वळण !!

अनिल हटेला's picture
अनिल हटेला in जनातलं, मनातलं
25 Feb 2009 - 2:59 pm

बराच वेळ वाजत असलेल्या डोअरबेल ने श्री ला जाग आली.डोळे चोळत आणी कोण तडमडलये हा विचार करत दरवाजा उघडला.समोर अरुण उभा.
"काय बे , ११.०० वाजलेत.अजुन अंथरुणातच आहेस होय ?"
"हम्म !"
"आरे काय हे? आज १४ फेब्रुवारी ! सारी दुनिया आजचा दिवस एंजॉय करतीये आणी तु ?"
"छोड ना यार ! चहा घेणारेस का ? "
"अर्थात !"
"ठीकाये २ कप बनव ,तोवर मी फ्रेश होतो !"
मनापासुन श्रीला शिव्या घालत बिचारा अरुण चहा बनवायला गेला .

बराच बदलाला होता श्री.
श्रीकांत पाटील!
टॅक्स कंसल्टंट!!
सहा दिवस भरपूर काम करणे आणी सातव्या दिवशी आक्खा दिवस लोळणे एवढेच त्याला माहिती.
कुठे जाणे नाही ,येणे नाही.नो ट्रीप ,नो पीकनीक.कुणी दोस्त ना दुष्मन.बस आला दिवस ढकलायचा एवढेच माहिती.
पण असा नव्हता श्री आधी.कोणे एके काळी भरपूर बडबडा,सगळ्याची मस्करी करणारा ,भरपूर भटकणारा,प्रत्येक गोष्ट अगदी मनापासुन अनुभवणारा असा होता.बीनडोक हींदी सीनेमा पासून ते संगीत नाटकापर्यंत अष्ट्पैलू आवडी होत्या त्याच्या. मूड मध्ये असेन तर चारोळ्या लिहीणे ते छान -छान पेंटींग्ज बनवणे ह्यात देखील मास्टर होता श्री .

साधारण दोन वर्षापूर्वीची घटना.
श्रीच्या बापूसने एक सडीयल लीमरेडा दिलेली श्रीला.तीचा नेमका रंग कोणता आहे हा संशोधनाचा विषय असावा.त्या दुचाकीला ना लाइट ,ना इंडीकेटर ,ना हॉर्ण.निव्वळ चालू करायची आणी पळवायची.ती पण एका विशीष्ट लयीतच.नायतर नेमका कुठला पार्ट कुठे गळून पडेल सांगता यायचं नाय.सारे मित्र त्याच्या दुचाकीला विमान म्हणायचे.कारण विमानाला कुठे हॉर्न ,इंडीकेटर वगैरे शुल्लक गोष्टी असतात. तर नेहेमीप्रमाणे अशा ह्या विमानावर बसुन कॉलेजला निघालेला.सकाळच्या प्रसन्न वातावरणात किशोरदाचे गाणे गुनगुणत स्वारी निघालेली.समोर एका बसथांब्यावर कुणीतरी आपल्यालाच हात करतयेस बघुन हा थांबला.एक नाजुकशी चाफेकळी बाला. तीजला पाहुन ह्याचा कलीजा खलास झाला.

"माफ करा! माझी बस मीस झालीये ,मला हायवे पर्यंत लीफ्ट देता का प्लीज ?"
नाही म्हणायचा प्रश्नच येत नव्हता.
"हो नक्कीच!"

