दुबई कट्टा वृत्तांत.

सायली पानसे's picture
सायली पानसे in जनातलं, मनातलं
21 Feb 2009 - 5:11 pm

|| श्री संत तात्याबा महाराज प्रसन्न ||

मिपाचे धर्मसंस्थापक श्री संत तात्याबा महाराज आणि मिपाधर्माच्या सर्व अनुयायांना दुबई मिपाधर्म अनुयायांचा नमस्कार!

आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आपल्या धर्मसंस्थापक श्री संत तात्याबा महारा़जांच्या आशिर्वादाने आमचा दुबई मिपा कट्टा सुरळीत पार पडला.

आपले ज्येष्ठ अनुयायी बिपिन दा यांना काहि अपरिहार्य कारणास्तव बाहेर देशी जावे लागल्यामुळे ते कट्ट्याला हजर राहु शकले नाहित. तसेच कुंदन भौ हि अनेक प्रयत्न करुन सुध्दा कट्ट्याला उपस्थित राहु शकले नाहित.

सर्वप्रथम आम्हि दुबईवासी मिपाकर खेद प्रकट करतो कि ईच्छा असुनहि आम्ही आपल्यासाठी तिकिटांचा बंदोबस्त करु शकलो नाही.
त्यास कारण :
बँगलोर कट्ट्याचे संस्थापक श्री श्री डाण बाबा बंगलोरी यांनी कबूल केलेले १०,००० दिराम आमच्या पर्यंत पोचलेच नाहित.
( आम्हि धर्मसंस्थपकांना नम्र विनंती करतो कि या गोष्टिची गंभीर दखल घेण्यात यावी आणि योग्य ती कारवाई करावी)
असो.

तर आमच्या कट्ट्याला हजर असलेले मिपावासी...

वर्षा अनिल आदित्य
वल्लरी
गौरी अद्वैत
सायली विजयन अनुष्का नील
अभिषेक

तर आपणा सर्वांना स्मरुन आम्ही कट्ट्याला सुरवात केली.

भरपुर गप्पा टप्पा झाल्या आणि ४ पोरांनी पण खुप कल्ला केला.

आणि मिपा धर्माला जागुन आम्ही खादाडी केली.........

मेनु : सौजन्य :

मिसळ पाव सायली
बाकरवड्या अभिषेक
सामोसे आणि मठरी वर्षा
बुंदीचे लाडु आणि पेढे वल्लरी आणि गौरी

उपस्थितांपैकी अनिल आणी विजयन केरळचे असुन देखिल त्यांनि मराठी मिपा कट्ट्यामधे समरसुन भाग घेतला आणि आपला मिसळपाव अगदी ईडली डोसा खावा तितक्याच प्रेमाने खाल्ला हे विशेष...

अभिषेक ने मिसळपाव धर्म आपले धर्मसंस्थापक आणि ईतर अनुयायी यांच्या बद्दल आम्हा नविन मंडळींना मौलिक माहिती दिली. त्याच प्रमाणे इतरहि अनेक मुद्यांवर (उदा. आज काल आलेली जागतिक मंदीची लाट, दुबई मधिल प्रश्न वगरे ..) चर्चा झाली.

त्याचप्रमाणे आम्ही आपले धर्मसंस्थपक श्रीसंत तात्याबा महाराज यांना विनंती करण्याचा निर्णय घेतला कि त्यांनी आपला समाधी घेण्याचा विचार काढुन टाकावा... सर्व मिपाधर्म अनुयायांना आणि माता अनुष्कादेवी शेट्टी यांना महाराजांची नितांत गरज आहे.

पुढील कट्टा लवकरात लवकर करण्याचा सामुहिक निर्णय देखिल या भेटीत घेण्यात आला.

आम्ही सर्वांनी मिपाधर्माचा प्रसार करण्याचा शपथविधी चहा सोबत उरकुन कट्टा समाप्त केला.

विशेष टिपणी : आम्ही सर्व एकमेकांना पहिल्यांदाच भेटलो ह्या कट्ट्याच्यानिमित्ताने तरीही अनेक वर्षांची ओळख असल्याचे वाटत होते.

तर अश्यारितीने आमचा पहिला मिसळपाव कट्टा उत्तमरित्या पार पाडला.

