आवरा रे ह्या नातेवाइकांना

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
18 Feb 2009 - 8:30 pm

"आता जबाबदारी मी घेतली आहे , तुम्ही निवांत रहा. मी सगळे बघुन घेतो." काकुंना मी सांगितले.
हॉस्पिटल ऍड्मिनिनस्ट्रेशन मधे असताना पेशंटचे नातेवाईक कसे पिडतात ह्याचा मला पुर्ण अनुभव होता. त्यातल्या त्यात एखादा मेडिकल रेप. निघाला तर मग काही विचारुच नका. असो.
काकुंच्या यजमानांचे जबड्याचे ऑपरेशन होते. 'गुटका कींग' होते काका. त्यामुळे ताबडतोब सर्जरी अनिवार्य झाली होती. दोन्ही मुले व सुना अमेरिकेत. आय्.टी त असल्यामुळे लगेच रजा घेणे शक्य नव्हते. आणि घेण्याची हिंमत नव्हती. कायमची रजा मिळायची शक्यता नाकारता येत नव्हती. मुलाचा मला फोन आला. मी जबाबदारी स्विकारली.
ऑपरेशन च्या दिवशी नेमक्या जवळ्च्या ४ जणानाच कळवले. सगळयाना कळवले असते जमा झालेल्या गर्दीला आवरणे कठीण गेले असते. आणि सर्व मंडळी येउन काय करणार होती. मदती पेक्षा त्रासच जास्त.
पेशंट्ला ऑपरेशन थिएटर मधे नेल्यावर ३ तास वेळ निवांत होता. आदल्या दिवशी कुटूंबाने पेशंटची आवड ओळखुन जेवायला गरम भाताबरोबर तिरफळाची आमटी दीली होती. ती पेशंटला आणि काकुना खुप आवडली होती. काकुनी भावविवश होउन आदल्या दिवशीच्या जेवणाचा विषय काढला. 'खाता पीता माणुस, आता फक्त लिक्विड डायेट'. तुझ्या बायकोला माझे आशिर्वाद आहेत हो, वगैरे, वगैरे. मी म्हटले, हे बघा काकु, पुढील १५ दिवस तरी असे काही विषय काढु नका. फक्त फोन करा. सर्व हजर होईल. उगाच घरी येण्याजाण्यात वेळ घालवु नका. काकांबरोबर रहा. तुमच्या चहापाण्याची, दोन्ही जेवणाची जबाबदारी माझी बायको बघुन घेईल. कुठ्ल्याही नातवाईकाना काहीही कळवु नका. त्यांचे सर्व 'संगीत मानापमान' मी बघुन घेईन. तुम्ही फक्त माझ्याकडे बोट दाखवा. जवळच उभे असलेले काकांच्या नातेवाईकाला राहावले नाही. लगेच 'धीस इज नॉट रिक्वायर्ड'चे वाक्य आले. मी म्हणालो, ठीक आहे, मग तुम्ही घ्या सर्व जबाबदारी , मी आहेच बरोबर. चेहेरा पडला त्यांचा. पुढे बोलायची गरज लागली नाही. 'बायको पीडीत' मेंबरांचा हा अध्यक्ष. एकदा खाजगीत म्हणाला होता,"आयला, बायकोला ना मगर असलेल्या नदीत ढकलायला पाहीजे". पण नको ते पण योग्य नाही. मगरींना कृयेल्टी केली म्हणुन प्राणिसंरक्षक समिती केस करेल".
ऑपरेशन व्यवस्थीत पार पडले. पेशंटला आय्.सी.यु. त ट्रांसफर केले गेले. काकु सुखावल्या. तीतक्यात बायको काकूना जेवण घेउन आली.
सकाळपासुन उपाशी असलेला जीव पोटभरुन जेवला. जेवणात बायकोने नारळ न घातलेला 'कोळंबा' केला होता. गरम भाताबरोबर तुप आणि ही आमटी कॉम्बिनेशन झकास जमले. काकु तृप्त झाल्या. मी कीती लकी असल्याचे सर्टिफिकेट पण मिळाले. हे सर्व 'मिस्टर मगर' बघत होते.
सर्व सेटल झाल्यावर मी घरी आलो. जेवण झाले. आता जरा लवंडुया म्हणतो तर कुटुंबाचा मोबाईल खणाणला. बघतो तर फोनवर 'मिसेस मगर'. फोनवरच्या संभाषणावरुन परत आशिर्वाद वगैरे झाले ह्याचा अंदाज आला. सुमारे १५ मिनिटाने कुटुंबाच्या चेहेर्‍यावर आष्चर्य बघितले. लक्षात आले मगरीने चावा घेतला होता. तीने नेमके काय काय म्हटले हे मला कधीच कळणार नाही हे मला माहीत आहे. बायकोही कधीच सांगणार नाही. पण अंदाज करणे कठीण नव्हते. एकंदरीत मी घेतलेल्या पुढाकाराबद्दल 'वैधानिक इशारे' असणार. सर्वात कहर म्हणजे जाता जाता त्या महामायेने 'कोळंब्याची" पाककृती सुद्धा विचारली. अरे प्रसंग काय हे तरी ओळखा.
संध्या़काळी काकुना चहा आणि फराळ घेउन गेलो होतो. समोर परत मीसेस मगर हजर. तोंडाचा पट्टा सतत चालु. आम्ही परके झालो इत्यादी ,इत्यादी. काकू हैराण. माझी ख्याती कानावर असल्यामुळे मला बघितल्यावर तोंड लगेच बंद केले. दोघेही घरी रवाना झाल्यावर काकू म्हणाल्या, "सोडवलेस रे बाबा, काय विचीत्र बाई आहे." आय्.सी.यु. मधे पॅरॅलीसीस चा ऍटॅक कसा येतो ह्यावर बोलत होती. नशीब, काका झोपले होते.
घरी गेल्यावर मिस्टर मगरला फोन केला आणि स्पष्ट सांगितले, तुमच्या मिसेसना हॉस्पिटल मधे पाठवु नका.त्या परत आल्या तर प्राणिसंरक्षक समितीच्या केस ला सामोरे जायला मी तयार आहे".