हायवेला बसस्टॉपवर विमान लँड झालं."थँक्स! नाहीतर आज पून्हा उशीर झाला असता."
" प्लेजर ! " ह्याला काय बोलावं समजेनासं झालेलं .
" वीश यु हॅपी वॅलेंटाईन ! आणी बाय " नाजुकसं हास्य फेकत धुर ओकत येणा-या पीएमटी कडे निघाली.
"सेम टू यु!" ह्याचे शब्द नेमके ऐकले की नाही कुणास ठाउक पण बस नावाचं ते धूड लांब जाई पर्यंत हा मजनु तीथेच उभा .
थोड्या वेळाने आपण अजुन पॄथ्वी तलावरच आहोत ह्याचा श्रीला साक्षात्कार झाला.स्वतःशीच हसत हे जागेपणी पाह्यलेलं स्वप्न तर नाही ना,असा विचार करत कॉलेजच्या दिशेने निघाला.कॉलेजमध्ये अवतरताच गुलाबाची फुलं,ग्रीटींग्ज ची देवाण घेवाण बघुन ह्याला गंमत वाटत होती.काय तर म्हणे आज प्रेम दिन.का कुणास ठाउक पण त्याच्या चेहे-यावरचा आनंद त्याला कुणाबरोबर का असेना शेयर करावासा वाटला.ह्याचा ग्रूप नेहेमीप्रमाणे कट्ट्यावर पक्षी निरीक्षणात बीजी होताच.श्री च्या एंटरीबरोब्बर सर्वात हास्याची खसखस पिकली.म्हणजे ह्याच्यावरच कॉमेंट्स चाललेल्या.
"काय म्हणता श्री राजे की राजे श्री ?" विज्याने सवयीनुसार गुड लेंथ डीलीव्हरी टाकली.काहीतरी तीखट बोलायची इच्छा झालेली पण श्रीने टाळले.
"ये गप रे ,त्याला राग आला ना तर तो कपडे काढुन नाचेन !"इती सुम्या रणदीवे.
"प्लीज यार ,आज माझा एकदम जॉली मूड आहे ,म्हणुन सोडतो! चला गरीबानो आज आम्ही सर्वाना कटींग वीथ सुवर्ण कांडी पाजण्याचा मनोदय बोलून दाखवत आहोत"
"बोलून काय दाखवता ,केल्याने होत आहे रे .... चलो नेक काम मे देरी नै"गलका करीत सगळे निघाले.

सारी मंडळी अमृततुल्य नावाच्या हाटीलात शिरली .आणी श्री ने सकाळचा घडलेला किस्सा मित्राना सांगीतला.सगळे अगदी खुश झाले .चला एकदाची श्री ला त्याची परी मिळाली .पण ती कोण ,कुठली वगैरे माहिती नसल्याने थोडीशी मंडळी चिंतातुर होती.
अशा वेळी नेहेमीप्रमाणे सुम्या ने मदत करण्याचे आश्वासन दिले.

दुस-या दिवशीची सकाळ जरा जास्तच प्रसन्न वाटत होती.श्री नेहेमीपेक्षा अर्धा तास आधीच सुम्याला घेउन बसस्टॉप ला आला .थोड्या वेळात कालचीच ती बाला येताना दिसली .फिकट नीळ्या रंगाचा सलवार सुट ,एका हातात पर्स दुस-या हाताने चेहे-यावर येणारे केस सावरत आली.ओळखीचे स्मितहास्य करत थांब्यावर थांबली.सुम्या ने श्रीला इशारा केला आणी लिमरेडा ची जबाबदारी घेत कलटी झाला.

श्रीची अवस्था धरलं तर चावतय ,सोडलं तर पळतये अशी झालेली.इतक्यात बस आली.

सकाळी जास्त गर्दी नव्हतीच .दोघेही आत शिरले .शेवटी तीनेच सुरुवात केली " काही बोलायचये का तुम्हाला?"
"नाही ! ऍक्च्युली.. हो! पण कॄपा करून गैरसमज करून घेउ नका ."
खट्याळपणे हसत तीनी मान हलवुनच हो म्हटलं.
"मला हेच म्हणायचे होते की हॅपी वॅलेंटाईन !" असं म्हणात ग्रीटींग्ज तीच्या पुढ्यात धरलं काही क्षण असेच गेले.खाली नजर करून श्री उभा आणी त्याच्याकडे ती बघतीये.काहीही न बोलता तीने ग्रीटींग हाती घेतलं.बराच वेळ कुणीच काही बोललं नाही.पूढच्या स्टॉपवर 'बाय !' म्हणत उतरला.

रम्या ऑन विमान वाटच बघत होता. हीरोचा चेहेराच सर्व हकीकत सांगत होता.अर्थात श्री च्या दॄष्टीने आजचा दिन पेष्षल होता.ग्रुपचे सर्व सरदार एकत्र आले आणी हीप हीप हुर्रे च्या तालावर हलत होते. कुणाचाच विश्वास बसत नव्हता की श्री नावाचा शेळपट इतकी हिंमत करु शकेन.विज्या ने तर बोलून पण दाखवले की 'येडा बनाता है क्या?' पण श्री ने मनावर घेतलं नाही.

