टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
वाणी व मोल्स
Sprint Nextel to Cut 4,000 Jobs, Close 8 Percent of Retail Shops
वाचा
मोठमोठे मौल्स वगैरे जर अपेक्षीत धंदा झाला नाही तर खाडकन बंद करतात
नोकरांना वा-यावर सोडतात
गि-हाइकांविषयी बेपर्वा असतात
कोप-यावरचा वाणी कळकट असतो
त्याचे दुकान पोश नसते
त्याच्या कडे जावुन आपल्याच खिशातील पैशानी आपला इगो सुखावल्याचे समाधान मिळत नाही
पण.......
तो खाडकन दुकान बंद करण्याची शक्यता खुप कमी असते ( नाही असे नाही)
पिढिजात असल्यामुळे बेपर्वा वृत्ती कमी असते
वाणी व मोल्स यांच्या युदधात वाणी च विजयी ठरणार
फार मागे मिसळपाव वरच कुणीतरी मोल्स हि आजची गरज आहे असे विधान केले होते.
दिवसाला शंभर रुपये कसेबसे मिळवुन त्यातल्या ३० रुपयात तांदुळ, डाळ, तेल, पीठ, मीठ, पोराला चोकलेट, हे प्याकेज कोप-यावरच्या वाण्याकडुन मिळवुन, ४० रुपयाची संत्रा किंवा नारींगी मारुन , तीस रुपये खोलीचे भाडे म्हणुन लावुन ठेवुन, बायकोला बदडुन () शांतपणे झोपुन पुन्हा दुस-या दिवशी राबणा-या पन्नास कोटी भारतीयांची मोल्स ही गरज अजिबात नाही
येथील भुमीशी संबध नसलेल्या इंडीयन लोकांना ती आईवडीलांपेक्षा जास्त गरजेजी वाटत असेल. दुर्देव त्यांचे
तुम्हाला काय वाटते?
नाना
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती

नान्या,
येथील भुमीशी संबध नसलेल्या इंडीयन लोकांना ती आईवडीलांपेक्षा जास्त गरजेजी वाटत असेल. दुर्देव त्यांचे
वाणी व मॉल्स यांची तुलना करताना मधल्यामध्ये, उगीचच्या उगीच आमच्या परदेशस्थ भारतीयांना तू विनाकारण फटकारले आहेस असे मला वाटते!
असो...
माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मी आजतागायत कुठल्याही मॉलमध्ये कधीही पाऊलही ठेवलेलं नाही. मला त्या हायफाय आणि पॉश वातानुकुलीत वातावरणात जावंसंच वाटत नाही. आम्ही सगळं सामन मुंबई ग्राहक पंचायतीने चालवलेल्या ग्राहक पेठेतून/संघातून महिन्याची यादी मागवून घेतो. आणि त्यातूनच जर काही गरज लागली तर कोपर्यावरचा वाणी आहेच!
तात्या.
दुर्देव ?
मला बुवा त्या पॉश वातानुकुलीत वातावरणात जायला आवडते .... त्यात मी वाईट वाटून घेण्यासारखे काय आहे?
उदा. एखाद्या मोल मध्ये खरेदी करण्यात काही देशद्रोह , अप्रामाणिकपणाला उत्तेजन आहे की काय? असल्यास मार्गदर्शन करा...
सुभिक्षा, मोअर,बिग बझार,स्पीनच या मोल्स ला मी नेहमी भेट दिलेली आहे...मला तसे वाटत नाही काहीच...
दुर्देव त्यांचे???...माझ्या कोपर्यावरचा वाणी छापील किमतीने वस्तू विकतो आणि मला सुभिक्षामध्ये खूप डिस्काउंट मिळतो....मी हे हजार वेळा तुलना करून पाहिले आहे....
,)
,)
माझा अनुभव
वाण्याजवळ असलेलाच माल तुम्हाला घ्यावा लागतो.
मॉल मध्ये व्हरायटी असते.
वाण्याच्या सामानाचे वजन खूपवेळा परफेक्ट नसते.
मॉल मध्ये आपण शंका आल्यास चेक करू शकतो.
वाण्याचे सामान काहीवेळा निवडलेले हवे असल्यास मिळत नाही.
मॉल मध्ये मिळते.
वाण्याकडे सर्व वस्तू एकाच ठिकाणी अशी कंन्सेप्ट नसते.