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

18 Feb 2009 - 8:36 pm | लिखाळ

>>" आय्.सी.यु. मधे पॅरॅलीसीस चा ऍटॅक कसा येतो ह्यावर बोलत होती. नशीब, काका झोपले होते.<<
हा हा ..
खरं आहे.. नातेवाईकांना आवरा .. हॉस्पिटलात काय बोलावे, काय करावे याचे अनेकांना भानच नसते.

पेठकरकाकांनी मिपावर त्यांच्या आजारपणाची कथा लिहिली होती त्यात पण असेच काही किस्से होते ते आठवले.

तुम्ही आशिर्वादाचे धनी झालात हे उत्तम.
-- लिखाळ.

त्रास's picture

18 Feb 2009 - 8:43 pm | त्रास

एकदम चंपक बाई आहे ती मगरबाई.
नमुने असतात एकेकजण.

प्रकाश घाटपांडे's picture

18 Feb 2009 - 8:48 pm | प्रकाश घाटपांडे

त्या परत आल्या तर प्राणिसंरक्षक समितीच्या केस ला सामोरे जायला मी तयार आहे"

.
:)) :-)) :laugh: :lol:
प्रकाश घाटपांडे

भास्कर केन्डे's picture

18 Feb 2009 - 8:55 pm | भास्कर केन्डे

प्रभू देवा... आभार! या वेळी कसलेही अनुमान न बंधता सरळ सगळे समले (असा समज आहे).

'गुटका कींग', मगरबाई, 'बायको पीडीत'... अलंकार जबरा वापरलेत.

तुम्ही जी कृती केलीत ती एकदम समयोचित व स्तुत्य. अशा प्रकारच्या सामाजिक बांधिलकीतल्या वागण्यांसाठी आपला भारतीय समाज हजारो वर्षांपासून प्रसिद्ध आहे. पण जस जसे 'बायको पीडीत' क्लब वाढत आहेत तसतसा त्या संस्कृतीचा र्‍हास होत आहे असे वाटते.

काय हो, त्या अनादी काळात सुद्धा 'बायको पीडीत' क्लब असतील का? का हे आजकल फुटलेले पेव आहे.