"शी-या लेका !जे काय झालये त्यावरुन इतकं शपथेवर सांगु शकतो की नशिब घेउन आलास वरुन.नाय तर साला आम्ही अजुन आहोत तीथेच आहोत.तीन वर्षे झाली.आजपर्यंत कुणी ढुंकुन सुद्धा पाहीलं नाय रे!" -गन्या महाडीक अगदी मनापासुन आणी तळमळून बोलत होता.खरच होतं.आक्ख्या ग्रूप मध्ये थोडासा डीसेंट आणी हुशार श्री च होता,त्याच्याच मदतीनेच का होइना इतर जण लटकत-लटाकत पास व्हायची.सर्वाच्या स्तुतीनी नाही म्हणता थोडासा सुखावला.

आता रुटीनच झालेलं.सकाळी मधु बरोबर बसचा प्रवास ,नंतर तीथुन कोण ना कोण मित्र ह्याला पीक-अप करणार.मग हा स्वतःच्या कॉलेजला.असा साधारण दिनक्रम ठरलेला.

मधु !
माधवी मुळे !
इंजीनियरींगच्या दुस-या वर्षात शिकायला. आई-बाबाची लाडकी प्रिन्सेस.आयुष्यात कसं प्लॅनींग ने जगावे ह्याचा उत्तम आदर्श.जितकी हुशार आणी जीनियस तीतकीच ,स्मार्ट आणी खोडकर.
दोन वर्षात पहील्यांदाच बस मीस झालेली.आजुबाजुला ऑटो वगैरे काहीही नाही.महत्त्वाचे प्रॅक्टीकल बूडू नये म्हणुन लीफ्ट साठी हात पूढे केला. आणी तो दिसला.तीचा वॅलेंटाइन.आधी तीला काय बोलावं काही समजेना.आणी हा तर बधीर-शिरोमणी.शेवटी हीनेच त्याला वीश केलं.दुस-या दिवशी पून्हा आलेला,पण बोलायची डेरींग होइना ,तेव्हा पून्हा एकदा मधुनेच पूढाकार घेतला.आणी नंतरच्या भेटीतुन तीला समजत गेले की किती साधा आणी सरळ आहे.पुस्तकी किडा तर आहेच पण निर्मळ मनाचा.एकमेकात अधिकच गुंफत गेले.काही नाती अशीच असतात.कुठुन चालू होतात समजतच नाही. कालपर्यंत एकमेकासाठी अनोळखी असणारे पूढे आयुष्यभर एकमेकाचे सखे होतात,मैत्र होतात.अशीच काहीशी अवस्था ह्या दोघात होती.आता-आता बाहेरही भेटी गाठी वाढलेल्या ,एकमेका सोबत नसतील तर फोनवर अशी काहीशी परीस्थीती झालेली.एकदा श्री घरी येउन गेलेला.मधु सुद्धा त्याच्या घरी वरचेवर जात असे.सर्वाबरोबर बसुन ह्याची टांग खेचण्यात सर्वात पूढे तीच असायची.ह्याच्या ग्रूपचे तर तीला बघुन घाबरायचे न जाणो आज कुणाला बळीचा बकरा बनवेल सांगता यायचं नाही.मस्त दिवस चाललेले.आनंदी आनंद गडे टाईपातले...

आणी ठरलं पीकनीकला जायचं.नाय -होय म्हणत महाबळेश्वर ठरलं.सारे सरदार एकत्र जमले.तवेराने जायचं नक्की झालेलं.आणी त्याच दिवशी श्रीकांतपंत आपल्या प्रेमाची कबुली देणार असं ठरलेलं.

सकाळी ६.०० लाच गाडीने महाबळेश्वरकडे कुच केलं.हसण्या खिदळण्यात,गाण्याच्या भेंड्यात सारे जण तल्लीन झालेले.भरून उत्साहाला उधाण आलेलं.काही समजण्यापूर्वीच गाडीने एक गचका दिला.आणी श्री ची शुद्ध हरपली.

श्री ने डोळे उघडले तेव्हा त्याला बाबा दिसले.त्यानी बाकीचे कुठे आणी कसे आहेत हे विचारलं. बाकी सारे ठीक आहेत आणी तु आता आराम कर असं डॉक्टरी उत्तर दिलं गेलं.४-५ दिवसात त्याला चालता फीरता येउ लागलं.हजारदा विचारुन देखील सगळे ठीक आहेत इतकच कळायचं.अगदी अगदी वैतागला.आणी शप्पथ घातली बाबांना तेव्हा सांगीतलं की एका डंपरच्या धडकेत ह्याची तवेरा डॅश लागुन दरीत कोसळली.
त्या जीवघेण्या अपघातात त्याचे सारे मित्र,ड्रायव्हर आणी त्याची मधु सगळेच गेले.नशीब बलवत्तर म्हणुन कसा कुणास ठाउक हा वाचला.
पार -पार संपला.पण डोळ्यातुन एक अश्रू आला नाही ह्याच्या.