आपले नम्र ,

मराठीचा महाराष्ट्राचा भारताचा आणि भारतिय असण्यांचा नितांत अभिमान बाळगणारे
दुबईस्थित अ(?)निवासी भारतिय मिपाकर.

मौजमजा

प्रतिक्रिया

अवलिया's picture

21 Feb 2009 - 5:16 pm | अवलिया

वा! अभिनंदन!!!!

--अवलिया

विसोबा खेचर's picture

21 Feb 2009 - 5:20 pm | विसोबा खेचर

कट्टावृत्तांत व सर्व फोटू सुरेख..!

चार माणसं एकमेकांना आपुलकीने भेटली, खूप समाधान वाटले.

ही आपुलकीच सर्वात महत्वाची!

मराठीचा महाराष्ट्राचा भारताचा आणि भारतिय असण्यांचा नितांत अभिमान बाळगणारे
दुबईस्थित अ(?)निवासी भारतिय मिपाकर.

जियो...!

मिपाचे अस्तित्व हे केवळ अन् केवळ मायबाप मिपाकरांमुळेच आहे!

पुढील कट्ट्याकरता अनेकानेक शुभेच्छा...

आपला,
(कृतार्थ आणि कृतज्ञ) तात्या.

टेबल छान सजवलं आहे.
कट्टा छान झालाच असेल.
मुलाबाळांचे फोटो सुंदर आले आहेत.
अभिनंदन.

सायली पानसे's picture

21 Feb 2009 - 5:47 pm | सायली पानसे

फोटो चा काहितरि घोळ होतो आहे... तो लवकर नीट करण्याचा प्रयत्न करते आहे ... संभाळुन घ्यावे.

ढ's picture

21 Feb 2009 - 6:06 pm |

सायली पानसे's picture

21 Feb 2009 - 6:13 pm | सायली पानसे

खरच धन्यवाद... मला जमल नाही हे करायला म्हणुन शेवटि लिंक दिली.

ढ's picture

21 Feb 2009 - 6:23 pm |

कसचं ..कसचं :D

घाशीराम कोतवाल १.२'s picture

24 Feb 2009 - 10:16 am | घाशीराम कोतवाल १.२

काय ढ भो फोटु दिसत नाय वो

**************************************************************
शिवरायाचे आठवावे रूप| शिवरायाचा आठवावा प्रताप||
शिवरायाचा आठवावा साक्षेप| भूमंडळी||

सायली पानसे's picture

24 Feb 2009 - 10:53 am | सायली पानसे

आम्हीच काढले भौ.... ढ भाउंनी उलट मदत केलि ते लावुन...
काही कारणास्तव आम्हीच काढले...

विनायक प्रभू's picture

21 Feb 2009 - 5:59 pm | विनायक प्रभू

फोटो अंमळ लहान आहेत. तरीसुधा ३ मुलांच्या पहिल्या फोटोमधील मध्यभागी असलेली कन्या 'एकदम डेंजर' आहे असे वाटते. आपला अंदाज हो.
नक्की विधान नाही.
सफळ कट्ट्याबद्दल अभिनंदन

सायली पानसे's picture

21 Feb 2009 - 6:15 pm | सायली पानसे

आपला अंदाज अगदी खरा आहे .... आता नक्की विधान केलत तरी चालेल. ति एकदम डेंजर वाटणारी कन्या माझीच्....अनुष्का डॉन.

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Feb 2009 - 2:38 am | बिपिन कार्यकर्ते

मास्तर, मागे पण एकदा अजून एका कन्येच्या फोटोवरून तुम्ही अचूक अंदाज केला होता. या वेळचा अंदाज पण पर्फेक्ट. =D>

मान गये!!!

बिपिन कार्यकर्ते

वल्लरी's picture

21 Feb 2009 - 6:02 pm | वल्लरी

आम्ही सर्व एकमेकांना पहिल्यांदाच भेटलो ह्या कट्ट्याच्यानिमित्ताने तरीही अनेक वर्षांची ओळख असल्याचे वाटत होते.

अगदी खरयं..
खुप मज्जा केली आम्ही...
मिपाचे नी मिपाचे धर्मसंस्थापक श्री संत तात्याबा महाराज यांचे आभार..
---वल्लरी

सहज's picture

21 Feb 2009 - 6:20 pm | सहज

कट्टेकर्‍यांचे अभिनंदन. एन्जॉय.

