करी ऑफ कॉन्स्पीरसी.

रामदास's picture
रामदास in पाककृती
9 Mar 2009 - 12:23 am

करी ऑफ कॉन्स्पीरसी उर्फ कटाची आमटी
कटाची आमटी ही नाजूक पाककृती आहे.सरावानी जमते.बिघडली तर गुळवणी होते.या आमटीचा किचनमधून येणारा सुगंध आणि दरवळ हेच या आमटीचे आयएसओ ४१००० प्रमाणपत्र आहे.सौ.रामदास यांच्या सौजन्याने ही पाककृती येथे देत आहे.
साहीत्य : मसाल्यासाठी-जीरं ,लवंग ,दालचिनी,तेजपत्ता.
भिजवलेले कच्चे शेंगदाणे, खोबर्‍याचे पातळ काप खोबर्‍याचा तुकडा (भाजण्यासाठी)
काजू तुकडा (ऐपतीप्रमाणे),कढीपत्ता, तेजपत्ता, हिरव्या मिर्चीचे तुकडे,कोथींबीर, लिंबाएव्हढी चिंच,थोडासा गूळ.
कृती :
कट काढणे : पुरणासाठी चण्याची डाळ शिजवून घेताना त्यावर पांढरा फेस येतो.तो काढून फेकून देणे.त्यानंतर डाळ शिजल्यावर डाळ चाळणीत ओतून पातेल्यात पाणी काढून घेणे.हा झाला कट.
थोडी शिजलेली डावभर डाळ बारीक करून कटात घालावी. या कटात चिंचेचा कोळ ,गूळ ,मिठ आणि थोडेसे लाल तिखट घालून ढवळून घेणे.
मसाला तयार करणे: जीरं ,लवंग ,दालचिनी,तेजपत्ता मद आचेवर खमंग भाजून घ्यावे.एक खोबर्‍याचा तुकडा गॅसवर व्यवस्थीत वरवर काळा होईस्तो खमंग भाजणे.हा तुकडा आणि वर भाजून घेतलेला मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घेणे.
फोडणीची तयारी: फोडणी तेलाची असते. रोजच्यापेक्षा थोडे जास्त तेल वापरावे.फोडणीत मोहोरी ,जिरं हिंग ,हळद कढीपत्ता,तिळ, हिरव्या मिर्चांचे तुकडे घालून फोडणी झाली की त्यातच शेंगदाणे,काजू, खोबर्‍याचे काप घातल्यावर कट त्यात ओतावा . बारीक केलेला मसाला घालून दहा मिनीटे उकळू द्यावे.बारीक चिरलेली कोथींबीर घालून गॅस बंद करावा.
पुरुषवर्गासाठी काही सूचना :कटाची आमटी तयार झाली की सुगंध येतो.तोपर्यंत किचन मध्ये ये जा करू नये.डाळ शिजली का हे बघण्यासाठी बोटचेपेपणा करू नये. कट काढल्याशिवाय डाळ शिजणार नाही.

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

9 Mar 2009 - 12:33 am | विसोबा खेचर

आता प्रॉमिस केल्यामुळे संपलो, वारलो असं म्हणणार नाही. पण वाचून त्रास मात्र खूपच झाला... :)

रामदास जिज्जू,

होळीच्या पूर्वसंध्येला अत्यंत औचित्यपूण अशी पाकृ!

रामदासदिदीला तात्याने आभार मानले आहेत असं सांगा.. एक दिवस नक्की जेवायला येईन म्हणावं! :)

तात्या.

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Mar 2009 - 12:48 am | बिपिन कार्यकर्ते

आता प्रॉमिस केल्यामुळे संपलो, वारलो असं म्हणणार नाही. पण वाचून त्रास मात्र खूपच झाला...

तोंड दाबून बुक्क्यांचा मार ते हेच काय? ;)

बिपिन कार्यकर्ते

सहज's picture

9 Mar 2009 - 5:12 am | सहज

ह्या पाकृबद्दल अनेक धन्यवाद .

अवांतर - काय तात्या नियमाला अपवाद म्हणतात तो हाच ना ;-)

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Mar 2009 - 12:43 am | बिपिन कार्यकर्ते

साहेब... झकास.

होळी रे होळी, पुरणाची पोळी!!!!

बिपिन कार्यकर्ते

गणपा's picture

9 Mar 2009 - 1:27 am | गणपा

काका आणि काकु दोघांचे आभार.
-गणपा

लवंगी's picture

9 Mar 2009 - 3:15 am | लवंगी

उद्या पुरणपोळीबरोबर बनवायलाच लागणार.

सुनील's picture

9 Mar 2009 - 7:46 am | सुनील

व्वा अगदी समयोचित पाकृ. सुंदर.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्रकाश घाटपांडे's picture

9 Mar 2009 - 8:37 am | प्रकाश घाटपांडे

आमाल आदुगर वाटल कि हित काहीतरी कट शिजतोय.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

चन्द्रशेखर गोखले's picture

9 Mar 2009 - 8:41 am | चन्द्रशेखर गोखले

होळी चा कट चांगला रचलाय !!!!

स्वाती दिनेश's picture

9 Mar 2009 - 2:02 pm | स्वाती दिनेश

४ अंश से. तापमानात कटाची आमटी भुरकायला मजा येईल, तुम्ही दिलेली पाकृ केवळ झकास!
आता कटाची आमटी करायलाच्च हवी..
स्वाती

झेल्या's picture

9 Mar 2009 - 4:25 pm | झेल्या

बिकट दिसतेय पाककॄती.

आमटीचे अगदी कट टु कट वर्णन चविष्ट.

बरे झाले काका ही पाकॄ लिहिलीत. आम्हाला कळले तरी की या कटात कोण कोण सामील असते. :)

पी फुर्र् फुर्र् तू भुरक ना रे...!

-झेल्या

थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.

शाल्मली's picture

9 Mar 2009 - 4:31 pm | शाल्मली

मस्त वाटत्ये कटाची आमटी.
स्वातीताई म्हणत्ये तसं ४ अंश से.मधे भुरकायला मजा येईल. :)
रामदास काका आणि काकू दोघांनाही धन्यवाद!

--शाल्मली.

चतुरंग's picture

9 Mar 2009 - 4:43 pm | चतुरंग

रामदासकाकांचा हात कोण धरणार? मस्तच पाकृ!
काकूंना पेश्शल धन्यवाद सांगा! :)

(खुद के साथ बातां : रंग्या, जायफळ लावलेली पुरणपोळी कटासोबत चापून दुपारच्या वेळी डाराडूर पडी टाकायला काय मजा येते ना? 8> )

चतुरंग

रेवती's picture

9 Mar 2009 - 8:59 pm | रेवती

येत्या विकांताला करणारे पु.पो.
त्यावेळेस कटाची आमटी अश्या पद्धतीने करून बघीन.
काकूंना धन्यवाद!
रेवती

चकली's picture

11 Mar 2009 - 2:35 am | चकली

कटाची आमटी ची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. आता शनिवारी पूपो बरोबर कटाची आमटी अशीच करून बघेन.

नाव बघून वाटले की stock market conspiracy विषयी आहे काहितरी...

चकली
http://chakali.blogspot.com