शिळ्या भाताच्या चकल्या.

सायली पानसे's picture
सायली पानसे in पाककृती
17 Feb 2009 - 11:51 am

शिळ्या भाता चा फोडणी चा भात सोडला तर काय करायचे हा घरातल्या आई समोर प्रश्न असतो... हि रेसिपी करयला सोप्पी आणि सर्वाना आवडेल ... माझी आई करायची.
फोटो नाहि आहे आत्ता म्हणुन लावु शकले नाहि.

साहित्य :

शिळा भात
आले
लसुण
हिरव्या मिर्च्या
जिरे
मीठ
ईथे प्रमाण दिले नाहिये कारण भात किति आहे त्यावर अवलंबुन आहे... त्यामुळे अंदाजाने घालणे..

आले मिर्च्या लसुण आणि जिरे वाटुन घ्यावेत. शिळ्या भातात वरिल वाटण आणि चविप्रमाणे मिठ घालुन खुप कुस्करुन नीट मळुन घ्यावे.. थोडा तेलाचा हात लावुन त्याचा गोळा करावा.
आता चकली च्या ढाच्यातुन वरिल गोळ्याच्या चकल्या पाडुन घ्या... आपण सबुदाण्याच्या करतो त्या प्रमाणे....
आता ह्या मोकळ्या ताटात सुकवायला ठेवा.... कडकडित उन्हात वाळवल्या तर उत्तम पण घरात जरि वाळवल्या तरि चालेल..... एकदम सुकल्या कि हवाबंद डब्यात भरुन ठेवाव्यात.. २०-३० दिवस छान राहतात्...जास्त सुद्धा.

हव्या तेव्हा तळुन खाव्या...... अप्रातिम चव लागते.

प्रतिक्रिया

त्रास's picture

17 Feb 2009 - 12:40 pm | त्रास

फ्रिज मधला ३ दिवसांचा शिळा भात चालेल का?
मायक्रोव्हेवमधे सुकवता येइल का?

सायली पानसे's picture

17 Feb 2009 - 12:51 pm | सायली पानसे

चालेल... मायक्रोव्हेव चि कल्पना नहि.
घरात सुकवला तरि चालेल.

वल्लरी's picture

17 Feb 2009 - 1:11 pm | वल्लरी

वा !!!
शिळ्या भाताला फोड्णीच्या भाता व्यतीरिक्त दुसरा पर्याय...:)
करुन बघेन नी कळवेनच ...

---वल्लरी

समिधा's picture

17 Feb 2009 - 1:14 pm | समिधा

नेहमी करते , मस्त होतात.

अभिष्टा's picture

17 Feb 2009 - 1:22 pm | अभिष्टा

तळल्यावर फुलतात का? साबुदाण्याच्या चिकवड्या जशा वर्षभर टिकतात तश्या टिकत नाहीत का?
---------------------------------
जे जे मजसाठी उचित, तेचि तू देशील खचित
हे मात्र मी नक्की जाणित, नाही तकरार राघवा

सायली पानसे's picture

17 Feb 2009 - 1:26 pm | सायली पानसे

फुलतात पण महिन्यावर टिकतिल कि नाही कल्पना नाहि... कारण एवढा भात उरत नाहि आणी लगेच संपतात सुध्दा ना...

अभिष्टा's picture

17 Feb 2009 - 1:40 pm | अभिष्टा

ते ही बरोबरच गं. :-)
---------------------------------
जे जे मजसाठी उचित, तेचि तू देशील खचित
हे मात्र मी नक्की जाणित, नाही तकरार राघवा

रेवती's picture

17 Feb 2009 - 6:02 pm | रेवती

चवीला छानच लागत असणार अश्या चकल्या!
शिळ्या भाताच्या 'भातवड्या' की अशाच काहीतरी नावाचा पदार्थ एकदा चाखायला मिळाला होता.
रेवती

विसोबा खेचर's picture

18 Feb 2009 - 7:54 am | विसोबा खेचर

आम्ही बिगरफोटूच्या पाकृंना प्रतिसाद देत नाही..

सायली पानसे's picture

18 Feb 2009 - 11:48 am | सायली पानसे

काका फोटो नाहिये माझ्याकडे.... आणी करुन लावायचा तर आजकाल भात अजिबात उरत नाहि हो .... सांगा काय करु?

विसोबा खेचर's picture

18 Feb 2009 - 11:55 am | विसोबा खेचर

सांगा काय करु?

हरकत नाही, म्होरल्या वेळेस टाका..

तात्या.

काका फोटो नाहिये माझ्याकडे....

काका??

बरं बरं! :)

स्वगत : तात्या, म्हातारा झालास रे आता! आणि म्हणे संध्याकाळी नाक्यावर जाऊन जरा हिरवळ पाहतो! छ्य्या! :)

सायली पानसे's picture

18 Feb 2009 - 12:00 pm | सायली पानसे

बाप रे.. काका म्हणाले म्हणुन रागवलात का?
तुम्हिच सांगा मग काय म्हणु ते?

तुमचि पाक्क्रुति आवलि मस्त
कारन शिळ्या भातापासुन एक मस्त पदर्थ बनतो
आनि तो हि कमि ख्र्चात मला तुम्चि आव्द्ली

अश्विनि३३७९'s picture

27 Feb 2009 - 12:22 pm | अश्विनि३३७९

नवीन रेसीपी येउ दे..

JayGanesh's picture

27 Feb 2009 - 12:37 pm | JayGanesh

कोणी 'प्रत्येश' करुन पाठेवेल का ?

योगिता_ताई's picture

27 Feb 2009 - 1:13 pm | योगिता_ताई

या चकल्या कडकडित उन्हात वाळवल्या तर वर्षभरपण टिकतात...

मी नेहमी करते....

जागु's picture

27 Feb 2009 - 2:22 pm | जागु

मी ही केल्या आहेत ह्या चकल्या छान होतात.
शिळ्या भाता पासुन अजुन दही बुत्ती पण बनवता येते. भातात दही, कोथिंबीर मिक्स करुन त्यावर कढिपत्ता, जिर, मिरचीची फोडणी द्यायची.

जागु's picture

27 Feb 2009 - 2:23 pm | जागु

मी ही केल्या आहेत ह्या चकल्या छान होतात.
शिळ्या भाता पासुन अजुन दही बुत्ती पण बनवता येते. भातात दही, कोथिंबीर मिक्स करुन त्यावर कढिपत्ता, जिर, मिरचीची फोडणी द्यायची.