इतर मिपाकर्‍यांना एकदा भेटले पाहीजे. नेहमी कट्ट्यात लोक एकदम खुशीत दिसतायत.

:-)

यशोधरा's picture

21 Feb 2009 - 6:43 pm | यशोधरा

मस्त फोटो आहेत! सायली, तुझी मुलगी भलतीच क्यूट आहे!
बच्चे मंडळी गोड आहेत अगदी!

रेवती's picture

21 Feb 2009 - 6:52 pm | रेवती

कट्टेकर्‍यांचे अभिनंदन!
फोटू आवडले, पण यातील सगळ्यांची नावे समजली नाहीत.
खाद्यपदार्थांची नावे न सांगताच समजली.;)
मुलांची धमालच चाललेली आहे.
बिपिनभाऊ व कुंदन यांचा निषेध!
त्यांच्या न येण्यामुळेच सायलीला कट्टा वृत्तांत लिहावा लागला.

रेवती

प्राजु's picture

21 Feb 2009 - 9:24 pm | प्राजु

सगळ्यांची नावे समजली असती तर बरे झाले असते..
कट्टा जोरदार झाल्याबद्दल अभिनंदन.
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

वाहीदा's picture

21 Feb 2009 - 11:32 pm | वाहीदा

सगळ्यांची नावे समजली असती तर बरे झाले असते..
बाकी मुले सगळी आपल्या सगळया सारखीच आहेत ... दंगा मस्ती करणारी ...
मि.पा. ची Generation Next :-)
ती गोड Don सगळ्या पोरांना भारी दिस्ते :-)
सदके जावां !!
~ वाहीदा
PS : बिपीन दा अन कुंदन दा यांचा जाहीर निषेध ! :-(

मीनल's picture

22 Feb 2009 - 2:37 am | मीनल

हं.तेच म्हणत होते.
फोटो छान आहेत. कोण उपस्थित होत /नव्हत ते कळल ,पण फोटो मधले कोण, कुठल, ते कळल नाही.
`डॉन` तेवढी कळली लगेच.
बेत तर खासच होता.
मीनल.

छोटा डॉन's picture

21 Feb 2009 - 7:20 pm | छोटा डॉन

समस्त दुबईकर कट्टर कट्टेकरी मिपाकरांचे हार्दीक अभिनंदन ( आयला, काय श्लेष झाला. जियो ;) )
अशीच मस्त मज्जा करत जावा ...!!!

खाद्यपदार्थांचे आणि लहान मुलांचे नॅचरल पोझमधले फोटो अप्रतिम ..!
पोरांकडुन पाहुनच कळते की कट्टा मस्त रंगला होता, वर्णन करायची गरजच नाही ...
काही कारणांमुळे कट्ट्याला अनुपस्थीत राहिलेल्या कुंदनशेठ आणि बिपीनदांचा जाज्वल्य निषेध ..!!!!
( त्यांच्या बंगल्यावर निषेधाच्या घोषणा द्यायला व जमल्यास सोडावॉटरच्या बाटल्या फेकायला काही माणसे सोडतो आहे.. ;) )
पुढच्यावेळी कुंदनशेठ सापडल्यावर त्यांच्याकडुन "पनीर बटर मसाला"करुन घ्यावा व त्यांना खायला न देता त्यांना समोर बसवुन सगळ्यांनी मनोसोक्त ओरपावा अशी समस्त दुबईकरांना विनंती. तसेच तुम्ही कुंदनच्या कन्येचा " आग्गो ऽऽऽऽ बाई " चा अविष्कार मिस केल्याच्या दु:खात आमचे अखिल बेंगलोर मिपाकर मंड्ळ सहभागी आहे असे नमुद करु इच्छितो ...
बाकी बिका पुढच्यावेळी इकडे आल्यावर आम्ही त्यांचा योग्य समाचार घेऊ ...