तेव्हापासून ते शहर..ते कॉलेज..त्या वाटा..सारं सोडुन श्री शीफ्ट झाला मुंबईत.कामात स्वतःला इतका काही गुरफटून ठेवतो की बाकी कशा-कशाचही भान ठेवत नाही.आयुष्य म्हणजे जगणे फक्त जगणे इतकच त्याच्या लेखी उरलेलं.

"घ्या ! ढोसा !" चहाचा कप देत अरुण बोलला,"यार श्री चल ना बाहेर ! मस्त कुठली तरी मूवी टाकु,बाहेरच चरू आणी येउ भटकुन.किती दिवस कोंडुन ठेवणारेस स्वतःला?"

"ठीकाये !"

कपडे करुन जोडी निघाली भटाकायला.ब-याच दिवसानी बिनकामी, निव्वळ भटकण्यासाठी श्रीकांत बाहेर पडला.मोकळ्या हवेत श्वास घेतल्याबरोबर त्याला काही सेकंदासाठी वेगळ्याच विश्वात आल्याचा भास झाला.आणी धुंदीतुन त्याला खाडकन भानावर यावं लागलं.एका स्कूटीने त्याला मस्त पैकी, अगदी प्रेमाने डॅश दिलेली.रागात काहीतरी बोलणार तेवढ्यात मंजुळ स्वर कानी पडला,"आय एम सॉरी! "ह्याला काय बोलावं कळेना.बिचारी खजील होत मागे सरकली. जाता-जाता म्हणाली "हॅपी वॅलेंटाईन!"

(कथा पूर्णतः काल्पनीक)

कथाविचारसद्भावनाशुभेच्छालेखप्रतिसादअभिनंदनमाध्यमवेधप्रतिक्रियाआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

25 Feb 2009 - 3:04 pm | आनंदयात्री

मस्त रे अनिल भाउ !!

सखाराम_गटणे™'s picture

25 Feb 2009 - 3:48 pm | सखाराम_गटणे™

----
तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.

दशानन's picture

25 Feb 2009 - 3:05 pm | दशानन

जबरा !

एका दमात वाचून काढली..... एकदम काळजाला घात घातलास यार.... डोळे नकळत पाणावले.. !

व शेवटचं वळण प्रत्येकालाच भेटतं असं नाही आहे ... हे जग आहे कल्पना विश्व नाही :(

चल बाय !

उद्या भेटू आता.. !

Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero.
सत्य वचन :D

सहज's picture

25 Feb 2009 - 3:08 pm | सहज

काळजी घ्या.

शेखर's picture

25 Feb 2009 - 3:43 pm | शेखर

चटका लावणारे लेखन.

दिपक's picture

25 Feb 2009 - 3:54 pm | दिपक

कथा मस्तच जमलीये... अश्या धक्क्यातुन लगेच सावरणे कठीणच..

JayGanesh's picture

25 Feb 2009 - 4:09 pm | JayGanesh

मि - ही - कथा वाचली....

संपल्यानंतर कळले की मि ती बघीतली.

गणा मास्तर's picture

25 Feb 2009 - 8:16 pm | गणा मास्तर

- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

आम्हाघरीधन's picture

25 Feb 2009 - 5:11 pm | आम्हाघरीधन

जोराचा धक्का दिलास मित्रा ..................आता सावरतच नाहीये. खुपच चटका लावणारे लेखन.

दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.

झेल्या's picture

25 Feb 2009 - 6:00 pm | झेल्या

आवडले.

कथा एक पूर्ण वळण (आवर्तन) घेऊन परत समेवर येते...

छान.

-झेल्या

थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.

अवलिया's picture

25 Feb 2009 - 6:07 pm | अवलिया

कथा आवडली.

--अवलिया

छोटा डॉन's picture

25 Feb 2009 - 6:40 pm | छोटा डॉन

मस्त लिहले आहेस रे अन्या, लै भारी ...!!!
फार हळवी कथा होती ...

असेच लिहीत रहा, आम्ही वाचतो आहोत.
पुलेशु.

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

यशोधरा's picture

25 Feb 2009 - 6:44 pm | यशोधरा

सह्ही!