आपला,
('बायको पीडीत'क्लबचा सदस्य न व्हावा लागलेला समाधानी) भास्कर

विनायक प्रभू's picture

18 Feb 2009 - 8:58 pm | विनायक प्रभू

बहुदा समस्या प्राचीन असावी. योग्य उत्तर अवलिया देइल असे वाटते.

भास्कर केन्डे's picture

18 Feb 2009 - 9:02 pm | भास्कर केन्डे

ऑ अवलिया आणि ही समस्या यांचा संबंध काय असवा बॉ?

समस्या ग्रस्त आणि समस्यावरचे उपाय शोधुन देणारे मास्तर यांच्या कडून काहीही उत्तर मिळाले तरी आम्ही ते ग्राह्य समजतो. कसें ? ;)

आपला,
(अवलिया फॅन) भास्कर

रेवती's picture

18 Feb 2009 - 10:09 pm | रेवती

बापरे!
खूप हसले मी!
गुटका किंग काय...., मिसेस मगर काय..., प्राणिसंरक्षक समिती...
फारच मजा वाटली.
आपल्या लेखनाचा हेतूही लक्षात आलाय.

रेवती

अवलिया's picture

18 Feb 2009 - 10:12 pm | अवलिया

मित्र निवडतो किंवा तोडतो तसे नातेवाईक निवडता किंवा तोडता यायला हवे होते हो...

--अवलिया

शंकरराव's picture

18 Feb 2009 - 11:48 pm | शंकरराव

"तुमच्या मिसेसना हॉस्पिटल मधे पाठवु नका.त्या परत आल्या तर प्राणिसंरक्षक समितीच्या केस ला सामोरे जायला मी तयार आहे".

=)) ए़केक नमुने... बाकी प्रकटन आवडले.
मास्तरांनी दिलेला समय सुचकता, दक्षता पाळणे ह्या विषयावर दिलेला तास आवडला.

शंकरराव

चतुरंग's picture

19 Feb 2009 - 12:25 am | चतुरंग

मास्तर, आपले निरीक्षण बरोबर आहे. आपल्या नातेवाईक रुग्णाला बाहेरची नातेवाईक नसलेली मंडळी मदत करताहेत हे बर्‍याचदा रुग्णाच्या नात्यातल्या लोकांच्या डोळ्यावर येते. ते स्वतःही फारशी मदत करीत असतीलच असे नाही पण दुसरे कोणी केले की ह्यांचे माथे फिरते! (म्हणूनच त्यांना 'ना त्यातले' म्हणत असावेत का? ;) )

गुटका किंग, मगरबाई ह्या तुमच्या शब्दसंपत्तीला आपला सलाम! ;)

चतुरंग

प्राजु's picture

19 Feb 2009 - 12:37 am | प्राजु

प्रभू श्टाईल..
मस्त लेख.
आमच्या शेजारी एक काकू होत्या.. त्यांना काही कारणाने ऍडमीट करावे लागले तर..
तिथले डॉक्टर पथ्याची जी काही यादी देत होते त्यात, "नको" चेच प्रमाण ९५ % होते. शेवटी त्यांना आई म्हणाली, "डॉक्टर, काय खायचं तेच फक्त सांगा."
असो... या लेखामुळे हा किस्सा आठवला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अनामिक's picture

19 Feb 2009 - 1:06 am | अनामिक

खरंच.. अशा नातेवाईकांना आवरता आले पाहिजे.
आय. सी. यु. मधुन नुकत्याच बाहेर आलेल्या पेशंटला येवून भांडलेले नातेवाईक ऐकिवात आहेत. असल्या लोकांना प्रंग काय आपण बोलतो काय याचे भान कसे नसते कुणास ठाऊक.

अगदी गरजेच्या आणि विश्वास असलेल्या नातेवाईकाला किंवा मित्रालाच मदत करायला सांगावे. बाकीच्यांना भेटायला कधी यायचे ते आम्ही कळवू , तेव्हा या म्हणून सांगावे.

अनामिक

विशाल कुलकर्णी's picture

19 Feb 2009 - 8:39 am | विशाल कुलकर्णी

एकदम फंडु !!!

सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

सहज's picture

19 Feb 2009 - 11:02 am | सहज

प्रभूसर हा लेख एकदम खास जमला आहे. एकदम खास प्रभूशैली.

:-)