>>बँगलोर कट्ट्याचे संस्थापक श्री श्री डाण बाबा बंगलोरी यांनी कबूल केलेले १०,००० दिराम आमच्या पर्यंत पोचलेच नाहित.
अच्छा ऽऽऽऽ
तरीच म्हटले की श्री श्री श्री ऍडी महाराज सध्या गायब कसे आहेत, गेल्या ४ दिवसापासुन "योगा व सात्विक आचार" शिबीराला सुद्धा पुर्वसुचना न देता अनुपस्थीत आहेत.
आम्ही "१०, ००० दिराम" च्या जागी खुषीने "१५१५१ दिराम" मंजुर करुन ते ऍडीकडे तुम्हाला देण्यासाठी सोपवले होते, हे महाशय त्याच्यासगट गायब झालेले दिसतात ...
असो.
लवकरच ह्या प्रकरणाची "हुच्च स्तरिय चौकशी" करण्यात येऊन त्याच्या अहवाल मायबाप मिपाकरांसमोर ठेवण्यात येईल ...!
तरीही झालेल्या गैरसोईबद्दल समस्त मिपा बेंगलोर कमिटी दिलगीर आहे. :(

पुढील कट्ट्याकरता अनेकानेक शुभेच्छा...

--------
( आनंदीत ) छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

कलंत्री's picture

21 Feb 2009 - 8:00 pm | कलंत्री

समस्त दुबईकर कट्टर कट्टेकरी मिपाकरांचे हार्दीक अभिनंदन ( आयला, काय श्लेष झाला. जियो Wink )

श्लेष आवडला.

कट्टे उदंड व्हावे अशीच शुभेच्छा. असे अनेक कट्टे होऊन मराठीलोकांमधील कट्ट्या कमी व्हाव्यात.

पुढच्या वेळेस आम्ही नक्कीच येऊ.

प्रमोद्_पुणे's picture

4 Mar 2009 - 6:41 pm | प्रमोद्_पुणे

सह्जच विचारत आहे. १०वीत शिकल्यासारखे वाटत आहे.

ऍडीजोशी's picture

22 Feb 2009 - 1:23 am | ऍडीजोशी (not verified)

डाण बाब बंगळूरी ह्यांचा जाहीर त्रीवार निषेध निषेध निषेध

खुषीने "१५१५१ दिराम" मंजुर करुन ते ऍडीकडे तुम्हाला देण्यासाठी सोपवले होते, हे महाशय त्याच्यासगट गायब झालेले दिसतात ...

ही रक्कम मी डाण्याने दिलेल्या २ अकाउंट मधे जमा केली. नंतर कळलं की तुमचा म्हणून दिलेल्या अकाउंट पैकी एक नं डाण्याचा आणि दुसरा अभिज्ञ चा होता. 'बँगलोर सात्विक आहार प्रचार आणि योगासन प्रसार समिती' च्या सदस्यांचे पैसे अशा तर्‍हेने खिशात घातल्याबद्दल डाण बाबा बंगलोरी आणि अभिज्ञ बाबा बँगलोरी ह्यांचा त्रीवार निषेध निषेध निषेध. सोबतच लगे हाथो बिपीन भाउंचा पण त्रीवार निषेध निषेध निषेध.

जमल्यास सोडावॉटरच्या बाटल्या फेकायला काही माणसे सोडतो आहे
डाण्या, अभिज्ञ आणि धम्याने संपवून टाकलेल्या सोड्याच्या २,२५६ बाटल्या विकणे आहे. किंमत प्रति बाटली फक्त रु. ३/-. बाटली फेकणारा माणूसही मिळेल पण सगळे पैसे आधी द्यावे लागतील. प्रति बाटली रु. ४/- फेकणावळ आणि वाहनखर्च.

आपला
(अँग्री यंमॅन) ऍडी जोशी

एखाद्याला अध्यक्ष म्हटलं की अध्यक्षाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की कमीटी मेंबर्स ना त्रास होतो.
त्यात अजुन अध्यक्षाला "गुद्दे" मारणे ही तर फारच लांबची गोष्ट. असो. #:S

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Feb 2009 - 2:35 am | बिपिन कार्यकर्ते

त्यांच्या बंगल्यावर निषेधाच्या घोषणा द्यायला व जमल्यास सोडावॉटरच्या बाटल्या फेकायला काही माणसे सोडतो आहे..