परिकथेतील राजकुमार's picture

25 Feb 2009 - 7:21 pm | परिकथेतील राजकुमार

अनील भौ एकदम मस्त, आवडली कथा.

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

विंजिनेर's picture

25 Feb 2009 - 7:24 pm | विंजिनेर

छान जमली आहे. शेवट काहिसा अनपेक्षित झाला.
अनपेक्षित अशा अर्थाने की लय बिघडल्यासारखी वाटली. सुरवातीची पात्र-ओळख किंवा वॅलेंटाईन चे अगदी योग्य लांबीचे वर्णन ह्या नंतर शेवट गुंडाळल्यासारखा वाटला मला. तुम्हाला कसा करायचा होता हे कळाले तर अजून छान वाटेल. (काही अडले तर मिपावर प्रेम आणि प्रेम-भंग ह्यावर बरेच संदर्भ(ग्रंथ!) रग्गड सापडतील म्हणा :))

रेवती's picture

25 Feb 2009 - 7:32 pm | रेवती

भीती वाटली.
कथा चांगली आहे.

रेवती

शिवापा's picture

25 Feb 2009 - 9:44 pm | शिवापा

अप्रतिम... एवढा एकच शब्द!

अनिल हटेला's picture

26 Feb 2009 - 9:24 am | अनिल हटेला

धन्यवाद लोक्स ,दोस्त्स,!!! :-)


>>>लय बिघडल्यासारखी वाटली

हो ! पण किंचीतशी !! :-(

>>>सुरवातीची पात्र-ओळख किंवा वॅलेंटाईन चे अगदी योग्य लांबीचे वर्णन ह्या नंतर शेवट गुंडाळल्यासारखा वाटला मला.

मला नाही वाटत.कारण अजुन ताणला असता तर चार्म निघुन गेला असता..

>>>काही अडले तर मिपावर प्रेम आणि प्रेम-भंग ह्यावर बरेच संदर्भ(ग्रंथ!) रग्गड सापडतील म्हणा
खरये सायबा, बरेच अश्वत्थामा आहेत इथे !

पून्हा एकदा सर्वाना धन्यवाद !! :-)

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

ढ's picture

26 Feb 2009 - 11:02 am |

अनिलभौ,

फारच छान ! कथा अतिशय आवडली.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

26 Feb 2009 - 11:10 am | घाशीराम कोतवाल १.२

मस्त आन्या भो खरच
च्यायला कधितरीच लिहितोस
पण जबरा लिहितोस लेका
खरच

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

अश्विनि३३७९'s picture

26 Feb 2009 - 11:17 am | अश्विनि३३७९

कथा खरंच छान आहे ... अगदी लय ताल सगळं पकडून आहे.

अभिज्ञ's picture

26 Feb 2009 - 11:50 am | अभिज्ञ

छान लिहिलेय.
अभिनंदन.

अभिज्ञ.

चैत्राली's picture

26 Feb 2009 - 2:01 pm | चैत्राली

अतिशय सुन्दर कथा आहे. खुप आवडली. काही अठवणी ज्या मनाच्या पटलावर धुसर झाल्या होत्या त्या आठवल्या.

आकाशी नीळा's picture

27 Feb 2009 - 10:26 am | आकाशी नीळा

एकदम सह्हीए .

अजुनही वाचायला आवडेल .

शक्तिमान's picture

27 Feb 2009 - 10:44 am | शक्तिमान

एक नंबर!

आवडली कथा..खुप छान लिहले आहे अनिलभौ तुम्ही. हॅपी व्हेलेण्टाईन तुम्हाला पण.
वेताळ

सुक्या's picture

27 Feb 2009 - 1:31 pm | सुक्या

अनिलभाउ. .. कथा आवडली ..

सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

विसोबा खेचर's picture

28 Feb 2009 - 4:55 pm | विसोबा खेचर

अनिलभाउ. .. कथा आवडली ..

हेच बोल्तो...

तात्या.

अनिल हटेला's picture

27 Feb 2009 - 1:37 pm | अनिल हटेला

धन्यवाद मित्रानो ,पून्हा एकदा !!!! :-)

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

स्वानन्द's picture

28 Feb 2009 - 11:46 am | स्वानन्द

सॉल्लीड लिहीली आहे. वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे, मीही गोष्ट पाहिली.

--वळणावर आनन्द

रुपी's picture

5 Aug 2017 - 4:08 am | रुपी

छान कथा!