मॉल मध्ये सगळ्या वस्तु मिळतात.(खाण्याच्या , वापर्ण्याच्या, इलेक्ट्रॉनिक्स, किचन इत्यादि...
वाण्याकडे कधीही सूट (डिस्काउंट) मिळत नाही.
मॉल मध्ये खूपदा मिळते.
महत्वाचे मॉल मुळे अनेक नोकर्या उत्पन्न होतात.
त्या वाण्याच्या दुकानात????
महत्वाचे
महत्वाचे मॉल मुळे अनेक नोकर्या उत्पन्न होतात.
त्या वाण्याच्या दुकानात????
नोक्-या हव्यात की स्वयंउद्योजकता ?
मॉल मधील नोकरीच्या अनुभ्वाचा काय उप्योग?
बरोबर
बरोबर पक्या
वाण्याच्य
वाण्याच्या सामानाचे वजन खूपवेळा परफेक्ट नसते.
मॉल मध्ये आपण शंका आल्यास चेक करू शकतो.
मध्यंतरी एका शहरात एका नामांकित मोल वर वजनमापे अधिका-यांनी संशयाने धाड टाकली.
(मला शहर व तो मोल व्यवस्थित माहिती आहे पण त्याचे नाव देत नाही. तुम्हाला हवा असेल तर व्यनि करा )
या धाडीत त्यांना असे आढळुन आले की सर्व माल किलोला ७५-100 ग्राम कमी होता. मात्र त्या मोल मधील वजनमापकावर १ किलोच दिसत असे.
त्या मोल मधील सर्व वजनमापके परिक्षण केली असता ९२५ ग्राम ला १ किलो अशी सेट केलेली होती.
त्या मोल मधील स्टोअर्स मधे प्याकिंग वरिल एम आर पी वर फेरफार करताना दोघांना रंगेहाथ पकडले
आणि महत्वाचे म्हणजे २००० रु वरिल सर्व विक्री बिलात बेरजांची चुक होती (!)
(त्या अधिका-यांना म्याटर सेटल करण्यासाठी ५ लक्ष रुपयांची ओफर दिली होती जी त्यांनी ठोकरली. त्यात एक माझा अतिशय जवळचा मित्र आहे ज्याचा मला अभिमान आहे)
नाना
असे मला वाटते...
जे लोक शिकलेले नाहीत( मी वयस्कर लोकांबद्द्ल बोलते) काही कारणामुळे. जे लोक स्वतःचा संसार, मुले बाळे सांभाळून पार्ट टाइम काम करण्यासाठी उत्सुक असतात.त्यांच्या बद्द्ल बोलत आहे.
मॉल आले कि क्लिनिंग, पार्किंग व्यवस्था, सिक्युरीटी, इत्यादी..
तसेच जे शिकलेले आहेत.. त्यांना कॅशिअरची मिळेल.
आणखी एक मुद्दा हे शॉपिंग मॉल काढणारे माल डायरेक्ट शेतकर्यांच्या कडून घेणार असे पण ऐकले आहे...
जे लोक
जे लोक शिकलेले नाहीत( मी वयस्कर लोकांबद्द्ल बोलते) काही कारणामुळे. जे लोक स्वतःचा संसार, मुले बाळे सांभाळून पार्ट टाइम काम करण्यासाठी उत्सुक असतात.त्यांच्या बद्द्ल बोलत आहे.
भारतातल्या किती मोल्स मधे तुम्हाला वयस्कर, गरजु लोकांना काम करताना पाहीले आहे? मी एकदाही पाहिले नाही. नोकरीच्या जाहिरातीत वय वर्षे २५ पेक्षा कमी , पदवीधर असावा किंवा असावी असाच उल्लेख असतो.
शॉपिंग मॉल काढणारे माल डायरेक्ट शेतकर्यांच्या कडून घेणार असे पण ऐकले आहे...
फक्त शेती माला संबंधी विचार चालु नाही
मॉल आले कि क्लिनिंग, पार्किंग व्यवस्था, सिक्युरीटी, इत्यादी..
तसेच जे शिकलेले आहेत.. त्यांना कॅशिअरची मिळेल
तुम्ही कदाचित भारतात रहात नसाल. भारतातील मेट्रो मधे किंवा परदेशात रहात असाल तर तुम्हाला भारत समजणार नाही
भारतात आजही कित्येक खेडी अशी आहेत ज्यांना वीज काय असते ते माहित नाही
कित्येक खेड्यात किंवा तालुक्यात १४=१८ तास वीज नसते
कधी गेला आहात तुम्ही अशा ठिकाणी?