निमित्त काही का असेना, आमचा बंगला आहे हे कळल्याने खूप बरं वाटलं. ;)

बिपिन कार्यकर्ते

वर्षा म्हसकर-नायर's picture

21 Feb 2009 - 8:18 pm | वर्षा म्हसकर-नायर

नमस्कार मिपाकर,
सायलीने आम्हा सर्वांचे खुप छान आदरातीथ्य केले, खुप मेहनत घेतली होती. छान मेनु होता आणि टेबल पण उत्तम रितीने सजविले होते. फोटोवरुन लक्षात आले असेलच. आम्ही आपले साधे विकतचे पदार्थ घेउन गेलो. :(
खरंच आम्ही सगळे प्रथम भेटत आहोत असे कुणालाच वाटत नव्हते. मराठी बरोबर त्याच वेळी, त्याच ठिकाणी एक केरळी कट्टा देखिल बनला होता. :)
बाकी सायलीची मुलगी खरंच डॉन आहे. :) खुप गोड आहे.

अभिषेकने मिसळपाव क्या है हे हिंदी व इंग्रजीमधून माझ्या नव-याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. :D

वर्षा

वल्लरी's picture

21 Feb 2009 - 8:31 pm | वल्लरी

सायलीने आम्हा सर्वांचे खुप छान आदरातीथ्य केले, खुप मेहनत घेतली होती. छान मेनु होता आणि टेबल पण उत्तम रितीने सजविले होते. फोटोवरुन लक्षात आले असेलच. आम्ही आपले साधे विकतचे पदार्थ घेउन गेलो.

वर्षाशी सहमत
---वल्लरी

शितल's picture

21 Feb 2009 - 8:56 pm | शितल

कट्टा वृत्त्तांत आणि फोटो एकदम मस्त आले आहेत.
:)

स्वाती राजेश's picture

21 Feb 2009 - 9:45 pm | स्वाती राजेश

फोटो आणि वृतांत फारच छान...
मला वाटते मि.पा.करांच्या मुलांनी कट्टा जास्ती एंजॉय केलेला दिसत आहे...
मुलांचे फोटो फारच छान, सर्वांची नावे दिली असती तर मस्तच झाले असते..
पुढील कट्टा लवकरच होवो......

अभिषेक पटवर्धन's picture

21 Feb 2009 - 10:54 pm | अभिषेक पटवर्धन

सायली ने खरच खुप केल होतं...खर तर केरळी कट्ट्यावरही मजा आली. मुलही सगली एकदम गोड आहेत...सायली चे मुलगी तर मराठी, हींदी, मल्याळम, इंग्लिश आणि गुजरथी इवढ्या भाषा बोलते...इकदम ठमाकाकु आहे...

फक्त_ मोक्श's picture

21 Feb 2009 - 11:13 pm | फक्त_ मोक्श

२००% सहम त !

आम्ही सर्व एकमेकांना पहिल्यांदाच भेटलो ह्या कट्ट्याच्यानिमित्ताने तरीही अनेक वर्षांची ओळख असल्याचे वाटत होते.

(२००%सहमत)

सायलीने आम्हा सर्वांचे खुप छान आदरातीथ्य केले, खुप मेहनत घेतली होती. छान मेनु होता आणि टेबल पण उत्तम रितीने सजविले होते. फोटोवरुन लक्षात आले असेलच. आम्ही आपले साधे विकतचे पदार्थ घेउन गेलो.(२००%सहमत)

सायली व विजयन ने जी मेहनत घेवुन तिच्या घरी जो क ट्टा रंग वला होता त्यांचे कोतुक करु ते कमीच! प्रत्येकाच्या व बाळ्-गोपाळांच्या उप स्थितित कट्टा सफ्ळ संपुर्ण!
सायली कट्टा वृत्तांत सुंद र लिहीला आहेस. जय हो!

पुढील कट्ट्याकरता अनेकानेक शुभेच्छा...:) <:P

विसोबा खेचर's picture

21 Feb 2009 - 11:24 pm | विसोबा खेचर

चला! दुबईचा सात्विक शाकाहारी कट्टा उत्तमरित्या पार पडला. छान झालं..

आता एखादा मांसाहारी व मद्यपानाचा कट्टाही रंगू द्यात! अरे माझ्या मुंबईपुण्यातील मिपाकरांनो, मनावर घ्या रे. साला बर्‍याच दिवसात आपलाही कट्टा झाला नाही! मस्तपैकी दारू, मटण, गप्पाटप्पा, गाणंबजावणं करू जोरदार..! :)

तात्या.

