ह्या वयात आपण जे वाचायला पाहिजे ते वाचा व आयुष्याचा उपभोग घ्या.;)

मुत्सद्दि.

विनायक पाचलग's picture

11 Mar 2009 - 7:22 pm | विनायक पाचलग

माफ करा
पण आपण ते पुस्तक वाचावे मग आपल्यला समजेल
त्यांची प्रस्तावना ही एक मुक्त कविता वाटेल अशी आहे
व ते नेटवर वावरत असल्याने व तरुण लोकांशी संपर्कात असल्याने त्याना लगेच आवडेल असे आहे
बाकी हे पुस्तक म्हणजे शिव खेरा यांचे पुस्तक आणि बराक ओबामा यांचे चरीत्र यांचा मिलाफ समजा...
पण हा मिलाफ साधणे अवघड आहे असे व्यक्तीश; मला वाटते म्हणुन असे लिवले आहे
बाकी आपल्याला विचार समजला नाही यावर व माझ्या शैलीवर नक्की विचार करीन
आपला
विनायक

छानसे वाचलेले

विनायक पाचलग

विंजिनेर's picture

11 Mar 2009 - 7:27 pm | विंजिनेर

पण आपण ते पुस्तक वाचावे मग आपल्यला समजेल
त्यांची प्रस्तावना ही एक मुक्त कविता वाटेल अशी आहे

अश्या प्रतिक्रिये पेक्षा मला कोणी ती मुक्त कविता सोप्या भाषेत समजावून सांगितली तर पुस्तक वाचायची आवड वाटेल.
नाहीतर "जाऊदे मरूदे.. फार क्लिष्ट दिसते आहे" म्हणून सोडून दिले जाईल. म्हणजे तुमच्या ह्या एव्हढ्या परिक्षणाचा मूळ उद्देशच सफल होणार नाही की!!

शरदिनी's picture

11 Mar 2009 - 11:31 pm | शरदिनी

मुक्त कविता सोप्या भाषेत
#:S

विंजिनेर's picture

12 Mar 2009 - 12:25 pm | विंजिनेर

ते म्हंजे तुळशी वृंदावन असतयं की नै तसंच ह्ये ....

प्रकाश घाटपांडे's picture

12 Mar 2009 - 10:04 pm | प्रकाश घाटपांडे

विनायका(गटण्या) सांभाळ रे बाबा नाहीतर तुझा साहित्यिक बोळा काढायला मुक्त सुनीतला सांगाव लागेल .इतक्या लवकर चिंतनासाठी स्पेस देउ नको. ती स्पेस जरा दुसरीकडे वापर.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

विंजिनेर's picture

11 Mar 2009 - 7:59 pm | विंजिनेर

विंजिनेर

शक्तिमान's picture

12 Mar 2009 - 11:46 am | शक्तिमान

मला व्यक्तिशः हे पुस्तक आवडले नाही.

लेखकाने विकिपीडियावरची आणि आंतरजालावर असलेली माहिती मराठी मध्ये छापली आहे.
पुस्तकात ओबामांचा परिचय, त्यांची पार्श्वभूमी ही अतिशय त्रोटकपणे मांडली आहे.
लेखन हे जास्तकरून निवडणुकांवर केंद्रित आहे. आणि ओबामांची अनेक भाषणे मराठीतून छापली आहेत.

ज्याने कुणी अमेरिकेची ही निवडणूक वर्तमानपत्रांमधून, आंतरजालावरील बातम्या, लेख-अग्रलेखांतून follow केली असेल.. त्याला या पुस्तकात नवीन काहीच सापडणार नाही. किंबहुना हे पुस्तक वाचताना माझी निराशाच झाली.

>>आवटेंची प्रवाही लिहण्याची क्षमता आहेच. त्यामुळेच हे लेखन इतके सुंदर झाले आहे की पुस्तक एका बैठकीत संपवावेसे वाटते
आवटेंचे या पुस्तकातील लेखन "मला" कृत्रिम वाटले..
आणि पुस्तक वाचताना कधी एकदा हे पुस्तक संपतंय असं झालं होतं....
या पुस्तकाची बांधणी आणि आकर्षक मुखपृष्ठ वगळता मला हे पुस्तक रूचले नाही...

विनायक पाचलग's picture

12 Mar 2009 - 11:54 am | विनायक पाचलग

आपल्या म्हणण्याशी मी काही प्रमाणात सहमत आहे
बाकी प्रत्येकाची वैयक्तीक मते आहेत
आणि मी त्याचा आदर करतो
आपल्या प्रतीसादाबद्दल आभारी आहे

छानसे वाचलेले

विनायक पाचलग

सहज's picture

12 Mar 2009 - 12:30 pm | सहज

"मनाच्या कुपितले - बराक ओबामा"

नाव वाचुन वाटले की मिशेल ओबामाच्या पुस्तकाचा अनुवाद असावा. :-)

असो.

चांगला उहापोह.

ओबामाच्या कुठल्या प्रसिद्ध भाषणांचा आढावा घेतलाय? त्यांच्या निवडणूकमोहीमेतील टर्नीग पॉइंट काय सांगीतला आहे? किती पानी पुस्तक? काय किंमत?

विनायक पाचलग's picture

12 Mar 2009 - 8:13 pm | विनायक पाचलग

२०० ते २२५ पानी पुस्तक
किंमत -१०० रुपये
छानसे वाचलेले

विनायक पाचलग