एक मोल साधारणत २००० वस्तीचे गाव वापरेल एवढी वीज दिवसभरात वापरतो. अंधार करुन वीज वापरुन उजेड पाडला जातो.
हिच वीज गावाकडे वळली तर गावात रोजगार निर्मिती होइल पण लक्षात घेतो कोण?
स्वयंरोजगारा पेक्षा नोकरी चांगली अशी विचारसरणी नाहि या देशाला प्रगतीवर नेणार...
असो
अमेरीकेत काय चालले ते नीट पहा
वादळात वाळुत तोंड खुपसुन वादळ नाहिच अशी समजुत करुन घेणा-या उंटाप्रमाणे अवस्था होवु द्यायची नसेल तर नीट बघा
एक फार मोठी उलथापालथ येवु घातली आहे जगभरात
काळजी घ्या
नाना
विजेचा मुद्दा महत्त्वाचा आहे..पटला..
<मी फार वीज जाळणार्या मॉल मध्ये नेहमी जात नाही... वाणसामानासाठी नेहमी सुभिक्षात ..तिथे एसी नसतो....वीज वाया घालवणार्या वस्तूंचा अनावश्यक वापर नसतो...सुविधा बर्या असतात्....डिस्काउंट मिळतो...अजून काय हवे??
मला बुवा
मला बुवा त्या पॉश वातानुकुलीत वातावरणात जायला आवडते .... त्यात मी वाईट वाटून घेण्यासारखे काय आहे?
वरचा प्रतिसाद व हा प्रतिसाद ....
बघा बुवा
नाना
मॉलपेक्षा वाणी बरा
मॉलपेक्षा वाणी बरा. वाण्याशी डायरेक्ट संपर्क असतो. एक माणूसकीचा ओलावा असतो.
पण आज आपण माणुसकीचं हरवत चाललो आहोत. सगळयाचं कॉर्पोरेटायझेशन सुरू आहे.
मॉलमध्ये तुम्ही आलात काय......गेलात काय.... त्यांना काही फरक पडत नाही.
एखाद्याने स्वत:चे दुकान सुरू केले तर तेथे आवर्जून खरेदी करावी. हे त्याला प्रोत्साहन देण्याचे कार्य आहे. मॉलवाल्यांची मग्रुरी सहन करण्यापेक्षा कोपर्यावरचा वाणी बरा.
आपला,
(पारंपारिक) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
@नाना.... आमच
@नाना....
आमची चूक मान्य...आमचे हे मोठे कन्फ्यूजन असते....
_________________________
असो..पण इथे थोडे कन्फ्यूजन इतरांचे ही आहे... मोल मध्ये मिळणार्या सर्व वस्तू वाण्याकडे मिळत असत्या तर तुलना योग्य होती....
प्रत्येक .........
गोष्टीला फायदे व तोटे असतात. वाण्याचे गोड बोलणे खराब माल जास्त किंमतीला आपल्या गळ्यात मारणे, शर्यतीत टिकून राहाणे आणि मान्यवर ग्राहक आपल्याकडेच यावेत म्हणून गोड बोलतात. फाटक्या दिसणा-या कामाठ्याशी कसे बोलतात ते पाहा. मॉल्मध्ये स्वच्छता असते, लबाडी ही मॉल व वाणी दोन्हीकडे दिसेल. हल्लीच एका मॉलवर वैधमापन विभागाच्या अधिका-यांनी कारवाई केली होती. तेथे पाण्याच्या बाटल्या छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विकत होते. वाणी विक्रीकर जवळ जवळ भरतच नाही. मॉल बहुधा भरत आसावेत. अजूनतरी तसे प्रकरण उघडकीस आले नाही. या कसोटीवर तरी मॉल बरे वाटतात. परंतु जर राजकीय नेते जर मॉललालक झाले तर सांगता येत नाही. अर्थतज्ञांचे मत घ्यावयास हवे. परंतु एक गोष्ट नक्की. शेतक-याना वाजवी विक्री दर व सामान्य खरेदीदारास माल योग्य किंमतीस कधीही मिळणार नाही. अवाच्या सव्वा नफा कमवणे हेच या दोन्हींचे सूत्र आहे.