ऍडीजोशी's picture

22 Feb 2009 - 1:28 am | ऍडीजोशी (not verified)

असेच सगळी कडे कट्टे भरोत. पुढच्या कट्ट्यासाठी शुभेच्छा.

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Feb 2009 - 2:32 am | बिपिन कार्यकर्ते

आत्ताच मुक्कामी आलो. दुबई कट्टा वृत्तांत आल्याची कुणकुण आम्हाला दुपारीच लागली होती. कट्टा आणि वृत्तांत दोन्ही भारीच. पहिलाच कट्टा हुकला म्हणून वाईट वाटलं. असो.

बिपिन कार्यकर्ते

सुक्या's picture

22 Feb 2009 - 3:39 am | सुक्या

कट्टा वृत्तांत वाचुन मजा आली. पुढच्या कट्ट्यासाठी शुभेच्छा.

"|| श्री संत तात्याबा महाराज प्रसन्न ||" या ऐवजी "|| श्री श्री श्री १००८ संत तात्याबा महाराज प्रसन्न ||" कसं वाटतय? ;)

सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

मॅन्ड्रेक's picture

23 Feb 2009 - 3:23 pm | मॅन्ड्रेक

कट्टा वृत्त्तांत आणि फोटो एकदम मस्त आले आहेत-- सह्हमत.
at and post : janadu.

चतुरंग's picture

23 Feb 2009 - 8:18 pm | चतुरंग

शॉल्लेट धमाल झालेली दिसते आहे!
कट्ट्यांचे लोण असे जगभर पसरत चाललेले पाहून एक मिपाकर म्हणून धन्यता वाटली!
'अनुष्का डॉन' अथॉरिटी दिसते आहे एकदम, है क्या कोई आवाज?!

('कार्यकर्ते' ह्यांनी त्यांचे नाव सिद्ध केलेले आहे आणि कुंदनभौना एकटे पडू दिले नाहीये हे आम्ही लक्षात ठेवूच! जातात कुठे!! :W )

चतुरंग

आनंदयात्री's picture

24 Feb 2009 - 9:37 am | आनंदयात्री

दुबईतल्या कट्टेकर्‍यांचे अभिनंदन. फोटोही सुरेख.

परिकथेतील राजकुमार's picture

24 Feb 2009 - 11:09 am | परिकथेतील राजकुमार

फोटु आणी कट्टा वृतांत येकदम बेष्ट !
मेनु मध्ये फुटाण्याचे गुलाबजाम नाहित हे बघुन अंमळ वाईट वाटले.
बिपिन भौ व कुंदन चंदन ह्यांच्याकडुन पुढिल कट्ट्याचा संपुर्ण खर्च वसुल करावा.

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

सायली पानसे's picture

24 Feb 2009 - 11:18 am | सायली पानसे

आपल्या सगळ्यांचे मनापासुन आभार इतक्या प्रतिकिया बद्दल.
आम्हाला अजुन कट्टे करण्यासाठी हुरुप आला आहे.

घासू's picture

4 Mar 2009 - 5:40 pm | घासू

पुढचा कट्टा केव्हा? आम्ही सुद्धा हजेरी लावू. बिपिनजींचा निरोप मिळाला होता, पण उशीरा वाचण्यात आल्यामुळे जमले नाही.

घासू

कुद्या कडून व्हॉटसअप वर अत्यंत दु:खद बातमी समजली. आपली जूनी मैत्रिण सायली हिचे दुबई येथे हार्ट एटैक ने काल पहाटे निधन झाले आहे. इश्वर तिच्या आत्म्यास शांती देवो. बिपीन दा कडून अपे़क्षा होती की एक पोस्ट येईल कारण ते दोघे शालेय फ्रेंड्स होते

कुद्या कडून व्हॉटसअप वर अत्यंत दु:खद बातमी समजली. आपली जूनी मैत्रिण सायली हिचे दुबई येथे हार्ट एटैक ने काल पहाटे निधन झाले आहे. इश्वर तिच्या आत्म्यास शांती देवो. बिपीन दा कडून अपे़क्षा होती की एक पोस्ट येईल कारण ते दोघे शालेय फ्रेंड्स होते